Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये अल्पवयीन मुलीस पळवून नेवून धर्मांतर करुन निकाह करत अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी मुल्ला कटर व त्याच्या टोळीला पुढे कोणतेही गुन्हे उघडकीस येवू नये म्हणून मदत केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेले श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी  निलंबीत केले आहे.श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मधील अहिल्यादेवीनगर भागात राहणार्‍या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिचे धर्मांतर करत तिच्याबरोबर निकाह करुन सलग तीन वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुल्ला कटरसह आणखी तिघा जणांविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्याप्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्याकडे होता.या प्रकरणाचा तपास करत असताना असेच आणखी काही गुन्हे उघडकीस येत असल्याचे पाहून मुल्ला कटर व त्यांच्या टोळीस पोलीस निरीक्षक संजय सानप हे मदत करत असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. मात्र त्याची दखल श्रीरामपूरात घेण्यात आली नसल्याने फिर्यादी महिलेने याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. त्यांनी याप्रकरणाची शहनिशा केली असता संजय सानप हे दोषी आढळून आले. त्यात त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. याप्रकरणातच दोन दिवसापूर्वी पोलीस नाईक पंकज गोसावी या पोलिसास निलंबित करण्यात आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्दची तक्रार पाहून त्यांना निलंबित केल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

श्रीरामपूर: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील रस्त्यांवर कमालीचे खड्डे पडले आहेत या खड्डेरहित रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते, शिवाय सय्यदबाबा चौकातील रेल्वे भुयारी मार्ग या रस्त्यावर वाहन चालविणे तर सोडाच पादचाऱ्यांना पायी चालणे देखील मोठे मुश्किल झाले होते.अशात या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे छोटे - मोठे अपघात होणे हे नित्याचेच होऊन बसले होते.याबाबत समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनास संबंधित बाबी अनेकवेळा कळवूनही नगर पालिका प्रशासन कुठलीच दखल घेत नव्हते,नगर पालिकेकडे जर सदरील कामांसाठी निधी उपलब्ध नसेल तर समाजवादी पार्टी भिक मांगो आंदोलनाद्वारे श्रीरामपूर न.पा.ला निधी उपलब्ध करुन देईल या अनुषंगाने जोएफ जमादार यांच्या

मार्गदर्शनाखाली समाजवादी पक्षाने भिक मांगो आंदोलन करत जनसामान्यांसोबत आपली नाराजगी दर्शविली होती,या आंदोलनात आसिफ तांबोळी, अय्यूब पठाण,इमरान शेख, रिजवान बागवान, ज़केरिया सैय्यद,अरबाज़ क़ुरैशी,रवी बोरसे, कलीम वेल्डर,अब्दुल सैय्यद, मतीन शेख, राजू शेख, साद पठाण, मुबस्शिर पठाण, गुड्डु जमादार आदींनी आपला सहभाग नोंदवला होता,या आंदोलनाची येथील उप विभागीय (प्रांत) अधिकारी तथा श्रीरामपूर नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष प्रशासक मा.श्री. अनिल पवार साहेब आणि मुख्याधिकारी मा.श्री.गणेश शिंदे साहेब यांनी दखल घेत सदरील सय्यदबाबा चौकातील रेल्वे भुयारी मार्ग रस्त्याची कामे चालु केल्याने शहरातील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवटी उशीरा का होईना मात्र नगर पालिका प्रशासनाने समाजवादी पार्टीच्या आंदोलनाची दखल घेत सदरील कामे चालु केले असल्याने समाजवादी पार्टी तर्फे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाचे अभार व्यक्त करण्यात येत आहे.मात्र सदरील विकास कामांनिमित्त काही दिवस सदरील मार्ग हा रहदारीकरीता बंद राहणार आहे म्हणून तृर्त पर्यायी मार्ग म्हणून वॉर्ड क्र.१ मधील सिद्धार्थनगर (मुस्लिम कब्रस्तान जवळील) ते भारत गॅस कंपनी दरम्यानच्या रेल्वे भुयारी मार्गचा वापर करुन नगर पालिका प्रशासनास सहकार्य करावे असेही श्री.जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

श्रीरामपूर वार्ताहर-श्रीरामपूर येथील रेल्वे भुयारी पुलाजवळ टँकरचा अ‍ॅक्सल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. सदरचे वाहन क्र एम एच 43 यु 2296 असुन यावेळी वाहन चालकाने प्रसंगावधान राखत वाहनावरील ताबा सुव्यवस्थीत ठेवला.यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु दुर्घटना अगदी बोगद्याच्या तोंडाजवळ असल्याने वाहतुकीची प्रचंड अशी कोंडी निर्माण झाली होती. यावेळी महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी तहसील कार्यालय तसेच विविध प्रकारची शासकीय कार्यालय न्यायालय आदी ठिकाणच्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.घटनेची माहिती नागरिकांमधून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यात आली. यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शफिक शेख यांनी घटना स्थळी भेट देत वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक सचिन गायकवाड, सादिक शेख, दत्तात्रेय सातकर, तसेच गृहरक्षक दलाचे महेश थोरात, राहुल जाधव, रेवननाथ पेठे, नारायण चोरमले, हारी कदम, राजेन्द्र देसाई यांनी चोख बंदोबस्त बजावले.यावेळी नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. मळीचे टँकर वाहतुकीसाठी बाहेरच्या मार्गाने घेऊन जाणे आवश्यक आहे. परंतु शहरांमधूनच मळीची वाहतूक होत असल्याने परिसरातील नागरिकांनी याबाबत संबधित विभागाने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. साधारण 2 ते 3 तास वाहतुकीची कोंडी झाली असुन पोलीस प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.


बेलापूर वार्ताहर -सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जि प शाळा आहे ऐनतपुर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या  उत्साहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी निळवंडे धरणाची कार्यकारी अभियंता मा.श्री आदीक निखील बाळासाहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .त्यांनी आपल्या भाषणात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा बहुमोल सल्ला दिला .

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार श्री दिलीप दायमा हे होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची सुंदर भाषणे ,बडबडगीत सादर केली .तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध संस्था तसेच परिसरातील व्यक्तींनी खाऊचे वाटप केले. शालेय गरजू विद्यार्थ्यांना श्रीरामपूर येथील काजल लोंगाणी मॅडम यांनी गणवेश वाटप केले या कार्यक्रमात कुंदन कुताळ,विजय कुताळ,शैलेश अमोलिक,मंगेश नजन,खंडागळे गुरुजी पत्रकार दिलीप दायमा यांनी शुभेच्छापर भाषणे केली.

या प्रसंगी चंद्रकांत नवले पाटील,रविंद्र  कुताळ्,मनोज अमोलिक, दत्तात्रय पटेकर,  श्रीकांत अमोलिक,बाबासाहेब धायकर ,निलेश सोनवणे दत्तात्रय खोसे, नवाब शेख, सागर साळवे, मेघाताई बंगाळ

 निलेशअमोलिक ,नवले व  अमोलीक ताई उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी श्री कल्हापुरे सर यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मुख्याध्यापक श्री कल्हापुरे सर व रावळे सर  यांनी अथक परिश्रम घेतले.

(श्रीरामपुर) : गेल्या आठ वर्षापासून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सय्यद बाबा चौक मित्र मंडळ आपल्या देशाप्रती अस्था व प्रेम व्यक्त करण्यासाठी विविध उपक्रम घेत आहे.

 त्याचाच एक भाग म्हणून या ही वर्षी त्यांनी चौकात अत्यंत आकर्षक सजावट केली होती. राष्ट्रध्वज सेल्फी पॉईंट उभारला होता. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या शर्टला राष्ट्रध्वज चिकटवून मंडळाचे सदस्य शुभेच्छा देत होते . या लक्ष्यवेधी सजावटीचे शहरातील अनेक शासकीय अधिकारी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

 त्यांच्या या उत्तम कार्याबद्दल त्यांना ॲड.समिन बागवान मित्र परिवाराच्या वतीने संविधान उद्देशिकेची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

 यावेळी बोलताना बागवान म्हणाले की,शहरासह तालुक्यात देश प्रेम वाढविण्यासाठी व सामाजिक एकोपा जपण्यासाठी हा सातत्यपूर्ण उपक्रम कौतकास्पद असून इतरांना ही दिशादर्शक ठरेल.

यातून पुढे शहरासाठी विधायक कामे होतील आशावादही त्यांनी व्यक्त केला.

 त्याचप्रमाणे नेवासा रोड येथील व्यापारी व रहिवासी यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त ऍड.समिन बागवान मित्र मंडळातर्फे मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि त्रिभुवन यांनी केले तर आभार प्रवीण जमधडे यांनी मानले.

यावेळी कॉ. जीवन सुरुडे, इरफान बागवान,महेबुब प्यारे,रवि त्रिभुवन,मुदस्सर शेख, रियाज शेख ,अबूजर पठाण, जावेदभाई पठाण,दिलावर बागवान, ॲड.फिरोज शेख,मोसिन पठाण,नाजीश शाह, ॲड.सोनवणे,अन्वर पठाण, मोहसीन प्यारे ,अकबर सय्यद, शोयब शेख, आमिर खान,अल्ताफ शेख,आय पी डेकोरेशन चे इरफान पठाण व इलियास पठाण यांनी केलेल्या उत्कृष्ट सजावटीसाठी त्यांचा ही सत्कार करण्यात आला तसेच याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी-देशाच्या  अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच  औचित्य साधून  समाजातील प्रत्येक घटकाला सारखं महत्व आणि सारखा सन्मान मिळावा यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न - डॉ.वंदनाताई मुरकुटे भारतीय राज्यघटनेत देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार देताना कुठेही स्त्री किंवा पुरुष असा उल्लेख केलेला नाही. आम्ही या देशाचे नागरिक असतानाही आम्हाला समाजात मानाचं स्थान दिलं जात नसताना आमच्या हस्ते ध्वजारोहण करून दिलेला सन्मान अविस्मरणीय असल्याचं  तृतीयपंधी  कार्यकर्ती ,कवियत्री व लेखिका दिशा पिंकी शेख यांनी प्राईड अँकेडमी येथे बोलताना व्यक्त केले.

यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार बरकतअली शेख, तृतीयपंथी आशु शेख, शाळेचे शिक्षक, पालक उपस्थित होते.

अध्यक्षपदावरून बोलताना बरकत अली म्हणाले की,माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक  माऊली मुरकुटे यांनी भगीरथ प्रयत्नाने ज्ञान गंगा ग्रामीण भागात स्थापित केली.

डॉ.मुरकुटे ह्या हाडाची शिक्षिका असून पंचक्रोशी दर्जेदार शिक्षण देण्याचा वसा घेतला आहे.


आपल्या समाजाचाच भाग असलेल्या तृतीयपंथीयांना, आज २१ व्या शतकातही उपेक्षेचे, अवहेलनेचेच जगणे जगावे लागत आहे. जमेची बाब म्हणजे कायद्याने तरी त्यांची बाजू उचलून धरायला सुरुवात केली आहे.


कुणाच्या घरी बाळ जन्माला आलं, कोणी नवीन व्यवसाय सुरू केला किंवा कोणाच्या घरी लग्न वा अन्य मोठा सामाजिक समारंभ असेल, तरच आपल्या समाजाला तृतीयपंथीयांची आठवण येते. पण तृतीयपंथी हे समाजाचाच भाग आहेत, याचा कधीच सखोलपणे विचार केला जात नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. तृतीयपंथीयांना आजही वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. तृतीयपंथीयांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला जात नाही, त्यांचा कुठल्याच स्तरावर स्वीकार केला जात नाही, माणूस म्हणून मनाप्रमाणे जगू दिलं जात नाही. शिक्षणाच्या हक्कापासूनदेखील ते वंचित आहेत, आपली ओळख सांगताना त्यांना केवळ नाव पुरेसं ठरत नाही तर सोबत जात, धर्म, कुटुंब यांचे दाखले जोडावे लागतात. परंतु कुटुंबानेच बेदखल केल्यानंतर पुरावे आणणार कुठून हा प्रश्न समोर उभा राहतो. ज्यामुळे ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होऊ शकत नाहीत. या सर्व परिस्थितीमुळे आजही त्यांच्यासाठी रोजचं जिणं संघर्षमयच आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील तृतीयपंथीयांच्या समस्या आणि संघर्ष वेगळा आहे. त्याचा सखोल अभ्यास होण्याची आणि धोरण बनवताना स्वतंत्रपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. असे मत प्राईडच्या संस्थापिका ,सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी व्यक्त केले. 

याप्रसंगी चिमकुल्या विध्यार्थ्यांनी विविध कलागुण व मनोगते व्यक्त केले.प्राईड स्कुल व कॉलेज प्राचार्या सौ.गोटे यांनी प्रास्ताविक केले.

टाकळीभान प्राईड शाळेचे मुख्याध्यापक प्रा.घोगरे यांनी आभार मानले

🙏

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget