श्रीरामपूर - येथील नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिका शिक्षण मंडळाचे लोकप्रिय प्रशासन अधिकारी श्री ज्ञानेश्वर पटारे हे उपस्थित होते.
आपल्या प्रमुख भाषणात प्रशासनाधिकारी पटारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी सर्वधर्मसमभाव जपला. त्यांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम सैनिक मोठ्या प्रमाणात होते.महाराज ही त्यांची खूप काळजी घेत होते.त्यांच्या आजोबांनी मूल बाळ होण्यासाठी नवस केल्यामुळे झालेल्या मुलांची नावे शहाजी व शरीफजी ठेवली असे सांगून शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत अत्यंत ओजस्वी स्वरात सादर केल्याबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल त्यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारी भाषणे सादर केली.
प्रस्ताविक भाषणात मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मुस्लिम सरदार या विषयावर मार्गदर्शन केले. महाराजांच्या फौजेमध्ये 35% मुस्लिम सैन्य होते तसेच महाराजांनी कुरआन शरीफ सुद्धा अवगत केले होते असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रशासन अधिकारी पटारे साहेब यांचा फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद आसिफ मुर्तुजा व आभार प्रदर्शन एजाज चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीच्या सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.
Post a Comment