जागतिक पातळीवरील "फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ " चे आयोजन , रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी " दोहा- कतार " येथील अल- खोर च्या अल - बायन स्टेडियमवर उद्घाटन समारंभ संपन्न झाला . यामध्ये अमेरिकेचा प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मॉर्गन फ्रिमॅन व फिफा फुटबॉल विश्वकप चा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर केलेल्या(Ghanim Al miftahi ) घानिम - अल - मुफ्ताह हा कॉउडल - रिग्रेशन सिंद्रोम (Caudal Regression Syndrome) ज्यांचे स्पायनल कॉर्ड ( मेंदुरजजा) चा दुर्धर दुर्मिळ आजार झालेला, अपंगत्वावर मात करून कुरआन हाफीज व कारी झालेला , उद्घाटनप्रसंगी मंचावर येऊन पवित्र कुरआन मधील वरील आयात (श्लोकाचा ध्वनी) म्हणून सुरुवात केली गेलीत .
ते सुद्धा असंख्य देशातील फुटबॉल खेळणाऱ्या सदस्यांचा विरोध डावलून, जगातील सर्वात बडे ५०० पेक्षा ही जास्त टी. व्हि. चॅनेलनी २०० देशात लयीव्हि Live telecast) प्रक्षेपण केले. कित्येक कोटी लोकांनी याच देह याचं डोळ्यांनी लाईव्ह शो बघितले.
एवढ्या मोठ्या आतंरराष्ट्रीय प्रक्षेपणात विरोध डावलून मंचावर पवित्र कुरआण सुराह अल - हुजूरात ची १३ वीच आयात का ??? म्हणून सुरुवात केली असेल.??? .
म्हणुनच या श्लोकाचा अर्थ समजून घेताना:-
या आयातीत अखिल मानवजातीला उद्देशून सर्वोच्च अल्लाहने तीन महत्त्वाचे तात्विक विवेचन केले आहेत. ते सांगतात की, " तुम्हा सर्वांचे मुळ एकच आहेत. एकाच पुरुष व एकाच स्त्री पासून तुमचा वंश अस्तित्वात आला( निर्माण केले) आहे . आज जगाच्या पाठीवर जे जे वंश आढळतात ते वास्तविकपणे एकाच आई व वडीलांपासून त्यांचा प्रारंभ झाला आहेत .त्याच्याच वंशाच्या अनेक शाखा आहेत.(२) परंतु आपल्या मुळ स्वरुपाच्या एकच असताना देखील त्यामधे तुमचे विविध राष्ट्र ( देश ) , विविध जाती , विविध कुळात , विविध कबील्यांत, विविध भावक्यात, तुम्हाला विभागले जाणे स्वाभाविकच होते . परंतु या स्वाभाविकच विभागात विभागलेल्या कुळं या आधारावर बिलकुलच नव्हते केली की ती उच्च- निचच, श्रेष्ठ- कनिष्ठ, स्पृश्य- अस्पृश्य , असले भेदभाव मतभेद व्हावेत असे , बिलकुल नव्हतेच केले होते .किंवा एका वंशाने दुसऱ्या वंशावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावे अथवा सत्ता -हुकूमत गाजवावे, किंवा एका वर्णाच्या लोकांनी दुसऱ्या वर्णाच्या लोकांना तुच्छ,क्षुद्र मानावे किंवा एका मोठ्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर जम, हुकूमत प्रस्थापित करावी ,..
हो , निर्माण करत्याने या एकाच कारणास्तव मानवी समुहानां राष्ट्र व वंशांच्या स्वरूपात उभारले होते ते फक्त त्याच्या दरम्यान परस्परांत सहकार्य सहकार व ओळखण्याची एक स्वाभाविक रित - खून ( सिंबोल, चिन्ह ) होती ..(३) त्यात , माणसं माणसांच्या दरम्यान श्रेष्ठत्व व उच्चतम तेचा आधार जर कोणता असेल तर तो फक्त केवळ उच्च नितीमत्ता व उच्चतम नैतिकतेचा. ; जर अल्लाहला जर सर्वात श्रेष्ठ तो असेल ,ज्यांची नैतिक नितीमत्ता उच्च दर्जाची असेल ..तेच अल्लाह ( ईश्वर) ला आवडते...!.
त्या दोहा कतार येथील आंतरराष्ट्रीय फिफा फुटबॉल विश्वकप २०२२. च्या उद्घाटनप्रसंगी मंचावरून सांगितलेल्या पवित्र कुरआन मधील सुराह अल - हुजूरात च्या १३ व्या आयाती(श्लोका) चा अर्थ सर्व धर्मांच्या लोकांना सर्व जगाला हेच संबोधित करायचे होते की आपण सर्व एकच आहोत ..एकच आहोत ...
परंतु त्यांनी त्या अपंगत्व आलेल्या घानिम अल - मुफ्ताहीचीच निवड केली की अल्लाह ( ईश्वरा) ला अपंग - धडधाकट - काळे- गोरे सर्व सारखेच आहेत...
अर्थात:-" वसुधैव कुटुंबकम "
" The world 🌎🌍 is one family "
हे संस्कृत शब्द आहे ज्यांचां अर्थ संपूर्ण जग एकच कुटुंब आहे.. हिंदी मधे " धरती ही परीवार है '
" उद्देश हेच होता -- विश्व व्यापक बंधुत्वाचा संदेश."
त्या कतार मधील जागतिक फुटबॉल संघटनेचा जगातील सर्वांना एकतेचा अखंड तेचा च संदेश अभिप्रेत असावा...या साठी जगातील सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले तर खरोखरच हा विचार मानव कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक ठरेल ... अल्लाहाला मानवता धर्म कायम राखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे काम करणाऱ्या लोकांना जरूर पसंत करतात...जो अल्लाह ( परमेश्वर) ला आवडतो तो सर्वांना आवडतो ...
सर्वांनी आपल्या नितीमत्ता व उच्चतम नैतिकतेचा आदर्श निर्माण करून अल्लाह ( ईश्वरा) चे आवडते , श्रेष्ठ ..व्हावे...
( मित्रांनो लेख काळजीपुर्वक वाचुन आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा , आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा..)
लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख,
बैतुशशिफा हॉस्पिटल -मिल्लतनगर ,
श्रीरामपूर
९२७१६४००१४
Post a Comment