दिवाळीचा सण असुनही अतिवृष्टीमुळे बाजारपेठेत शुकशुकाट

बेलापुर (प्रतिनिधी  )-दिपावलीच्या सणाकरीता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सजवुन ठेवली परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बाजारपेठेत मंदीचे सावट स्पष्ट जाणवत होते            दिपावली सणाकरीता व्यापाऱ्यांनी दुकानात भरपुर माल भरुन ठेवला होता या वर्षी दिवाळी चांगली होईल अशी सर्वांनाच अपेक्षा असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व्यापारी कष्टकरी सर्वांच्या आनंदावर पाणी पडले बेलापुर बाजारपेठेची आसपासच्या गावांमुळे दर वर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते खासकरुन शेती चांगली पिकली तर बाजारपेठ फुलुन जाते परंतु या वर्षी सर्वच पिके जोमात होती परंतु आलेल्या पावसामुळे ती सर्व कोमात गेली पाऊस येण्या आगोदर सर्वच भागात सोयाबीन कापसु मका ही पिके जोरात होती त्या पिकाच्या जोरावर काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते परंतु अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या वाती झाल्या तर

सोयाबीनला जागेवरच मोड फुटले सोयाबीन, कापुस बाजारात आले असते तर आर्थिक उलाढाल वाढली असती परंतु आता केवळ बालबच्च्याकरीता नाईलाजास्तव सण साजरा करण्याची वेळ सर्वावरच आली आहे अनेकांनी थोडे फार फराळ बाजारातुनच विकत आणुन सण साजरा केला आहे  शेतीतील पिकाचे नुकसान झाल्यामुळे कष्टकरी वर्गांना देखील काम मिळेनासे झाले आहे नुकसानीचे पंचनामे करुन निदान दिवाळीला तरी सण साजरा करण्यापुरती मदत शासनाकडून मिळेल ही अपेक्षा होती पण ती ही फोल ठरली आहे याचा परीणाम सर्व बाजारपेठावर झालेला दिसत असुन व्यापारी ग्राहकाच्या प्रतिक्षेत दुकानात बसुन आहे बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त  ग्राहकांनी आपली खरेदी गावातच करावी या करीता भव्य अशी बक्षिस योजना जाहीर केली व्यापारी वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला परंतु हाता-तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास हिरावला गेल्यामुळे व्यापारी बँका पतसंस्था सहकारी संस्था सर्वावरच मोठा परिणाम झाला आहे

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget