सप्टेंबर महिन्यामध्ये गोव्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेची निवड चाचणी श्रीरामपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती.या निवड चाचणीसाठी अहमदनगर, संगमनेर,अकोले,कोपरगाव श्रीरामपूर तसेच संभाजीनगर जिल्ह्यातून ४५ ते ५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.निवड चाचणीतून १३ खेळाडूंची निवड करण्यात आली असल्याची माहिती संघाचे प्रशिक्षक श्री नितीन बलराज यांनी दिली. निवड झालेल्या संघ १६ ते १९ वर्षाखालील स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.या स्पर्धेमध्ये देशभरातून निमंत्रित १८ राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत. निवड झालेल्या संघाचे व्यवस्थापक म्हणून श्री नितीन गायधने तर मार्गदर्शकपदी श्री बॉबी बकाल व गौरव डेंगळे यांची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या संघाचे टी-२० क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री सद्दिक मोहम्मद,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राम टेकावडे,खजिनदार जन्मजय टेकावडे,प्राचार्या सौ जयश्री पोडघन,प्राचार्य डॉ योगेश पुंड,श्री गोकुळ खंडागळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
निवड झालेल्या संघ पुढीलप्रमाणे: १) प्रेम शिंदे (कर्णधार) २) मितांश चोथानी (उप कर्णधार) ३) यश काथेड ४) धर्मेश आदमाने ५) अर्जान शेख ६) सर्वेश व्यास ७) आकाश यादव ८) आरम डाकले ९) वरद कुंभकर्ण १०) सक्षम थापर ११) अनिमेश फेरवणी १२) रिदम बत्रा १३) कबीर चौदांते
Post a Comment