न्यातीज समताचे "मंथन" स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न,आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी पिढी घडत आहे - खा.लोखंडे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) तालुक्याच्या ग्रामीण भागात मुंबई - पुणे सारख्या दर्जाचे शिक्षण  देऊन भविष्यातील आवाहनाला समर्थपणे सामोरे जाण्याची आणि त्याद्वारे व्यक्तिमत्वाचा विकास साधण्याची संधी न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलने उपलब्ध करुन दिली. त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान युगात काळाबरोबर अधिकाधिक वेगाने पुढे जाऊन दर्जेदार शिक्षणाची परंपरा अविरत सुरू ठेवावी असे आवाहन शिवसेना खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.

बेलापूर - एकलहरे येथील न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळया प्रसंगी अध्यक्षीय भाषणात खा. लोखंडे बोलत होते. यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सौ.प्रितीताई कदम,व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. स्वाती कोयटे, संदीप कोयटे, विद्यालयाचे संस्थापक अनिल न्याती, सचिव राकेश न्याती, मुकेश न्याती, शाळा समिती सदस्या सौ. कोमल न्याती, सौ. वैशाली न्याती, शैक्षणिक संचालक धनेश गांधी, उपप्राचार्या सोनल चोबे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना सौ. प्रितीताई कदम यांनी विद्यार्थी- शिक्षक आणि पालक यांच्यातील दृढ संबंधांचे शिक्षणावर होणाऱ्या परिणामांचे महत्व विषद केले. तर सौ. स्वाती कोयटे यांनी भविष्यातील शैक्षणिक बदल आणि आव्हाने यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सौ. कोमल न्याती यांनी विद्यार्थ्याना शिक्षकां बरोबरच पालकांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांनी मंथन या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित समुद्र मंथन आणि विचार मंथन हा गाभा मानून लघुनाट्य,गीत, संगीत आणि नृत्य अशा विविध प्रभावी सादरीकरणातून विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपली संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवून उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना विविध क्षेत्रातील नैपुण्य संपादीत केल्याबद्दल पारितोषिके देउन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती राजश्रीताई ससाणे, उद्योजक नगरसेवक श्रीनिवास बिहानी, राजन चुग, संजय छल्लारे, काँग्रेस नेते हेमंत ओगले,लायन्स क्लबचे अध्यक्ष चेतन भुतडा, रोटरी क्लबचे अध्यक्ष ऋषिकेश बनकर, माजी जी.प.सदस्य शरद नवले, विराज राजे भोसले,बेलापुर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत  लढ्ढा , शांतीलाल हिरण, बेलापूर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले, एकालहरे ग्रा. पं. सदस्या सौ. अनिसा शेख, उक्कलगाव ग्रा. पं. सरपंच नितीन थोरात, बेलापूर ग्रा. पं. सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते.

संस्थापक अनीलजी न्याती व काका कोयटे यांनी प्रारंभी स्वागत केले. तर सचिव राकेश न्याती यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक वृंदानी परिश्रम घेतले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget