युवकाची निर्घृणपणे हत्या,एमआयडीसीत दगडाखाली ठेचून फेकला मृतदेह
श्रीरामपूर : यावेळेची मोठी बातमी हाती आलीय. ज्यात श्रीरामपूर एमआयडीसी तील दत्तनगर ते वाकडी रस्त्यावररील, यशवंतबाबा चौकी पासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात अंदाजे ३५ वर्षीय युवकांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून. दगडाखाली ठेचून युवकाचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी दोन्ही अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन. मृतदेह व परिसराची पाहणी करून,युवकाच्या हत्येसंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याने. सहाय्यक पोलीस निरीक्षक मगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे,पोलीस नाईक मच्छिंद्र शेलार, रघुवीर कारखीले, पोलीस कॉन्स्टेबल खरात, गुंजाळ, गुन्हे अन्वेषण विभागाचे राहुल नरवडे, गौरव दुरगुळे,गौतम लगड, बाळासाहेब गिरी, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फुरखान शेख,प्रमोद जाधव, बिरप्पा करमल आदी पोलीस कर्मचा-यांनी,मृतदेह व परिसराचा पंचनामा करून, मयत युवकाचा मृतदेह शवविच्छेदना करीत पाठवला असून. मयत युवक कोण व कुठला, व कशामुळे त्याचा खून झाला याबाबत शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Post a Comment