Latest Post

प्रतिनिधी- Dy.s.p. संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे शिर्डी परिसरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन 15 पिडीत  महिलांची सुटका करण्यात आली आहे. 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे . 

 एकाच वेळी हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी,हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आले. या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे  साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी DySP संदीप मिटके  यांचे  कौतुक केले.

*सदरची कारवाई मा. श्री. बी.जी. शेखर पाटील IG, मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI विलास पुजारी, Pi डोहिफोडे, PI डांगे, Pi चौधरी, pi पाटील, pi इंगळे, Api मानिक चौधरीं API थोरात, psi बोरसे व इतर पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली.*

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अवैध व्यवसायामुळे गावाची शांतता धोक्यात आली असुन गावात सुरु असलेले अवैध व्यवसाय मटका गुटखा त्वरीत बंद करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थासह बेलापुर पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसण्याचा इशारा बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी दिला आहे .                          या बाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पाठविलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की बेलापुरगाव हे सुसंस्कृत गाव असुन गावात सुरु असलेल्या अवैध व्यवसायामुळे गावाची शांतता धोक्यात आलेली आहे आनेक गुन्हेगारांचा वावर गावात वाढला आहे शासनाने वाळू खूली केल्यामुळे वाळू तस्करी करणारे वाळू तस्कर आता अवैध व्यवसायाकडे वळू लागले आहे गावात काही मोठी घटना घडण्या आगोदर हे अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे असे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिले होते त्यामुळे काही काळ हे व्यवसाय बंद राहीले आता पुन्हा काहींनी मध्यस्थी करुन नव्या जोमाने अवैध व्यवसाय सुरु केले असुन अनेक तरुण मुले विद्यार्थी कष्टकरी मजुर अवैध व्यवसायाच्या अहारी जात आहे मटका गुटखा दारु यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे तरी आपण गावातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच महेंद्र साळवी यांनी केली असुन हे व्यवसाय दोन दिवसात बंद न केल्यास आपण ग्रामस्थासह बेलापुर पोलीस स्टेशन येथे उपोषणास बसु असा इशाराही सरपंच साळवी यांनी दिला आहे या निवेदनाच्या प्रति मा मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री महसुल तथा पालकमंत्री पोलीस महासंचालक जिल्हाधिकारी अहमदनगर अप्पर  पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर यांना पाठविण्यात आलेल्या आहेत

श्रीरामपूर : हजरत सैलानी बाबा दरगाह श्रीरामपूर यांचा,६४ वा उर्स मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना. १ मे रोजी छोटा मजीद शोला यांचा कार्यक्रम संपन्न झाला. व २ मे २०२३ रोजी प्रसिद्ध कव्वाल रईस अनिस साबरी यांचा पूर्व नियोजित कार्यक्रम होणार होता. मात्र रईस अनिस साबरी यांची आई गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथील आपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून. काल त्यांची बायपास सर्जरी झाल्या नंतर, त्यांची प्रकृती खालावल्याने प्रसिद्ध कव्वाल रईस अनिस साबरी यांना श्रीरामपूर येथील हजरत सैलानी बाबा उर्सास येणे शक्य होणार नसल्याने. रईस अनिस साबरी यांनी आपोलो हॉस्पिटलमधून दिलगिरी व्यक्त
करत,आपल्या परिस्थिती संदर्भात व्हिडीओ द्वारे शहर वासीयांची माफी मागितली असून आपल्या टीम सोबत दुसरा कव्वाल पाठवत असल्याचे माहिती व्हिडीओच्या माध्यमातून, आज पहाटे स्वतः दिली आहे. त्यामुळे आज रईस अनिस साबरी यांचा पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द झाला असून. त्यांच्या ठिकाणी दुस-या कव्वालाच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असल्याची माहिती. हजरत सैलानी बाबा उर्स कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.


बेलापूरःकृषी उत्पन्न बाजार समिती हि शेतक-यांशी निगडीत आहे.या संस्थेच्या माध्यमातून शेतक-यांचे प्रश्न सोडवायचे आहेत तसेच अनेक विकास कामे करावयाची आहेत.यासाठी सत्तेचे पाठबळ लागते.त्यासाठीच महसूल मंञी श्री.राधाकृष्ण विखे,मी आणि करण ससाणे यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही  कायम जनतेत असतो म्हणूनच आम्हाला सत्ता मिळते हे केवळ निवडणूकांच्या वेळी अवतरणारांनी ध्यानात ठेवावे असे  प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.                                       कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील श्रीरामपूर सहकार विकास पॕनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे आयोजित मेळव्यात श्री.मुरकुटे बोलत होते.जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे,भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे,साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर,माजी सभापती नानासाहेब पवार,डीपी.डी.सी चे सदस्य बाबासाहेब दिघे,जि.प.सदस्य शरद नवले,लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ,भास्कर खंडागळे, रवी खटोड ,सुधीर नवले,अभिषेक खंडागळे, राम पोळ, आदी उपस्थित होते.                              श्री.मुरकुटे म्हणाले की,श्रीरामपूरची बाजार समितीला उर्जितावस्था मिळवून द्यायची आहे.मुख्य बाजार समितीसह बेलापूर व टाकळीभान येथील उपबाजार समिती येथे  जनावरांचे बाजार,कांदा मार्केट सुरु करणे यासह अनेक विकास कामे करावयाची आहेत.तालुक्यात खंडकरी व आकारी पडीत शेतक-यांचे प्रश्न प्रलंबित आहेत.अनेक गावांची गावठाण हद्द संपली आहे.गावठाण हद्द वाढीसाठी शेती महामंडळाची जागा मिळवायची आहे.हे सर्व प्रश्न महसूल मंञ्यांशी निगडीत आहेत.महसूल मंञ्यांनी या प्रश्नी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.शेतक-यांचे प्रश्न सोडविणेसाठीच आम्ही युती केली आहे.सत्तेसाठी आम्ही झुकत नाही तर आम्ही नादी लागणारांना घुडगे टेकावयास लावतो.  जनतेचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्हाला सत्ता मिळते हे आमच्यावर बिनबुडाचे आरोप करणारांनी ध्यानात घ्यावे असे श्री.मुरकुटे  म्हणाले.                                                           स्वागत व प्रास्ताविक साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर यांनी केले.देवीदास देसाई यांनी सूञ संचलन केले तर सरपंच महेन्द्र साळवी यांनी आभार मानले.कार्यक्रमास भरत साळुंके,जालिंदर कु-हे,प्रकाश नाईक,शेषराव पवार,भगवान सोनवणे,भाऊसाहेब कुताळ,किशोर नवले,शिवाजी वाबळे,ज्ञानदेव वाबळे,पंडीतराव बोंबले,भास्कर बंगाळ,दत्ता कु-हे ,विलास मेहेञे,प्रकाश नवले,सुधाकर खंडागळे,बाळासाहेब वाबळे,अनिल नाईक,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,रमेश अमोलिक, प्रभात कु-हे,पुरुषोत्तम भराटे,वैभव कु-हे,प्रसाद खरात,सुरेश कु-हे,रामचंद्र राशिनकर,विलास कु-हे ,प्रकाश कु-हे, असिफ बागवान,हाजी ईस्माइलभाई शेख,मोहसीन सय्यद,जीना शेख, जाकीर शेख,आयजुभाई शेख,सुरेश अमोलिक सचिन अमोलिक,रावसाहेब अमोलिक,किशोर बोरुडे,अन्तोन आमोलिक,दिलिप अमोलिक ,प्रशांत लढ्ढा,शांतिलाल हिरण,प्रदीप शेलार,सुभाष शेलार,वैभव कु-हे,अमोल गाढे,महेश कु-हे,सचिन वाघ,विशाल आंबेकर आदिंसह ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रसिद्ध पार्श्वगायीका अनुराधाताई पौडवाल यांना शनि महाराज जयंती निमित्त बेलापुर व शनि शिंगणापूर येथे भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले असुन या निमंत्रणाचा त्यांनी स्विकार केला असल्याची माहीती बेलापुर येथील शनि मंदिराचे पुजारी दिपक वैष्णव यांनी दिली आहे.शनि महाराजांची जयंती १९ मे रोजी येत असुन त्या निमित्ताने आपण अहमदनगर जिल्ह्यात येवुन शनि शिंगणापूर तसेच पुरातन  बेलापुर येथील शनि मंदिरास भेट द्यावी अशी विनंती शनि शिंगणापूरचे पोलीस पाटील अँड .सयाराम बानकर व बेलापुर शनि मंदिराचै पुजारी दीपक वैष्णव यांनी मुंबई येथील अनुराधाताई पौडवाल यांच्या घरी जावुन शनि मंदिरास भेट देण्याचे निमंत्रण दिले शनि शिंगणापूर येथील शनि महात्म्य सर्वांना माहीत आहे त्याच बरोबर श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथे शनी महाराजाची एकमेव मूर्ती असुनअतिशय जागृत असे हे देवस्थान आहे त्यामुळे मूर्ती रुपात असणाऱ्या बेलापुर येथील शनि मंदिरासह आपण भेट द्यावी अशी विनंती मदिंराचे पुजारी दिपक वैष्णव व रामभाऊ जगताप यांनी केली या वेळी बोलताना अनुराधाताई पौडवाल म्हणाल्या की शनि महाराजांच्या दर्शनाला जाण्याचा योग खऱ्या अर्थाने आज आलेला आहे शनि महाराजाचे दोन्ही भक्त पुजारी शनि महाराजांच्या भेटीचे निमंत्रण घेवुन आलेले आहे बहुधा शनि देवानेच त्यांना माझ्याकडे पाठविले असावे त्यामुळे शनि जयंतीला मी शनि महाराजांचे दर्शन घेण्याकरीता शिगंणापूर तसेच बेलापुर येथे येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - जगभरातील मुस्लिमांचा सर्वात मोठा सण असलेली रमजान ईद काल शहर व तालुक्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या  निमित्ताने ईदगाह मैदान व जामा मशीद तसेच शहरातील अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली.सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईद व अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर सुद्धा शुभेच्छांचा पाऊस पडला.

याप्रसंगी ईदगामध्ये दुवा करताना शहर काळजी मौलाना अकबर अली यांनी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी आपल्या देशाला उद्देशून गौरोद्गार काढले होते.मुझे जमीन ए हिंद से मोहब्बत की महक आती है असे हजरत पैगंबर यांनी सांगितले होते.परंतु आज या देशाला कुणाची तरी नजर लागली आहे. देशाचे वातावरण बिघडले आहे.त्यासाठी आज आपण सर्वजण मिळून दुआ करू या. या देशांमध्ये सुख,शांती, समृद्धी नांदू दे.सर्वांच्या समस्या दूर होऊ दे आणि एकोपा आणि भाईचारा निर्माण होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली.

जामा मशीद व ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस  अविनाश आदिक, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,उपनगराध्यक्ष करण ससाणे,युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक कानडे,सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, हेमंत ओगले,संजय छल्लारे, लकी सेठी,दीपक कदम, जयंत चौधरी, भाउसाहेब मुळे, विजय खाजेकर,

तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, डिवायएसपी संदीप मिटके,

मुख्याधिकारी गणेश शिंदे,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,नाना पाटील,महेंद्र त्रिभुवन, किशोर त्रिभुवन,संदीप मोकळ,अरुण मोकळ, तलाठी घोरपडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

आगामी नगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक पाहता या वर्षी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये शुभेच्छा फलकांची स्पर्धा दिसून आली. 

नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक म्हणून शुभेच्छा दिल्या. पोलीस खात्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जामा मशीद मध्ये आलेल्या मान्यवरांचे स्वागत डॉक्टर राज शेख,नगरसेवक मुख्तार शाह, रज्जाक पठाण, तनवीर रजा,जावेद शेख यांनी केले. महिनाभर रमजान निमित्ताने रमजान, कुरआन व इस्लाम धर्माबद्दल मौलिक माहिती विविध वर्तमानपत्रे व सोशल मीडिया मधून प्रसारित केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा जामा मशीद ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला. मौलाना मोहम्मद ईमदादअली यांनी धार्मिक प्रवचन दिले तर मुफ्ती अतहर हसन यांनी नमाजची ईमामत केली.जामा मशिदीचे विश्वस्त शकूर भाई शेख यांची कमतरता यावेळी जाणवली.

ईदगामध्ये मुफ्ती रिजवानुल हसन शेख यांनी धार्मिक प्रवचन दिले. नमाजची इमामत मौलाना सय्यद अकबर अली काझी यांनी केली.याप्रसंगी लखनऊ येथील मदरसा नदवातुल उलेमाचे मुफ्ती अब्दुल्लाह मखदुम हुसेन यांची प्रमुख उपस्थिती होती.ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी मुझफ्फर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.


चौकट

पोलीस विभागातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईद मुबारक म्हणत स्वागत करण्यात आले.पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक गवळी व त्यांचे सर्व सहकारी यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प दिले.

नगरपालिकेतर्फे यावेळी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ईदगाह भोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नमाज नंतर सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर प्रमुख राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी शहरातील मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर येथील ईदगाह मैदानावर मौलाना शकील अहमद यांनी ईदची नमाज अदा केली मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान तसेच  मस्जिद मध्ये ईद उल फित्रची नमाज अदा करुन एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद साजरी केली              येथील उक्कलगाव चौफुलीवर असलेल्या ईदगाह मैदानावर मौलाना शकील अहमद यांनी सर्व मुस्लीम बांधवांना महीनाभर केलेले उपवास तसेच अल्लातालाकडे केलेली याचना मंजुर होवुन गावात तालुक्यात जिल्ह्यात तसेच राज्यात देशात शांतता नांदुन सुख समृद्धी व भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या या वेळी मा जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचा चेअरमन रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके  आरपीआयच्या वतीने रमेश अमोलीक पत्रकारांच्या वतीने देविदास देसाई  पोलीसांच्या वतीने ऐपीआय बोरसे प्रदेश तेली महासंघाच्या वतीने एकनाथ उर्फ लहानु नागले भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदिंनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या तसेच हिंदु बांधवांना अक्षय तृतीयाच्या तसेच परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रशासनाच्या वतीने योग्य  सहकार्य केल्याबद्दल ऐपीआय बोरसे यांचा सत्कार सर्फराज सय्यद जाकीर शेख जब्बार अत्तार शफीक बागवान  यांनी सत्कार केला या वेळी जाफरभाई आतार मोहसीन सय्यद अब्रार सय्यद हाजी ईस्माईल शेख यांनी हिंदु बांधवांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget