Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्री स्वामी समर्थ अध्यात्मीक बाल संस्कार केंद्राचे भुमीपुजन विविध मान्यवरांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले या वेळी सर्व मान्यवरांनी गावाच्या वैभवात भर टाकणारे हे संस्कार केंद्र असुन केंद्र उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे अवाहन केले               श्री स्वामी समर्थ केंद्रांची बेलापुरात सन १९९१ ला सुरुवात झाली सुरुवातीला हे केंद्र महादेव मंदीर येथे सुरु झाले या केंद्रास व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा यांनी जागा उपलब्ध करुन दिली सन २०१७ पासुन नविन जागेत श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र सुरु करण्यात आले या ठिकाणी जागा उपलब्ध होती परंतु  या ठिकाणी चांगले संस्कार केंद्र उभे रहावे ही अनेक सेवेकऱ्यांची मनापासुन ईच्छा होती अखेर विविध मान्यवरांच्या हस्ते या केंद्राचा भुमीपुजन सोहळा संपन्न झाला त्या वेळी जि प सदस्य शरद नवले बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष  सुनिल मुथा ,प्रशांत लढ्ढा शांतीलाल हिरण आप्पासाहेब थोरात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक सुवालाल लुक्कड रविंद्र खटोड सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे साहेबराव वाबळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी प्रताप सरोदे ,उंदिरगाव केंद्र भारत कोळसे, राधु पवार ,दिनेश वैद्य, बाबासाहेब शेटे, हिम्मतराव धुमाळ, प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, किरण भांड, ज्योतीताई भांड, भगीरथ मुंडलीक, कैलासा देसाई , दत्तात्रय कुऱ्हे  ,योगेश शिंदे ,जनार्धन शिंदे ,विलास कुऱ्हे  ,जालींदर गाढे ,अशोक राशिनकर ,विजर धुमाळ  आदिसह असंख्य सेवेकरी उपस्थित होते या वेळी महीला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ कल्पना थोरात यांनी केले तर सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले शेवटी विठ्ठल गाडे मामा यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-दिपावली प्रमाणेच गुढी पाडवा व डाँक्टर  बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त  महाराष्ट्र शासनाने गोरगरीब जनतेला शंभर रुपयात  आनंदाचा शिधा देण्याचा धाडसी निर्णय घेतला असुन या निर्णयामुळे जनतेचा सण गोड होणार आहे                                       सर्व सामान्य नागरीकांची दिवाळी गोड व्हावी या करीता शासनाने शंभर रुपयात एक लिटर पामतेल एक किलो रवा एक किलो साखर एक किलो हरभरा दाळ देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता आता नविन मराठी वर्ष सुरु होत आहे पहीलाच सण  गुढी पाडवा आहे तसेच महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती आहे त्यामुळे नागरीकांना हे ही सण आनंदात साजरे करता यावेत या करीता राज्यातील एक कोटी ६३ लाख कुटुंबांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे  दिपावली सणाच्या कालावधीत अनेक ठिकाणी आनंदाचा शिधा उशिराने पोहोचला होता परंतु आता शासनाने वेळेत हा शिधा पोहोच करण्याची खबरदारी घ्यावी अशीच सर्व सामान्य नागरीकांची मागणी आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )- आर्थिक नियोजना बाबत बेलापुर ग्रामपंचायतीने केव्हा ग्रामसभा घेतली? विरोधी सदस्यांना का बोलविले नाही ?त्या सभेचा अजेंडा दाखवा ? म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला यावर सरपंच-उपसरपंच यांनी आक्रमक होत प्रतिउत्तर दिले. गरमा-गरमीच्या वातावरणात जि प सदस्य शरद नवले यांनी मध्यस्थी करुन वादावर पडदा टाकल्यामुळे ग्रामसभा शांततेत पार पडली     बेलापुर ग्रामपंचायतीची ग्रामसभा मराठी शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आली होती ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी मागील सभेचे प्रोसिडींग वाजण्यास सुरुवात केली त्या  वेळी ही सभा केव्हा घेतली आम्हाला निरोप का दिला नाही ?असा सवाल सदस्य भरत साळूंके, रविंद्र खटोड यांनी केला त्यावर वाद सुरु झाला या वादात उपसरपंच अभिषेक खंडागळे  प्रफुल्ल डावरे मोहसीन सय्यद यांनी तुम्ही मागे काय केले ते पण सांगा अशी विचारणा करताच वातावरण चांगलेच तापले त्यामुळे पोलीस देखील तातडीने ग्रामसभेस उपस्थित झाले. जि प सदस्य शदर नवले यानी काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करु असे सांगुन तो विषय थांबविला त्या नंतर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या १५% निधी मागासवर्गीयासाठी खर्च करणे हा नियम असताना तो  का केला नाही असा सवाल विजय शेलार यांनी केला.चंद्रकांत नाईक यांनीही दलीत वस्तींना न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी मागील सत्ताधाऱ्यांच्या काळातील मागसवर्गीय निधी वाटप झालेले नाही असा खुलासा केला.प्रफुल्ल डावरे यांनी अनेक ठिकाणी नविन बांधकाम झालेली असुन त्याचे रिव्हीजन करा वा नविन नियमानुसार आकारणी करा जेणेकरुन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढेल अशी मागणी केली.हाजी इस्माईल शेख यांनी गावातील रस्त्यावरील अतिक्रमण गोविंद वाबळे व राकेश कुंभकर्ण यांनी फ्लेक्स बोर्डाबाबत नियम बनवावेत कलेश सातभाई, संजय रासकर यांनी सातभाई वसाहतीतील स्मशानभुमीचा लागलेला फेर कसा रद्द झाला अशी विचारणा केली. याबाबत सरपंच महेंद्र साळवी यांनी सदरचा फेर २०१० सालीच रद्द झालेला असून जागा ताब्यात घेण्या याबाबत कार्यवाही करू असे सांगितले.बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी पाणी पुरवठा योजनेची माहीती व आराखडा याची माहीती नागरीकांना द्यावी अशी मागणी केली या वेळी पत्रकार देविदास देसाई यांनी बेलापुर ग्रामपंचायतीचे शतक महोत्सवी वर्ष असुन पाणी पुरवठा योजनेकरीता १२६ कोटी रुपये निधी मिळविणारी पहीली ग्रामपंचायत ठरली असुन या योजनेकरीता पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा खासदार सदाशिव लोखडे आमदार लहु कानडे तसेच दिपक पटारे, शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे  या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. टाळ्याच्या गजरात त्यास मंजुरी देण्यात आली मा ,जि प शरद नवले यांनी १२६ कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा  योजनेची सविस्तर माहीती दिली  पाणी पुरवठा योजनेकरीता जमीन मिळावी या करीता उच्च न्यायालयात दावा दाखल करणारे विलास मेहेत्रे संजय शिरसाठ मुस्ताक शेख यांचा सत्कार करण्यात आला तसेच नविन पाणी पुरवठा योजनेतील टाक्यासाठी  जागा देणारे माधव कुऱ्हे प्रकाश मेहेत्रे नामदेव मेहेत्रे मनोज मेहेत्रे जनार्धन दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी तबस्सुम बागवान सौ शिला पोळ स्वाती आमोलीक प्रियंका कुऱ्हे जालींदर कुऱ्हे  प्रकाश नवले लहानु नागले भाऊसाहेब तेलोरे दत्ता कुऱ्हे  प्रकाश नवले प्रभाकर कुऱ्हे  विशाल आंबेकर अमोल गाढे अजिज शेख अय्याज सय्यद जाकीर शेख भाऊसाहेब कुताळ महेश कुऱ्हे सचिन वाघ सुरेश कुऱ्हे आदिसह ग्रामस्थ महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते नेहमीत शांत व संयमी असणारे सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा आक्रमक पवित्रा पहिल्यादाच विरोधकांनी अनुभवला.


श्रीरामपूर - येथील नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिका शिक्षण मंडळाचे लोकप्रिय प्रशासन अधिकारी श्री ज्ञानेश्वर पटारे हे उपस्थित होते.

आपल्या प्रमुख भाषणात प्रशासनाधिकारी पटारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी सर्वधर्मसमभाव जपला. त्यांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम सैनिक मोठ्या प्रमाणात होते.महाराज ही त्यांची खूप काळजी घेत होते.त्यांच्या आजोबांनी मूल बाळ होण्यासाठी नवस केल्यामुळे झालेल्या मुलांची नावे शहाजी व शरीफजी ठेवली असे सांगून शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत अत्यंत ओजस्वी स्वरात सादर केल्याबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल त्यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारी भाषणे सादर केली.

प्रस्ताविक भाषणात मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मुस्लिम सरदार या विषयावर मार्गदर्शन केले. महाराजांच्या फौजेमध्ये 35% मुस्लिम सैन्य होते तसेच महाराजांनी कुरआन शरीफ सुद्धा अवगत केले होते असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रशासन अधिकारी पटारे साहेब यांचा फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद आसिफ मुर्तुजा व आभार प्रदर्शन एजाज चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीच्या सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) बारावी परीक्षा हा शैक्षणिक प्रवासातील महत्वाचा आणि दिशा दर्शक टप्पा असुन तो पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावुन यश संपादन करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले यांनी केले.अशोक एज्युकेशन सोसायटी संचलित शिरसगाव येथील  न्यु इंग्लिश स्कूल व कनिष्ठ वानिज्य महाविद्यालय वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित "अनुभवाचे बोल" या विशेष कार्यक्रमात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. गवले बोलत होते.ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी ऐन परीक्षा काळात अकारण दडपण घेतात. त्यामुळे आत्मविश्वास गमावून बसतात. त्यातुन मनात गोंधळ निर्माण होतो. त्यासाठी मानसिक संतुलन स्थिर ठेवणे अत्यावश्यक आहे. पेपरला सामोरे जाताना केलेल्या अध्ययनाचे वारंवार चिंतन, मनन करणे अपेक्षित ठरते. असे सांगत त्यांनी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन करुन अधिक गुण संपादन करण्याच्या काही युक्त्या सांगुन प्रा.गवले यांनी विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढविला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रास्ताविक व परिचय  या उपक्रमाचे संयोजक प्रा. राजेंद्र  वधवानी यांनी केले. प्राचार्या सौ. सुमती औताडे यांनी प्रा. गवले यांचा सन्मान केला. यावेळी पर्यवेक्षक व्ही. आय. थोरात, लेखनिक शशिकांत गवारे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी कु.कांचन गवारे,कु.श्रृतीका गवारे, मंगेश रुद्राक्षे कु.गायत्री आदी विद्यार्थ्यांनी  मनोगत व्यक्त केले. प्रा .सुनिता अहीरे यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील ईनामदार मस्जिदशेजारी असलेल्या दोन खोल्यांना अचानक आग लागली सुदैवानी कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही शुक्रवारची नमाज अदा करण्या आगोदर ही घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला                                येथील ईनामदार मस्जिद लगत असलेल्या दोन खोल्यांना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विजेच्या शाँर्ट सर्किटमुळे आग लागली आशुतोष गोरे यांनी सर्व प्रथम धुर निघताना पाहीले त्यांनी तातडीने आरडा ओरड केली आसपासचे नागरीक जमा झाले काही नागरीकांनी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळविले ते बाहेरगावी होते तरी देखील त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला सुचित केले तसेच ग्रामपंचायत टँकर व ग्रामपंचायत कर्मचारी घटनास्थळी पाठविले.आग लागल्याचे सामजताच गावातील विज पुरवठा बंद करण्यात आला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके हाजी इस्माईल शेख मोहसीन सय्यद अशोक गवते पत्रकार दिलीप दायमा पापा मुलानी समीर जहागीरदार आकीब शेख आदिसह ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. काही वेळातच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला अन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या नंतर पोलीस प्रशासन व महावितरण चे अधिकारी यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.आज शुक्रवार असल्यामुळे दुपारी मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी या ठिकाणी जमा होणार होते परंतु त्यापुर्वीच ही घटना घडली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

बेलापूर (वार्ताहर )- अंगणात खेळत असलेल्या लहान मुलीच्या चेहेऱ्यालाच पाळीव कुत्र्याने चावा घेतला असुन अहमदनगर येथील दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरु आहेत या बाबत बेलापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे                    या बाबत पोलीस सूत्राकडून समजलेली हाकीकत अशी की  पढेगाव रोड शालोम चर्चच्या पाठीमागे दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी तीन च्या सुमारास आयेशा दस्तगीर शेख ही मुलगी ( वय वर्ष 9 ) खेळत असताना टायगर नावाच्या कुत्र्याने  तिच्या तोंडाला व इतर ठिकाणी चावा घेऊन तिला  गंभीर जखमी केले  गंभीर जखमी अवस्थेत मुलीला प्रथम श्रीरामपूर येथील शिरसगावच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले चेहेऱ्याची जखम फार मोठी असल्या कारणाने प्राथमिक उपचार करुन त्या मुलीस नगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले  जखमी आयेशास अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करुन तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे कुत्र्याने त्या मुलीच्या गालाचाच लचका तोडला असुन  मुलीची तब्येत गंभीर  असल्याचे नातेवाईकांनी सांगितले या बाबत मुलीची आई निलोफर दस्तगीर शेख हिने बेलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून बेलापुर पोलीसांनी शेलार यांच्या विरुद्ध भा द वि कलम २८९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन  पुढील तपास बेलापुर पोलीस करीत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget