स्थानिक गुन्हे शाखेची राहाता,कोपरगाव कारवाई,अवैध दारूसाठा उध्वस्त.
अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात, अवैध गावठी व हातभट्टी दारू व्यवसाय सुरू असल्याने. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी,स्थानिक गुन्हे शाखेस,अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसाया विरोधात कारवाईची आदेश दिल्याने. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी, तात्काळ कारवाईसाठी पथक रवाना करून. राहाता, कोपरगाव परिसरात सुरू असलेल्या. अवैध गावठी हातभट्टी दारू विरोधात कारवाई करत,१ लाख ६ हजार रुपये किमतीचे, अवैध गावठी हातभट्टीची साधने. तसेच १९०० लिटर कच्चे रसायन व ११० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू साठा नष्ट केला असून. या प्रकरणी हिरामण रावसाहेब पवार, राहणार वारी कोपरगाव, दयानंद वामन गायकवाड राहणार वारी कोपरगाव,म्हाळू जयराम बर्डे, राहणार शिंगवे तालुका राहाता, यांच्या विरुद्ध. महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर,पोलीस नाईक शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, राहुल सोळुंके, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव आदींच्या पथकाने आज पहाटे केले आहे.
Post a Comment