Latest Post

बेलापूर (वार्ताहर) येथील गावकरी मंडळाच्या वतीने आयोजित ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती महोत्सवा निमित्त  नगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या मान्यतेने  ना.राधाकृष्ण विखे पाटील चषक दोन दिवसीय  भव्य  खुल्या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते शनिवार दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. अशी माहिती संयोजन प्रमुख जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र  साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.


या स्पर्धेसाठी गावकरी मंडळाच्या वतीने प्रथम बक्षिस रू.५१ हजार, तेजराज आर. एम. सी. बाय चव्हाण कन्स्ट्रक्शन, श्रीरामपूर यांच्या तर्फे द्वितीय बक्षिस रू.४१ हजार,सुरेश नारायण शिंदे, बेलापूर यांच्या वतीने तृतीय बक्षिस रु.३१ हजार आणि सामाजिक कार्यकर्ते शफीक आतार यांच्या तर्फे चतुर्थ बक्षिस रू.२१ हजार ठेवण्यात आले आहे. याशिवाय उत्कृष्ठ संघ, उत्कृष्ठ चढाईपटू, उत्कृष्ठ पकड पटू आणि उत्कृष्ठ खेळाडू अशी प्रत्येकी रू. ५ हजार १०० ची चार बक्षिसे अनुक्रमे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाणी,देवा ग्रुप बेलापुर,साई फर्निचर,रामगड व कृष्णा कलेक्शन श्रीरामपूर यांच्या वतीने ठेवण्यात आली आहेत.येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर  पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवार दि.४ रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचे उदघाटन होईल. तसेच रविवार दि.५ रोजी  कोपरगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते व महानंदाचे चेअरमन राजेश आबा परजने व श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी सर्वश्री अनिल पटारे (९४२२२९०३९३), बंटी शेलार (९८३४३८०९३५), गिताराम पवार सर (९४०३७०१००७) या भ्रमण ध्वनी क्रमांकासह सतीश सोनवणे, मयुर जाधव, विकी अमोलिक, मोईन शेख यांच्याशी सातशे रुपये प्रवेश शुल्कासह संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यभरातील मोठ्या संख्येने  कबड्डी संघांनी या खुल्या स्पर्धेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहनही संयोजक मा. जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक पा.खंडागळे यांच्यासह स्वागतोत्सुक समस्त गावकरी मंडळ, बेलापूर कबड्डी संघ आणि बेलापूर - ऐनतपुर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी  )-धान्य दुकानदारांनी पी एम धान्य योजनेचे वाटप केलेले कमिशन त्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग केले जाणार असुन यापुढील मोफत धान्य वाटपाचेही कमिशन दुकानदारांच्या खात्यावर वर्ग केले जाईल असे अश्वासन जिल्हा पुरवठाअधिकारी जयश्री माळी यांनी दिले                   जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी संदर्भात अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्य वतीने निवेदन दिले त्या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा पुरवठा आधिकारी माळी यांनी वरील अश्वासन दिले या वेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी सांगितले की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे धान्य दुकानदारांनी वाटप केले असुन त्याचे कमिशन तातडीने दुकानदारांच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात यावे माहे एप्रिल 2021  महीन्यात वाटप केलेल्या राज्य शासनाचे एक महीन्याचे पैसे ताताडीने  मिळावे जानेवारी 2023 पासुन मोफत धान्य वितरण करण्याचे शासनाचे आदेश असुन मोफत धान्य वाटपामुळे दुकानदार आर्थिक विवंचनेत सापडला आहे दुकान भाडे विज बिल मापाडी यांचा खर्च कसा भागवावा याचे संकट दुकानदारापुढे उभे आहे त्यामुळे मोफत वाटपाचे कमिशन दर महा खात्यावर जमा व्हावे  माहे आँक्टोंबर नोव्हेंबर  डिसेंबर या महीन्याकरीता दुकानदारांनी चलन भरले असुन पैसे भरुन दुकानदारांना ते धान्य उशिरा जानेवारी महिन्यात मिळाल्यामुळे त्याचे वितरण मोफत करावे लागले त्यामुळे ते चलनाचे भरलेले पैसे विनाविलंब मिळावे दुकानदारांना धान्य दुकानात मोजुन मिळावे त्या करीता प्रत्येक गाडीत वजनकाटा असावा आदि मागण्याचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांना देण्यात आले त्या वेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे श्रीरामपुर तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले उपस्थित होते

श्रीरामपूर - नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, फळांचे सुप्रसिद्ध व्यापारी हाजी जावेदभाई ईस्हाकभाई बागवान यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक हाजी मुजफ्फर पापाभाई, हाजी अंजुमभाई शेख, मुक्तार शाह, नगरसेविका जायदाभाभी कुरेशी, कलीमभाई कुरेशी,मुन्ना पठाण, कुरेशी जमात अध्यक्ष महेबूब कुरेशी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तरन्नुम मुनीर शेख, माजी अध्यक्ष रज्जाकभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते मुक्तारभाई मणियार, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अकिल सुन्नाभाई शेख,रियाज पठाण, अशपाक शेख,माजी नगरसेवक याकूबभाई बागवान, नजीर मुलानी, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई चौधरी, गफूर शाह, किशोर शिंदे,हाजी जलिल काझी,डॉ.राज शेख, सरवरअली मास्टर,अहमद शाह, शरीफ मेमन, रियाज बागवान, गनी टिनमेकर, जाफर शाह, तक्वा मशिदीचे मौलाना साहब, सादिक शेख, मुनीर दादामिया शेख, गुलामरसूल बाबा, फिरोज शेख,भैय्या आत्तार, हैदर बागवान आधी प्रमुख कार्यकर्त्यांसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची वाहवा मिळविली यावेळी जावेद बागवान यांच्यातर्फे तिन्ही शाळेतील मुलांना मिठाई वाटप करण्यात आले. शाळा क्रमांक चार व शाळा क्रमांक नऊ चे विद्यार्थी व शिक्षक देखील या कार्यक्रमात सहभागी होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक सर्वश्री फारुक शाह, वहिदा सय्यद, नसरीन ईनामदार, शाहीन शेख, अस्मा पटेल, निलोफर शेख, बशिरा पठाण, आसिफ मुर्तुजा, मिनाज शेख, एजाज चौधरी, जुनेद काकर, यास्मिन पठाण, रिजवाना कुरेशी, रेश्मा सय्यद, रिझवाना बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर बु ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती वर्षाचे औचित्य साधून गावकरी मंडळाच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील  चषक खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन प्रथम क्रमांकास रुपये ५१ हजार  द्वितीय क्रमांकास रुपये ४१ हजार तृतीय क्रमांकास रुपये ३१ हजार चतुर्थ क्रमांकास रुपये २१ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली असल्याची माहीती मा .जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली आहे.                              गावकरी मंडळाच्या वतीने खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन दिनाक ४ व ५ फेब्रुवारी रोजी या स्पर्धा भरविण्यात येणार आहे  या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघास गावकरी मंडळाच्या वतीने ५१ हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या संघास चव्हाण कन्स्ट्रक्शन श्रीरामपुर यांच्या वतीने ४१ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकाच्या संघास सुरेश शिंदे बेलापुर यांच्या वतीने ३१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे चतुर्थ क्रमांकाच्या संघास सामाजिक कार्यकर्ते शफीक आतार यांच्या वतीने २१ हजार रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहे  तसेच उत्कृष्ट संघास बाळासाहेब दाणी यांच्याकडून ५१००रुपये रोख तर उत्कृष्ट चढाई पटुस देवा गृपच्या वतीने ५१०० रुपये बक्षिस देण्यात येणार आहे साई फर्निचर रामगड यांच्या वतीने उत्कृष्ट पकडपटु करीता ५१०० रुपये तर कृष्णा कलेक्शनच्या वतीने  उत्कृष्ट खेळाडूस ५१०० रुपये अशी बक्षिसे  ठेवण्यात आलेली आहे.स्पर्धेसाठी रुपये ७०० प्रवेश फी ठेवण्यात येणार आहे.सामने दिवस रात्र खेळविण्यात येणार असुन स्पर्धा मँटवर खेळवीली जाणार आहे स्पर्धेत भाग घेवु ईच्छिणाऱ्या संघानी शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी दुपारी एक वाजेपर्यंत रिपोर्टींग करणे आवश्यक असेल खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकाकडून केली जाणार असुन एका खेळाडूस एकाच संघात खेळता येईल तसेच पंचाचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनीश्री. अनिल पटारे सर मो.९४२२२९०३९३,श्री.गिताराम पवार सर

मो.९४०३७०१००७,श्री. सतिश सोनवणे मो.८९८३६३६३८३,श्री. बंटी शेलार मो.९८३४३८०९३५,

श्री.मयुर जाधव मो.९३७०८४४८९६,

श्री.विकी अमोलिक मो.८३२९३७५४१९,

श्री.मोईन शेख मो.७३५०२३३०१५ यांच्याशी संपर्क करावा.

तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे आसे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तसेच गावकरी मंडळ यांनी केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) तालुक्याच्या ग्रामीण भागात मुंबई - पुणे सारख्या दर्जाचे शिक्षण  देऊन भविष्यातील आवाहनाला समर्थपणे सामोरे जाण्याची आणि त्याद्वारे व्यक्तिमत्वाचा विकास साधण्याची संधी न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलने उपलब्ध करुन दिली. त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान युगात काळाबरोबर अधिकाधिक वेगाने पुढे जाऊन दर्जेदार शिक्षणाची परंपरा अविरत सुरू ठेवावी असे आवाहन शिवसेना खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.

बेलापूर - एकलहरे येथील न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळया प्रसंगी अध्यक्षीय भाषणात खा. लोखंडे बोलत होते. यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सौ.प्रितीताई कदम,व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. स्वाती कोयटे, संदीप कोयटे, विद्यालयाचे संस्थापक अनिल न्याती, सचिव राकेश न्याती, मुकेश न्याती, शाळा समिती सदस्या सौ. कोमल न्याती, सौ. वैशाली न्याती, शैक्षणिक संचालक धनेश गांधी, उपप्राचार्या सोनल चोबे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना सौ. प्रितीताई कदम यांनी विद्यार्थी- शिक्षक आणि पालक यांच्यातील दृढ संबंधांचे शिक्षणावर होणाऱ्या परिणामांचे महत्व विषद केले. तर सौ. स्वाती कोयटे यांनी भविष्यातील शैक्षणिक बदल आणि आव्हाने यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सौ. कोमल न्याती यांनी विद्यार्थ्याना शिक्षकां बरोबरच पालकांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांनी मंथन या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित समुद्र मंथन आणि विचार मंथन हा गाभा मानून लघुनाट्य,गीत, संगीत आणि नृत्य अशा विविध प्रभावी सादरीकरणातून विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपली संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवून उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना विविध क्षेत्रातील नैपुण्य संपादीत केल्याबद्दल पारितोषिके देउन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती राजश्रीताई ससाणे, उद्योजक नगरसेवक श्रीनिवास बिहानी, राजन चुग, संजय छल्लारे, काँग्रेस नेते हेमंत ओगले,लायन्स क्लबचे अध्यक्ष चेतन भुतडा, रोटरी क्लबचे अध्यक्ष ऋषिकेश बनकर, माजी जी.प.सदस्य शरद नवले, विराज राजे भोसले,बेलापुर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत  लढ्ढा , शांतीलाल हिरण, बेलापूर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले, एकालहरे ग्रा. पं. सदस्या सौ. अनिसा शेख, उक्कलगाव ग्रा. पं. सरपंच नितीन थोरात, बेलापूर ग्रा. पं. सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते.

संस्थापक अनीलजी न्याती व काका कोयटे यांनी प्रारंभी स्वागत केले. तर सचिव राकेश न्याती यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक वृंदानी परिश्रम घेतले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-महाराष्ट्र राज्याचे माजी गृह मंत्री स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील यांच्या नावाने दिला जाणारा सन २०२१-२२ चा मानाचा आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून बेलापूर बु., ता. श्रीरामपूर ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक (विभागून) प्राप्त झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे या पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये (विभागून) व मानचिन्ह असे आहे. स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त गावाची यादी नुकतीच अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जाहीर केला आहे.

बेलापूर बु., ग्रामपंचायतीस १०० वर्ष पूर्ण झाली असून शतकपूर्ती वर्ष साजरे होत आहे. शतकपूर्ती वर्षात ग्रामपंचायतीस पुरस्कार प्राप्त झाला असुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून गावात चौक सुशोभीकरण, भूमिगत गटारी, जॉगिंग ट्रॅक, नाव घाट सुशोभीकरण, १२६ कोटी खर्चाची पाणी पुरवठा योजना आदी विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम तसेच आरोग्य शिबिरे यांचे आयोजन करण्यात येत आहे.तसेच दिपावली निमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला होता  याचीच दखल घेत ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्रामपुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारा बद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच ,अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात, अवैध गावठी व हातभट्टी दारू व्यवसाय सुरू असल्याने. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी,स्थानिक गुन्हे शाखेस,अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसाया विरोधात कारवाईची आदेश दिल्याने. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी, तात्काळ कारवाईसाठी पथक रवाना करून. राहाता, कोपरगाव परिसरात सुरू असलेल्या. अवैध गावठी हातभट्टी दारू विरोधात कारवाई करत,१ लाख ६ हजार  रुपये किमतीचे, अवैध गावठी हातभट्टीची साधने. तसेच १९०० लिटर कच्चे रसायन व  ११० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू साठा नष्ट केला असून. या प्रकरणी हिरामण रावसाहेब पवार, राहणार वारी कोपरगाव, दयानंद वामन गायकवाड राहणार वारी कोपरगाव,म्हाळू जयराम बर्डे, राहणार शिंगवे तालुका राहाता, यांच्या विरुद्ध. महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर,पोलीस नाईक शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, राहुल सोळुंके, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव आदींच्या पथकाने आज पहाटे केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget