विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जावे -प्रा. ज्ञानेश गवले
श्रीरामपूर (प्रतिनिधी) बारावी परीक्षा हा शैक्षणिक प्रवासातील महत्वाचा आणि दिशा दर्शक टप्पा असुन तो पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावुन यश संपादन करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले यांनी केले.अशोक एज्युकेशन सोसायटी संचलित शिरसगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल व कनिष्ठ वानिज्य महाविद्यालय वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित "अनुभवाचे बोल" या विशेष कार्यक्रमात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. गवले बोलत होते.ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी ऐन परीक्षा काळात अकारण दडपण घेतात. त्यामुळे आत्मविश्वास गमावून बसतात. त्यातुन मनात गोंधळ निर्माण होतो. त्यासाठी मानसिक संतुलन स्थिर ठेवणे अत्यावश्यक आहे. पेपरला सामोरे जाताना केलेल्या अध्ययनाचे वारंवार चिंतन, मनन करणे अपेक्षित ठरते. असे सांगत त्यांनी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन करुन अधिक गुण संपादन करण्याच्या काही युक्त्या सांगुन प्रा.गवले यांनी विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढविला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रास्ताविक व परिचय या उपक्रमाचे संयोजक प्रा. राजेंद्र वधवानी यांनी केले. प्राचार्या सौ. सुमती औताडे यांनी प्रा. गवले यांचा सन्मान केला. यावेळी पर्यवेक्षक व्ही. आय. थोरात, लेखनिक शशिकांत गवारे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी कु.कांचन गवारे,कु.श्रृतीका गवारे, मंगेश रुद्राक्षे कु.गायत्री आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा .सुनिता अहीरे यांनी आभार मानले
Post a Comment