Latest Post

राज्यात व देशांमध्ये मिलेनियम नॅशनल स्कूलच्या मुलींचे पुन्हा एकदा वर्चस्व.

हिगोली (१२/२/२३):दि १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी हिंगोली येथे महाराष्ट्र क्रीडा संचालनालय,पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत शालेय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल १७ वर्षा खालील मुले व मुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत मुलीच्या गटात पुणे विभागाचे नेतृत्व करत मिलेनियम नॅशनल स्कूल,पुणे संघाने अंतिम सामन्यात नागपूर विभागाचा  पराभव करून विजेतेपद पटकावले. कर्णधार ओजस्वी बचुटे हिच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पुणे विभाग संघाने साखळी सामन्यात कोल्हापूर विभाग व लातूर विभागाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यामध्ये मिलेनियम संघाकडून श्रीया गोठस्कर,नंदिनी भागवत,ओजस्वी बचुटे,निधी पाटील,अनन्या गोसावी,श्रावणी काळे,रिद्धी देसाई यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावरती संघास विजेतेपद मिळवून दिले. विजयी संघाचे मिलेनियम नॅशनल स्कूलचे डायरेक्टर मा.अन्वित फाठक यांनी अभिनंदन केले.विजयी खेळाडूंना राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप कोंडे,सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्री हरिहर केशव गोविंद भगवान श्री क्षेत्र उक्कलगाव हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी या कालावधीत उक्कलगाव येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन या सप्ताहाची सांगता ह भ प जगन्नथ महाराज पाटील भिवंडी यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे            उक्कलगावचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद भगवान देवस्थानच्या प्रांगणात महंत रामगिरीजी महाराज व  महंत उध्दवगीरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वअखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत असुन त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दररोज पहाटे ५ ते ६.३० वाजेपर्यंत काकडा भजन , सकाळी ६.३० ते ७ आरती , सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यत प्रसादभोजन सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत हरिपाठ रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत हरिकिर्तन अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानेश्वरी  ग्रंथ मिरवणूक सायंकाळी ७ ते ९ ह भ प अरुणगीरीजी महाराज भामाठाण यांचे किर्तन व गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत वाणीभुषण ह भ प जगन्नाथ महाराज पाटील  भिवंडी यांच्या  काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असुन त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज सायंकाळी ७ ते ९ हरी किर्तन नंतर महाप्रसाद असा उपक्रम सप्ताहभर सुरु आहे  ह भ प बाबा महाराज मोरे ह भ प नामदेव महाराज मोरे ह भ प रविंद्र महाराज मुठे ,ह भ प उल्हास महाराज तांबे ह भ प बाबासाहेब  महाराज ससाणे हे व्यासपीठ चालक म्हणून काम पहात आहेत तरी भावीकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-माझी लहान लहान वीस बालके असुन त्यांना दोन घास भरविण्यासाठी माझ्या झोळीत काहीतरी दान टाका आपल्या दानने त्या चिमुकल्यांचा एक दिवस तरी भागेल अशी आर्त हाक श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे ह भ प कृष्णानंद महाराज यांनी दिली               निमित्त होते संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाचे            बेलापुर सुवर्णकार समाजाच्या वतीने बेलापुरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली बेलापुरच्या मुख्य चौकात संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले या वेळी म जि प सदस्य  शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  बेलापुर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड भरत साळूंके विलास मेहेत्रे  प्रशांत लढ्ढा एकनाथ उर्फ लहानु नागले दत्ता कुऱ्हे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम उपस्थित होते संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त श्री हरिहर केशव गोविंद मदिरात ह भ प कृष्णानंद महाराजाचे प्रवचन ठेवण्यात आले होते त्या वेळी उपस्थितीतांना संबोधीत करताना कृष्णानंद महाराज म्हणाले की महाराष्ट्र ही साधु संताची भुमी आहे समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम संतानी केलेले आहे संत हे कुणा एका समाजाचे नाहीत त्यांनी संपुर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आपले जिवन समर्पित केलेले आहे मी स्वतं अनाथ आहे ते दुःख काय असते हे मला ठाऊक आहे त्यामुळे वयाच्या अठराव्या वर्षी मी अनाथ मुलांची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे आज श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमात अठरा अनाथ बालके  आहेत त्यांचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मी किर्तन प्रवचन करत आहे सर्वांचे चहा पाणी नाष्टा जेवण त्याच बरोबर शिक्षण  हा सर्व खर्च भागविणे अवघड काम आहे त्यामुळे आपण शक्य होईल तेवढी मदत या लहानग्यांना करावी आसे अवाहनही कृष्णानंद महाराजांनी शेवटी केले सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष अनिल मुंडलीक यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २०२३-२४ या वर्षीचा १४ कोटी २० लाख रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला असुन या अर्थसंकल्पात अनेक विकास कामे हाती घेण्यात आलेली आहे प्रशासकांच्या कार्यकाळात  बाजार समीतीचा नफा तसेच ठेवीत देखील  मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे                           श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीने सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला असुन प्रशासकाच्या कार्याकाळात बाजार समीतीच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे माहे डिसेंबर २०२१ अखेर समीतीला ५लाख ८३ हजार रुपये नफा होता तर माहे डीसेंबर २०२२ अखेर ४५ लाख रुपये नफा झालेला आहे तर माहे आँक्टोंबर पर्यत मुदत ठेवी ४५ लाख होत्या .जानेवारी २०२३ अखेर या ठेवी १ कोटी २० लाख इतक्या झालेल्या आहेत प्रशासकांनी पुढील काळात अनेक विकास कामे हाती घेतलेली असुन सी एन जी पंप उभारणी जनावरांचा बाजार पूर्ववत चालु करणे ,मोकळा कांदा खरेदीसाठी जमीन खरेदी करणे ,बेलापुर उपबाजार आवारात २८ दुकानगाळे व १४ गोडावुन असे २ कोटी ५० लाख रुपयाचे काम प्रागती पथावर आहे महाराष्ट्र शासनाकडून शेती महामंडळाच्या उर्वरीत ५० एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव प्रशासाकांनी तयार केलेला आहे  तसेच श्रीरामपुर बाजार समीतीतील मेन गेट ते कांदा मार्केट रोड काँक्रिटीकरणासाठी रुपये १२ लाख कांदा मार्केट रोड काँंक्रीटीकरणासाठी रुपये ७० लाख मुख्य बाजार समीतीत शाँपींग सेंपर करीता रुपये २ कोटी ५० लाख भाजीपाला मार्केट दुकानगाळे रुपये ४०लाख बेलापुर उपबाजार शाँपींग सेंटर १ कोटी १५ लाख बेलापुर रोड अंतर्गत काँक्रीटीकरण रुपये ६५ लाख ,टाकळीभान रोड काँक्रीटीकरण रुपये १ कोटी १० लाख या प्रमाणे एकुण ७ कोटी ७० लाख रुपये खर्चाची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे बाजार समीतीचे प्रशासक दिपक नागरगोजे व बाजार समीतीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्या कार्यकाळात बाजार समीतीच्या उत्पन्नात तसेच वैभवातही वाढ होत आहे शेतकरी व्यापारी वर्गांना मिळणाऱ्या सुविधातही वाढ झाली असुन शेतकरी व्यापारी बंधुनी प्रशासक नागरगोजे व प्रभारी सचिव वाबळे यांना धन्यवाद दिले आहेत

श्रीरामपूर - प्रचंड गर्दी ...महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत साहित्यिकांना ऐकण्यासाठी जमलेला जनसागर ...तीन वेळा खुर्च्या मागवूनही कमी पडणारी जागा ...प्रत्येक वक्त्याला ऐकण्यासाठी तल्लीन झालेला श्रोता वर्ग ...श्रोत्यांच्या प्रतिसादामुळे बोलत जाणारा वक्ता आणि शेवटी त्याला थांबवण्यासाठी दिली जाणारी आमदार कानडे यांची चिठ्ठी ...हे चित्र होते काल आमदार लहुजी कानडे यांच्या यशोधन या कार्यालयाच्या मागील प्रांगणात झालेल्या लोक हक्क फाउंडेशनच्या पुरस्कार वितरणाचे.निमित्त होते राज्याचे माजी महसूल मंत्री, सुसंस्कृत विचारांचं सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे.आमदार लहुजी कानडे, माजी नगरसेवक अशोक नाना कानडे, शिक्षक नेते अंकुश कानडे यांच्या नीटनेटक्या नियोजनातून साकार झालेल्या या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते दैनिक सकाळचे माजी संपादक, राज्यातील एक नामवंत विचारवंत,ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे. व्यासपिठावर उपस्थिती होती महाराष्ट्र सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष,प्रा.डॉ. शमशुद्दीन तांबोळी, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर,ज्येष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांचे पुतणे श्री भारदे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पंचायत समिती श्रीरामपूरचे माजी सभापती,श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र इंद्रनाथ पाटील थोरात,कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांची. शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्राचार्य, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी आदींनी सभा मंडप खच्चून भरला होता.आमदार कानडे प्रमुख असलेल्या लोकहक्क फाउंडेशन तर्फे हा दिमाखदार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक भाषणामध्ये आमदार लहुजी कानडे यांनी लोकहक्क फाउंडेशन मार्फत राबविल्या गेलेल्या उपक्रमांची माहिती देताना ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरवण्याचा उपक्रम आपण गेल्या काही वर्षापासून सुरू केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक, सेवाभावी कार्यकर्ते यांचा गौरव करतानाच तालुक्यातील ज्या भूमिपुत्रांनी विविध क्षेत्रांमध्ये उज्वल असे यश संपादन केले आहे. त्यांचही गौरव या निमित्ताने करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील सुमारे 80 गुणवंतांचा गौरव काल या समारंभात करण्यात आला. शिवाय राज्यातील नामवंत असे वेगवेगळ्या चळवळीत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी, ज्येष्ठ साहित्यीक,प्रा. डॉ.प्रल्हाद लुलेकर,तालुक्याचे ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांना जीवनगौरव पुरस्कार यानिमित्ताने प्रदान करण्यात आले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी यांनी सत्यशोधक चळवळीचा इतिहास मांडला. मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करीत असताना आजचे शासनकर्ते हे समाजामध्ये कशाप्रकारे द्वेष पसरवित आहेत याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांनी आपल्या मार्मिक भाषणातून समाजात सध्या सुरू असलेल्या दांभिकपणावर गंभीरपणे टीका केली. समाज जोडण्याऐवजी समाज तोडण्याचे काम कशा पद्धतीने होत आहे हे त्यांनी सोदाहरण नमूद केले.समारंभाचे प्रमुख अतिथी, दैनिक सकाळचे माजी संपादक, ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे यांचे भाषण म्हणजे ओजस्वी विचारांची पेरणी होती. फुले,आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेताना आजचे राज्यकर्ते कशा पद्धतीने समाजाचे विघटन करण्याचा प्रयत्न करीत आहेत याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.आपल्या अस्खलित वाणीने त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ते बोलत असताना सभामंडपामध्ये अत्यंत शांतता होती. श्रीरामपूरला यापूर्वी सात आठ वेळा येऊन गेलो. भाषणे केली. मात्र आजच्या एवढी गर्दी यापूर्वी कधी नव्हती. याचे श्रेय आमदार कानडेंना जाते असा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणावर आपल्या खणखणीत शैलीने प्रहार करताना त्यांनी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या राज्यकर्त्यांच्या धोरणांचा देखील तडाखेबंद समाचार घेतला.आमदार कानडे यांच्या मैत्रीचा समर्पक उल्लेख करताना लहुजी कानडे यांच्या रूपाने विधिमंडळामध्ये बहुजन चळवळीचा एक चेहरा पोहोचला.साहित्यिक, कवि,अधिकारी म्हणून त्यांचे योगदान कदापि विसरता येणे शक्य नाही. आमच्यातला एक साहित्यिक विधिमंडळात लोक प्रतिनिधी म्हणून पोहोचला याचे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले.अत्यंत निट नेटका, नियोजनबद्ध व देखणा समारंभ या निमित्ताने श्रीरामपूरकरांना अनुभवावयास मिळाला. उपस्थित सर्व श्रोत्यांनी देखील महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांचे विचार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीरामपूरकरांना ऐकायला मिळाले याबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला व आमदार लहुजी कानडे, अशोक नाना कानडे व त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ॲडवोकेट समीन बागवान यांनी केले तर ज्येष्ठ नेते इंद्रनाथ पाटील थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहर व तालुक्यातील सर्व क्षेत्रातील नामवंत दिग्गज उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-संक्रापुर तालुका राहुरी येथील जाधव वस्तीवरील जाधव ट्रान्सफार्मरला कोल्हार फिडरवरुन विज पुरवठा होत असल्यामुळे कमी दाबाने विज मिळत असुन जवळील दवणगाव फिडर मधुन विज पुरवठा केला जावा अशी मागणी संक्रापुर येथील शेतकऱ्यांनी राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे                                     राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील बेलापुर येथील कबंड्डी स्पर्धेच्या उद़्घाटनाकरीता आले असता संक्रापुर तालुका राहुरी येथील शेतकऱ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटुन आपल्या व्यथा मांडल्या पाणी असुनही विज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे अनेक समस्याचा सामना करावा लागत असुन संक्रापुर येथील जाधव डी पी ला कोल्हार येथुन विज पुरवठा केला जातो हे अंतर फार मोठे असल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दाबाने विज पुरवठा होतो त्याचा परिणाम विज मोटारी जळणे ट्रांन्सफार्मर जळणे अशा घटना वारवार घडत आहे त्यामुळे पाणी असुनही पिके जळून चाललेली आहे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे या ट्रांन्सफार्मरला जवळील दवणगाव फिडर मधुन विज पुरवठा जोडण्यात यावा जेणे करुन विज मोटारी जळणे ट्रांन्सफार्मर वेळोवेळी नादुरुस्त होणे असे प्रकार होणार नाहीत अशी मागणी शेतकऱ्यांनी नामदार विखे यांच्याकडे केली आहे आपण वैयक्तिक लाक्ष घालुन आमची समस्या सोडवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे   या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे, जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,पत्रकार देविदास देसाई , नबाजी जगताप ,कल्याणराव जगताप राजाभाऊ थोरात, विकास पा थोरात पंडीतराव थोरात, संजय जगताप, राजेंद्र जगताप ,विश्वनाथ जगताप, शशिकांत माकोने ,नंदकुमार लोंढे, बाळासाहेब जाधव ,नारायण जाधव, बाळासाहेब गुंड, सुभाष दाते, वसंत बर्डे आदि शेतकरी उपस्थित  होते.

बेलापूर (प्रतिनिधी)ःबेलापूर बुll ग्रामापचायतीच्या शतकपूर्ती निमित्ताने अहमदनगर  जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या मान्यतेने गावकरी मंडळाने आयोजित केलेल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डी  स्पर्धेत आझाद, टाकळीभान चा संघ विजेता तर किरण गंगवाल मित्रमंडळ बेलापूर संघ उपविजेता ठरला.                            जि.प.सदस्य शरद नवले,सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपच अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली गावकरी मंडळ बेलापूर कबड्डी संघ व समस्त ग्रामस्थ बेलापूर बु-ऐनतपूर च्या सहकार्याने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते  ग्रामिण भागात प्रथमच मॅट वर कबड्डी स्पर्धा भरविण्याचा मान बेलापुर गावाने गावकरी मंडळाच्या माध्यमातून मिळवीला या स्पर्धा दिवस रात्र विद्युत प्रकाश झोतात  जि.प.प्राथमिक शाळेच्या मैदानावर खेळविण्यात आल्या .या स्पर्धेचा भव्य उदघाटन सोहळा राज्याचे महसूल  व दुग्ध विकास मंत्री नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांचे हस्ते,जालिंदर कु-हे यांचे अध्यतेखाली तसेच भाजप ओबीसी राज्य उपाध्यक्ष प्रकाश चित्ते,भाजप तालुकाध्यक्ष दिपक पटारे,जिल्हा संघटक नितीन दिनकर,अॕड.बाळासाहेब खंडागळे ,भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा,नानासाहेब शिंदे,डाॕ.नितीन आसने,भिमा बागुल,माजी नगरसेवक दीपक चव्हाण,रवी पाटील,रुपेश हरकल हाजी इस्माईल शेख ,प्रफुल्ल डावरे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर स्पर्धेत आझाद, टाकळीभान संघाने प्रथम क्रमांक मिळवीला  (रु.५१००० गावकरी मंडळ, बेलापूर पुरस्कृत),किरण गंगवाल मित्रमंडळ संघाने द्वितीय क्रमांक मिळवीला (रु.४१००० चव्हाण कंस्ट्रक्शन,श्रीरामपूर पुरस्कृत ),रणवीर, भेंडा संघाने तृतिय क्रमांक तर (रु.३१००० श्री. संजय शिंदे, बेलापूर पुरस्कृत )आणि जगदंबा, भोकर संघास चतुर्थ (रु.२१००० श्री. शफिक आतार, बेलापूर पुरस्कृत) क्रमांकाचे बक्षिस मिळाले  याशिवाय उत्कृष्ट संघाचा पुरस्कार बेलापूर कबड्डी संघास(रु.५१०० बाळासाहेब दाणी पुरस्कृत), उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार(रु.५१०० कृष्णा कलेक्शन, पुरस्कृत)

 राहुल धनवटे या खेळाडूस,उत्कृष्ट चढाईपटू(रु.५१०० देवा ग्रुप बेलापूर  पुरस्कृत )गणेश कांबळे या खेळाडूस,उत्कृष्ट पकडपटू (रु.५१०० साई फर्निचर, रामगड पुरस्कृत)अशी वैयक्तीक पारितोषिके देण्यात आली.विजेत्या संघांना व खेळाडूंना मेनरोड मित्र मंडळ, बेलापूर च्या सौजन्याने ट्रॉफी चे देखील वितरण करण्यात आले.   स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ महानंद चे चेअरमन, जिल्हा जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य राजेश परजणे, गणेश महाराज शिंदे भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे  यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.                                   स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन पञकार देवीदास देसाई, संतोष मते,प्रविण जमधडे व प्रियंका यादव यांनी केले. तसेच एस.न्यूजचे जयेश सावंत व तिरंगा न्यूजचे अस्लम बिनसाद यांनी स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण राजस्थानी गृह उद्योग, बेलापूर बु चे संचालक बाळूशेठ लड्डा यांच्या सौजन्याने केले.सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी गावकरी मंडळाचे सर्व सदस्य, बेलापूर कबड्डी संघाचे आजी-माजी खेळाडू बेलापुर ग्रामस्थ आदिंनी परिश्रम घेतले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget