Latest Post

श्रीरामपूर - पत्रकारिते सोबत सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असलेल्या आणि पत्रकारांवर झालेल्या अन्यायाप्रसंगी धावून जाणाऱ्या तथा त्यांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने लढा उभारत त्यांना योग्य न्याय मिळवून देणाऱ्या अशी राज्यभरात ख्यातीप्राप्त असलेल्या महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार संघाचा रौप्य महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील अपूर्वा हॉलच्या भव्य अशा सभागृहात हा रौप्य महोत्सव व गुण गौरव सोहळा पार पडला.

महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार संघास ३० वर्ष पुर्ण होऊन ३१ व्या वर्षात पदार्पण करत असताना दैनिक सार्वतम चे संपादक स्व.वसंतरावजी देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांबरोबरच वैद्यकीय, सामाजिक,शैक्षणिक,अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मापत्र देवून गौरविण्यात आले.


महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार पत्रकार संघाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक अभयशेठ बाफना हे होते,

याप्रसंगी भारतमातेची प्रतिमा आणि संविधान प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,सार्वमत चे संपादक स्व.वसंतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान कादर शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात पत्रकार संघाची भुमिका विषद केली.

यावेळी दूरदर्शनचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवळी

ज्येष्ठ पत्रकार प्रा.पद्माकर शिंपी सर, बेलापूर येथील ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे, डॉ.अक्षय शिरसाठ,डॉ. मुस्ताक निजामी, डॉ. तोफिक शेख, ॲड. सुभाषराव जंगले,सामाजिक कार्यकर्ते विजय खाजेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय शेलार,उर्दू बचाव कमिटीचे अब्दुल्लाभाई चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मिर्झा लालमोहम्मद पठाण, एन एम पी न्यूज चैनल चे संपादक शौकत पठाण,समता फाऊंडेशनचे संस्थापक शौकतभाई शेख, माऊली वृद्धाश्रमचे संस्थापक सुभाषराव वाघुंडे,रेड क्रॉस सोसायटीचे  सुनिल साळवे सर, एमआयएमचे उत्तर जिल्हाध्यक्ष आदिल  मखदुमी,पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव सलाउद्दीन शेख (SS),,पत्रकार संघाचे श्रीरामपूर शहर सचिव इम्रान एस. शेख, समाजवादी पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष सुखदेव केदारे, पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूरभाई पठाण,नाशिक जिल्हा सचिव वहाबखान पठाण,पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष विजय खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रा.ज्ञानेश्वर गवळी, प्रा.पद्माकर शिंपी,ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, ॲड.सुभाषराव जंगले, कॉम्रेड सुखदेव केदारे,चांदवड येथील पत्रकार फिरोज पठाण, पत्रकार संघाचे  प्रदेश कार्याध्यक्ष अमीर जहागीरदार,पत्रकार मन्सूर पठाण, एमआयएमचे आदिल मखदुमी,अब्दुल्लाभाई चौधरी, आदींनी मार्गदर्शनपर भाषणे केली.

 यावेळी ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे यांच्या हस्तलिखित पुस्तकाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय शेठ बाफना यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ.अक्षय दिलीप शिरसाट, डॉ. मुस्ताक निजामी, डॉ. तोफिक शेख,अध्यापक सुनील साळवे सर, अध्यापिका रेहाना गणी मुजावर मॅडम, सुभाषराव वाघुंडे,आदिल मखदुमी, फिरोज सुलतान पठाण,जोएफ युनूस जमादार, अझहर हनीफ शेख,सय्यद मिर्झा लालमोहम्मद पठाण, देविदास अगस्ती देसाई, विजय शांताराम शेलार, उस्मान के. शेख, मुजम्मिल भैय्या शेख, सुखदेव सोमा केदारे, नवनाथ खुरसणे, सूर्यकांत शंकर गोसावी, सखाराम मोतीराम पगारे,शौकत अब्दुलकादर शेख,अब्दुल्ला हसन चौधरी, शहानवाज चांद बेगमपुरे, मन्सूरभाई पठाण,वहाबखान मेहबूबखान पठाण,असलम अवद बिनसाद, मोहम्मद हनीफ तांबोळी, आदी मान्यवरांच्या कार्यांचा सन्मान करत त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास आर के न्यूज चे संपादक राहुल कोळगे, पत्रकार संघाचे बेलापूर शाखाध्यक्ष मुसा सय्यद, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, पत्रकार कासमभाई शेख, पत्रकार एजाज सय्यद,पत्रकार रसूल सय्यद, पत्रकार बानूबी पठाण, पत्रकार संगीता भालेराव, पत्रकार आरती सोनवणे, पत्रकार अनिसभाई शेख, आफताब शेख, पत्रकार अबुजर शेख, एमआयएमचे उत्तर जिल्हा युवा अध्यक्ष सादिक शेख, आदि मान्यवरांसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुयोग्य सुत्रसंचलन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांनी केले, तर आभार पत्रकार मोहम्मद हनीफभाई तांबोळी यांनी मानले.

बेलापूर (वार्ताहर) येथील गावकरी मंडळाच्या वतीने आयोजित ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती महोत्सवा निमित्त  नगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या मान्यतेने  ना.राधाकृष्ण विखे पाटील चषक दोन दिवसीय  भव्य  खुल्या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते शनिवार दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. अशी माहिती संयोजन प्रमुख जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र  साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.


या स्पर्धेसाठी गावकरी मंडळाच्या वतीने प्रथम बक्षिस रू.५१ हजार, तेजराज आर. एम. सी. बाय चव्हाण कन्स्ट्रक्शन, श्रीरामपूर यांच्या तर्फे द्वितीय बक्षिस रू.४१ हजार,सुरेश नारायण शिंदे, बेलापूर यांच्या वतीने तृतीय बक्षिस रु.३१ हजार आणि सामाजिक कार्यकर्ते शफीक आतार यांच्या तर्फे चतुर्थ बक्षिस रू.२१ हजार ठेवण्यात आले आहे. याशिवाय उत्कृष्ठ संघ, उत्कृष्ठ चढाईपटू, उत्कृष्ठ पकड पटू आणि उत्कृष्ठ खेळाडू अशी प्रत्येकी रू. ५ हजार १०० ची चार बक्षिसे अनुक्रमे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाणी,देवा ग्रुप बेलापुर,साई फर्निचर,रामगड व कृष्णा कलेक्शन श्रीरामपूर यांच्या वतीने ठेवण्यात आली आहेत.येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर  पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवार दि.४ रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचे उदघाटन होईल. तसेच रविवार दि.५ रोजी  कोपरगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते व महानंदाचे चेअरमन राजेश आबा परजने व श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी सर्वश्री अनिल पटारे (९४२२२९०३९३), बंटी शेलार (९८३४३८०९३५), गिताराम पवार सर (९४०३७०१००७) या भ्रमण ध्वनी क्रमांकासह सतीश सोनवणे, मयुर जाधव, विकी अमोलिक, मोईन शेख यांच्याशी सातशे रुपये प्रवेश शुल्कासह संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यभरातील मोठ्या संख्येने  कबड्डी संघांनी या खुल्या स्पर्धेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहनही संयोजक मा. जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक पा.खंडागळे यांच्यासह स्वागतोत्सुक समस्त गावकरी मंडळ, बेलापूर कबड्डी संघ आणि बेलापूर - ऐनतपुर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी  )-धान्य दुकानदारांनी पी एम धान्य योजनेचे वाटप केलेले कमिशन त्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग केले जाणार असुन यापुढील मोफत धान्य वाटपाचेही कमिशन दुकानदारांच्या खात्यावर वर्ग केले जाईल असे अश्वासन जिल्हा पुरवठाअधिकारी जयश्री माळी यांनी दिले                   जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी संदर्भात अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्य वतीने निवेदन दिले त्या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा पुरवठा आधिकारी माळी यांनी वरील अश्वासन दिले या वेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी सांगितले की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे धान्य दुकानदारांनी वाटप केले असुन त्याचे कमिशन तातडीने दुकानदारांच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात यावे माहे एप्रिल 2021  महीन्यात वाटप केलेल्या राज्य शासनाचे एक महीन्याचे पैसे ताताडीने  मिळावे जानेवारी 2023 पासुन मोफत धान्य वितरण करण्याचे शासनाचे आदेश असुन मोफत धान्य वाटपामुळे दुकानदार आर्थिक विवंचनेत सापडला आहे दुकान भाडे विज बिल मापाडी यांचा खर्च कसा भागवावा याचे संकट दुकानदारापुढे उभे आहे त्यामुळे मोफत वाटपाचे कमिशन दर महा खात्यावर जमा व्हावे  माहे आँक्टोंबर नोव्हेंबर  डिसेंबर या महीन्याकरीता दुकानदारांनी चलन भरले असुन पैसे भरुन दुकानदारांना ते धान्य उशिरा जानेवारी महिन्यात मिळाल्यामुळे त्याचे वितरण मोफत करावे लागले त्यामुळे ते चलनाचे भरलेले पैसे विनाविलंब मिळावे दुकानदारांना धान्य दुकानात मोजुन मिळावे त्या करीता प्रत्येक गाडीत वजनकाटा असावा आदि मागण्याचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांना देण्यात आले त्या वेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे श्रीरामपुर तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले उपस्थित होते

श्रीरामपूर - नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, फळांचे सुप्रसिद्ध व्यापारी हाजी जावेदभाई ईस्हाकभाई बागवान यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक हाजी मुजफ्फर पापाभाई, हाजी अंजुमभाई शेख, मुक्तार शाह, नगरसेविका जायदाभाभी कुरेशी, कलीमभाई कुरेशी,मुन्ना पठाण, कुरेशी जमात अध्यक्ष महेबूब कुरेशी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तरन्नुम मुनीर शेख, माजी अध्यक्ष रज्जाकभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते मुक्तारभाई मणियार, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अकिल सुन्नाभाई शेख,रियाज पठाण, अशपाक शेख,माजी नगरसेवक याकूबभाई बागवान, नजीर मुलानी, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई चौधरी, गफूर शाह, किशोर शिंदे,हाजी जलिल काझी,डॉ.राज शेख, सरवरअली मास्टर,अहमद शाह, शरीफ मेमन, रियाज बागवान, गनी टिनमेकर, जाफर शाह, तक्वा मशिदीचे मौलाना साहब, सादिक शेख, मुनीर दादामिया शेख, गुलामरसूल बाबा, फिरोज शेख,भैय्या आत्तार, हैदर बागवान आधी प्रमुख कार्यकर्त्यांसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची वाहवा मिळविली यावेळी जावेद बागवान यांच्यातर्फे तिन्ही शाळेतील मुलांना मिठाई वाटप करण्यात आले. शाळा क्रमांक चार व शाळा क्रमांक नऊ चे विद्यार्थी व शिक्षक देखील या कार्यक्रमात सहभागी होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक सर्वश्री फारुक शाह, वहिदा सय्यद, नसरीन ईनामदार, शाहीन शेख, अस्मा पटेल, निलोफर शेख, बशिरा पठाण, आसिफ मुर्तुजा, मिनाज शेख, एजाज चौधरी, जुनेद काकर, यास्मिन पठाण, रिजवाना कुरेशी, रेश्मा सय्यद, रिझवाना बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर बु ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती वर्षाचे औचित्य साधून गावकरी मंडळाच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील  चषक खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन प्रथम क्रमांकास रुपये ५१ हजार  द्वितीय क्रमांकास रुपये ४१ हजार तृतीय क्रमांकास रुपये ३१ हजार चतुर्थ क्रमांकास रुपये २१ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली असल्याची माहीती मा .जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली आहे.                              गावकरी मंडळाच्या वतीने खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन दिनाक ४ व ५ फेब्रुवारी रोजी या स्पर्धा भरविण्यात येणार आहे  या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघास गावकरी मंडळाच्या वतीने ५१ हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या संघास चव्हाण कन्स्ट्रक्शन श्रीरामपुर यांच्या वतीने ४१ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकाच्या संघास सुरेश शिंदे बेलापुर यांच्या वतीने ३१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे चतुर्थ क्रमांकाच्या संघास सामाजिक कार्यकर्ते शफीक आतार यांच्या वतीने २१ हजार रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहे  तसेच उत्कृष्ट संघास बाळासाहेब दाणी यांच्याकडून ५१००रुपये रोख तर उत्कृष्ट चढाई पटुस देवा गृपच्या वतीने ५१०० रुपये बक्षिस देण्यात येणार आहे साई फर्निचर रामगड यांच्या वतीने उत्कृष्ट पकडपटु करीता ५१०० रुपये तर कृष्णा कलेक्शनच्या वतीने  उत्कृष्ट खेळाडूस ५१०० रुपये अशी बक्षिसे  ठेवण्यात आलेली आहे.स्पर्धेसाठी रुपये ७०० प्रवेश फी ठेवण्यात येणार आहे.सामने दिवस रात्र खेळविण्यात येणार असुन स्पर्धा मँटवर खेळवीली जाणार आहे स्पर्धेत भाग घेवु ईच्छिणाऱ्या संघानी शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी दुपारी एक वाजेपर्यंत रिपोर्टींग करणे आवश्यक असेल खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकाकडून केली जाणार असुन एका खेळाडूस एकाच संघात खेळता येईल तसेच पंचाचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनीश्री. अनिल पटारे सर मो.९४२२२९०३९३,श्री.गिताराम पवार सर

मो.९४०३७०१००७,श्री. सतिश सोनवणे मो.८९८३६३६३८३,श्री. बंटी शेलार मो.९८३४३८०९३५,

श्री.मयुर जाधव मो.९३७०८४४८९६,

श्री.विकी अमोलिक मो.८३२९३७५४१९,

श्री.मोईन शेख मो.७३५०२३३०१५ यांच्याशी संपर्क करावा.

तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे आसे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तसेच गावकरी मंडळ यांनी केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) तालुक्याच्या ग्रामीण भागात मुंबई - पुणे सारख्या दर्जाचे शिक्षण  देऊन भविष्यातील आवाहनाला समर्थपणे सामोरे जाण्याची आणि त्याद्वारे व्यक्तिमत्वाचा विकास साधण्याची संधी न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलने उपलब्ध करुन दिली. त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान युगात काळाबरोबर अधिकाधिक वेगाने पुढे जाऊन दर्जेदार शिक्षणाची परंपरा अविरत सुरू ठेवावी असे आवाहन शिवसेना खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.

बेलापूर - एकलहरे येथील न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळया प्रसंगी अध्यक्षीय भाषणात खा. लोखंडे बोलत होते. यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सौ.प्रितीताई कदम,व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. स्वाती कोयटे, संदीप कोयटे, विद्यालयाचे संस्थापक अनिल न्याती, सचिव राकेश न्याती, मुकेश न्याती, शाळा समिती सदस्या सौ. कोमल न्याती, सौ. वैशाली न्याती, शैक्षणिक संचालक धनेश गांधी, उपप्राचार्या सोनल चोबे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना सौ. प्रितीताई कदम यांनी विद्यार्थी- शिक्षक आणि पालक यांच्यातील दृढ संबंधांचे शिक्षणावर होणाऱ्या परिणामांचे महत्व विषद केले. तर सौ. स्वाती कोयटे यांनी भविष्यातील शैक्षणिक बदल आणि आव्हाने यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सौ. कोमल न्याती यांनी विद्यार्थ्याना शिक्षकां बरोबरच पालकांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांनी मंथन या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित समुद्र मंथन आणि विचार मंथन हा गाभा मानून लघुनाट्य,गीत, संगीत आणि नृत्य अशा विविध प्रभावी सादरीकरणातून विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपली संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवून उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना विविध क्षेत्रातील नैपुण्य संपादीत केल्याबद्दल पारितोषिके देउन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती राजश्रीताई ससाणे, उद्योजक नगरसेवक श्रीनिवास बिहानी, राजन चुग, संजय छल्लारे, काँग्रेस नेते हेमंत ओगले,लायन्स क्लबचे अध्यक्ष चेतन भुतडा, रोटरी क्लबचे अध्यक्ष ऋषिकेश बनकर, माजी जी.प.सदस्य शरद नवले, विराज राजे भोसले,बेलापुर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत  लढ्ढा , शांतीलाल हिरण, बेलापूर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले, एकालहरे ग्रा. पं. सदस्या सौ. अनिसा शेख, उक्कलगाव ग्रा. पं. सरपंच नितीन थोरात, बेलापूर ग्रा. पं. सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते.

संस्थापक अनीलजी न्याती व काका कोयटे यांनी प्रारंभी स्वागत केले. तर सचिव राकेश न्याती यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक वृंदानी परिश्रम घेतले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-महाराष्ट्र राज्याचे माजी गृह मंत्री स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील यांच्या नावाने दिला जाणारा सन २०२१-२२ चा मानाचा आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून बेलापूर बु., ता. श्रीरामपूर ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक (विभागून) प्राप्त झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे या पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये (विभागून) व मानचिन्ह असे आहे. स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त गावाची यादी नुकतीच अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जाहीर केला आहे.

बेलापूर बु., ग्रामपंचायतीस १०० वर्ष पूर्ण झाली असून शतकपूर्ती वर्ष साजरे होत आहे. शतकपूर्ती वर्षात ग्रामपंचायतीस पुरस्कार प्राप्त झाला असुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून गावात चौक सुशोभीकरण, भूमिगत गटारी, जॉगिंग ट्रॅक, नाव घाट सुशोभीकरण, १२६ कोटी खर्चाची पाणी पुरवठा योजना आदी विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम तसेच आरोग्य शिबिरे यांचे आयोजन करण्यात येत आहे.तसेच दिपावली निमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला होता  याचीच दखल घेत ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्रामपुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारा बद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच ,अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget