Latest Post

श्रीरामपूर : शाळा आणि ज्ञानार्जन हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक सर्वश्रूत समीकरणच आहे.शाळेतून घेतलेले धडे प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचे काम विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांचे सर्वत्र कौतुक होत असते.गावकर्‍यांसोबत इतरांनीही कौतुक करावे असा दीपोत्सवाचा उपक्रम उंबरगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला.  

असा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत यावे हीच मुळात आनंद देणारी बाब आहे. ज्या शाळेत आपण ज्ञानाचे धडे घेतो,त्याच ज्ञानरूपी शिदोरीच्या सहाय्याने विद्यार्थी भविष्यात मार्गक्रमण करतो, अशा शाळेत रोषणाई केली जावी अशा उद्देशाने विद्यार्थ्यांनी दिवाळी प्रथम शाळेत साजरी केली.


उंबरगाव येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक शकील बागवान यांनी पुढाकार घेत दिवाळी सुट्टीपूर्वी विद्यार्थ्यांना दीपावलीचे महत्त्व पटवून देताना पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करताना फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते.त्याचवेळी सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेतच दिवाळी साजरी करण्याचा संकल्प मांडला.सर्व विद्यार्थ्यांनी होकार देत प्रत्यक्ष दिवाळी साजरी करण्याचे नियोजन केले. 

दिवलीच्या दिवशी रंगी बेरंगी कपडे परिधान करून नटून थटून आलेला प्रत्येक विद्यार्थी पणतीसह आला. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच आनंदाची पणती प्रत्येक


वर्गासमोर दीप लावून तो वर्ग सुशोभित केला.पणत्यानी रोषणाई करून संपूर्ण शालेय परिसर प्रकाशमय करून समृद्ध केला. फटाके न फोडता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा खराखुरा आनंद यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.सर्व विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकासह एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

आगळ्यावेगळ्या या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील काळे,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,सरपंच किशोर कांडेकर,माजी सरपंच चिमाजी राऊत,राजेंद्र राऊत,जितेंद्र भोसले,मुख्याध्यापक लताबाई पालवे व सर्व शिक्षकांनी उपक्रमाचे कौतुक केले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-दिपावलीच्या सणाकरीता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सजवुन ठेवली परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बाजारपेठेत मंदीचे सावट स्पष्ट जाणवत होते            दिपावली सणाकरीता व्यापाऱ्यांनी दुकानात भरपुर माल भरुन ठेवला होता या वर्षी दिवाळी चांगली होईल अशी सर्वांनाच अपेक्षा असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व्यापारी कष्टकरी सर्वांच्या आनंदावर पाणी पडले बेलापुर बाजारपेठेची आसपासच्या गावांमुळे दर वर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते खासकरुन शेती चांगली पिकली तर बाजारपेठ फुलुन जाते परंतु या वर्षी सर्वच पिके जोमात होती परंतु आलेल्या पावसामुळे ती सर्व कोमात गेली पाऊस येण्या आगोदर सर्वच भागात सोयाबीन कापसु मका ही पिके जोरात होती त्या पिकाच्या जोरावर काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते परंतु अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या वाती झाल्या तर

सोयाबीनला जागेवरच मोड फुटले सोयाबीन, कापुस बाजारात आले असते तर आर्थिक उलाढाल वाढली असती परंतु आता केवळ बालबच्च्याकरीता नाईलाजास्तव सण साजरा करण्याची वेळ सर्वावरच आली आहे अनेकांनी थोडे फार फराळ बाजारातुनच विकत आणुन सण साजरा केला आहे  शेतीतील पिकाचे नुकसान झाल्यामुळे कष्टकरी वर्गांना देखील काम मिळेनासे झाले आहे नुकसानीचे पंचनामे करुन निदान दिवाळीला तरी सण साजरा करण्यापुरती मदत शासनाकडून मिळेल ही अपेक्षा होती पण ती ही फोल ठरली आहे याचा परीणाम सर्व बाजारपेठावर झालेला दिसत असुन व्यापारी ग्राहकाच्या प्रतिक्षेत दुकानात बसुन आहे बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त  ग्राहकांनी आपली खरेदी गावातच करावी या करीता भव्य अशी बक्षिस योजना जाहीर केली व्यापारी वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला परंतु हाता-तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास हिरावला गेल्यामुळे व्यापारी बँका पतसंस्था सहकारी संस्था सर्वावरच मोठा परिणाम झाला आहे

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-अतिवृष्टीमुळे शेतकरी व कष्टकरी वर्गाचे झालेले नुकसान व सणासुदीचा काळ लक्षात घेता सर्वांची दिवाळी गोड व्हावी या करीता आनंदाचा शिधा देण्याचा धाडसी निर्णय शासनाने घेतला असुन या निर्णयामुळे गरीबांना दिपावलीचा आनंद घेता येणार असल्याचे मत खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले                                   श्रीरामपुर तालुक्यात आनदांचा शिधा दुकानात पोहोच झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित वितरण होते की नाही हे पहाण्याकरीता खासदार लोखंडे यांनी रेव्हेन्यू सोसायटीच्या धान्य दुकानास भेट देवुन पहाणी केली वाटप व्यवस्थित सुरु असल्याचे पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले त्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटचे वितरणही करण्यात आले या वेळी त्याच्या समवेत भाजपाचे पदाधिकारी प्रकाश चित्ते राजेंद्र देवकर सुधीर वायखेडे संदीप वाघमारे कैलास भणगे नंदकिशोर आरोटे राजेंद्र त्रिभुवन उपस्थित होते रेव्हेन्यू सोसायटीच्या दुकानाचे सेल्समन रज्जाक पठाण यांनी आभार मानले

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-शासनाने गोरगरीबांना दिवाळी भेट देताना शंभर रुपयात साखर रवा हरबरा डाळ व पामतेल या चार वस्तूचा आनंदाचा शिधा वस्तुंचे वाटप श्रीरामपुर तालुक्यात सुरु झाले असुन ग्रामीण भागातही वाटप सुरु झाले आहे .मांडवे तालुका श्रीरामपुर येथे या किटचे वाटप सुरु करण्यात आले        या वेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य  शंकर चितळकर म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकरी तसेच गोरगरीबांना दिवाळी सणाचा आनंद लुटता यावा या करीता शंभर रुपयात चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला असुन  शासनाचा हा निर्णय खरोखरच सर्वसामान्यांना वाढत्या महागाईच्या काळात नक्कीच दिलासा देणारा आहे अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झालेल्या शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या अर्थात दिवाळीच्या काळात भाजपा सरकारने या गोरगरीब जनतेला मोठा मदतीचा हात दिलेला आहे या वेळी  पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव चितळकर सरपंच निखील वडीतके उपसरपंच गोविंद तांबे ग्रामसेवक संदीप बडाख अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई गंगाराम भोसले  आण्णासाहेब गेठे शहाजी वडीतके बबनराव सोपान चितळकर  साहेबराव चितळकर गोकुळ पवार विजय काबुडके आण्णासाहेब ढोणे पांडुरंग पटांगरे बाबासाहेब शेंडे ज्ञानेश्वर वडीतके शिवाजीराजे वडीतके विष्णू सोनवणे  आदींसह तांबे वाडी तसेच मांडवे येथील रेशनकार्ड धारक महिला आणि लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी )महाराष्ट्र  शासनाच्या वतीने गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी या करीता शंभर रुपयात साखर तेल रवा व चनाडाळ हा आनंदाचा शिधा श्रीरामपुर तालुक्यात पोहोच झाला असुन त्याचे वितरण उपविभागीय आधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष देविदास देसाई भाऊसाहेब वाघमारे रज्जाक पठाण गोपीनाथ शिंदे शिवाजी सईद माणिक जाधव गोदाम व्यवस्थापक अर्जुन सानप गोदामपाल मिलींद नवगीरे पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले आहे.  सणासुदीचा काळ लक्षात घेता सर्व दुकानदारांनी आंनदाचा शिधा प्रत्येक कार्डधारकांना मिळेल याची काळजी घ्यावी तसेच दुकानात माल पोहोच होताच दुकानदारांनी तात्काळ वाटप सुरु करावे कुणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी तक्रार येणाऱ्या दुकानावर कडक कारवाई करण्यात येईल असा ईशारा उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिला आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला यांची नियुक्ती झाली आहे. राज्यातील 24 पोलीस अधिक्षकांच्या बदली बाबतचे आदेश गृह विभागाने गुरूवारी रात्री काढले.दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना अद्याप पदस्थापना मिळालेली नाही. 

यांच्या जागी मा. राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश ओला हे सध्या पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे कार्यरत आहेत. ते एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि हसतमुख अधिकारी म्हणून राकेश ओला यांची ओळख आहे. राजस्थान येथील जयपूर मधील पोलिस घराण्यात त्यांचा जन्म झाला असुन. २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले राकेश ओला हे सरळ सेवा भरतीने सहायक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली होती. त्यावेळी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी

टोळीने अहमदनगरसह संपूर्ण राज्यात हैदोस घातला होता. या टोळीचा त्यांनी छडा लावून टोळीचे कंबरडे मोडले. मे १६ मध्ये त्यांची मालेगावला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. जातीय दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या मालेगावात त्यांनी मे २०१७ पर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली. तेथून ते जून २०१७ ला नागपुरात पोलीस उपायुक्त

म्हणून बदलून आले. येथे त्यांना परिमंडळ दोनची जबाबदारी देण्यात आली. नागपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तोतया पोलीस बनून लुटणाऱ्या

टोळीचा तसेच कारची काच फोडून रोकड आणि मौल्यवान चिजवस्तूंची बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा त्यांनी छडा लावला. याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांचाही छडा लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमीका बजावली आहे. राकेश ओला यांनी यापूर्वी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे अधीक्षक होते.आता नगर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणुन त्यांना नियुक्ती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा नगर जिल्ह्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांनी 1 ऑक्टोबर 2020 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांनी जिल्हा पोलीस दलात ई-टपाल प्रणाली, टू-प्लस योजना प्रभावी राबवली.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपुर तालुक्यात बेलापुर विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही जिल्ह्यात अव्वल नंबरची सोसायटी ठरली असुन या संस्थेच्या संचालक मंडळाने १५%लाभांश १०किलो साखर दिवाळीचा फराळ देण्याचा निर्णय घेतला असुन सभासद हीत जोपासतानाच संस्थेचा विकास साधण्याचाही प्रयत्न केला आहे  असे गौरोद़्गार आमदार लहु कानडे यांनी काढले                                 दिपावली निमित्त बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सभासदांना १५ टक्के डीव्हीडंट १० किलो साखर तसेच फराळ वाटप व सेवकांना बोनस वाटपाच्या  कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते  या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे काँग्रेसचे

तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक  भगवान  सोनवणे अजय डाकले कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके राजेश खटोड दत्ता कुऱ्हे  आदि मान्यवर उपस्थित  होते आमदार लहु कानडे पुढे म्हणाले की सध्याच्या शासनाने सर्वांनाच गाजर दाखविण्याचे काम  केले आहे महाविकास अघाडी सरकारने अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले होते त्यांना तिलांजली देण्याचे काम या शासनाने सुरु केले आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी भुईसपाट झाला आहे त्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली पाहीजे शेती कायमच तोट्यात चालल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम जिल्हा बँकेने हाती घेतले आहे शेतकऱ्यांना विज व पाणी हे महत्वाचे आहे हे लक्षात घेवुन शेतकऱ्यांना विंजेसंदर्भात येणाऱ्या अडचणीचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की श्रीरामपुर तालुक्यात उच्च दाबाने विज पुरवठा व्हावा अशी यंत्रणाच अस्तित्वात नाही त्यामुळे तालुक्यात हाय पाँवर सब स्टेशन मंजुर करण्यात आले असुन लवकरच त्याचे काम सुरु होणार आहे ,तालुक्याचा शाश्वत स्वरुपात विकास व्हावा हे आपले स्वप्न आहे श्रीरामपुर ते देवळाली या रस्ता चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असुन चांगल्या कामांना खिळ घालणाऱ्या अपप्रवृत्ती विरोधात भक्कमपणे उभे राहीले पाहीजे असेही ते म्हणाले  जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे म्हणाले की जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप देण्यासाठी कर्ज योजना सुरु करण्यात आली असुन त्याचा लाभ घ्यावा असे अवाहन ससाणे यांनी केले या वेळी बोलताना संस्थेचे चेअरमन सुधीर नवले म्हणाले की केवळ कर्ज देणे व वसुल करणे या वर अवलंबून न रहाता संस्थेने पेट्रोल पंप स्वस्त धान्य दुकान खत डेपो असे दुय्यम व्यवसाय सुरु केल्यामुळे संस्था नफ्यात आलेली आहे सन २०१४ पासुन सभासदांना लाभांश देण्याचे काम संस्था करत आहे १५ वर्षापासुन संस्थेचा कारभार काटकसरीने केल्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा संस्था आमच्या ताब्यात दिली आहे त्यांच्या विश्वासाला तडा जावु दिला जाणार नाही आगामी काळात शाँपींग काँम्प्लेक्स मंगल कार्यालाय बांधण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही नवले म्हणाले  आमदार कानडे यांनी श्रीरामपुर  ते देवळाली या रस्ता चौपदरीकरण कामाकरीता सोळा कोटीचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल तसेच गावातील स्मशानभुमी दलीत वस्ती वाबळे वस्ती करीता निधी दिल्याबद्दलही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला या वेळी त्रिंबकराव कुऱ्हे नंदकिशोर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले तुकाराम मेहेत्रे  शेषराव पवार अनिल नाईक अंतोन अमोलीक प्रदीप शेलार अयाज सय्यद जाकीर शेख प्रविण शेलार सुनिल नाईक उत्तम मेहेत्रे रावसाहेब कुऱ्हे राजेंद्र सातभाई अशोक कुऱ्हे विश्वनाथ गवते आदिसह सभासद मोठ्या सख्येंने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास मेहेत्रे यांनी केले तर सचिव विजय खंडागळे यानी आभार मानले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget