Latest Post

प्रतिनिधी: ठाणे ग्रामीण मधील पडघा पो.स्टे च्या हद्दीमध्ये दि.13/10/2023 रोजी रात्री 09:30 सुमारास मैदे गावाजवळ ता.भिवंडी येथे आरोपी नामे सुरज देवराम ढोकरे याने फिर्यादी अजिम अस्लम सय्यद  आणि त्याचा आतेभाऊ फिरोज रफिक शेख यांच्यावर जीवे ठार मारण्याचा उद्देशाने अजिम यांच्यावर 6 आणि फिरोज यांच्यावर 2 गोळ्या सरकारी ग्लॉक 19 Made in USA या पिस्तूलातुन झाडल्या. त्याबाबत पडघा पो.स्टे गुर.नं 533/23 भारतीय दंड संहिता 307, भारतीय हत्यार कायदा 3/25  गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज दि. 15/10 /2023 रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी हा अहमदनगरकडून नाशिकच्या दिशेने जात असल्याबद्दल माहिती पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके यांना मिळाली. त्यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीला ताब्यात घेण्याकरिता  तीन पथके तयार करून कोल्हार येथे नाकाबंदी लावण्यात आली आणि आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या ग्लॉक 19 पिस्तलसह कोल्हार बस स्टँडवरून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले .सदर आरोपी हा मुंबई पोलीस दलात नायगाव पोलीस मुख्यालय QRT मध्ये आर्मरर या पदावर कार्यरत आहे. आरोपीस पुढील तपास कामी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

*सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , API युवराज आठरे, PSI योगेश शिंदे,ASI बाबासाहेब लबडे,HC दिनेश चव्हाण,HC सुरेश पवार, HC एकनाथ सांगळे,HC भाऊसाहेब आव्हाड,PN रवींद्र मेढे,PN निलेश धाधवड ,PN अशोक शिंदे,PN श्याम जाधव,PC दिनेश कांबळे,PC अमोल फटांगरे चालक HC वर्पे व चालक PC ज्ञानेश्वर गांगुर्डे, होम हारदे, होम अभिजित साळवे, होम विशाल राऊत, होम गणेश साळुंके यांनी केली आहे.*

संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर येथे आज मोठ्या थाटामाटात युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती संघटना ही सदैव सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे मूलभूत हक्काचे प्रश्न घेऊन शासन दरबारी प्रश्न मांडणारी संस्था असून या संस्थेमध्ये नव्याने रुजू झालेले सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा श्री राजेश कोटकर (उत्तर महाराष्ट्र सह-संपर्क प्रमुख) यांच्या हस्ते नवीन ओळखपत्र व सभासत्व तसेच ट्रॅकसुट यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले हा कार्यक्रम सौभाग्य मंगल कार्यालय जवळ कार्यक्रमाच्या उपस्थिती वेळेस युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे संगमनेर तालुक्यातील श्री राजेश कोटकर उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख तसेच कैलास नवले उपाध्यक्ष नवनाथ तळपे तुषार नवले हंबीरराव लांडगे संगमनेर कार्याध्यक्ष श्री रोहिदास गुंजाळ (महाराज) तसेच अहमदनगर जिल्हा महिला कार्याध्यक्ष वैशाली फटांगरे संगमनेर महिला अध्यक्ष स्वीटी विदुर ,ज्योती कोरडे व अन्य  सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी तसेच श्रीरामपूर श्रीरामपूर तालुका अध्यक्ष ज्योती टाके बाबासाहेब वाघ महिला आघाडीच्या आरती महाडिक राहता तालुक्यातील पदाधिकारी राहता तालुका उपाध्यक्ष सचिन चोळके सदस्य हे यावेळेस उपस्थित होते यावेळी जनतेच्या मूलभूत हक्क व प्रश्नांसाठी युवा क्रांतीस फाउंडेशन नेहमी पाठीशी राहील अशा आश्वासन  उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजेश कोटकर यांनी दिले आहे

कोपरगाव(गौरव डेंगळे):शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा तसेच रोजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात काही उसंतीचे क्षण मिळावेत  व आपल्या अंगी असलेले कलागुण सादर करता यावे या उदात्त हेतूने सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव मध्ये पूज्य पद्मभूषण श्री करमसी भाई सोमैया भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.शारदीय नवरात्रोत्सवाच्या आयोजनाचे हे दुसरे पुष्प असून ही स्पर्धा दिनांक १६ व १७ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.सदर स्पर्धा ही शालेय गट व खुला गट अशा दोन गटांमध्ये विभागण्यात आलेली आहे. शालेय गटामध्ये शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे संघ सहभागी होऊ शकतात.सदर स्पर्धा दिनांक १६ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात येणार असून या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २०० रुपये आहे.बालकलाकारांचा उत्साह द्विगुणित व्हावा यासाठी 

*प्रथम बक्षीस-७०००/-*

*द्वितीय बक्षीस-५०००/-*

*तृतीय बक्षीस-३०००/-*

*प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस-१०००/-*

*द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस-१०००/-* अशाप्रकारे बक्षीसांचे स्वरूप ठेवण्यात आलेले आहे.

खुला गटातील स्पर्धा दिनांक १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी घेण्यात येणार असून या गटात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये आहे. या गटासाठी आयोजकांच्या वतीने भरघोस रकमेच्या बक्षिसांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर गटासाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे राहील.

*प्रथम बक्षीस-२५,०००/-*

*द्वितीय बक्षीस-१५,०००/-*

*तृतीय बक्षीस-१०,०००/-*

*प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस-५०००/-*

*द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस-५०००/-*

आपणा सर्व रसिक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न..तरी आपण सर्वांनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद देऊन आपली नाव नोंदणी दिनांक *१२ ऑक्टोंबर २०२३* पर्यंत पूर्ण करावी.

*स्पर्धेसाठी नियम व अटी*

१)सहभागी संघामध्ये कमीत कमी १६ स्पर्धक असावे.

२) प्रत्येक संघाला आपले नृत्य सादर करण्यासाठी 'आठ ते दहा' मिनिटांचा अवधी देण्यात येईल.

३)सदर स्पर्धा ही दांडिया स्पर्धा असल्याकारणाने गुणांकनासाठी दांडिया नृत्यालाच प्राधान्य देण्यात येईल.

४)आयोजकांनी दिलेल्या नियोजित वेळेतच आपला प्रवेश निश्चित करावा.

५) सर्व स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी सायंकाळी ठीक ५.३० वाजता उपस्थित राहावे, स्पर्धा वेळेवर चालू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

६)सदर स्पर्धा श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.प्रवेश निश्चितीसाठी संपर्क सौ.शुभांगी अमृतकर(9423038831) यांच्याशी संपर्क साधावा.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय,श्रीरामपूर क्रीडा समिती व कै रघुनाथ कृष्णाजी पाटील अवताडे महाविद्यालय माळेवाडी

येथे तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न झालेल्या.१४ वर्ष वयोगटातील मुलीच्या कबड्डी स्पर्धात हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूल संघ विजेता ठरला आहे.

या १४ वर्ष वयोगटातील मुलीनी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीचे लढतील जे टी येस, बेलापूर  तर अंतिम सामन्यात श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सदर संघ श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल. विजयी संघाचे खेळाडू श्रुती कारले (कर्णधार), शर्वरी बोर्डे, श्रावणी कहार, आर्या कळसाईत, गीतांजली बडाख, गायत्री गायके, पूर्वा बांद्रे, नव्यानी पंडित, अतिथी देहाडे, कार्तिकी गायके, साक्षी बावस्कर, शिफा शेख, अनुष्का देहाडे, समृद्धी कदम.विजयी संघाचे संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर ज्योती,शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी संघाला श्रीरामपूरचे क्रीडारत्न नितीन बलराज यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): टी ट्वेंटी क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने दिनांक २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली.या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू प्रेम शिंदे याची निवड करण्यात आली तर उपकर्णधारपदी केंब्रिज इंटरनॅशनल हायस्कूलच्या खेळाडू मितांश चोथानी याची निवड करण्यात आली.

सप्टेंबर महिन्यामध्ये गोव्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेची निवड चाचणी श्रीरामपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती.या निवड चाचणीसाठी अहमदनगर, संगमनेर,अकोले,कोपरगाव श्रीरामपूर तसेच संभाजीनगर जिल्ह्यातून ४५ ते ५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.निवड चाचणीतून १३ खेळाडूंची निवड करण्यात आली असल्याची माहिती संघाचे प्रशिक्षक श्री नितीन बलराज यांनी दिली. निवड झालेल्या संघ १६ ते १९ वर्षाखालील स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.या स्पर्धेमध्ये देशभरातून निमंत्रित १८ राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत. निवड झालेल्या संघाचे व्यवस्थापक म्हणून श्री नितीन गायधने तर मार्गदर्शकपदी श्री बॉबी बकाल व गौरव डेंगळे यांची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या संघाचे टी-२० क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री सद्दिक मोहम्मद,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राम टेकावडे,खजिनदार जन्मजय टेकावडे,प्राचार्या सौ जयश्री पोडघन,प्राचार्य डॉ योगेश पुंड,श्री गोकुळ खंडागळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


निवड झालेल्या संघ पुढीलप्रमाणे: १) प्रेम शिंदे (कर्णधार) २) मितांश चोथानी (उप कर्णधार) ३) यश काथेड ४) धर्मेश आदमाने ५) अर्जान शेख ६) सर्वेश व्यास ७) आकाश यादव ८) आरम डाकले ९) वरद कुंभकर्ण १०) सक्षम थापर ११) अनिमेश फेरवणी १२) रिदम बत्रा  १३) कबीर चौदांते

अहमदनगर(गौरव डेंगळे): रोलर हॉकी हा हॉकीचा एक प्रकार आहे जो कोरड्या पृष्ठभागावर चाकांच्या स्केट्सचा वापर करून खेळला जातो.हे पारंपारिक रोलर स्केट्स (क्वॉड स्केट्स) किंवा इनलाइन स्केट्ससह खेळले जाऊ शकते आणि एकतर बॉल किंवा पक वापरता येते. आज अहमदनगर येथे भारतीय रोलर स्केटिंग संघटनेचे सहसचिव श्री सतीश गायकवाड यांनी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंना रोलर स्केटिंग खेळा संदर्भात प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली.

रोलर हॉकी जगभरातील जवळपास ६० देशांमध्ये खेळली जाते.संघटित रोलर हॉकीचे तीन प्रमुख प्रकार आहेत. पारंपारिक " रोलर हॉकी " (याला रिंक हॉकी, क्वाड हॉकी आणि हार्डबॉल हॉकी देखील म्हणतात) क्वाड स्केट्स, वक्र/'केन' स्टिक्स आणि बॉल वापरून खेळला जातो; हा मर्यादित संपर्काचा खेळ आहे . इनलाइन स्केट्स, आइस हॉकी स्टिक्स आणि एक पक वापरून " इनलाइन हॉकी " खेळली जाते ; शरीराच्या तपासण्यांना परवानगी नसली तरी हा एक पूर्ण-संपर्क खेळ आहे. " इनलाइन स्केटर हॉकी " ही इनलाइन हॉकीची युरोपियन आवृत्ती आहे जी पक ऐवजी बॉल वापरते. रिंक हॉकी आणि इनलाइन हॉकी आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक स्केटद्वारे नियंत्रित केली जातात , तर इनलाइन स्केटर हॉकी द्वारे नियंत्रित केली जातेआंतरराष्ट्रीय इनलाइन स्केटर हॉकी फेडरेशन . बहुतेक व्यावसायिक हॉकी खेळ इनडोअर किंवा आउटडोअर स्पोर्ट कोर्टवर होतात (स्केटिंग पृष्ठभाग तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या इंटरलिंकिंग टाइल्सचा एक प्रकार).अन्यथा,कोणत्याही कोरड्या पृष्ठभागाचा वापर खेळ आयोजित करण्यासाठी केला जाऊ शकतो,विशेषत: रोलर रिंक, मॅकॅडम (डामर) किंवा सिमेंट.यावेळी न्यू इंग्लिश स्कूलच्या ४० ते ४५ खेळाडूंसह, क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे,श्री नितीन गायधने यांनी रोलर स्केटिंग मार्गदर्शन सत्राचा अनुभव घेतला.

श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हददीत सार्वजनिक गणेश उत्सवात एकुण 112 गणेश मंडळानी सहभाग घेवुन गणेश स्थापना केली होती. सदर मंडळांना प्रोत्साहन देण्याकरीता व पोलीस प्रशासन व गणेश मंडळ यांचेत समन्वय राहुन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. तसेच गणेश मंडळाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचे हातातून चांगले कार्य व्हावे करीता श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन कडुन प्रथम ०३ उत्कृष्ट मंडळ व 02 उत्तेजनार्थ तसेच एक गाव एक गणपती 3 मंडळाची निवड करुन त्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्याची संकल्पना राबविली. तसेच ज्या गणपती मंडळानी प्रशासनाची परवानगी घेणे,1. गणेश मुतीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीत डीजे /डॉल्बींचा वापर न करता पारंपारीक वादयांचा वापर करणे. २. गणेश भुतीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे ३. पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश स्थापनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे ४. श्री गणेशाचे जागेवर विसर्जन करणे ५. गणेशोत्सव काळात उत्कृष्ट सजावट ६. गणेशात्सव काळात पर्यावरण संगोपन, व्यसनमुक्ती व महीला सुरक्षा बाबतचे कार्यक्रम राबविणे 7. स्वंयसेवक नेमुन शिस्त पाळणारे गणेश मंडळ या निकषांचा विचार करुन मंडळाची बक्षीसासाठी निवड केली आहे. तसेच शासनाच्या घालुन दिलेल्या अटी शर्तीचे पालन करुन प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल सर्व गणेश मंडळाना देखील प्रमाणपत्र दिले.

सार्वजनिक गणेश उत्सव सन २०२३ मध्ये उत्कृष्ट सार्वजनिक काम केल्याबाबत त्यांचा सन्मान सोहळा दिनांक 02/10/२०२३ रोजी सायंकाळी 06/०० वाजेच्या सुमारास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे मा. डाँ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर व मा.हर्षवर्धन गवळी, पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांचे उपस्थितीत पार पडला असून त्याचे शुभहस्ते उत्कृष्ट काम करणा-या गणेश मंडळांना पारीतोषिक वितरण करण्यात आलेले आहेत.प्रथम क्रमांक - मानाचा गणपती आझाद मैदान वार्ड नं -5 दुसरा क्रमांक - नॉर्दन बँच वार्ड नंबर-7 तिसरा क्रमांक-जे टी एस हायस्कूल बेलापूर चौथा क्रमांक- शिवाजी रोड चा राजा वार्ड नं 3

पाचवा क्रमांक-योद्धा ग्रुप गिरमे चौक वार्ड नं-3 उत्तेजनार्थ- 1. जय भोले मित्र मंडळ 2. श्रीराम तरुण मंडळ

एक गाव एक गणपती

प्रथम क्रमांक - खंडाळा

दुसरा क्रमांक - वळदगाव तिसरा क्रमांक- ब्राह्मणगाव वेताळ

यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत. सदर कार्यक्रमांस श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमधील सरपंच, उपसरपंच, सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांचे सहकारी हजर राहीले आहेत. तरी सदर मंडळांनी यापुढे देखील अशाच प्रकारे शासनाचे दिलेल्या सुचना व नियमाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम करुन सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्याचे काम करेल यांना पोलीस प्रशासनाकडुन अशाच प्रकारे सन्मानित करण्यात येईल बाबत आश्वाषित केले आहे.

सदरचा उपक्रम मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब,मा अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली मा. डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर व मा. हर्षवर्धन गवळी, पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांचे उपस्थितीत राबविण्यात आला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget