Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-महाराष्ट्र राज्याचे माजी गृह मंत्री स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील यांच्या नावाने दिला जाणारा सन २०२१-२२ चा मानाचा आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून बेलापूर बु., ता. श्रीरामपूर ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक (विभागून) प्राप्त झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे या पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये (विभागून) व मानचिन्ह असे आहे. स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त गावाची यादी नुकतीच अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जाहीर केला आहे.

बेलापूर बु., ग्रामपंचायतीस १०० वर्ष पूर्ण झाली असून शतकपूर्ती वर्ष साजरे होत आहे. शतकपूर्ती वर्षात ग्रामपंचायतीस पुरस्कार प्राप्त झाला असुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून गावात चौक सुशोभीकरण, भूमिगत गटारी, जॉगिंग ट्रॅक, नाव घाट सुशोभीकरण, १२६ कोटी खर्चाची पाणी पुरवठा योजना आदी विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम तसेच आरोग्य शिबिरे यांचे आयोजन करण्यात येत आहे.तसेच दिपावली निमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला होता  याचीच दखल घेत ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्रामपुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारा बद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच ,अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात, अवैध गावठी व हातभट्टी दारू व्यवसाय सुरू असल्याने. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी,स्थानिक गुन्हे शाखेस,अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसाया विरोधात कारवाईची आदेश दिल्याने. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी, तात्काळ कारवाईसाठी पथक रवाना करून. राहाता, कोपरगाव परिसरात सुरू असलेल्या. अवैध गावठी हातभट्टी दारू विरोधात कारवाई करत,१ लाख ६ हजार  रुपये किमतीचे, अवैध गावठी हातभट्टीची साधने. तसेच १९०० लिटर कच्चे रसायन व  ११० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू साठा नष्ट केला असून. या प्रकरणी हिरामण रावसाहेब पवार, राहणार वारी कोपरगाव, दयानंद वामन गायकवाड राहणार वारी कोपरगाव,म्हाळू जयराम बर्डे, राहणार शिंगवे तालुका राहाता, यांच्या विरुद्ध. महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर,पोलीस नाईक शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, राहुल सोळुंके, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव आदींच्या पथकाने आज पहाटे केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- अवघ्या चार तासात शहर पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक करुन १ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अरबाज इजाज बागवान, सर्फराज बाबा शेख असे या आरोपींचे नावे आहे. त्यांच्यावर यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, लासलगाव पोलीस ठाण्यात दोघांवर एकूण 15 गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १६) येथील रोहित सचिन मैड हा रात्री ८ वाजेच्या सुमारास रामनगर ते साईनगर कच्चा रस्ता वॉर्ड नं.1 येथुन त्याच्या कडील दुचाकीवर जात असताना त्याला दोन अनोळखी इसमांनी रस्त्यात अडवुन, त्याच्या गळ्याला
धारदार चाकु लावत मारहाण केली. तसेच त्याच्याकडील चांदीची चैन, चांदीचे ब्रेसलेट, ३ हजार रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्डसह त्याची दुचाकी बळजबरीने चोरुन पसार झाले होते.याप्रकरणी रोहित सचिन मैड याने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास येथील शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक जीवन बोरसे हे करीत असताना, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा अरबाज इजाज बागवान (वय-२३, रा.संजयनगर, वॉर्ड नं.२) व सर्फराज बाबा शेख (वय २०, रा.बीफ मार्केट जवळ, वॉर्ड नं.२) यांनी केला आहे. म्हणुन पो.नि. हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ तपास पथक रवाना केले. श्रीरामपूर पोलिसांनी सापळा लावुन शिताफिने पाठलाग करुन दोन्ही आरोपींना अवघ्या चार तासात पकडले.
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपीना दाखल गुन्ह्यात अटक करुन न्यायालयासमोर काल बुधवारी (दि.१८)
हजर केले असता न्यायालयाने आरोपीना पुढील ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडुन लाल रंगाची दुचाकी, ॲपल कंपनीचा आय फोन, १२०० रुपयांची रोख रक्कम, चांदीचे तीन भाराचे चैन व ब्रेसलेट, फिर्यादीचे आधारकार्ड व पॅनकार्ड, एक चाकु असे एकुण १ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या सुचनेनुसार स.पो.नि. जीवन बोरसे, पो.ना. रघुनाथ कारखेले, पो.कॉ. गौतम लगड, पो.कॉ. राहुल नरवडे, पो.कॉ. रमिझराजा अत्तार, पो.कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. मच्छिद्र कातखडे, पो.कॉ. भारत तमनर, पो.ना. फुरकान शेख व पो. कॉ. प्रमोद जाधव यांनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास स.पो.नि. जीवन बोरसे हे करीत आहेत.


श्रीरामपूर : यावेळेची मोठी बातमी हाती आलीय. ज्यात श्रीरामपूर एमआयडीसी तील दत्तनगर ते वाकडी रस्त्यावररील, यशवंतबाबा चौकी पासून  काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात अंदाजे ३५ वर्षीय युवकांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून. दगडाखाली ठेचून युवकाचा खून केल्याची प्राथमिक माहिती  समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी दोन्ही अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन. मृतदेह व परिसराची पाहणी करून,युवकाच्या हत्येसंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याने. सहाय्यक पोलीस निरीक्षक मगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे,पोलीस नाईक मच्छिंद्र शेलार, रघुवीर कारखीले, पोलीस कॉन्स्टेबल खरात, गुंजाळ, गुन्हे अन्वेषण विभागाचे राहुल नरवडे, गौरव दुरगुळे,गौतम लगड, बाळासाहेब गिरी, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फुरखान शेख,प्रमोद जाधव, बिरप्पा करमल आदी पोलीस कर्मचा-यांनी,मृतदेह व परिसराचा पंचनामा करून, मयत युवकाचा मृतदेह शवविच्छेदना करीत पाठवला असून. मयत युवक कोण व कुठला, व कशामुळे त्याचा खून झाला याबाबत शहर पोलीस  पुढील तपास करीत आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी )-बेलापुर बु ग्रामपंचायत निवडणूकीत अनुसुचित जमाती महिला या जागेवर निवडून आलेल्या सुनिता राजेंद्र बर्डे यांचे जात प्रमाणपत्रच रद्द झाल्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द ठरविल्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसलै यांनी काढला असुन या निकालामुळे जनता विकास आघाडीला धक्का बसला आहे.  बेलापुर ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२१ मध्ये झाली होती त्यात प्रभाग क्रमांक  चार मधुन अनुसुचित जमाती महिला जागेकरीता गावकरी मंडळाच्या वतीने सौ.कमल भगवान मोरे तर जनता विकास आघाडीच्या वतीने सौ.सुनिता राजेंद्र बर्डे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत सौ कमल भगवान मोरे यांचा पराभव झाला. या निवडणूकीत जनता विकास अघाडीला सहा जागा तर गावकरी मंडळाला अकरा जागा मिळाल्या होत्या या वेळी सौ कमल मोरे यांनी जात पडताळणी कार्यालय नाशिक येथे अर्ज करुन बर्डे यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्यामुळे जात पडताळणी देवु नये अशी मागणी केली होती. सौ.मोरे यांच्या अर्जाची दखल घेवुन तो अर्ज चौकशी कामी उपविभागीय कार्यालय श्रीरामपुर येथे पडताळणीसाठी पाठविण्यात आला.श्रीरामपुर येथील उपविभागीय अधिकारी यांना जातीच्या दाखल्या सोबत जोडलेले पुरावे चुकीचे असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे उपविभागीय कार्यालयाने सौ. सुनिता बर्डे यांचे जात प्रमाणपत्र दिनांक १०आँक्टोबर २०२२ रोजी  रद्द केले व तसा चौकशी अहवाल जातपडताळणी कार्यालयास कळविला तसेच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र आदेश क्र/रानिआ/मनपा/२००७ / प्रक्र६ /क-५दिनाक ३ आँक्टोंबर २००७ मधील मुद्दा क्रमांक ३ नगरपरिषद व नगर पंचायत व ग्रामपंचायत यांच्या बाबतीत ज्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे त्यांच्या बाबतीत अनर्हतेचे आदेश जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचे कळविल्यापासून त्वरीत व जास्तीत जास्त १५ दिवसाचे आत सदस्यत्व रद्द करुन संबधीताना बजवावा कुठल्याही सदस्याचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास ते तात्काळ जिल्हाधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे त्या नुसार जात पडताळणी कार्यालयाने ते पडताळणी देणे शक्य नसल्याचे कळविले.सौ.बर्डे यांचे जात प्रमाणापत्रच रद्द झाल्याने जिल्हाधिकारी डाँक्टर राजेंद्र भोसले यांनी त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पदच रद्द केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी): आज दि.16/01/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना वडगाव पान ता. संगमनेर येथे  सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने  वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली.  त्यावरून सदर ठिकाणी  बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन एक परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.आरोपी नामे प्रतिक उत्तर आणि एक महिला आरोपी अशा दोघां विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गु. र.नं.23/2023, महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला  पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर  Dysp संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली PI राजेंद्र भोसले,   𝙰𝚙𝚒 ठाकरे, पो.हे .का.सुरेश औटी पो.ना.निलेश मेटकर,पो.ना.दिपक रोकडे,पो.कॉ लगड,पो.कॉ नितीन शिरसाठ, म.पो.कॉ वाकचौरे यांनी केली.*

श्रीरामपूर (प्रतिनिधी): श्रीरामपूर आरटीओ कार्यालय वतीने रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.या मार्गदर्शन सत्रासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरेश शिंदे व हेमंत निकुंभ उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निकुंभ म्हणाले की, अपघात टाळण्यासाठी आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. सर्व नागरिकांनी रस्त्यावर चालताना उजव्या बाजूने चालावे त्याने देखील अपघात तळतील. तसेच रस्त्यावर गाडी उभी करताना व गाडीचा दरवाजा उघडताना आपण मागे बघून दुसरे वाहन येत नसल्याची खात्री करावी मगदरवाजा उघडावा. रस्ता ओलांडताना आधी उजव्या, डाव्या मग उजव्या बाजूला बघून रस्ता ओलांडावा, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे असे ते पुढे म्हणाले. यावेळी शिंदे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की रस्त्यावर होणाऱ्या अपघात व मदत कार्य कसं करावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अनेक नियम त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.यावेळी प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक हेमंत सोलंकी यांनी सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज त्रिपाठी तर आभार रत्नप्रभा पाटील यांनी व्यक्त केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget