Latest Post

श्रीरामपूर - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या श्रीरामपुरातील साखळी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शहरातील मुस्लिम समाजातील बांधवांनी पाठिंबा दर्शवून साखळी उपोषणात सहभागी झाले.    

     सकल मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने महात्मा गांधी पुतळयासमोर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आलेली आहे.या उपोषणास दररोज विविध राजकीय, सामाजिक,विविध संस्थांचे पदाधिकारी भेट देऊन पाठिंबा दर्शवीत आहेत.उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शहरातील मुस्लिम समाजाचे सर्वश्री,

मुक्तारभाई शाह,साजिदभाई मिर्झा,रज्जाक पठाण, अहमदभाई जहागिरदार, गफ्फारभाई पोपटिया, रियाजखान पठाण,एजाजभाई दारूवाला,मेहबूबभाई कुरेशी, सरवरअली सय्यद,अकील हाजी सुन्नाभाई,मुक्तार शेख,जावेदभाई बागवान,मोहसीनभाई बागवान, शफी शाह,भैया आत्तार,अहमद सिकंदर शाह,रहीमभाई शेख, तोसिफ शाह,शरीफ मेमन, इमरान शेख,अब्दुल रहमान काकर,मुबारक शेख,एकनाथ डांगे यांचा सहभाग होता.याप्रसंगी

शिवसेनेचे संजय छल्लारे,सचिन बडदे,निखिल पवार,शहर प्रमुख रमेश घुले,मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे,सतीश कुदळे,संतोष धुमाळ,ॲड, मधुकर शिंदे,पंडितराव बोंबले,राजेश बोर्डे,विजय खाजेकर,विलास बोरावके मच्छिंद्र पवार,छावाचे विश्वनाथ वाघ,हिंदू एकता चे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे,मंगेश छतवाणी,भाऊसाहेब पवार,रमेश आजगे,राजेंद्र मोरगे,नजीरभाई शेख,मेहमूद शाह,तोफिक शेख, युनूस मंसूरी,ॲड,आय्याज सय्यद,अल्ताफ शेख,रफिक मेमन,यासीन सय्यद,अजहर शेख,सैफ शेख,हारुण मेमन, भगवान धनगे आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.


 💐 *भावपूर्ण श्रद्धांजली* 💐

श्रीरामपूर शहरातील  कॉलेजरोड येथील रहिवासी - 

 *संजय यशवंत कोकाटे (वय ६१)* 

यांचे दि.३०/११/२०२३ रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.

  त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहिण, मुलगा चि.सागर,  मुलगी असा परिवार आहे. 

  अचानक त्यांच्या जाण्याने कोकाटे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. श्रीरामपूर येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवार दिनांक ७ डिसेंबर रोजी नॉर्दन ब्रांच श्रीरामपूर येथे दहाव्याचा विधी सकाळी ८:३० वाजता होईल.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सोमवार दिनांक ११ डिसेंबर रोजी १६ वर्ष वयोगटासाठी ६ वी सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत आहे.या स्पर्धेसाठी हरप्रीत कोचिंग क्लासेस,श्रीरामपूर यांच्यावतीने ₹ ५००१/- व चषक विजेत्या संघाला प्रदान करण्यात येईल. तसेच विविध आकर्षक वैयक्तिक पारितोषिक देण्यात येतील. स्पर्धेत १२ संघांना स्थान देण्यात येईल प्रत्येक संघात ९ खेळाडू असतील.स्पर्धा विंडबॉल वर खेळण्यात येईल.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी ९ डिसेंबर पूर्वी आपल्या संघाची नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.सदर स्पर्धा ही ६ षटकांची असेल.इच्छुक संघांनी नितीन गायधने,नितीन बलराज,दौलतराव पवार  आदींशी संपर्क साधून संघाची नाव नोंदणी करावी.

राहता तालुक्यातील ममदापूर या गावात भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने "संविधान जागर दिवस" हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ममदापूर गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा,जिल्हा परिषद उर्दू शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत सामूहिकरीत्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.यावेळी त्यांना संविधानाविषयी माहिती देण्यात आली.तसेच भारतीय संविधान नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची देखील सखोल माहिती विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित वक्त्यांनी दिली. 

सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी नेते पॅंथर ऋषी पोळ हे होते.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ममदापूर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.अनिताताई कदम, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश राव ससाने, भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक दीपक भालेराव होते.याप्रसंगी न्यूज 14 चॅनेल चे पत्रकार नानासाहेब उंडे, RKS न्यूज चैनल चे संपादक कासम शेख, MS न्यूजचे मुसा सय्यद, गौरव भालेराव, समाधान पगारे,फरहान शेख, माहिती अधिकाराचे नगर जिल्हाध्यक्ष शिवाजी मुसमाडे, गोविंद नाना जवरे पाटील,परवेज पटेल, ग्रामसेवक सोनवणे भाऊसाहेब, अश्रफ तांबोळी,पुंजा थोरात, हुसेन तांबोळी,वृषभ ससाने, ज्ञानदेव म्हसे पाटील तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समस्त ममदापूर गावचे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन ममदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त शब्बीर कुरेशी यांनी केले.

नेवासा (गौरव डेंगळे): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक ६ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान शालेय राज्यस्तरीय १४ वर्षाखालील मुला-मुलींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणी मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणारा नेवासा येथील सेंट मेरीज् स्कूलचा खेळाडू शौर्य प्रशांत माकोणेची महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघात निवड झाली आहे. दिनांक २२ ते २६ डिसेंबर रोजी भुवनेश्वर, ओडीसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करेल. महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्याबद्दल शौर्यचे सेंट मेरीज् स्कूलचा मुख्याध्यापिका सिस्टर ज्योसी जोस, व्यवस्थापिका सिस्टर मोली,सिस्टर लीसा, सिस्टर मुक्ता, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. शौर्यला

क्रीडा शिक्षक विष्णू खांदोडे, व्हॉलीबॉल प्रशिक्षक पापा शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

सुप्रीम कोर्टाने आदेश करून सांगितले आहे की एक महिन्याच्या आत सर्व दुकानदाराने मराठी भाषा मध्ये पाट्या लावावेत अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल या देशाचे श्रीरामपूर मध्ये त्वरित पालन व्हावे यासाठी श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी नगरपालिका शहर पोलीस स्टेशन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मनाली की मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकून राहण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध स्वरुपाचे  उग्र आंदोलन करुन संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. तर काही पदाधिकार्‍यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती याची दखल घेऊन सुप्रिम कोर्टाने केंद्र व राज्य सरकारला आदेश दिले आहे की, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दुकानावर मोठ्या अक्षरात ठळकपणाने दिसेल असे मराठी भाषेत बोर्ड लावण्यात यावे या आदेशाचे संपूर्ण राज्याने तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांने, सर्व दुकानदाराने पालन करावे असे आदेश असतांना आपल्या नगरपालिका हद्दीतील सर्व दुकानदारांना आपण नोटीस देवून त्यांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन करुन दुकानावर मराठी भाषेत मराठी पाट्या लावण्याचे आदेश करावे व जे दुकानदार सुप्रिम कोर्टाचे व आपल्या आदेशाचे पालन करणार नाही अशा दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात यावी. व 

आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये श्रीरामपूर शहरातील सर्व दुकांनावर मराठी पाट्या न लावणार्‍या दुकानदारावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आपण दुकानदारांना पाठीशी घालून आपण सुद्धा सुप्रिम कोर्टाचे आदेशाचे पालन करत नाही असे समजून आपल्यासह दुकानदारांवर कारवाई व्हावी यासाठी आपल्या कार्यालयासमोर मनसे स्टाईलने तिव्र आंदोलन करण्यात येईल. मग होणार्‍या परिणामास आपण स्वत: जबाबदार राहाल याची नोंद घेण्यात यावी. असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले


याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, डॉक्टर संजय नवथर जिल्हा सचिव,

उपजिल्हाध्यक्ष विलास पाटणी, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे,शहराध्यक्ष सतिश कुदळे,बबन वाकडे तालुका संघटक,भास्कर सरोदे तालुका सचिव,अमोल साबणे तालुका सरचिटणीस, कुणाल सूर्यवंशी विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष, यश जराड विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष,निलेश सोनवणे शहर संघटक, नितीन जाधव शहर सरचिटणीस, अभिजीत खैरे तालुका उपाध्यक्ष, शहर उपाध्यक्ष अंकुश कुमावत,सचिन कदम,

लखन खुरे,  संतोष धुमाळ, बाळासाहेब ढाकणे, संदीप विशंभर, मारुती शिंदे, सुनील करपे, चेतन दिवटे, सुमित गोसावी, ज्ञानेश्वर काळे, महेश पवार, विकी परदेशी, मच्छिंद्र हिंगमिरे,आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बेलापुर (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सचिव म्हणून किशोर काळे यांना हजर करुन घेण्याच्या पणन मंत्रालयाच्या आदेशास मा .उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठाने स्थगीती दिली असुन उच्चन्यायालयाच्या निकालामुळे बाजार समीतीच्या सचिव पदी साहेबराव वाबळे हेच राहणार असल्यावर शिक्का मोर्तब झाला आहे .            श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या पेट्रोल पंपावरुन पेट्रोल व डिझेल उधारीवर देण्यात आले होते तसेच काही पैसे उधारीवर देण्यात आलेले होते या बाबत सचिव किशोर काळे यांची चौकशी झाली होती .त्या चौकशी अहवालात अनेक आरोप काळे यांच्यावर ठेवण्यात आले होते तसेच  लेखा परिक्षणातही २९ लाख रुपयांचे पेट्रोल व डिझेल उधारीवर दिल्याचे ताशेरे ओढण्यात आले होते या कामी सचीव काळे यांना जबाबदार धारण्यात आले होते चौकशी अहवालात सचिव काळे यांच्या सांगण्यावरुनच उधारीवर पेट्रोल व डिझेल दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले होते त्यामुळे किळे यांना पदनवत करुन सचिव पदाचा पदभार साहेबराव वाबळे यांच्याकडे देण्यात आला होता .त्या विरोधात काळे यांनी उपविभागीय सह निबंधक नाशीक यांच्याकडे अपील केले होते त्याचा निकाल काळे यांच्या बाजुने लागला त्या बाबत बावळे यांनी पणन मंत्रालयात अपील दाखल केले .पणन मंत्रालयानेही  काळे यांच्या बाजुने निकाल दिला .त्यानंतर काळे हे सचिव पदाचा पदभार घेण्यासाठी श्रीरामपुर कृषी  बाजार समीतीच्या कार्यालयात आले त्या वेळी त्यांचा अर्ज दाखल करुन घेतला कारण त्यांना दाखल करुन घेण्याचे अधीकार सभापतींना होते .त्या वेळी राजकीय दबावाचा वापर करण्यात आला .सचिव पदाचा चार्ज घेण्यासाठी डी डी आर व ऐ आर यांना पाठवीण्यात आले ,त्या वेळी आपल्या अर्जावर बैठकीत निर्णय घेवु असे सांगण्यात आले .त्यामुळे काळे व त्याचा जोडीदार निघुन गेले .मात्र राजकीय दबावाचा वापर करुन साहेबराव वाबळे व ईतरावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला .साहेबराव वाबळे यांनी पणन मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली .या बाबतची सुनावणी न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्यासमोर झाली .त्या वेळी पणन मंत्रालयाने दिलेल्या आदेशास न्यायमूर्ती शैलैश ब्रम्हे यांनी स्थगीती दिली असुन काळे यांच्यावरील चौकशी अहवालातील गंभीर दोष कायम ठेवण्यात आले आहे ,त्यामुळे साहेबराव वाबळे हेच बाजार समीतीच्या सचिव पदी कायम राहाणार आहे यावर शिक्का मोर्तब झाला साहेबराव वाबळे यांच्या वतीने अँड राहुल कर्पे यांनी काम पाहीले त्यांना अँड योगेश शिंदे यांनी सहकार्य केले ,सरकारी वकील म्हणून अँड .एस डी घायळ यांनी काम पाहीले .तर काळे यांच्या वतीने अँड ए डी शिंदे अँड अश्विन होन यांनी काम पाहीले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget