श्रीरामपूर प्रतिनिधी-अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहरालगत असलेल्या रांजणखोल (ता. राहाता) येथील गोदामावर छापा टाकून विनापरवाना साठविलेलीसुमारे 6 कोटी 50 लाख रुपये किमतीचीदूध पावडर व व्हे पावडरचा साठा जप्त केला.अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करीत असल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान संबंधिताच्यावतीने हजर झालेल्या अधिकार्यांनी या साठ्याबाबत कोणताही समाधानकारक खुलासा केला नाही, अथवा कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत.सहाय्यक आयुक्त स. पा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन अहमदनगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी सहाय्यक आयुक्त प्रमोद काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार व नमुना सहाय्यक अधिकारी प्रसाद कसबेकर यांनी सदरची कारवाई केली.याठिकाणच्या पावडरचे नमुने प्रयोशाळेत पाठविण्यात आले असून अन्न नमुने अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.

Post a Comment