यांच्या जागी मा. राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश ओला हे सध्या पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे कार्यरत आहेत. ते एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि हसतमुख अधिकारी म्हणून राकेश ओला यांची ओळख आहे. राजस्थान येथील जयपूर मधील पोलिस घराण्यात त्यांचा जन्म झाला असुन. २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले राकेश ओला हे सरळ सेवा भरतीने सहायक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली होती. त्यावेळी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी
टोळीने अहमदनगरसह संपूर्ण राज्यात हैदोस घातला होता. या टोळीचा त्यांनी छडा लावून टोळीचे कंबरडे मोडले. मे १६ मध्ये त्यांची मालेगावला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. जातीय दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या मालेगावात त्यांनी मे २०१७ पर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली. तेथून ते जून २०१७ ला नागपुरात पोलीस उपायुक्त
म्हणून बदलून आले. येथे त्यांना परिमंडळ दोनची जबाबदारी देण्यात आली. नागपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तोतया पोलीस बनून लुटणाऱ्या
टोळीचा तसेच कारची काच फोडून रोकड आणि मौल्यवान चिजवस्तूंची बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा त्यांनी छडा लावला. याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांचाही छडा लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमीका बजावली आहे. राकेश ओला यांनी यापूर्वी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे अधीक्षक होते.आता नगर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणुन त्यांना नियुक्ती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा नगर जिल्ह्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांनी 1 ऑक्टोबर 2020 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांनी जिल्हा पोलीस दलात ई-टपाल प्रणाली, टू-प्लस योजना प्रभावी राबवली.
Post a Comment