Latest Post

आज २० विसावा रोजा  चालला आहे अर्थात पहिला अशहरा ( विभाग) " रहमत,( 'दये)चे संपलेंत ,  आज  २० रोजा पुर्ण  " मगफीरत '( माफी दैवून कृपादृष्टी )चे (१०- ते २० ) संपूं  राहिलेत , आज संध्याकाळी तिसऱ्या विभाग ( अशहारा ) हा " नरकाग्नितल्या ( जहान्नुम) च्या आगीच्या होणाऱ्या इंधनापसून संरक्षण " वाचण्यासाठी  पुढील दहा दिवस आहे , वेळ दिवस खुप लवकर संपत चाललेली ..आज संध्याकाळीच "लैलतुल -कद्र "  च्या पवित्र रात्रीं ( ज्यांचे पुण्य हे एका रात्रीचं एक हाजार महीन्यांच्यां रात्रीं पेक्षाही अधिक असतं) बरोबरच" एहतेकाफ "संध्याकाळ पासूनच सुरू होणार ,   आज ही अल्लाहच्या कृपेपासून विमुक्त आहोत . याचं महत्त्व आपल्या लक्षात घेतलं पाहिजे .   दुआ याचना करण्याच्या पर्वाचा प्रवास सुरू झाला आहे. 

                 एक ते वीस दिवसांत तुम्हाला तुमच्या व्यस्तते  ,हालगर्जीपणामुळे ,  त्याचं महत्त्व न समजल्यामुळे  अल्लाहा ( ईश्वरा) च्या एवढ्या मोठ्या पर्वाच्या संधीचा फायदा उचलला नाहीत  ,तर तुम्ही दरीद्रीच समजा. " मगफिरत "या पर्वात वर्षांनु वर्षे क्षणा क्षणाला ,कळत नकळत केलेल्या पापांची , चुकांची दुरुस्ती  , चुकांची माफी मागणं व अल्लाह ला पुन्हा पुन्हा या चुकीचं होणार नाहीत यासाठी कृपादृष्टी व्हावीत . याला म्हणतात "मगफिरत ' होणं. संपूर्ण आयुष्यभर श्रद्धांवान बांधव याच आशेवर जगत असतात की परमेश्वर( अल्लाह) ने आमची मगफीरत करावी..हे फक्त परमेश्वराच्याच हातात आहे.

आपण कळत नकळत चुका होतच असतात . एखाद्या शुल्लक चुका ; त्याला साधी लहान चुक समजतो , परंतु ती कोणां दुसऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानिची ठरु शकते  हे कधीच आपल्या लक्षात येत नसते , आशा चुक ही आपल्यासाठी नरकातील इंधनासाठी  पुरेशी ठरु शकते.  

पवित्र कुरआन  सांगितले की, " त्या ( कयामत)  दिवशी तुम्हाला वाचवणारा कोणी नसेल , त्या दिवशी स्वतः चे आई-बाबा मुलांना ओळख देणार नाही , बहीण- भावाला , पती -पत्नी ला ,मुलं- आई-बाबांना  ओळख देणार नाहीत . ज्याला त्याला स्वतःचं पडेल. " 

आयुष्यभर केलेल्या  चांगल्या -वाईट कर्मांचां हिशोब द्यावाच लागणार आहे . मग  त्यासाठी आजच तय्यारीला लागा .

तिसऱ्या टप्प्या ( अशराह )ला  २१ ते ३० ला सुरूवाती बरोबरच रमजानुल मुबारक मधील   पवित्र लैलतुल -कद्र च्यां   रात्रीं रोजा२१ , रोजा २३ ,रोजा २५ , रोजा २७- रोजा २९- रोजा ३० वी, या विषम संख्यात्मक " लैलतुल-कद्र " च्या  रात्रीं  असतात ,   या एक रात्र ही एक हजार महीण्यांच्या रात्रींच्यां  पेक्षा ही जास्त पुण्यंचीं फक्त एक  लैलतुल कद्रची  रात्रींचं पुण्यं - सबाब भेटतं.

दिव्य कुरआन मधे सांगितले ,  " आम्ही या( कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरले आहे .(१), आणि , तुम्हाला काय माहित ,की, " कद्र " ची रात्र काय आहेत ? म्हणून, (२), कद्र ची रात्र ही हजार महीण्यांपेक्षा ही अधिक  उत्तम आहेत (३),ईशदूत ( फरिशते) आणि रुह (जिब्राईल अलै.) त्यारात्री आपल्या पालनकर्तांच्या आज्ञेनुसार प्रत्येक आदेश घेऊन उतरतात (४),  ती रात्र म्हणजे पुर्णतः " शांती" आहेत व  उष: काळा पर्यंत...(५) ..( दिव्य कुराण ,सुरहा नं. ९७ .अल- कद्र आ.नं. १ ते ५).


त्याच बरोबरच आज २० व्या रोजा च्यां दिवसांपासून ते थेट ३० व्या रोजा पर्यंत १० दिवस सलग अल्लाहच्या याचने नतमस्तक होउन याचना करण्यासाठी बांधंव २४ तास १० दिवस बसतात त्यालाच " एहतेकाफ " ला बसणं.

जगात प्रत्येक मस्जिद मधे या शेवटच्या दहा दिवसांत एक तरी रोजेदार बांधंव बसणं गरजेचे आहे.दहा दिवस अल्लाह च्या भक्तीत बाहेरील जगाशी संपर्क तोडून - जग विसरून,  स्वतःच्या प्रंपाचाला बाजूला ठेवून , फक्त अल्लाहाला संपूर्णतः समर्पण करून- देह भान विसरून अल्लाहचच नामस्मरणात तल्लीन होऊन जाणं ..बस..

     या रात्रीच्या आलेल्या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा उचलून अल्लाहा जवळ सर्वस्वी अर्पण- लिन - तल्लीन होऊन छाती बदडून , रडून -डोळ्यात पाणी आणून , आयुष्य भर केलेल्या चुकांची जाणीव करून उदा. जाणते व  अजाणतेपणी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता व खात्री देउन गरीबांचे ,मजुरांचे , भिकारी, बहीण,भाउ , आई-बाबा , आजी-आजोबा, मित्र मंडळ , गिऱ्हाईक या सर्वांबरोबर कधीतरी  उच्च निच झाले असतील , एखाद्याला  वेडेवाकडे  अपशब्द वापरले गेले असतील , अपमानास्पद भाषेचा वापर झाला असेल, संशयास्पद वागणूक दिली गेली असेल,  कधी घमेंडी आली असेल , " मी " ही जागा झाला असेल, कधी" अहंकार" आला असेल , 

"अहंकार""रावर :- प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम . म्हणतात की, " ज्या व्यक्तींच्या मनात तिळमात्र देखील अहंकार असेल ,तो स्वर्गात जाणार नाहीत, " 

त्यावर त्यांच्या एका मित्र( सहाबी) ने विचारले की चांगले कपडे परिधान करणे, नव्या पादत्राणांचां वापर करणं, हे देखील अहंकारासारखंच आहे का? 

त्यावर प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी उत्तर दिले," अल्लाह सुंदर आहे आणि त्याला सौंदर्य आवडते, अहंकार हा आहे की तो सत्याला नाकारतो आणि दुसऱ्या लोकांना तुच्छ समजणे " ( हादिस ईब्न मस- उद , मुस्लिम.). कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नयेत. आपल्यातल्या " मी "पणा , अहंकार माणसाच्या आयुष्यात खूप गडबड करत असतो तर त्या मी व अहंकाराला बाजूला काढून टाकण्यासाठी अल्लाहच्या दरबारात येउन बाजूला काढण्याचं प्रयत्न करा .

         " , आपल्या व्यस्त जीवनाचा काही वेळ , जितकं वेळ मिळाला तेवढं का होईना वेळ काढून , एकांतात ,एका शांत जागी , निवांत बसून, अल्लाहा जवळ पुर्ण पणे लीन -शरण - समर्पित होउन - अगदी तल्लीन होऊन , निर्विकार पणे , अंतर्मनात दडलेल्या प्रत्येक  प्रत्यक्ष गुन्हेची , दुष्कृत्ये ची , काही घटना  फक्त आपल्यालाच माहीत असतात , आशा केलेल्या  गुन्हे ची माफी मागणं ,   आगदी मनापासून- मनमोकळेपणाने अल्लाहा (परमेश्वरा) बरोबर संवाद साधणं ..जसं  एका  खास मित्राला  मनमोकळेपणाने गप्पा मारतो तशा पध्दतीने अल्लाहा (परमेश्वरा) समोर मनापासून मनमोकळे करणं .याला रिते होणं , फक्त रिते होणे ‌, आत्मक्लेश करणे , आत्मचिंतन करणं ,  पुन्हा पुन्हा अल्लाहा( परमेश्वर )ला सांगणं पुढे कधीच  कोणत्याही परिस्थितीत अशा चुकीचं होणार नाही याची ग्वाही - खात्री देणं . म्हणजेचं मोकळे ,रिते होउन  अल्लाहा ( ईश्वराला) ला   राजी करणं .

आशा गोष्टींमुळे   जेव्हा आपण केलेल्या पापांची - गुन्ह्याची कबुली कुठे  तरी देत असतो  ;  निश्चितपणे माणुष्यात  सकारात्मक बदल घडत असतात . निगेटिव्ह विचार -आचार हळूहळू जावून सकारात्मक पॉझिटिव्ह विचार येतात . प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक च होत जाते .  हे फक्त  स्वतः  ठरवलं  तर अशक्य काहीच नसतं .   " मी "फार धोकादायक ठरतो ,तो मी च आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतो . तो " मी' मनापासून गायब झाला तर अहंकार ही नष्ट होऊन मनाची अंतर्मुख होऊन आत्मशुद्धी होते व आत्मविश्वास वाढला जातो .मणुष्य  स्वतः च स्वतः ला कित्येक वर्षे ओळखत नसलेला  या दहा दिवसात ओळखू लागतो याच साठी अंतरात्माला आत्मक्लेश आत्मसमर्पण आत्मसमर्पित करणं गरजेचे असते.

नंतर  निर्विकार -शांत - नितळ  अंतरमन होउन आत्मिक शुध्दी होउन व्यक्तीचा उत्सव वाढतो , चेहऱ्यावर  तेज , आनंद  ,झळकतो .  आपल्या जीवनात एक अल्हाददायक , आनंदी पहाटचं ..

 अल्लाह राजी हुआ समझो...


( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.)


लेखक डॉ सलीम सिकंदर शेख ,

 बैतुशशिफा हॉस्पिटल ,

श्रीरामपूर ९२७१६४००१४.

बेलापुर (प्रतिनिधी )-महावितरणच्या विद्युत निरीक्षक राजश्री गीते मँडम यांनी सागर भांड मयत झालेल्या घटनास्थळाला भेट देवुन पहाणी केली व पंचनामा केला तसेच पुढील विज पुरवठा तातडीने सुरु करण्याच्या सुचना दिल्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या भागातील विज पुरवठा सुरळीत केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.                              कै. सागर भांड याचा मृत्यू विज वाहक तार तुटल्यामुळे झाला असुन या घटनेचा त्वरित पंचनामा करण्याची मागणी करुन कै. सागर भांड यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी तसेच त्या भागातील विज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी जि प सदस्य शरद नवले व  बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयात जावून अधिकाऱ्यांना जाब विचारला .त्या वेळी आज वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी येवुन पंचनामा करुन विज पुरवठा सुरळीत होईल असे अश्वासन महावितरणचे सहाय्यक अभियंता शिरीष वाणी यांनी दिले होते त्यानंतर दुपारी महावितरणच्या विद्युत निरीक्षक राजश्री गीते मँडम यांनी घटनास्थळाला भेट देवुन पंचनामा केला तसेच दुर्घटना घडू नये या करीता आवश्यक ते पोल, विज वाहक तारा, विद्युत वाहीनी तातडीने दुरुस्त करा अशा सुचना दिल्या. या वेळी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की नागरिक,शेतकरी,व्यापारी,विद्यार्थी विजेच्या समस्ये मुळे त्रस्त असून सर्व भागातील मेन्टेनन्सची कामे त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे.अशा घटना पुन्हा घडू नये या करीता महावितरणने आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच महावितरण च्या कामात सुधारणा न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा खंडागळे यांनी दिला.या वेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी के केदारी सहाय्यक अभियंता शिरीष वाणी

 जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,उपसभापती अभिषेक खंडागळे,  देविदास देसाई,उपसरपंच मुस्ताक शेख,एकनाथ नागले,पुरुषोत्तम भराटे, रविंद्र कुताळ,भाऊसाहेब तेलोरे,दादासाहेब कुताळ,दिपक गायकवाड, सुरेश अमोलिक,किशोर बंगाळ,बाळासाहेब सोनवणे,मनोज गाढे,भास्कर वारे, महावितरण कर्मचारी मधुकर औचिते, अनिल दौंड स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.

बेलापूर:(प्रतिनिधी )-   छत्रपती तरुण मंडळांच्या वतीने  शिवजयंती उत्सवानिमित्त व धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासा निमित्त तसेच मंडळाचे तरुण सहकारी कै. अनिकेत भडके,कै. अभिषेक आढाव,कै. संदिप कळमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करुन अनोख्या पध्दतीने शिवजयंती साजरी केली                        या रक्तदान शिबीराचे उद्घाटन श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या शुभहस्ते व सुनिल मुथ्था यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले, या वेळी जि.प. सदस्य शरदराव नवले,सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच मुश्ताक शेख,पं.स.सदस्य अरुण पाटील नाईक, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, भाजपाचे प्रफुल्ल डावरे,प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड,शांतीलाल हिरण, प्रशांत लढ्ढा ईस्माइल शेख डॉ. अविनाश गायकवाड, डॉ. विलास मढिकर(जनकल्याण रक्तपेढी),सागर ढवळे, सुहास शेलार, भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव मुठे ,श्रीरामपूर नगर परिषदेचे नगर सेवक दिपक चव्हाण , प्रा.प्रकाश देशपांडे,प्रा.पवार ,मोहसीन सय्यद,लहानुभाऊ नागले,भैय्या शेख,

भरतशेठ साळुंके,अक्षय पा.नाईक,पं समितीचे माजी उपसभापती दत्ता कुर्हे,आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी १११ वेळेस रक्तदान करणारे दत्तात्रय माळवदे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या शिबीरामध्ये भरपूर तरुणांनी रक्तदान केले.जनकल्याण रक्तपेढी अ.नगर येथिल डॉ.विलास मढिकर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले व सर्व हातावर काम करणाऱ्या तरुणांनी रक्तदान केल्यामुळे त्यांचे विषेश आभार मानले.

दुसऱ्या दिवशी शिवजयंतीच्या मुहुर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तींचे पूजन खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले,त्यांच्या समवेत प्रतापराव शेटे हे ही उपस्थित होते.त्यानंतर शरदराव नवले, मार्केट कमिटीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, भरत साळुंके,पत्रकार ज्ञानेश गवले , देविदास देसाई,प्रा.अशोक माने , दिलीप दायमा,विष्णुपंत डावरे,शरद देशपांडे,जावेद शेख, वसंतराव शिंदे,कलेश सातभाई आदि मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.यानंतर शाबुदाना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी छत्रपती तरुण मंडळांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-दररोजच्या आहारात असणारी साखर कशी तयार होते ऊस चरख्यात घातल्यापासून ते साखर तयार होईपर्यत काय काय प्रक्रिया होतात याची प्रत्यक्ष माहीती घेण्याचा योग बेलापुरातील महीलांना आला                 बेलापुर व्यापारी असोसिएशन बेलापुर किराणा मर्चंड असोसिएशन सुवर्णकार संघटना यांच्या वतीने गावातील ५० व्यापारी व महीलांना अशोक सहकारी साखर कारखान्याची पहाणी व माहीती घेण्याकरीता सहल आयोजित करण्यात आली होती ,ऊसापासून रस साखर ईथेनाँल स्पिरीट विज निर्मिती या सर्व बाबींची सविस्तर माहीती या वेळी देण्यात आली .त्यानंतर कारखाना बैठक हाँलमध्ये मुळा प्रवरा विज संस्थेचे चेअरमन सिध्दार्थ मुरकुटे अशोक कारखान्याच्या संचालीका सौ मंजुश्री मुरकुटे जेष्ठ संचालक हिम्मतराव धुमाळ माजी संचालक राधाभाऊ उंडे कारेगाव भाग कंपनीचे संचालक नारायण बडाख तसेच अशोक सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने विक्रांत भागवत यांनी सर्व उपस्थित व्यापारी बंधु व भगीनींचे स्वागत केले .या वेळी युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे तसेच संचालक हिंमतराव धुमाळ यांनी माहीती देताना सांगितले की अशोक कारखान्यावर श्रीरामपुर तालुक्याच्या  बाजारपेठेचे भवितव्य अवलंबुन आहे कारखान्याच्या चोख व्यवस्थापनामुळे परिसरातील कारखाने बंद पडले तेथे अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली  कारखाना वेगवेगळे प्रकल्प राबवत आहे उद्योग क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही अशोक कारखाना प्रगती पथावर आहे या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा किराणा मर्चडचे अध्यक्ष  शांतीलाल हिरण शिवसेना नेते संजय छल्लारे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष अनिल मुंडलीक जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन प्रविण लुक्कड यांनीही मनोगत व्यक्त करुन अशोक सहकारी साखर कारखाना ही तालुक्याची कामधेनु आहे या कारखान्यामुळेच श्रीरामपुर बेलापुरची बाजारपेठ गजबजलेली असते अशोक सहकारी साखर कारखान्याची अशीच प्रगती होत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली.            या वेळी पंकज हिरण केदारनाथ मंत्री विकी मुथा महेश मंत्री आनंद लुक्कड प्रविण राका बेलापुर मर्चंडच्या संचालिका सरोज लुक्कड सुषमा लढ्ढा मोनाली लुक्कड सोनाली लुक्कड रश्मी लुक्कड सुषमा लुक्कड सुनंदा चांडक अक्षरा मुंदडा गौरी मंत्री दिव्या मंत्री राखी हिरण सुलोचनाबाई लखोटीया चंद्रकला हिरण स्वाती राका निकीता लुक्कड रेणुका मुंडलीक कविता सुनिल मुथा गीता मुथा शिल्पा लखोटीया सुवर्णा चोरडीया मिना दिलीप दायमा पुर्वा मुथा रोहीत वाकचौरे जयेश लढ्ढा यश बिहाणी आदि उपस्थित होते .या सहलीचे आयोजन करण्यासाठी गणेश लढ्ढा शांतीलाल हिरण प्रशांत लढ्ढा अनिल मुंडलीक कारखान्याचे जेष्ठ संचालक हिंमतराव धुमाळ आदि प्रयत्नशिल होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर गावातुन बाहेर जाणाऱ्या तसेच गावात येणाऱ्या रस्त्यावर अकरा अति उच्च दर्जाचे सी सी टी व्ही कँमेरे बसविल्यामुळे आता परिसरात होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल असा विश्वास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी व्यक्त केला. बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातुन अति उच्च दर्जाचे अर्धा किलोमीटर पर्यतचे चित्रण सुस्पष्टपणे करणारे अकरा कँमेरे मुख्य चौकात बसविले त्यात बेलापुर झेंडा चौकात चार  उक्कलगाव कोल्हार चौकात तीन कँमेरे व बेलापुर श्रीरामपुर गोडी शेव रेवडी चौकात तीन  बेलापुर काँलेज जवळ एक असे अकरा कँमेरे बसविले या कँमेऱ्याचे नियंत्रण हे बेलापुर पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले .श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी कँमेऱ्याबाबत,जि प सदस्य शरद नवले ,सरपंच स्वाती अमोलीक,उपसरपंच मुस्ताक शेख,टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुथा बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्याकडून सर्व सी सी टी व्ही ची माहीती घेवुन समक्ष पहाणी केली .नविन बसविलेल्या कँमेऱ्यात रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता मग तो दुचाकीवर असो किंवा चार चाकीवर  तसेच वाहनाची नंबरप्लेट देखील स्पष्ट दिसत होती हे चित्रण पाहुन पी आय देशमुख यांनी समाधान व्यक्त केले तसेच गावातील सर्व पतसंस्था बँंका व्यापारी शाळा काँलेज या सर्वांनी आपल्या व गावाच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही बसवावे असे अवाहनही देशमुख यांनी केले या वेळी पी एस आय दिपक मेढे उपसरपंच मुस्ताक शेख प्रफुल्ल डावरे ऐ एस आय सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे काँन्स्टेबल संपत बडे भारत तमनर नंदकिशोर लोखंडे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा,प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले,तंटामूक्ती अध्यक्ष  बाळासाहेब दाणी आदि उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-कारखाना बंद झाल्यामुळे गावाकडे निघालेल्या ऊस तोड मजुराची बैलाने भरलेली गाडी उत्साही गोरक्षकांनी अडविली.परंतु चौकशी करुन पोलीसांनी ती गाडी सोडुन दिली परंतु या सर्व प्रकारामुळे ऊस तोड मजुरांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.                                     बेलापुरात काल चुकीचा संदेश मिळाल्यामुळे अति उत्साही कार्यकर्त्यांनी बेलापुर ग्रामपंचायतीने बांधलेले कंपाऊड तोडले होते तो गोंधळ बराच वेळ चालला होता शेवटी पुन्हा तार कंपाऊड केल्यामुळे पुढील अनर्थ टळला त्यातच बेलापुर चौकातुन बैलाने भरलेले वहान जात असल्याचे समजताच काही उत्साही कार्यकर्त्यांनी ते वहान अडविले  दौंड कारखाना बंद झाल्यामुळे ऊस तोडणी करणारे मजुर गाडीत बैलासह सामान भरुन धुळ्याकडे गावी निघाले होते बैलाने भरलेली गाडी पहाताच काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी ती अडवली जमावाला पाहुन चालकही घाबरला मग ती गाडी बेलापुर पोलीस स्टेशनला नेण्यात आली .पोलीसांनी सविस्तर चौकशी केल्यावर असे समजले की कारखानां बंद झाल्यामुळे ते ऊस तोडणी मजुर घराकडे निघाले होते या प्रकरणाची माहिती मिळताच टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष  सुनील मुथा व पत्रकार देविदास देसाई  यांनी शहनिशा करून पोलिसांच्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिली व सदर वाहन सोडण्याची विनंती केली टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुथा यांनी दौंड कारखाना व्यवस्थापनाशी देखील  संपर्क साधला सर्व बाजुने चौकशी केल्यानंतर बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार बाळासाहेब  कोळपे यांनी  कार्यकर्त्यांचा गैरसमज झाल्याचे निदर्शनास आणून दिले. सर्वांची शंका निरसन झाल्यानंतर  पोलिसांनी ते वाहन सोडले.मात्र

या सर्व प्रक्रियेत बराच वेळ गेला त्यामुळे धुळ्याला जाणाऱ्या या मजुरांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागला.

बेलापुर (प्रतिनिधी  )-बेलापुर ग्रामपंचायतीच्या  जागेत केलेले  अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात  काढल्यानंतर चुकीचा संदेश पसरविण्यात आल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी बांधलेले कंपाऊड तोडून पुन्हा तेथे जनावरे बांधल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पुन्हा अतिक्रमण केलेली जागा मोकळी करुन वादावर पडदा पाडला या बाबत हकीकत अशी की,बेलापुर बाजार तळाजवळ असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अतिक्रमण करुन जनावरे बांधण्यात आली होती. तेथे शेड बांधण्यात येणार असल्याचे समजताच बेलापुर ग्रामपंचायतीने ते सर्व सामान कार्यालयात आणले त्यानंतर  ग्रामपंचायत पदाधीकारी सदस्य व ग्रामस्थांनी पोलीस बंदोबस्तात ते अतिक्रमण काढुन टाकले व बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने त्या जागेस तार कंपाऊड करण्यात आले .ही बाब काहींना खटकली त्यांनी अपप्रचार करुन गो शाळेतुन गायी बाहेर काढल्या असा संदेश पसरविला त्यामुळे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमा झाले .चुकीच्या माहीतीमुळे आलेल्या कार्यकर्त्यांनी बेलापुर ग्रामपंचायतीने केलेल्या कंपाउडची तोडफोड केली तसेच त्या जागेत पुन्हा जबरदस्तीने जनावरे बांधली ,ही बाब ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला ,पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले ,त्यांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला आणले जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे सभापती सुधीर नवले उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक सुनिल मुथा प्रफुल्ल डावरे देविदास देसाई आदिसह सदस्य  व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जमा झाले .या वेळी संबधीत अतिक्रमण करणारांनी चुकीचा संदेश दिला की गो शाळेत बांधलेल्या गायी सोडून दिल्या  त्यामुळे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते बेलापुर पोलीस स्टेशनला जमा झाले तेथे ग्रामस्थ पदाधिकारी व हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्यामध्ये बराच वेळ जोरदार बाचाबाची झाली या वेळी जि प सदस्य शरद नवले सुनिल मुथा यांनी स्पष्टपणे सांगीतले की ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करुन चुकीचा संदेश पसरवुन गावातील वातावरण कुणी खराब करत असेल तर ते कदापीही खपवुन घेणार नाही, त्यामुळे कंपाउडची तोडफोड करणारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली त्याच वेळी श्रीरामपुरहून आलेल्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली की अतिक्रमण काढु नये या करीता गो शाळेतुन गायी काढुन दिल्याचा चुकीचा संदेश देवुन बोलविण्यात आले त्यामुळे  आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यानीही थोडेसे नमते घेतले, अखेर ताबडतोब पुन्हा ग्रामपंचायतीची जागा मोकळी करुन द्यावी नाहीतर शासाकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा अशी ठाम भूमीका सुनिल मुथा सरपंच स्वाती अमोलीक जी प सदस्य शरद नवले अभिषेक खंडागळे प्रफुल्ल डावरे यांनी घेतली अखेर पुन्हा अतिक्रमण केलेली जागा मोकळी करुन ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यावर आपापसात एकमत झाले अन त्या वादावर पडदा पडला तो पर्यत गावात काहीतरी वेगळेच घडल्याची चर्चा तालुकाभर पसरली होती परंतु पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पी एस आय दिपक मेढे ऐ एस आय सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब  कोळपे संपत बडे भारत तमनर नंदु लोखंडे होमगार्ड अजय भागवत तसेच गावातील शरद नवले सुनिल मुथा अभिषेक खंडागळे रविंद्र खटोड एकनाथ नागले  देविदास देसाई प्रफुल्ल डावरे यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली .                        (सामाजिक जिवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आलेल्या माहीतीची पुर्ण खात्री करुनच पुढील पाऊल उचलावे चुकीच्या माहीतीमुळे चांगले काम करतानाही अनर्थ घडू शकतो याची जाण कार्यकर्त्यांनी ठेवावी -सुनिल मुथा बेलापुर पत्रकार संघ)

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget