Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी): मी शाळेत असताना मी माझ्या आईला म्हणायचो की माझा होमवर्क झालाय.आता जाऊ का खेळायला? आणि आता? ते टॅब ठेव आता बाजूला आणि ट्युशनला जा', असे संवाद ऐकू येतात.आता अशी मुले सुदृढ कशी बनतील.प्रत्येकच गोष्टीसाठी 'मॅजिक' औषध नसते.मूल अभ्यासात चांगले असेल,तर पालकांनी त्याच्या आवडीनिवडी शोधून काढल्या पाहिजेत.मूल खेळामध्ये चांगले असेल,तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.व जास्त जास्त मुला-मुलीनी मैदानी खेळ खेळली पाहिजे असे प्रतिपादन श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री स्वामीराज कुलथे यांनी केले. 

येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे १४ संघांच्या श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन श्री स्वामीराज कुलथे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी स्पर्धेचे आयोजक गौरव डेंगळे,नितीन गायधने,दत्ता घोरपडे,प्रसाद लबडे,अमोल शिरोळे,हरप्रित सेठी,अमंदीप गुरुवडा आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल, बेलापूर,विद्यानिकेतन अकॅडमी, श्रीरामपूर,न्यू इंग्लिश स्कूल,श्रीरामपूर,केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, श्रीरामपूर,अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल,प्रगतीनगर,जे टी येस बेलापूर आदी शाळेतील १४ संघांनी सहभाग घेतला असून स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक १२ डिसेंबर रोजी खेळवला जाईल.

श्रीरामपूर शहरातील लॅब चालकाच्या चुकीमुळे डॉक्टरांनी घेतले हजारो रुपयांची बिले आजकाल फॅशन बनले डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर प्रथम लॅब मध्ये रक्त लघवी तपासण्यास सांगतात व आपल्या मर्जीतील लॅब चालकाकडे तपासून आणावी याकरता पहिले आवर्जुन पाठवतात व त्याने ठरवायचं की आपल्याला काय ट्रीटमेंट या नावाजलेल्या मोठ्या डॉक्टरकडे घेवायची ज्याच्यावर आपल्याला मोठा विश्वास आहे व विश्वासाने आपन त्याकडे जात असतो मात्र या डिग्री असणाऱ्या मोठा डॉक्टर याचा एक लॅब चालकांवर भरवसा करत असतो याचाच फायदा शहरातील एका लॅब चालकाने व डॉक्टरा ने घेत पेशंटला चक्क कावीळ आजार नसतानाही हजारो रुपयांची लुट केली व पेशनटने तक्रार केली आसता उलट पुन्हा पेशंट कडूनच आमचा गैर समज झाल्याचे पत्र देखील या महाभागांनी घेतले जर काही चुकलंच नव्हते तर पत्र घेतले तरी कशाला या सर्व प्रकारच्या चर्चा श्रीरामपुर शहरात दबक्या आवाजात चालू आहे या विषयी सम्बधित लॅब चालकास विचारणा केली आसता मला यात काही माहीत नाही आमच आपआपसात मिटल असल्याचं त्याच्या कडुन सांगण्यात येत आहे.

श्रीरामपूर - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या श्रीरामपुरातील साखळी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शहरातील मुस्लिम समाजातील बांधवांनी पाठिंबा दर्शवून साखळी उपोषणात सहभागी झाले.    

     सकल मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने महात्मा गांधी पुतळयासमोर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आलेली आहे.या उपोषणास दररोज विविध राजकीय, सामाजिक,विविध संस्थांचे पदाधिकारी भेट देऊन पाठिंबा दर्शवीत आहेत.उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शहरातील मुस्लिम समाजाचे सर्वश्री,

मुक्तारभाई शाह,साजिदभाई मिर्झा,रज्जाक पठाण, अहमदभाई जहागिरदार, गफ्फारभाई पोपटिया, रियाजखान पठाण,एजाजभाई दारूवाला,मेहबूबभाई कुरेशी, सरवरअली सय्यद,अकील हाजी सुन्नाभाई,मुक्तार शेख,जावेदभाई बागवान,मोहसीनभाई बागवान, शफी शाह,भैया आत्तार,अहमद सिकंदर शाह,रहीमभाई शेख, तोसिफ शाह,शरीफ मेमन, इमरान शेख,अब्दुल रहमान काकर,मुबारक शेख,एकनाथ डांगे यांचा सहभाग होता.याप्रसंगी

शिवसेनेचे संजय छल्लारे,सचिन बडदे,निखिल पवार,शहर प्रमुख रमेश घुले,मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे,सतीश कुदळे,संतोष धुमाळ,ॲड, मधुकर शिंदे,पंडितराव बोंबले,राजेश बोर्डे,विजय खाजेकर,विलास बोरावके मच्छिंद्र पवार,छावाचे विश्वनाथ वाघ,हिंदू एकता चे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे,मंगेश छतवाणी,भाऊसाहेब पवार,रमेश आजगे,राजेंद्र मोरगे,नजीरभाई शेख,मेहमूद शाह,तोफिक शेख, युनूस मंसूरी,ॲड,आय्याज सय्यद,अल्ताफ शेख,रफिक मेमन,यासीन सय्यद,अजहर शेख,सैफ शेख,हारुण मेमन, भगवान धनगे आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.


 💐 *भावपूर्ण श्रद्धांजली* 💐

श्रीरामपूर शहरातील  कॉलेजरोड येथील रहिवासी - 

 *संजय यशवंत कोकाटे (वय ६१)* 

यांचे दि.३०/११/२०२३ रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.

  त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहिण, मुलगा चि.सागर,  मुलगी असा परिवार आहे. 

  अचानक त्यांच्या जाण्याने कोकाटे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. श्रीरामपूर येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवार दिनांक ७ डिसेंबर रोजी नॉर्दन ब्रांच श्रीरामपूर येथे दहाव्याचा विधी सकाळी ८:३० वाजता होईल.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सोमवार दिनांक ११ डिसेंबर रोजी १६ वर्ष वयोगटासाठी ६ वी सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत आहे.या स्पर्धेसाठी हरप्रीत कोचिंग क्लासेस,श्रीरामपूर यांच्यावतीने ₹ ५००१/- व चषक विजेत्या संघाला प्रदान करण्यात येईल. तसेच विविध आकर्षक वैयक्तिक पारितोषिक देण्यात येतील. स्पर्धेत १२ संघांना स्थान देण्यात येईल प्रत्येक संघात ९ खेळाडू असतील.स्पर्धा विंडबॉल वर खेळण्यात येईल.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी ९ डिसेंबर पूर्वी आपल्या संघाची नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.सदर स्पर्धा ही ६ षटकांची असेल.इच्छुक संघांनी नितीन गायधने,नितीन बलराज,दौलतराव पवार  आदींशी संपर्क साधून संघाची नाव नोंदणी करावी.

राहता तालुक्यातील ममदापूर या गावात भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने "संविधान जागर दिवस" हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ममदापूर गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा,जिल्हा परिषद उर्दू शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत सामूहिकरीत्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.यावेळी त्यांना संविधानाविषयी माहिती देण्यात आली.तसेच भारतीय संविधान नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची देखील सखोल माहिती विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित वक्त्यांनी दिली. 

सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी नेते पॅंथर ऋषी पोळ हे होते.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ममदापूर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.अनिताताई कदम, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश राव ससाने, भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक दीपक भालेराव होते.याप्रसंगी न्यूज 14 चॅनेल चे पत्रकार नानासाहेब उंडे, RKS न्यूज चैनल चे संपादक कासम शेख, MS न्यूजचे मुसा सय्यद, गौरव भालेराव, समाधान पगारे,फरहान शेख, माहिती अधिकाराचे नगर जिल्हाध्यक्ष शिवाजी मुसमाडे, गोविंद नाना जवरे पाटील,परवेज पटेल, ग्रामसेवक सोनवणे भाऊसाहेब, अश्रफ तांबोळी,पुंजा थोरात, हुसेन तांबोळी,वृषभ ससाने, ज्ञानदेव म्हसे पाटील तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समस्त ममदापूर गावचे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन ममदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त शब्बीर कुरेशी यांनी केले.

नेवासा (गौरव डेंगळे): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक ६ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान शालेय राज्यस्तरीय १४ वर्षाखालील मुला-मुलींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणी मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणारा नेवासा येथील सेंट मेरीज् स्कूलचा खेळाडू शौर्य प्रशांत माकोणेची महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघात निवड झाली आहे. दिनांक २२ ते २६ डिसेंबर रोजी भुवनेश्वर, ओडीसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करेल. महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्याबद्दल शौर्यचे सेंट मेरीज् स्कूलचा मुख्याध्यापिका सिस्टर ज्योसी जोस, व्यवस्थापिका सिस्टर मोली,सिस्टर लीसा, सिस्टर मुक्ता, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. शौर्यला

क्रीडा शिक्षक विष्णू खांदोडे, व्हॉलीबॉल प्रशिक्षक पापा शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget