Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-  देशात होणाऱ्या निवडणूका या पारदर्शीपणे व्हाव्यात या उदात्त हेतूने बारा ओळखपत्रांची यादी जाहीर केली.मात्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदाराकडे असल्यास तो मतदान करू शकेल.असे असले तरी बारा पैकी अकरा ओळखपत्र हे बनावट असु शकते असा दावा येथील भाजपाचे जेष्ठ नेते व  सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुथा यांनी केला आहे.

या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सुनिल मुथा यांनी म्हटले आहे की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस ओळखपत्रे तयार करण्याचा गोरख धंदा जोरात सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पारदर्शी मतदानाच्या मूळ हेतुलाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे..

या प्रकाराची खातर जमा करण्यासाठी बेलापूर येथील भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी काही प्रतिष्ठित व्यक्तींचे बोगस आधार कार्ड बनवून घेऊन या कृत्याचा पर्दाफाश केला आहे.त्यांनी समाजातील काही जबाबदार व्यक्तींचे बनावट ओळखपत्र कसे तयार होते याचा अनुभव स्वतः घेतला.काही लोक कागदपत्राची पडताळणी न करता बनावट आय डी प्रुप तयार करुन देत असल्याचा आरोप मुथा यांनी केला आहे .

यामुळे मतदान केंद्राच्या ठिकाणी ओळखपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी मजबुत  यंत्रणा असणे अत्यावश्यक बनले आहे. याखेरीज बोगस मतदान टाळणे केवळ अशक्य असल्याची चिंता सुनील मुथा यांनी व्यक्त केली आहे.

या बोगस ओळखपत्रांचा वापर करून एसटी महामंडळालाही दरवर्षी लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याचेही बऱ्याच प्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असे बोगस ओळखपत्र वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मार्फत हे ओळखपत्र बनवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे.

तरी निवडणूक आयोगाने सदर बाब गांभीर्याने घेऊन त्याकरीता आवश्यक असलेल्या उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात अशी मागणी सुनील मुथा यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात केली आहे.

लोकांनों ! आम्ही तुम्हाला ( सर्वांना) एकच पुरुष व एकाच स्त्री पासून निर्माण केले आहे  ;  मग तुमची राष्ट्रे व वंश ( कबीले,व वंश ) बनविले ,.  जेणेकरून तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे ( ओळखावे) ;    परंतु अल्लाह जवळ तुमच्या पैकी सर्वात जास्त श्रेष्ठ ( प्रतिष्ठित) तोच असणारं आहे, जो चारित्र्याने श्रेष्ठ असणारा..". ( पवित्र कुरआन पारा नं. २६ , सुराह अल - हुजूरात नं. ४९ ,आ .न. १३ वी. )   

            जागतिक पातळीवरील   "फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२  " चे आयोजन ,  रविवार  दिनांक २०  नोव्हेंबर २०२२  रोजी  " दोहा- कतार "  येथील  अल- खोर च्या  अल - बायन स्टेडियमवर   उद्घाटन समारंभ संपन्न झाला . यामध्ये अमेरिकेचा  प्रसिद्ध  हॉलिवूड  अभिनेता  मॉर्गन फ्रिमॅन  व फिफा फुटबॉल  विश्वकप चा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर केलेल्या(Ghanim Al miftahi ) घानिम - अल - मुफ्ताह हा कॉउडल - रिग्रेशन सिंद्रोम (Caudal Regression Syndrome)  ज्यांचे स्पायनल कॉर्ड ( मेंदुरजजा)  चा दुर्धर दुर्मिळ आजार झालेला,   अपंगत्वावर मात करून  कुरआन हाफीज व कारी  झालेला  , उद्घाटनप्रसंगी मंचावर येऊन  पवित्र कुरआन मधील वरील आयात (श्लोकाचा ध्वनी)  म्हणून सुरुवात केली गेलीत .

 ते सुद्धा असंख्य देशातील फुटबॉल  खेळणाऱ्या सदस्यांचा  विरोध डावलून,   जगातील सर्वात बडे  ५०० पेक्षा ही जास्त  टी. व्हि. चॅनेलनी २०० देशात लयीव्हि Live telecast) प्रक्षेपण केले. कित्येक कोटी लोकांनी याच देह याचं डोळ्यांनी लाईव्ह शो बघितले.

    

 एवढ्या मोठ्या आतंरराष्ट्रीय प्रक्षेपणात  विरोध डावलून मंचावर पवित्र कुरआण सुराह अल - हुजूरात ची १३ वीच आयात   का ??? म्हणून  सुरुवात केली असेल.??? .

  म्हणुनच या श्लोकाचा अर्थ  समजून घेताना:- 

या आयातीत अखिल मानवजातीला उद्देशून सर्वोच्च अल्लाहने तीन महत्त्वाचे तात्विक विवेचन केले आहेत.  ते सांगतात की, " तुम्हा सर्वांचे मुळ एकच आहेत. एकाच पुरुष व एकाच स्त्री पासून तुमचा वंश  अस्तित्वात आला( निर्माण केले) आहे .  आज जगाच्या पाठीवर जे जे वंश आढळतात ते वास्तविकपणे एकाच आई व वडीलांपासून  त्यांचा प्रारंभ झाला आहेत .त्याच्याच वंशाच्या अनेक शाखा आहेत.(२) परंतु आपल्या मुळ स्वरुपाच्या एकच असताना देखील त्यामधे तुमचे विविध राष्ट्र ( देश ) , विविध जाती , विविध कुळात , विविध कबील्यांत, विविध भावक्यात,  तुम्हाला विभागले जाणे स्वाभाविकच होते . परंतु या स्वाभाविकच विभागात विभागलेल्या कुळं या आधारावर बिलकुलच नव्हते केली की ती  उच्च- निचच, श्रेष्ठ- कनिष्ठ, स्पृश्य- अस्पृश्य , असले भेदभाव मतभेद व्हावेत असे , बिलकुल नव्हतेच केले होते .किंवा एका वंशाने दुसऱ्या वंशावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावे अथवा सत्ता -हुकूमत गाजवावे,  किंवा एका वर्णाच्या लोकांनी दुसऱ्या वर्णाच्या लोकांना तुच्छ,क्षुद्र मानावे  किंवा एका मोठ्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर जम, हुकूमत प्रस्थापित करावी ,..

हो , निर्माण करत्याने या एकाच कारणास्तव मानवी समुहानां  राष्ट्र व वंशांच्या स्वरूपात उभारले होते ते फक्त त्याच्या दरम्यान परस्परांत सहकार्य सहकार व ओळखण्याची एक स्वाभाविक रित - खून ( सिंबोल, चिन्ह  )  होती ..(३)  त्यात , माणसं माणसांच्या दरम्यान श्रेष्ठत्व व उच्चतम तेचा आधार जर कोणता असेल तर तो फक्त केवळ उच्च नितीमत्ता व उच्चतम नैतिकतेचा.  ;  जर अल्लाहला जर सर्वात श्रेष्ठ तो असेल ,ज्यांची नैतिक नितीमत्ता उच्च दर्जाची असेल ..तेच अल्लाह ( ईश्वर) ला आवडते...!.

त्या दोहा कतार येथील आंतरराष्ट्रीय फिफा फुटबॉल  विश्वकप २०२२. च्या उद्घाटनप्रसंगी मंचावरून सांगितलेल्या पवित्र कुरआन मधील सुराह अल - हुजूरात च्या १३ व्या आयाती(श्लोका) चा अर्थ सर्व धर्मांच्या लोकांना सर्व जगाला हेच संबोधित करायचे होते की आपण सर्व एकच आहोत ..एकच आहोत ...

परंतु त्यांनी त्या अपंगत्व आलेल्या घानिम अल - मुफ्ताहीचीच निवड केली की अल्लाह ( ईश्वरा) ला  अपंग - धडधाकट - काळे- गोरे सर्व सारखेच  आहेत...

     अर्थात:-" वसुधैव कुटुंबकम "

" The world 🌎🌍 is one family "

हे संस्कृत शब्द आहे ज्यांचां अर्थ संपूर्ण जग एकच कुटुंब आहे.. हिंदी मधे " धरती ही परीवार है '

 " उद्देश हेच होता  -- विश्व व्यापक बंधुत्वाचा  संदेश."

त्या कतार मधील जागतिक फुटबॉल संघटनेचा जगातील सर्वांना एकतेचा अखंड तेचा च संदेश अभिप्रेत असावा...या साठी जगातील सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले तर खरोखरच हा विचार मानव कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक ठरेल ... अल्लाहाला मानवता धर्म कायम राखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे काम करणाऱ्या लोकांना जरूर पसंत करतात...जो अल्लाह ( परमेश्वर) ला आवडतो तो सर्वांना आवडतो ...

सर्वांनी आपल्या नितीमत्ता व उच्चतम नैतिकतेचा आदर्श निर्माण करून अल्लाह ( ईश्वरा) चे आवडते  , श्रेष्ठ ..व्हावे...


( मित्रांनो लेख काळजीपुर्वक वाचुन आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा , आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा..)



लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख,

बैतुशशिफा हॉस्पिटल -मिल्लतनगर ,

श्रीरामपूर 

 ९२७१६४००१४

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या बेलापुर खुर्द येथील प्रा. बाबासाहेब शेलार यानी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याची दखल शासनाने घेवुन त्यांना डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार  दिला ही बेलापुरकराच्या नव्हे श्रीरामपुर तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे गौरोद़्गार अरुण पा नाईक यांनी काढले                    सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रा. बाबासाहेब शेलार  यांना नुकताच प्रदान करण्यात आला. त्याबद्दल प्रा. शेलार  यांचा ग्रामपंचायत बेलापूर विविध सामाजिक संघटना बेलापुर ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला होता .त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन नाईक बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच  अँड दीपक बारहाते ,  करण दादा ससाने द्वारकनाथ बडधे बापुसाहेब पुजारी प्राचार्य काळूराम बोर्डे विजय शेलार सुभाष त्रीभुवन उपस्थित होते,या वेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. बाबासाहेब शेलार म्हणाले की मला आतिशय गरीब परिस्थीतून शिक्षण घ्यावे लागले गरीबीचे चटके सहन करतानाच गावातील काही समाज कार्य करणाऱ्या समाजसेवकाशी संपर्क आला अन समाजसेवेचे खुळ डोक्यात शिरले समाजसेवेतुन मिळणाऱ्या  आनंदाचे मोलच होवु शकत नाही .मी कधीच अपेक्षा ठेवुन कुठलेही सामाजिक काम केले नाही आपल्या सर्वाच्या आशिर्वादामुळे मला महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला हा माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल दागीना असुन या पुढेही माझे कार्य असेच सुरु ठेवणार असल्याचे शेलार म्हणाले या वेळी श्री हरिहर केशव गोविंद बन येथील विश्वस्त बापुसाहेब पुजारी पत्रकार देविदास देसाई आलम शेख कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले बाबासाहेब दिघे काँग्रेसचे हेमंत ओगले  द्वारकनाथ बडधे दिपक बारहाते प्राचार्य काळूराम बोर्डे प्रा.सोळसे मुख्याध्यापक ना म साठे संजय शिंदे विजय शेलार सुभाष त्रिभुवन आदिनी मनोगत व्यक्त केले  या वेळी प्रशांत होन  गोरख भगत प्रा. तुकाराम सोळसे  प्राचार्य काळूराम बोरुडे, विश्वनाथ आल्हाट  उत्तमराव शेलार रवि शेलार, विजय शेलार  माजी उपसरपंच शरद पुजारी संदेश विसपुते विलास  भालेराव , मधुकर पुजारी  ना. म. साठे, कार्याध्यक्ष,  बहुजन रयत परिषद  प्रभाकर क्षीरसागर भगवानराव जगताप दादू नेटके  संजय शेलार,दिलीप दायमा आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरुण बोरुडे व संजयकुमार शिंदे यांनी केले.प्रास्ताविक जागृती प्रतिष्ठाणचे सचिव रविंद्र शेलार यांनी केले तर आभार .प्रभाकर क्षिरसागर यांनी मानले

बेलापुर (प्रतिनिधी  )- :बेलापुर व परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील विज मोटारीच्या केबल चोरुन त्यातील तांब्याची तार विकणारे दोन व तार विकत घेणारा असे  तीन आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे . श्रीरामपुर तालुक्यातील एकलहरे शिवारातील एकलहरे- टिळकनगर रस्त्यांच्या कडेला शेती महामंडळाच्या शेतात भल्या सकाळी केबल चोरट्यांना येथील शेतकऱ्यानी केबल जाळतांना रंगेहाथ पकडले मात्र चोरट्यांनी सदर शेतकऱ्याला दमदाटी देत घटनास्थळावरून पोबारा केला या बाबतची माहीती बेलापुर पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवीली पोलीसांनी गणेश संतोष आल्हाट यास ताब्यात घेतले पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आदित्य नामदेव आहेर रा वडजळी भोकर याचे नाव सांगितले पोलीसांनी तातडीने आरोपी आहेर याची माहीती घेवुन त्यास शिताफीने अटक केली.तसेच आणखी काही जण पोलीसांच्या रडारवर असुन एक इसम संशयीत म्हणून ताब्यात घेतला आसल्याची माहीती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.तसेच चोरीची तांब्याची तार विकत घेणारा मुस्ताक याकुब शेख यास देखील ताब्यात घेतले असुन न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे   याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी भल्या सकाळी टिळकनगर-एकलहरे रस्त्याच्या महामंडळाच्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात काळकुट धुर निघत होता, एकलहरे येथील शेतकरी सदर रस्त्याने आपल्या शेतांत मोटार चालू करण्यासाठी जात असतांना सदर बाब शेतकऱ्याच्या निदर्शनास आली शेतकऱ्याने घटनास्थळी जाऊन बघितले असता,सदर चोरटे लंपास केलेल्या केबली जाळून नष्ट करत त्यामधून कॉपर तार काढून विक्री करण्यासाठी तयार करत होते. सदर शेतकऱ्यानी चोरट्यांना याबाबत हटकले असता, चोरट्यांनी सदर शेतकऱ्याला दमदाटी करत घटनास्थळावरून धूम ठोकली सदर शेतकऱ्यानी लगेचच बेलापूर पोलिसांना याबाबद माहिती देताच बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे पोलीस काँन्स्टेबल संपत बडे भारत तमनर नंदकिशोर लोखंडे ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून आरोपी बाबत माहीती घेतली  पोलीसांनी संशयावरुनआगोदर अल्हाट यास ताब्यात घेतले नंतर आहेर यास ताब्यात घेतले असुन पोलिसांना सदर जागेवरून वीस ते तीस किलो कॉपर तारेचा साठा जाळलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. एकलहरे ,उक्कलगाव, बेलापूर शिवारातील सातत्याने शेतकऱ्यांचे वीजपंप व केबल चोरीचे प्रकार समोर आले. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे., सदर आरोपीकडून सखोल तपास केल्यास या ताब्याच्या तारा स्वस्तात विकत घेणारा मोठा मासा गळाला लागु शकतो काल सदर घटनेने एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव येथील शेकडो शेतकऱ्यांनी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत आपापल्या चोरीला गेलेल्या मोटारी, केबल सह अन्य वस्तु बाबत तक्रार दिल्या आहेत. 


[ एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव क्षेत्राच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी रात्र वैऱ्याची ठरत आहे.येथील शेतकऱ्यांचे विद्युत पंप, केबल, स्टार्टरवर चोरटे डल्ला मारीत आहेत. यामुळे रात्री सुरू असलेला पंप सकाळी शाबूत असण्याची खात्री नाही. आमचा हजारोंचा वीजपंप व केबल चोरट्यांनी चोरून नेला आहे. उन्हाची वाढती तीव्रता, पिकांची पाण्याची गरज भागविताना होणारी दमछाक व चोरीची घटना यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोर चोरी करीत आहेत.पोलिसांनी गस्त वाढविण्याबरोबर चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे बनले आहे. - सचिन थोरात, शेतकरी, उक्कलगाव ]

आज २० विसावा रोजा  चालला आहे अर्थात पहिला अशहरा ( विभाग) " रहमत,( 'दये)चे संपलेंत ,  आज  २० रोजा पुर्ण  " मगफीरत '( माफी दैवून कृपादृष्टी )चे (१०- ते २० ) संपूं  राहिलेत , आज संध्याकाळी तिसऱ्या विभाग ( अशहारा ) हा " नरकाग्नितल्या ( जहान्नुम) च्या आगीच्या होणाऱ्या इंधनापसून संरक्षण " वाचण्यासाठी  पुढील दहा दिवस आहे , वेळ दिवस खुप लवकर संपत चाललेली ..आज संध्याकाळीच "लैलतुल -कद्र "  च्या पवित्र रात्रीं ( ज्यांचे पुण्य हे एका रात्रीचं एक हाजार महीन्यांच्यां रात्रीं पेक्षाही अधिक असतं) बरोबरच" एहतेकाफ "संध्याकाळ पासूनच सुरू होणार ,   आज ही अल्लाहच्या कृपेपासून विमुक्त आहोत . याचं महत्त्व आपल्या लक्षात घेतलं पाहिजे .   दुआ याचना करण्याच्या पर्वाचा प्रवास सुरू झाला आहे. 

                 एक ते वीस दिवसांत तुम्हाला तुमच्या व्यस्तते  ,हालगर्जीपणामुळे ,  त्याचं महत्त्व न समजल्यामुळे  अल्लाहा ( ईश्वरा) च्या एवढ्या मोठ्या पर्वाच्या संधीचा फायदा उचलला नाहीत  ,तर तुम्ही दरीद्रीच समजा. " मगफिरत "या पर्वात वर्षांनु वर्षे क्षणा क्षणाला ,कळत नकळत केलेल्या पापांची , चुकांची दुरुस्ती  , चुकांची माफी मागणं व अल्लाह ला पुन्हा पुन्हा या चुकीचं होणार नाहीत यासाठी कृपादृष्टी व्हावीत . याला म्हणतात "मगफिरत ' होणं. संपूर्ण आयुष्यभर श्रद्धांवान बांधव याच आशेवर जगत असतात की परमेश्वर( अल्लाह) ने आमची मगफीरत करावी..हे फक्त परमेश्वराच्याच हातात आहे.

आपण कळत नकळत चुका होतच असतात . एखाद्या शुल्लक चुका ; त्याला साधी लहान चुक समजतो , परंतु ती कोणां दुसऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानिची ठरु शकते  हे कधीच आपल्या लक्षात येत नसते , आशा चुक ही आपल्यासाठी नरकातील इंधनासाठी  पुरेशी ठरु शकते.  

पवित्र कुरआन  सांगितले की, " त्या ( कयामत)  दिवशी तुम्हाला वाचवणारा कोणी नसेल , त्या दिवशी स्वतः चे आई-बाबा मुलांना ओळख देणार नाही , बहीण- भावाला , पती -पत्नी ला ,मुलं- आई-बाबांना  ओळख देणार नाहीत . ज्याला त्याला स्वतःचं पडेल. " 

आयुष्यभर केलेल्या  चांगल्या -वाईट कर्मांचां हिशोब द्यावाच लागणार आहे . मग  त्यासाठी आजच तय्यारीला लागा .

तिसऱ्या टप्प्या ( अशराह )ला  २१ ते ३० ला सुरूवाती बरोबरच रमजानुल मुबारक मधील   पवित्र लैलतुल -कद्र च्यां   रात्रीं रोजा२१ , रोजा २३ ,रोजा २५ , रोजा २७- रोजा २९- रोजा ३० वी, या विषम संख्यात्मक " लैलतुल-कद्र " च्या  रात्रीं  असतात ,   या एक रात्र ही एक हजार महीण्यांच्या रात्रींच्यां  पेक्षा ही जास्त पुण्यंचीं फक्त एक  लैलतुल कद्रची  रात्रींचं पुण्यं - सबाब भेटतं.

दिव्य कुरआन मधे सांगितले ,  " आम्ही या( कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरले आहे .(१), आणि , तुम्हाला काय माहित ,की, " कद्र " ची रात्र काय आहेत ? म्हणून, (२), कद्र ची रात्र ही हजार महीण्यांपेक्षा ही अधिक  उत्तम आहेत (३),ईशदूत ( फरिशते) आणि रुह (जिब्राईल अलै.) त्यारात्री आपल्या पालनकर्तांच्या आज्ञेनुसार प्रत्येक आदेश घेऊन उतरतात (४),  ती रात्र म्हणजे पुर्णतः " शांती" आहेत व  उष: काळा पर्यंत...(५) ..( दिव्य कुराण ,सुरहा नं. ९७ .अल- कद्र आ.नं. १ ते ५).


त्याच बरोबरच आज २० व्या रोजा च्यां दिवसांपासून ते थेट ३० व्या रोजा पर्यंत १० दिवस सलग अल्लाहच्या याचने नतमस्तक होउन याचना करण्यासाठी बांधंव २४ तास १० दिवस बसतात त्यालाच " एहतेकाफ " ला बसणं.

जगात प्रत्येक मस्जिद मधे या शेवटच्या दहा दिवसांत एक तरी रोजेदार बांधंव बसणं गरजेचे आहे.दहा दिवस अल्लाह च्या भक्तीत बाहेरील जगाशी संपर्क तोडून - जग विसरून,  स्वतःच्या प्रंपाचाला बाजूला ठेवून , फक्त अल्लाहाला संपूर्णतः समर्पण करून- देह भान विसरून अल्लाहचच नामस्मरणात तल्लीन होऊन जाणं ..बस..

     या रात्रीच्या आलेल्या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा उचलून अल्लाहा जवळ सर्वस्वी अर्पण- लिन - तल्लीन होऊन छाती बदडून , रडून -डोळ्यात पाणी आणून , आयुष्य भर केलेल्या चुकांची जाणीव करून उदा. जाणते व  अजाणतेपणी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता व खात्री देउन गरीबांचे ,मजुरांचे , भिकारी, बहीण,भाउ , आई-बाबा , आजी-आजोबा, मित्र मंडळ , गिऱ्हाईक या सर्वांबरोबर कधीतरी  उच्च निच झाले असतील , एखाद्याला  वेडेवाकडे  अपशब्द वापरले गेले असतील , अपमानास्पद भाषेचा वापर झाला असेल, संशयास्पद वागणूक दिली गेली असेल,  कधी घमेंडी आली असेल , " मी " ही जागा झाला असेल, कधी" अहंकार" आला असेल , 

"अहंकार""रावर :- प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम . म्हणतात की, " ज्या व्यक्तींच्या मनात तिळमात्र देखील अहंकार असेल ,तो स्वर्गात जाणार नाहीत, " 

त्यावर त्यांच्या एका मित्र( सहाबी) ने विचारले की चांगले कपडे परिधान करणे, नव्या पादत्राणांचां वापर करणं, हे देखील अहंकारासारखंच आहे का? 

त्यावर प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी उत्तर दिले," अल्लाह सुंदर आहे आणि त्याला सौंदर्य आवडते, अहंकार हा आहे की तो सत्याला नाकारतो आणि दुसऱ्या लोकांना तुच्छ समजणे " ( हादिस ईब्न मस- उद , मुस्लिम.). कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नयेत. आपल्यातल्या " मी "पणा , अहंकार माणसाच्या आयुष्यात खूप गडबड करत असतो तर त्या मी व अहंकाराला बाजूला काढून टाकण्यासाठी अल्लाहच्या दरबारात येउन बाजूला काढण्याचं प्रयत्न करा .

         " , आपल्या व्यस्त जीवनाचा काही वेळ , जितकं वेळ मिळाला तेवढं का होईना वेळ काढून , एकांतात ,एका शांत जागी , निवांत बसून, अल्लाहा जवळ पुर्ण पणे लीन -शरण - समर्पित होउन - अगदी तल्लीन होऊन , निर्विकार पणे , अंतर्मनात दडलेल्या प्रत्येक  प्रत्यक्ष गुन्हेची , दुष्कृत्ये ची , काही घटना  फक्त आपल्यालाच माहीत असतात , आशा केलेल्या  गुन्हे ची माफी मागणं ,   आगदी मनापासून- मनमोकळेपणाने अल्लाहा (परमेश्वरा) बरोबर संवाद साधणं ..जसं  एका  खास मित्राला  मनमोकळेपणाने गप्पा मारतो तशा पध्दतीने अल्लाहा (परमेश्वरा) समोर मनापासून मनमोकळे करणं .याला रिते होणं , फक्त रिते होणे ‌, आत्मक्लेश करणे , आत्मचिंतन करणं ,  पुन्हा पुन्हा अल्लाहा( परमेश्वर )ला सांगणं पुढे कधीच  कोणत्याही परिस्थितीत अशा चुकीचं होणार नाही याची ग्वाही - खात्री देणं . म्हणजेचं मोकळे ,रिते होउन  अल्लाहा ( ईश्वराला) ला   राजी करणं .

आशा गोष्टींमुळे   जेव्हा आपण केलेल्या पापांची - गुन्ह्याची कबुली कुठे  तरी देत असतो  ;  निश्चितपणे माणुष्यात  सकारात्मक बदल घडत असतात . निगेटिव्ह विचार -आचार हळूहळू जावून सकारात्मक पॉझिटिव्ह विचार येतात . प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक च होत जाते .  हे फक्त  स्वतः  ठरवलं  तर अशक्य काहीच नसतं .   " मी "फार धोकादायक ठरतो ,तो मी च आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतो . तो " मी' मनापासून गायब झाला तर अहंकार ही नष्ट होऊन मनाची अंतर्मुख होऊन आत्मशुद्धी होते व आत्मविश्वास वाढला जातो .मणुष्य  स्वतः च स्वतः ला कित्येक वर्षे ओळखत नसलेला  या दहा दिवसात ओळखू लागतो याच साठी अंतरात्माला आत्मक्लेश आत्मसमर्पण आत्मसमर्पित करणं गरजेचे असते.

नंतर  निर्विकार -शांत - नितळ  अंतरमन होउन आत्मिक शुध्दी होउन व्यक्तीचा उत्सव वाढतो , चेहऱ्यावर  तेज , आनंद  ,झळकतो .  आपल्या जीवनात एक अल्हाददायक , आनंदी पहाटचं ..

 अल्लाह राजी हुआ समझो...


( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.)


लेखक डॉ सलीम सिकंदर शेख ,

 बैतुशशिफा हॉस्पिटल ,

श्रीरामपूर ९२७१६४००१४.

बेलापुर (प्रतिनिधी )-महावितरणच्या विद्युत निरीक्षक राजश्री गीते मँडम यांनी सागर भांड मयत झालेल्या घटनास्थळाला भेट देवुन पहाणी केली व पंचनामा केला तसेच पुढील विज पुरवठा तातडीने सुरु करण्याच्या सुचना दिल्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या भागातील विज पुरवठा सुरळीत केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.                              कै. सागर भांड याचा मृत्यू विज वाहक तार तुटल्यामुळे झाला असुन या घटनेचा त्वरित पंचनामा करण्याची मागणी करुन कै. सागर भांड यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी तसेच त्या भागातील विज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी जि प सदस्य शरद नवले व  बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयात जावून अधिकाऱ्यांना जाब विचारला .त्या वेळी आज वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी येवुन पंचनामा करुन विज पुरवठा सुरळीत होईल असे अश्वासन महावितरणचे सहाय्यक अभियंता शिरीष वाणी यांनी दिले होते त्यानंतर दुपारी महावितरणच्या विद्युत निरीक्षक राजश्री गीते मँडम यांनी घटनास्थळाला भेट देवुन पंचनामा केला तसेच दुर्घटना घडू नये या करीता आवश्यक ते पोल, विज वाहक तारा, विद्युत वाहीनी तातडीने दुरुस्त करा अशा सुचना दिल्या. या वेळी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की नागरिक,शेतकरी,व्यापारी,विद्यार्थी विजेच्या समस्ये मुळे त्रस्त असून सर्व भागातील मेन्टेनन्सची कामे त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे.अशा घटना पुन्हा घडू नये या करीता महावितरणने आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच महावितरण च्या कामात सुधारणा न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा खंडागळे यांनी दिला.या वेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी के केदारी सहाय्यक अभियंता शिरीष वाणी

 जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,उपसभापती अभिषेक खंडागळे,  देविदास देसाई,उपसरपंच मुस्ताक शेख,एकनाथ नागले,पुरुषोत्तम भराटे, रविंद्र कुताळ,भाऊसाहेब तेलोरे,दादासाहेब कुताळ,दिपक गायकवाड, सुरेश अमोलिक,किशोर बंगाळ,बाळासाहेब सोनवणे,मनोज गाढे,भास्कर वारे, महावितरण कर्मचारी मधुकर औचिते, अनिल दौंड स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.

बेलापूर:(प्रतिनिधी )-   छत्रपती तरुण मंडळांच्या वतीने  शिवजयंती उत्सवानिमित्त व धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासा निमित्त तसेच मंडळाचे तरुण सहकारी कै. अनिकेत भडके,कै. अभिषेक आढाव,कै. संदिप कळमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करुन अनोख्या पध्दतीने शिवजयंती साजरी केली                        या रक्तदान शिबीराचे उद्घाटन श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या शुभहस्ते व सुनिल मुथ्था यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले, या वेळी जि.प. सदस्य शरदराव नवले,सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच मुश्ताक शेख,पं.स.सदस्य अरुण पाटील नाईक, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, भाजपाचे प्रफुल्ल डावरे,प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड,शांतीलाल हिरण, प्रशांत लढ्ढा ईस्माइल शेख डॉ. अविनाश गायकवाड, डॉ. विलास मढिकर(जनकल्याण रक्तपेढी),सागर ढवळे, सुहास शेलार, भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव मुठे ,श्रीरामपूर नगर परिषदेचे नगर सेवक दिपक चव्हाण , प्रा.प्रकाश देशपांडे,प्रा.पवार ,मोहसीन सय्यद,लहानुभाऊ नागले,भैय्या शेख,

भरतशेठ साळुंके,अक्षय पा.नाईक,पं समितीचे माजी उपसभापती दत्ता कुर्हे,आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी १११ वेळेस रक्तदान करणारे दत्तात्रय माळवदे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या शिबीरामध्ये भरपूर तरुणांनी रक्तदान केले.जनकल्याण रक्तपेढी अ.नगर येथिल डॉ.विलास मढिकर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले व सर्व हातावर काम करणाऱ्या तरुणांनी रक्तदान केल्यामुळे त्यांचे विषेश आभार मानले.

दुसऱ्या दिवशी शिवजयंतीच्या मुहुर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तींचे पूजन खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले,त्यांच्या समवेत प्रतापराव शेटे हे ही उपस्थित होते.त्यानंतर शरदराव नवले, मार्केट कमिटीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, भरत साळुंके,पत्रकार ज्ञानेश गवले , देविदास देसाई,प्रा.अशोक माने , दिलीप दायमा,विष्णुपंत डावरे,शरद देशपांडे,जावेद शेख, वसंतराव शिंदे,कलेश सातभाई आदि मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.यानंतर शाबुदाना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी छत्रपती तरुण मंडळांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget