Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रखर राष्ट्रवाद, देशभक्ती, सामाजिक समरसता जोपासण्याचे काम राष्ट्रीय स्वंयसेवक संघ करत असुन सर्वाना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी गेल्या ९७ वर्षापासून संघाचे कार्य अविरतपणे चालु आहे असे   प्रतिपादन रा स्व.संघाचे नासिक विभाग प्रचारक सुवेदजी देशमूख यांनी केले.

बेलापूर येथील रा.स्व. संघाच्या विजय दशमी दसरा उत्सवात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माऊली वृध्दाश्रमाचे संस्थापक सुभाष वाघुडे हे होते,तर तालुका सहकार्यवाह निलेशजी हरदास, देविदासजी चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपेंद्र कुलकर्णी यांच्या 

।"संघ विजयी पथ पर बढ चले."। या गीताने करण्यात आली.

आपल्या भाषणात देशमुख म्हणाले भारताची गौरवशाली संस्कृती,परंपरा आहे. आपल्यातील शौर्य,शक्ती,तेजाची उपासना करण्यासाठी या दिवशी शस्राचे पूजन केले जाते असेही ते म्हणाले

अध्यक्षीय भाषणात सुभाष वाघुंडे म्हणाले—देशात वृद्धाश्रमे ही समाजासाठी कलंकित बाब आहे.वृद्धाश्रमे असू नये हे जरी अपेक्षीत असले तरी निराधारांना आधार देणे.ह्याच मुळ उद्देशाने मी वृद्धाश्रम सुरु केलेला आहे राष्ट्रीय स्वंयसेवक संघामुळे जिवनाता शिस्त लागते आपल्यातील राष्ट्र प्रेम जागृत होते समाजाचे काहीतरी देणे लागतो या संकल्पनेतुन सुरु केलेल्या माऊली आश्रमात सध्या १९ आजी आजोबा सेवा घेत आहे .सुमारे २८ आजी आजोबांना मी घरवापसी केल्याचे त्यांनी सांगितले..

यावेळी रा.स्व.संघाचे घोषासह पथसंचलन काढण्यात आले.संघस्थानावर सुर्य नमस्कार,नियुद्ध, अग्र्निप्रलय,प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.कार्यक्रमाचे सुञसंचलंन देवेंद्र गोरे यांनी तर आभार रविंद्र कोळपकर यांनी  मानले.कार्यक्रमास परिसरातील संघप्रेमी नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते,

बेलापुर  (प्रतिनिधी  )-संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षीक सर्वसाधारण सभा अंत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन महेबुब शेख हे होते या वेळी सजंय जगताप यांनी मयत सभासदाचे सभासदत्व रद्द करुन वारसास सभासद करुन घ्यावे तसेच सातबारा नसलेल्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची सुचना केली त्यास कल्याणराव जगताप यांनी अनुमोदन दिले ऐनवेळच्या विषयात तोट्यात असणारी संस्था उर्जितावस्थेत कशी येईल या करीता करण्यात येणाऱ्या उपाय योजनावर चर्चा झाली .गावात सुरु असलेले धान्य दुकान शेजारच्या गावास जोडले असुन कार्डधारकांना चार किलोमीटर दुर अंतरावर धान्य नेण्याकरीता जावे लागते त्यातच मशिन बंद असल्यास माघारी यावे लागते ही कार्डधारकांची, गोरगरीबांची होणारी हेळसांड थांबविण्याकरीता गावाचे धान्य दुकान गावातच सुरु करण्याची मागणी ऐन वेळच्या विषयात करण्यात आली .संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांनी सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली .संस्थेचे चेअरमन  महेबुब शेख यांनी लांडेवाडी ते देवळाली चिंचोली या एक किलोमीटर  रस्त्याच्या दुरुस्तीचे काम स्वः खर्चाने केल्याबद्दल सभासदांनी त्यांचा सत्कार करुन आभार मानले . या वेळी संस्थेचे सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक उपसभापती योगीता चव्हाण यांनी केले तर सचिव गीताराम काळे यांनी अहवाल वाचन केले प्रकाश नलगे यांनी सहकार्य केले शेवटी संचालक देविदास देसाई यांनी सर्वांचे आभार मानले

बेलापुर (प्रतिनिधी  )-संक्रापुर तालुका राहुरी येथील लांडेवाडी ते देवळाली चिंचोली फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संक्रापुर सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांनी स्वःखर्चाने केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला            संक्रापुर ग्रामस्थांना राहुरी,  देवळालीला जाण्याकरीता लांडेवाडी ते चिंचोली देवळाली हाच ऐकमेव रस्ता आहे मात्र पावसामुळे या रास्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली होती या रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले होते या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत शासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला होता परंतु शासन स्तरावर काहीच हालचाल झाली नाही संक्रापुर सहकारी संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांना या रस्त्याने जाणाऱ्या नागरीकांचे हाल पहावेना मग त्यांनी पदरमोड करुन या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला लांडेवाडी ते चिंचोली देवळाली फाटा या एक किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती स्वखर्चाने करुन नागरीकांची गैरसोय दुर केली त्याबद्दल संस्थेचे संचालक जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला या वेळी संस्थेचे माजी चेअरमन नबाजी जगताप संजय जगताप कल्याणराव होन भरतरीनाथ सालबंदे बाजीराव जगताप त्रींबक गताप विजय रोकडेकुंडलीक खेमनर बाळासाहेब गुंड भाऊसाहेब जगताप बबन खेमनर राजेंद्र जगताप रोहीदास खपके सुभाष दाते बाळासाहेब जगताप डाँक्टर सुरेश जगताप दावल शेख आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापूर(प्रतिनिधी )--विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कुणीही हरवु शकत नाही असे उद़्गार नाशिकच्या प्राईम अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा. विकास मालकर यांनी व्यक्त केले. बेलापूर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग, करिअर कट्टा विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करियर गायडन्स चर्चासत्रात  बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समीतीचे चेअरमन राजेश खटोड होते तर संस्थेचे विश्वस्त रविंद्र खटोड शेखर डावरे हे प्रमुख उपस्थित होते .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, उत्तम करिअर, चांगली नोकरी, पदवी व पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम , मानसन्मान प्रतिष्ठा ,पारितोषिके, बक्षीसे इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होते.त्यामुळे सरळ सेवा परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करावी.सिलेक्शन कमिशन , महाराष्ट्र लोकसेवा आयोग, रेल्वे रिक्रुटमेंट बँकिंग आदि स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात .उपलब्ध पदांची संख्या ही कधी शंभरात तर कधी हजारात असते. त्यात आपल्याला टिकायचे असेल तर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. भारतात सर्वात जास्त लोक भारतीय रेल्वेमध्ये काम करतात. त्या खालोखाल नंबर लागतो तो भारतीय सैन्य दलाचा. सरकारी नोकरीमध्ये ठराविक कालावधीनंतर तसेच विभागीय परीक्षा द्वारे बढतीच्या संधी देखील प्राप्त होतात. सरकारी नोकरीत जायचे असेल तर स्पर्धा परीक्षांना सामोरे जावेच लागते .त्यांचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती आत्मसात करावी लागते. मानव्यविद्या शाखेतील सर्व विषयांचा अभ्यास करावा लागतो.दुस-या सत्रात न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य योगेश पुंड यांनी मोटिव्हेशनल स्पीच दिले. करियर करण्यासाठी नियोजन, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी असेल तरच यशाचे शिखर गाठता येते असे ते म्हणाले.खुल्या सत्रामधे विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारले व मान्यवरांनी निराकरण केले, अध्यक्षीय सूचना विजया फलके हिने मांडली तर अध्यक्षीय अनुमोदन पुजा सोनवणे  हिने दिले..चर्चासत्राचे संयोजन स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. विठ्ठल सदाफुले,करीअर गायडन्सचे समन्वयक डॉ.अशोक माने ,अंतर्गत गुणवत्ता विभागाचे समन्वयक डॉ. बाबासाहेब पवार,प्रा विकास नालकर यांनी केले.या चर्चासत्रासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.महाविद्यालयाच्या प्राचार्या गुंफा कोकाटे यांनी प्रास्ताविक केले .पायल म्हस्के हीने सूत्रसंचलन केले तर मनीषा मुसमाडे हीने आभार मानले .

श्रीरामपूर प्रतिनिधी-अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहरालगत असलेल्या रांजणखोल (ता. राहाता) येथील गोदामावर छापा टाकून विनापरवाना साठविलेलीसुमारे 6 कोटी 50 लाख रुपये किमतीचीदूध पावडर व व्हे पावडरचा साठा जप्त केला.अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करीत असल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान संबंधिताच्यावतीने हजर झालेल्या अधिकार्‍यांनी या साठ्याबाबत कोणताही समाधानकारक खुलासा केला नाही, अथवा कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत.सहाय्यक आयुक्त स. पा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन अहमदनगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी सहाय्यक आयुक्त प्रमोद काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार व नमुना सहाय्यक अधिकारी प्रसाद कसबेकर यांनी सदरची कारवाई केली.याठिकाणच्या पावडरचे नमुने प्रयोशाळेत पाठविण्यात आले असून अन्न नमुने अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रौ उत्सवानिमित्ताने माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही योजना राबविण्यात येत असुन महीलांनी या योजनेचा लाभ घेवुन आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे अवाहन मा.जि प सदस्य शरद नवले यांनी केले आहे           माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेचा शुभारंभ बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्या स्वाती अमोलिक,तंटामुक्ती चे माजी अध्यक्ष प्रकाश कुऱ्हे,संदीप शेरमाळे बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँक्टर देविदास चोखर डाँक्टर मृण्मयी कुटे डाँक्टर मंजुश्री जाधव, गावकरी पतसंस्थेचे संचालक सचिन वाघ, सागर ढवळे,किशोर कदम, बापूसाहेब वडितके उपस्थित होते आपल्या भाषणात नवले पुढे म्हणाले की बेलापुर ग्रामपंचायतीचे शतक महोत्सव आहे त्या निमित्ताने ग्रामपंचायती मार्फत महीलांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे या वेळी माहीती देताना डाँक्टर देविदास चोखर म्हणाले की आरोग्य विभागाच्या वतीने १८ वर्षावरील सर्व महीलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे नऊ दिवस नवविवाहीत गरोदर स्तनदा तसेच वयोवृद्ध महीलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे सर्व महीलांची आरोग्य तपासणी करुन महीला सबलीकरण करण्याचा शासनाचा मानस आहे या तपासणीत गंभीर आजार असणाऱ्या महीलाना तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार असुन या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बारा गावे येत असुन सहा उपकेंद्र आहेत त्या सर्व ठिकाणी ही तपासणी मोहीम राबविली जाणार असल्याचे डाँक्टर चोखर यांनी सांगितले या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे स्वाती अमोलीक यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी आरोग्य सहाय्यक प्रशांत गायकवाड श्रीमती ग्रेटा कदम श्रीमती नेहुलकर रत्ना नागले आशा कुताळ महेंद्र मेश्राम गणेश टाकसाळ संतोष शेलार श्रीमती सय्यद पंडीत पत्रकार देविदास देसाई  किशोर कदाम दिलीप दायमा आदिसह नागरीक उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )- राष्ट्रीय नवरात्रौ उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलापुर विभागाच्या वतीने श्री दुर्गामाता दौड २०२२चे आयोजन करण्यात आले असुन या दुर्गामाता दौडमुळे गावाचे वातावरण भक्तिमय झाले आहे .                       दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलापुर विभागाच्या वतीने श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी साडेपाच वाजता सर्व युवक युवती गावातील शनि मंदिरासमोर एकत्र होतात श्री छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याला अभिवादन करुन गावातील प्रत्येक गल्लीतुन ही फेरी जात असते वेगवेगळी पद्य गात जागो हिंदु जागो अशी हाक देत ही दौड जनजागृती करत आहे गावातील महीला देखील या दौडचे भक्तीभावाने स्वागत करत आहे महीला आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढुन ध्वजाचे पुजन करुन तरुणांचा उत्साह वाढवत आहेत देव देश धर्म ही भावना जागृत ठेवुन माता तुळजाभवानी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आशिर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांचे अपूर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी प पू गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतुन तरुण पिढीला व्यसनापासुन दुर करणे समाजात लव्ह जिहादचे प्रमाण वाढत आहे जबरदस्तीने धर्मांतराचे करण्याचे प्रकार वाढत आहे, त्याकरीता जनजागृती करणे हिंदु संघटन करणे नागरीकात आपापसात प्रेमभाव निर्माण करणे हे मुख्य कार्य डोळ्यासमोर ठेवुन श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान बेलापुर विभाग कार्य करत आहे , गावातुन फेरी पुर्ण झाल्यानंतर देविच्या मंदिरात आरती करुन दौडची सांगता होते .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget