Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूरच्या हजरत सय्यद बाबा उरूस व रामनवमी यात्रोत्सवाची या वर्षाची सुरुवात करणारा शुभारंभाचा कार्यक्रम बहारदार असा अखिल भारतीय कौमी एकता मुशायरा (कवि संमेलन) उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती मुशायरा कमेटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण यांनी दिली.मुशायऱ्याचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

 तेवीस वर्षांपूर्वी शहराच्या यात्रोत्सवाला जोडून मुशायरा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून कोरोना काळ वगळता उद्या होणारा हा अठरावा कार्यक्रम आहे असे ही त्यांनी सांगितले.

उद्या होणाऱ्या अखिल भारतीय मुशायरा व कवी संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू शायर अबरार काशीफ तसेच मराठीचे जांगडगुत्ता फेम सुप्रसिद्ध कवी मिर्झा एक्सप्रेस यांचे सह आंतरराष्ट्रीय हास्य कवी राहत हरारत (तामिळनाडू),सुप्रसिद्ध उर्दू शायर कमर एजाज (औरंगाबाद),झहीर अख्तर (बहाणपूर),

इर्शाद अंजूम (अनाऊन्सर),हिंदी कवी

कपिल जैन (यवतमाळ),

हास्य कवी इब्राहीम सागर (धुलिया),

रोबोट मालेगावी तसेच

इर्शाद वसीम (नासिक) व शाकिर अहमद शाकिर (जामखेड) हे नामवंत कवी व शायर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुशायरा कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद रफीक शेख यांनी दिली.

गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम सय्यद बाबा दर्गा समोरील मैदानावर घेतला जात होता.परंतु तेथे रेल्वे खात्याचे बांधकाम झाल्याने जागा नसल्याने यावर्षी हा कार्यक्रम रेल्वे स्टेशन समोरील बॅरिस्टर रामराव आदिक पुतळा समोर असलेल्या मैदानात घेण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष व सय्यद बाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष मुन्ना पठाण यांनी दिली.

सय्यद बाबा उरूस व रामनवमी यात्रेनिमित्त होणारा हा मुशायरा कार्यक्रम खूपच लोकप्रिय असून या कार्यक्रमासाठी आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक शायर व कवी यांनी श्रीरामपूरात उपस्थिती लावली आहे. अबरार काशिफ यांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध उर्दू शायर यांना ऐकण्याची संधी श्रीरामपूरकरांना प्राप्त झाली असून काव्य रसिक व मुशायरा प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुशायरा कमिटीचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी केले आहे.

श्रीरामपूर शहराचा जातीय सलोखा व शहरवासीयांचे एकमेकांशी असलेले स्नेहबंध दृढ करण्यासाठी कौमी एकता मुशायरा हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतो. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्वपक्षीय व सर्व धर्मीय नेते,कार्यकर्ते,नागरिक यांचा सहभाग हा उल्लेखनीय आहे.

श्रीरामपूरची शान वाढविणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी एक पर्वणी आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुशायरा कमेटीचे संघटक मुनीर शेख यांनी केले आहे.


उद्या होणाऱ्या या मुशायरा व कवी संमेलनास सर्व काव्य व शायरी प्रेमी रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुशायरा कमेटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण,अध्यक्ष मोहम्मद रफिक शेख,

स्वागताध्यक्ष मुन्नाभाई पठाण,कार्याध्यक्ष संजय जोशी,संघटक मुनीर भाई शेख,उपाध्यक्ष - डॉ. रविंद्र कुटे,रियाज पठाण,जावेद काझी, शांतीलाल पोरवाल,

मुख्तार मनियार,गणेश मगर,एजाज शेख,

मोहम्मद रफिक (बाबा),

सचिव आसिफ शेख,

सहसचिव सलीम जहागिरदार,खजिनदार

साजीद मिर्झा, सह खजिनदार फिरोज पोपटीया,दर्गाह विश्वस्त

दिलावर पेंटर,सदस्य - सौ.रंजनाताई पाटील, रविंद्र गुलाटी,राजेश अलघ,श्रीनिवास बिहाणी,हरीश ओबेराय,

अनिल पांडे,ॲड.बाबा शेख,गफ्फार पोपटीया,

इरफान जिवाणी,ॲड. बाबा औताडे,

रज्जाकभाई फिटर,ॲड. कलिम शेख,महाराज कंत्रोड,गुलशन कंत्रोड,

नरेंद्र पाटणी,सुनिल गुप्ता,मंजीत चुग,अशोक गाडेकर,लालमहंमद जहागिरदार, रवि भागवत,मनोज आगे, महेश माळवे,

अशोक उपाध्ये, संजय छत्ल्लारे,भगवान उपाध्ये, सुनिलराव बोलके,अशोक सातुरे,

शाहिद कुरेशी, साजिद खान,पुरुषोत्तम झंवर,

राजेंद्र सोनवणे, प्रताप देवरे,डॉ. निशिकांत चव्हाण,डॉ. ज्ञानेश्वर राहिंज,डॉ. सुनील उंडे,संजय माखीजा,

रज्जाक पठाण,सय्यद फारुक सर,जाकीर सय्यद (सर), अल्ताफ शेख,नजिरभाई शेख,

सत्यनाथ शेळके, राजु दारुवाला,अरुण मंडलिक,मो.बदर शेख, फिरोज शेख,साबिर शेख, बाळासाहेब सरोदे, प्रदिप दळवी,जितू विळस्कर,अभिजीत मुथा,सागर वर्मा,सादिक शिलेदार,फिरोज हमिद खान,जावेद हमीद शेख,लकी सेठी,इज्जू इनामदार,शकील खान, अमरप्रीत सेठी,अण्णा इंगळे,युसुफ शहा,

असलम बिनसाद,जयेश सावंत,मयूर पांडे,

भाऊसाहेब भोसले, शरीफ मेमन,युसूफ लाखाणी आदींनी केले आहे.

कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-एस के सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर शाळेत ईयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणारा चिरंजीव साईश रामेश्वर ढोकणे याने ध्येय प्रकाशन संचलित आय एम विनर या परीक्षेत २०० पैकी १९८ गुण मिळवुन राज्यात दुसरा क्रमांक मिळवीला.या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.              तसेच मंथन स्पर्धा परीक्षेत १५० पैकी १३६ गुण मिळवुन राज्यात आठवा तर जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला महात्मा फुले प्रज्ञा शोध जिल्हा स्तरीय स्पर्धेत १५० पैकी १३० गुण मिळवुन द्वितीय क्रमांक मिळविला .तर कँमेरेज हाय इंटरनँशनल स्कूल अँण्ड ज्युनिअर काँलेज संचलित कौन बनेगा लिटल इन्स्टेंन या तालुका स्तरीय स्पर्धेत १०० पैकी १०० गुण मिळवुन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला . साईश ढोकणे हा श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे हवालदार रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव आहेत.त्यास एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका पैठणी मँडम तसेच वर्गशिक्षिका श्रीमती मेघा पवार ,यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले .या वेळी आपले आयडाँल विश्वास नांगरे पाटील असल्याचे चिरंजीव साईश याने बोलुन दाखविले.

श्रीरामपूर प्रतिनिधी:- येसगाव तालुका खुलताबाद तेथील  सामाजिक कार्यकर्ते व विहीर ठेकेदार अली मुंशी शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्य पदावर निवड करण्यात आली असून राजनीति समाचार वेब चॅनलच्या खुलताबाद प्रतिनिधी पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले आहे

पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात अली मुंशी शेख यांना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करून निवड केली अली शेख यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार, युवक प्रदेशाध्यक्ष संदीप पवार, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज महंमद के. शेख, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट विलासराव पठाडे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, मराठवाडा प्रदेश महासचिव मीर अली सय्यद, महाराष्ट्र प्रदेश महासचिव उस्मान शेख, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राज महंमद आर. शेख, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजलखान, पुणे शहर अध्यक्ष हनीफ भाई तांबोळी, धुळे जिल्हाध्यक्ष रईस हिंदुस्तानी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज खान पठाण, महाड जिल्हाध्यक्ष मुदस्सीर पटेल, नासिक जिल्हाध्यक्ष सुखदेव केदारे, यांच्यासह पत्रकार संघाच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर - मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली ईद-उल-फितर अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साहात शहर व परिसरात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील ईदगा व जामा मशीद सह शहरातील सर्वच मशीदींमध्ये ईद निमित्त नमाज पठण करण्यात आले .

बुधवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर ईदच्या तयारीला वेग आला. रात्री उशिरापर्यंत चौका चौकात व शहरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी मुस्लिम बंधू-भगिनींची झुंबड उडाली होती. सर्वच मशिदीमधून रात्री लैलतुल जायजा ची विशेष प्रार्थना करण्यात आली.


काल सकाळी नऊ वाजता जामा मशीद मध्ये ईद ची नमाज अदा करण्यात आली. प्रमुख धर्मगुरू मौलाना मोहम्मद इमदाद अली यांचे धार्मिक प्रवचन झाले. मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांनी ईदच्या नमाज ची इमामत केली.

ईदगामध्ये दहा वाजता ईद ची नमाज संपन्न झाली.मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन यांचे धार्मिक प्रवचन झाले. शहर काजी मौलाना सय्यद अकबर अली यांनी नमाजची इमामत केली.

याशिवाय शहरातील मक्का मस्जिद, मदिना मस्जिद,गौसिया मस्जीद, मदरसा रहमते आलम, मुसा मस्जिद, गरीब नवाज मस्जिद, जैनब मस्जिद सह अनेक मशीदींमधून ईद ची नमाज अदा करण्यात आली .

जामा मस्जिद व ईदगामध्ये मुस्लिम बांधवांना ईद मुबारक च्या शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार लहुजी कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी नगराध्यक्ष संजय फंड,माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, शिवसेना नेते संजय छल्लारे,अशोक थोरे मामा,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, हेमंत ओगले, अशोक उपाध्ये, जयंत चौधरी,माऊली मुरकुटे, अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक नाना कानडे, महेंद्र त्रिभुवन, अशोक बागुल, डॉक्टर रवींद्र कुटे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लकी सेठी, दिलीप नागरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे, डॉक्टर दिलीप शिरसाट,नितीन गवारे, रवी भांबरे, कैलास बोर्डे, प्रसन्ना शेटे, अविनाश पोहेकर, संजय फरगडे, संदीप चोरगे, तेजस बोरावके,विजय खाजेकर, सुभाष त्रिभुवन, मिलिंदकुमार साळवे,अशोक भोसले, डॉक्टर संजय साळवे, सत्यनाथ शेळके,नितीन गवारे,अरुण मंडलिक, गोरख कंदलकर, दीपक कदम, प्रवीण जमदाडे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अर्चना पानसरे,सोनल मुथा आदिसह विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

ईदगामध्ये आमदार लहुजी कानडे यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मुस्लिम समाजासाठी केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली तर एडवोकेट जयंत चौधरी यांनी ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक अविनाश आदिक व अनुराधा आदिक यांनी मुस्लिम समाजासाठी केलेले काम मुस्लिम समाजाला ज्ञात आहे असे सांगितले.

जामा मशीद मध्ये नगरसेवक मुख्तार शहा, डॉक्टर राज शेख, रज्जाक पठाण, जावेद शेख, मोहसीन बागवान, तनवीर रजा यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर इदगाह मध्ये कमिटीचे अध्यक्ष मुजफ्फर शेख,जिकर मेमन, गफार पोपटिया, याकुब बागवान, अश्फाक शेख व इतर मान्यवरांनी स्वागत केले.

येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने देशाचे भले करणाऱ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी याप्रसंगी केले.ईदच्या नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.तहसीलदार वाघ तसेच पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक मिलिंद देशमुख यांच्यासह पोलिस विभागाने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.शांततेत ईद संपन्न झाली.

राज्यातील विविध वर्तमानपत्रातून रमजान लेखमालेचे लेखन करून समाज जागृती केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा जामा मस्जिद मध्ये आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बेलापुर (प्रतिनिधी  )-बेलापुरात ईदगाह मैदानावर नमाज पठण करुन मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद साजरी केली या वेळी हिंदु बांधवांनी देखील रमजान ईदच्या  शुभेच्छा दिल्या . महीनाभर उपवास (रोजा) केल्यानंतर काल चंद्रदर्शन झाले अन मुस्लीम बांधवांनी मोठ्या उत्सहात ईद साजरी केली .ईदगाह मैदानावर सकाळी सर्व मुस्लीम बांधव ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी  जमा झाले होते. या वेळी मौलाना  मुफ्ती मुर्शिदा रजा यांनी नमाज पठण करुन सर्वांना सुख शांती लाभू दे ,पाऊस वेळेवर व भरपुर पडू दे, रोगराई कमी येवु दे अशी प्रार्थना अल्लातालाकडे केली. या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले उपसभापती अभिषेक खंडागळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड,उपसरपंच मुस्ताक शेख,माजी सरपंच भरत साळूंके , प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, पत्रकार देविदास देसाई ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,प्रभात कुऱ्हे,गावकरी पटसंस्थेचे संचालक महेश कुऱ्हे,यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या वेळी मोहसीन सय्यद यांनी मस्जिद बांधकामासाठी मदतीने अवाहन केले त्यास मुस्लीम बांधवांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रभात कुर्हे  पत्रकार हाजी शफीक बागवान आदिसह जवळपास दोन ते आडीच हजार मुस्लीम बांधवा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्व नियोजन जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे काँन्स्टेबल संपत बडे भारत तमनर नंदकिशोर लोखंडे ज्ञानेश्वर वाघमोडे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे सलग पाचव्या वर्षी पूर्ण महिन्याचे रोजे उपवास करून येथील लताबाई पोपटराव वाघचौरे(औटी मॅडम) यांनी धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व थरातून स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन होत आहे.सौ.लताबाई वाघचौरे या नगरपालिका शाळेच्या सेवानिवृत्त पदवीधर शिक्षिका आहेत.आज त्यांचे वय 60 वर्षे आहे. कोरोना काळात 2020 पासून दरवर्षी त्यांनी पवित्र रमजान महिन्याचे महिनाभराचे पूर्ण रोजे करण्यास सुरुवात केली आणि यावर्षी सलग पाचव्या वर्षी हे रोजे पूर्ण केले आहेत.याबाबत बोलताना सौ. वाघचौरे यांनी सांगितले कि रमजान महिन्यात रोजी धरण्याची परंपरा आमच्या कुटुंबात फार पूर्वीपासून आहे.माझी आजी सासू तसेच सासूबाई या सुद्धा रमजानचे रोजे घरीच होत्या सोनगाव येथील जी मशिद आहे तेथे माझे सासरे व सासू यांनी नवस केला होता त्यानंतर त्यांना पाच मुले झाली.त्यानंतर माझ्या सासूबाईंनी हे व्रत चालू ठेवले.त्यांना पाहून मी सुद्धा मला मुलगा झाला तर मी रोजे ठेवीन असा नवस केला.1992 साली मला पुत्रप्राप्ती झाली त्यानंतर मी 1994 पासून रोजी धरण्यास सुरुवात केली. सुरुवातीची 28 वर्षे मी दोन ते दहा पर्यंत रोजी दरवर्षी करीत होते परंतु कोरोना काळात सन 2020 पासून मी पूर्ण महिन्याचे रोजे करण्यास सुरुवात केली आणि आता यावर्षी सलग पाचव्या वर्षी मी रमजान चे पूर्ण महिन्याभराचे रोजे पूर्ण केले आहेत.रोजे पूर्ण केल्याने शरीर शुद्ध होते तसेच वर्षभर प्रसन्न वाटते.मला अस्थम्याचा त्रास होता परंतु रोजचे धरणामुळे तो त्रास सुद्धा गेला.मला चैतन्य वाटते शिवाय देवावर असलेल्या आढळ श्रद्धेमुळे आज वयाच्या साठाव्या वर्षी सुद्धा कडक उन्हाळ्यातही मला कसलाही त्रास झाला नाही.अल्लाह च्या कृपेने दरवर्षी माझी मनोकामना पूर्ण होते. यावर्षी माझ्या सुनबाई डॉक्टर झाल्या तसेच माझ्या मुलाला व मुलीलाही मुलगा झाला.मी खूप आनंदी आहे अल्लाहने सर्वांना आनंदी ठेवावे हीच माझी प्रार्थना आहे.माझ्या या संकल्पपूर्तीमध्ये माझे पती पोपटराव वाकचौरे मुलगा डॉक्टर गणेश सून डॉक्टर रचना यांचे खूप सहकार्य लाभले त्यांनी रोजी धरण्यासाठी मला प्रोत्साहन दिले.या कामे माझे बंधू सलीमखान पठाण यांचे सुद्धा मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले असेही त्यांनी सांगितले.सौ लताबाई वाघचौरे यांनी रमजानचे रोजे पूर्ण करून हिंदू मुस्लिम तालुक्याचे उत्तम उदाहरण समाजासमोर घालून दिले आहे त्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

दिनांक ०६/०४/२०२४ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हा अन्वेषण मोहीम राबवून नांदूर शिवार ता. राहाता येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणे नष्ट केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर चे निरीक्षक श्री अनुपकुमार देशमाने यांनी दिली.

सदर कारवाई मध्ये एकूण ०१ गुन्हा नोंद करण्यात आला असून ४१८० ली.कच्चे रसायन व ३०० ली . हातभट्टी गावठी दारू व हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे लोखंडी व प्लॅस्टिक बॅरल व इतर साहीत्य नष्ट करण्यात आले आहे. सदर मुद्देमालाची एकूण किंमत रु.२,०४,८००/- इतकी आहे सदर कारवाईत एकूण ०१ आरोपी वर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद कारण्यात आला आहे.

सदरील कारवाई श्री. प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर श्री. प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर, श्री जी. एन. नायकोडी दुय्यम निरीक्षक, श्री एस. एस. पवार दुय्यम निरीक्षक, श्री के. के. शेख सहा. दुय्यम निरीक्षक, श्री एस.डी.साठे सहा. दुय्यम निरीक्षक, श्री. तौसीफ शेख जवान, व महिला जवान श्रीमती एस. आर. फटांगरे, श्री एन.एम. शेख जवान नि वाहन चालक यांनी सहभाग घेतला आहे. अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती व विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र २ श्रीरामपूर यांनी दिली.

asten

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget