महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते खूल्या कबड्डी स्पर्धेचे उद़्घाटन

बेलापूर (वार्ताहर) येथील गावकरी मंडळाच्या वतीने आयोजित ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती महोत्सवा निमित्त  नगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या मान्यतेने  ना.राधाकृष्ण विखे पाटील चषक दोन दिवसीय  भव्य  खुल्या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते शनिवार दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. अशी माहिती संयोजन प्रमुख जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र  साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.


या स्पर्धेसाठी गावकरी मंडळाच्या वतीने प्रथम बक्षिस रू.५१ हजार, तेजराज आर. एम. सी. बाय चव्हाण कन्स्ट्रक्शन, श्रीरामपूर यांच्या तर्फे द्वितीय बक्षिस रू.४१ हजार,सुरेश नारायण शिंदे, बेलापूर यांच्या वतीने तृतीय बक्षिस रु.३१ हजार आणि सामाजिक कार्यकर्ते शफीक आतार यांच्या तर्फे चतुर्थ बक्षिस रू.२१ हजार ठेवण्यात आले आहे. याशिवाय उत्कृष्ठ संघ, उत्कृष्ठ चढाईपटू, उत्कृष्ठ पकड पटू आणि उत्कृष्ठ खेळाडू अशी प्रत्येकी रू. ५ हजार १०० ची चार बक्षिसे अनुक्रमे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाणी,देवा ग्रुप बेलापुर,साई फर्निचर,रामगड व कृष्णा कलेक्शन श्रीरामपूर यांच्या वतीने ठेवण्यात आली आहेत.येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर  पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवार दि.४ रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचे उदघाटन होईल. तसेच रविवार दि.५ रोजी  कोपरगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते व महानंदाचे चेअरमन राजेश आबा परजने व श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी सर्वश्री अनिल पटारे (९४२२२९०३९३), बंटी शेलार (९८३४३८०९३५), गिताराम पवार सर (९४०३७०१००७) या भ्रमण ध्वनी क्रमांकासह सतीश सोनवणे, मयुर जाधव, विकी अमोलिक, मोईन शेख यांच्याशी सातशे रुपये प्रवेश शुल्कासह संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यभरातील मोठ्या संख्येने  कबड्डी संघांनी या खुल्या स्पर्धेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहनही संयोजक मा. जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक पा.खंडागळे यांच्यासह स्वागतोत्सुक समस्त गावकरी मंडळ, बेलापूर कबड्डी संघ आणि बेलापूर - ऐनतपुर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget