Latest Post


श्रीरामपूर - येथील नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिका शिक्षण मंडळाचे लोकप्रिय प्रशासन अधिकारी श्री ज्ञानेश्वर पटारे हे उपस्थित होते.

आपल्या प्रमुख भाषणात प्रशासनाधिकारी पटारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी सर्वधर्मसमभाव जपला. त्यांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम सैनिक मोठ्या प्रमाणात होते.महाराज ही त्यांची खूप काळजी घेत होते.त्यांच्या आजोबांनी मूल बाळ होण्यासाठी नवस केल्यामुळे झालेल्या मुलांची नावे शहाजी व शरीफजी ठेवली असे सांगून शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत अत्यंत ओजस्वी स्वरात सादर केल्याबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल त्यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारी भाषणे सादर केली.

प्रस्ताविक भाषणात मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मुस्लिम सरदार या विषयावर मार्गदर्शन केले. महाराजांच्या फौजेमध्ये 35% मुस्लिम सैन्य होते तसेच महाराजांनी कुरआन शरीफ सुद्धा अवगत केले होते असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रशासन अधिकारी पटारे साहेब यांचा फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद आसिफ मुर्तुजा व आभार प्रदर्शन एजाज चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीच्या सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) बारावी परीक्षा हा शैक्षणिक प्रवासातील महत्वाचा आणि दिशा दर्शक टप्पा असुन तो पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावुन यश संपादन करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले यांनी केले.अशोक एज्युकेशन सोसायटी संचलित शिरसगाव येथील  न्यु इंग्लिश स्कूल व कनिष्ठ वानिज्य महाविद्यालय वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित "अनुभवाचे बोल" या विशेष कार्यक्रमात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. गवले बोलत होते.ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी ऐन परीक्षा काळात अकारण दडपण घेतात. त्यामुळे आत्मविश्वास गमावून बसतात. त्यातुन मनात गोंधळ निर्माण होतो. त्यासाठी मानसिक संतुलन स्थिर ठेवणे अत्यावश्यक आहे. पेपरला सामोरे जाताना केलेल्या अध्ययनाचे वारंवार चिंतन, मनन करणे अपेक्षित ठरते. असे सांगत त्यांनी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन करुन अधिक गुण संपादन करण्याच्या काही युक्त्या सांगुन प्रा.गवले यांनी विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढविला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रास्ताविक व परिचय  या उपक्रमाचे संयोजक प्रा. राजेंद्र  वधवानी यांनी केले. प्राचार्या सौ. सुमती औताडे यांनी प्रा. गवले यांचा सन्मान केला. यावेळी पर्यवेक्षक व्ही. आय. थोरात, लेखनिक शशिकांत गवारे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी कु.कांचन गवारे,कु.श्रृतीका गवारे, मंगेश रुद्राक्षे कु.गायत्री आदी विद्यार्थ्यांनी  मनोगत व्यक्त केले. प्रा .सुनिता अहीरे यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील ईनामदार मस्जिदशेजारी असलेल्या दोन खोल्यांना अचानक आग लागली सुदैवानी कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही शुक्रवारची नमाज अदा करण्या आगोदर ही घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला                                येथील ईनामदार मस्जिद लगत असलेल्या दोन खोल्यांना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विजेच्या शाँर्ट सर्किटमुळे आग लागली आशुतोष गोरे यांनी सर्व प्रथम धुर निघताना पाहीले त्यांनी तातडीने आरडा ओरड केली आसपासचे नागरीक जमा झाले काही नागरीकांनी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळविले ते बाहेरगावी होते तरी देखील त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला सुचित केले तसेच ग्रामपंचायत टँकर व ग्रामपंचायत कर्मचारी घटनास्थळी पाठविले.आग लागल्याचे सामजताच गावातील विज पुरवठा बंद करण्यात आला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके हाजी इस्माईल शेख मोहसीन सय्यद अशोक गवते पत्रकार दिलीप दायमा पापा मुलानी समीर जहागीरदार आकीब शेख आदिसह ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. काही वेळातच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला अन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या नंतर पोलीस प्रशासन व महावितरण चे अधिकारी यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.आज शुक्रवार असल्यामुळे दुपारी मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी या ठिकाणी जमा होणार होते परंतु त्यापुर्वीच ही घटना घडली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

बेलापूर (वार्ताहर )- अंगणात खेळत असलेल्या लहान मुलीच्या चेहेऱ्यालाच पाळीव कुत्र्याने चावा घेतला असुन अहमदनगर येथील दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरु आहेत या बाबत बेलापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे                    या बाबत पोलीस सूत्राकडून समजलेली हाकीकत अशी की  पढेगाव रोड शालोम चर्चच्या पाठीमागे दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी तीन च्या सुमारास आयेशा दस्तगीर शेख ही मुलगी ( वय वर्ष 9 ) खेळत असताना टायगर नावाच्या कुत्र्याने  तिच्या तोंडाला व इतर ठिकाणी चावा घेऊन तिला  गंभीर जखमी केले  गंभीर जखमी अवस्थेत मुलीला प्रथम श्रीरामपूर येथील शिरसगावच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले चेहेऱ्याची जखम फार मोठी असल्या कारणाने प्राथमिक उपचार करुन त्या मुलीस नगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले  जखमी आयेशास अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करुन तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे कुत्र्याने त्या मुलीच्या गालाचाच लचका तोडला असुन  मुलीची तब्येत गंभीर  असल्याचे नातेवाईकांनी सांगितले या बाबत मुलीची आई निलोफर दस्तगीर शेख हिने बेलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून बेलापुर पोलीसांनी शेलार यांच्या विरुद्ध भा द वि कलम २८९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन  पुढील तपास बेलापुर पोलीस करीत आहे.

श्रीरामपूर - नागरिकांच्या सेवेसाठी नेमण्यात आलेले, शासकीय अधिकारी आपल्या कर्तव्या बजावीत नसल्याने. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास,सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्याने. अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. ज्यात श्रीरामपूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या. निष्क्रिय तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष, व सतत दालन बंद करून गायब असल्याने. ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून. शासनाकडून मिळणाऱ्या मोफत आरोग्य साधने,सर्रासपणे खाजगी मेडीकल मध्ये विकली जात असल्याचेही निदर्शनास आल्याने. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची अवस्थाच बिकट झाल्याने. कर्तव्यात कसून करणाऱ्या, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून. त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा,अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने. गटविकास अधिकारी यांना निवेदना द्वारे दिला आहे. सदरचे निवेदन अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,जिल्हा सरचिटणीस शरद बोंबले, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण देवकर, शहराध्यक्ष दौलत गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष गोरख शेजुळ, तालुका उपाध्यक्ष प्रशांत पटारे आदींनी दिले आहे.

श्रीरामपूर -विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सह, त्यांच्या शारिरीक क्षमतेत वाढ होण्या करिता. विविध मैदानी क्रिडा तसेच खेळांचे प्रशिक्षण दिले जातात. ज्यात मुला मुलींच्या आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने, त्यांना मार्शल आर्ट,तायकांदो या सारखे प्रशिक्षण देखील दिले जात आहेत. या सर्वांच्या चालता श्रीरामपूर शहरातील शेकडो मुल- मुली, मास्टर कलीम बिनसाद यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ग्लोबल मार्शल आर्टच्या माध्यमातून. मागील ३ महिन्यांपासून मोफत तायक्वांदो कराटे प्रशिक्षण दिले जात आहे. सदरचे प्रशिक्षण घेणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांची, शहरातील काँग्रेस भवन वार्ड नंबर ६ या ठिकाणी. नुकतीच कलर बेल्ट एक्झाम संपन्न झाली. यावेळी परिक्षणार्थी मुला मुलींनी आत्मसाद केलेल्या मार्शल आर्ट, तायकांदोचे प्रत्येक्षिके सादर करून. उपस्थित मान्यवरांसह पालकांचे मन मोहून घेतले. यावेळी प्रशिक्षक जुबेर बिनसाद,पूजा गतिर,अबू बकर बिनसाद,अशोक शिंदे,शुभम पवार,शोएब पटेल गौरव काळे, आदींच्या निरीक्षणाखाली कलर बेल्ट एक्झाम संपन्न झाल्या. तसेच सेल्फ डिफेन्स आज काळाची गरज असून, ते आपल्याला करता आले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून,जास्तीत जात मैदानी खेळ खेळावेत,जेणे करून आपले शरीर निरोगी, धष्टपुष्ट राहून. बुद्धीचा देखील चांगला विकास होईल.तसेच भालाफेक,कबड्डी, खो-खो, क्रिकेट,अथलेटिक, तायक्वांदो,आर्चरी, रनिंग,अशा खेळांच्या मधून. अनेक पदके मिळवून,आपल्या पालकांचे नाव श्रीरामपूर शहरचे, जिल्ह्याचे नाव राज्य नाही तर देश पातळीवर चमकव्यात. अशा शुभेच्छा ग्लोबल मार्शल आर्टचे संस्थापक अध्यक्ष, मास्टर कलीम बिनसाद यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिल्या.

बेलापूर ( वार्ताहर) पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असुन पत्रकार शशीकांत वारीसे यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी बेलापुर व परिसरातील पत्रकारांनी पोलीसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ..               पत्रकारवरील हल्ल्याबाबत  पोलिसांनी तसेच शासनाने दखल घेवुन आरोपींना अटक करुन कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .रत्नागिरी येथील पत्रकार शशीकांत वारीसे यांनी वृत्तपत्रात बातमी छापली म्हणून त्यांना गाडीची धडक देवुन ठार मारण्यात आले अशा गुन्हेगाराला कठोर शासन व्हावे . पत्रकारांना

संरक्षण  देण्याबाबत येणाऱ्या अधिवेशनामध्ये आवश्यक ते पावले उचलावीत असेही निवेदनात म्हटले आहे.

.बेलापूर येथे औटपोस्टचे हेड कॉ अतुल लोटके पोलिस हेड कॉ रामेश्वर ढोकणे भारत तमनर नंदु लोखंडे  यांनी निवेदन स्वीकारले.निवेदनावर भास्कर खंडागळे अशोक गाडेकर  देवीदास देसाई ज्ञानेश्वर गवले नवनाथ कुताळ शरद थोरात  भरत थोरात दिलीप  दायमा किशोर कदम दिपक क्षत्रिय सुहास शेलार  आदीसह पत्रकारांच्या  सह्या आहे. 


 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget