हिगोली (१२/२/२३):दि १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी हिंगोली येथे महाराष्ट्र क्रीडा संचालनालय,पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत शालेय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल १७ वर्षा खालील मुले व मुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत मुलीच्या गटात पुणे विभागाचे नेतृत्व करत मिलेनियम नॅशनल स्कूल,पुणे संघाने अंतिम सामन्यात नागपूर विभागाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. कर्णधार ओजस्वी बचुटे हिच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पुणे विभाग संघाने साखळी सामन्यात कोल्हापूर विभाग व लातूर विभागाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यामध्ये मिलेनियम संघाकडून श्रीया गोठस्कर,नंदिनी भागवत,ओजस्वी बचुटे,निधी पाटील,अनन्या गोसावी,श्रावणी काळे,रिद्धी देसाई यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावरती संघास विजेतेपद मिळवून दिले. विजयी संघाचे मिलेनियम नॅशनल स्कूलचे डायरेक्टर मा.अन्वित फाठक यांनी अभिनंदन केले.विजयी खेळाडूंना राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप कोंडे,सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मिलेनियम नॅशनल स्कूल अजिंक्य
राज्यात व देशांमध्ये मिलेनियम नॅशनल स्कूलच्या मुलींचे पुन्हा एकदा वर्चस्व.
Post a Comment