Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव बेलापूरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला बेलापुर गावातील मुख्य ध्वजारोहण हे सर्व धर्मीय संत महंत व पोलीस तसेच जेष्ठ सेवानिवृत्त  शिक्षक यांच्या शुभहस्ते करुन ग्रामपंचायतीने एक वेगळाच आदर्श घालून दिला.  बेलापुर गावाला आदर्शवत घडविणारे सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक लक्ष्मण डोखे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर समाजाला सतत चांगला उपदेश करणारे सतं महंत महेश व्यास महानुभाव मठाचे कृष्णराज लाड बाबा सेंट पिटर चर्चचे पालक चंद्रकांत ओहोळ बेलापुरातील मुख्य जामा मस्जिदचे मौलाना शकील अहमद शेख आदि धर्मगुरुंच्या हस्ते ध्वजपुजन करण्यात आले .सरपंच महेंद्र साळवी यांच्या हस्ते बेलापुर पोलीस स्टेशनचे तर बेलापुर सहकारी सेवा संस्थेचे प्रकाश पा नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले बेलापुर ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या तबसुम बागवान,स्वाती अमोलिक,सौ.शिला पोळ  यांच्या हस्ते तर मराठी मुले व मुलींच्या शाळेचे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाणी व शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष तोफेल सय्यद यांच्या हस्ते संपन्न झाले. उर्दू शाळेचे ध्वजारोहण शाळेचे माजी विद्यार्थी डाँक्टर आजिम शेख,अँड.अयाज सय्यद, आसायी समीर शेख,इंजिनिअर स्वालिया कदिर सय्यद, रूजदा इकबाल शेख,नईम फकीर आतार यांच्या हस्ते करण्यात आले बेलापुर जे टी एस हायस्कूलचे ध्वजारोहण राजेश खटोड यांच्या हस्ते करण्यात आले.रामगड येथील जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेत दिपक निंबाळकर यांच्या हस्ते 

 ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट गावडे व देविदास देसाई यांनी केले.नवनाथ धनवटे यांच्या संदीप ढोल पार्टी ने डोलीबाजा वाद्याचे वादन करून वातावरण निर्मिती केली.साई इंग्लिश मीडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे सादरीकरण केले.ध्वज स्तंभा भोवती केलेली सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.यावेळी फटक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शाळांना खाऊ चे वाटप करण्यात आले.यावेळी विविध मान्यवर,पत्रकार,सर्व संस्थांचे पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,मुख्याध्यापक, शिक्षक, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महसुल विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रँलीचे बेलापूरात जोरदार स्वागत करण्यात आले उपविभागीय अधिकारी अनिल पवार व पोलीस निरीक्षक संजय सानप,गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस,मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर पोस्ट कार्यालय व ग्रामपंचायत बेलापुर बु!!यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय येथे अपघात विमा शिबीर संपन्न झाले                                    डाक विभागाच्या वतीने रुपये३९९मध्ये नागरीकांचा दहा लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला जाणार आहे यात अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख रुपये कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये दवाखाना खर्च रुपये ६० हजार दोन मुलांना शिक्षणाचा खर्च अपघाताने पँरालिसीस झाल्यास१० लाख रुपये भरपाई दिली जाणार आहे वय वर्ष १८ते ६५असणाऱ्या नागरीकासाठी एकच हप्ता आसणार आहे यात सर्व प्रकारचे अपघात सर्पदंश विजेचा शाँक फरशीवरुन घसरुन पडणे आदिंचा समावेश असल्याची माहीती डाक विभागाच्या वतीने देण्यात आली बेलापुर  विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्थेच्या सर्व सभासदांचा विमा विनामूल्य उतरविला जाणार असुन सभासदांनी आधार कार्ड व मोबाईल सोबत आणावा तसेच सर्व सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे अवाहन संस्थेचे चेअरमन सुधीर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले व सर्व संचालकानी केले आहे.  या वेळी डाक विभागाचे जालींदर चव्हाण श्रीमती पुनम ओहोळ राहुल पारधे विलास गायकवाड संदीप वाकडे राजन पवार शिवाजी पोटभरे तसेच मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी सदस्य चंद्रकांत नवले विलास मेहेत्रे सुधाकर खंडागळे प्रफुल्ल डावरे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम मुसा शेख महेश कुऱ्हे  सचिन वाघ राहुल माळवदे मोहसीन सय्यद भाऊसाहेब कुटे मनोज कुटे प्रसाद साळूंके मुस्ताक शेख आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी )-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त व बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त बेलापूरात प्रथमच सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यातून राष्टगीत लावण्यात आले होते                                 हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत सकाळी साडेआठ वाजता गावातील सर्व नागरीकांनी एकाच वेळेस ध्वज उभारले त्यानंतर सकाळी नऊ वाजता बेलापूरातील मुख्य पेठेतील जामा मस्जिद साईबाबा मंदिर, बिरोबा मंदिर श्री चक्रधर स्वामी मठ गावातील शालोम चर्च,ईनामदार मशिद,शिलोह चर्च आदि प्रार्थनास्थळ तसेच सर्व शाळामधील 

स्पिकरवरुन राष्ट्रगीत लावण्यात आले नागरीकांना अवाहन केल्याप्रमाणे सर्व नागरीक घरातून रस्त्यावर येवुन राष्ट्रगीताकरीता उभे राहीले बेलापूरातील आझाद मैदान येथे सर्व नागरीक जमा झाले त्या ठिकाणी सूचना दिल्याप्रमाणे बरोबर नऊ वाजता सर्वत्र राष्ट्रगीत सुरु झाले प्रत्येक  नागरीक राष्ट्रगीताचा मान ठेवुन जागेवरच उभे राहीले राष्ट्र गीतानंतर वंदे मातरम़् भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला बेलापुर जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील मुलींच्या लेझीम पथकाने अनेकांना आचंबित केले त्यानंतर मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले. बचत गटाच्या महिलांनी गावातून तिरंगा फेरी काढली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य,सोसायटी पदाधिकारी व संचालक,विविध राजकीय पक्षांचे नेते व सदस्य,विविध संस्था व पतसंस्था यांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी,विविध मान्यवर, नागरिक आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले.प्रास्ताविक सरपंच महेंद्र साळवी यांनी केले तर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले.

बेलापूर(वार्ताहर)बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने 'हर घर तिरंगा अभियान" अंतर्गत गावातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची गावातून सवाद्य तिरंगा रॅली काढण्यात काढण्यात आली. त्यास हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असुन बेलापूर व परिसरात एकाच वेळेस ध्वजारोहण व सामूदायीक राष्ट्रगीत घेण्यात येणार आहे देशभरात स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत.यात प्रामुख्याने हर घर तिरंगा अभियानाचा समावेश करण्यात आलेला आहे.या आभियान अंतर्गत बेलापुर  ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांची सवाद्य तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते.                                                          जे.टी.एस.हायस्कूलच्या प्रांगणात या फेरीचा शुभारंभ झाला.त्यानंतर  गावातून  तिरंगा फेरी काढण्यात आली.यात जे.टी.एस.कनिष्ठ महाविद्यालय,जे.टी,एस.हायस्कूल,जि. प. मराठी मुले तसेच मुलींची शाळा,उर्दू शाळा,अहिल्यादेवी होळकर उर्दू शाळा आदिं शाळांचे विद्यार्थी हातात तिरंगा ध्वज हाती  घेत सहभागी  झाले होते.यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम,हर घर तिरंगा आदि घोषणांनी वातावरण चैतन्यमय बनले होते.                          सदर प्रसंगी मा.जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे कै ,मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन व विद्यमान सदस्य रविंद्र खटोड जेष्ठ पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ  सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम भाजपाचे प्रफुल्ल डावरे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे प्रकाश कुऱ्हे महेश कुऱ्हे प्रभात कुऱ्हे  आदिसह गावातील विविध मान्यवर,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक आदिंसह शाळांचे मुख्यध्यापक तसेच अध्यापक उपस्थित होते.  शनिवार  दि.१३ रोजी सकाळी साडे आठ वाजता गावातील ग्रामस्थांनी आपआपल्या घरी तिरंगा ध्वजारोहण करावे ,तसेच सकाळी नऊ वाजता सामुदायिक राष्ट्रगीत होईल.यावेळी प्रत्येक नागरिकाने आहे तिथे उभे राहून राष्ट्रगीताचा सन्मान करावा असे अवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

बेलापूरः(प्रतिनिधी  )-येथील जे.टी.एस हायस्कूलच्या सन १९९६-९७ च्या बॕचच्या माजी विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा अभियानासाठी दोनशे तिरंगा ध्वज बेलापुर  ग्रामपंयतीस सूपूर्त केले. बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविले जाणार आहे.सदर अभियनासाठी ग्रमपंचायत मार्फत तिरंगा ध्वज वितरण केले जाणार आहे.या अभियानासाठी सदर माजी विद्यार्थ्यांनी दोनशे तिरंगा ध्वज सरपंच महेन्द्रर साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचेकडे सुपूर्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,सुधाकर खंडागळे ,पञकार देविदास देसाई,दिलिप दायमा,सुहास शेलार तसेच ग्रुपचे सदस्य राधेश्याम अंबिलवादे,कैलास दळे,विजय पोपळघट,योगेश कोठारी,अजीम सय्यद ,अनिल मुंडलिक,मंगेश गवते,शैलेश अमोलिक उपस्थित होते.

श्रीरामपूर प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून हजरत सैलानी बाबा दरबार श्रीरामपूर या ठिकाणी सवाऱ्याचे विसर्जन होत आहे गेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर मोहरम ची मिरवणूक काढण्यात आली श्रीरामपूर शहरातील सर्वधर्मीयांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्रीरामपूर शहरात कित्येक वर्षांपासून ची परंपरा असलेले हजरत सैलानी बाबा दरबार मौलाअली यांची सवारी आठ मोहरम रोजी श्रीरामपूर शहरातील मेन रोड भागातून हजरत सय्यद शाह कादरी बाबा तसेच काजी बाबा व बारा इमान दर्गा या ठिकाणी भेट देऊन पुन्हा छत्रपती शिवाजी रोड

मार्गे हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी मिरवणूक काढली जाते. श्रीरामपूर शहरातील अनेक भागांमध्ये सावरींची  स्थापना केली जाते श्रीरामपूर शहरात वर्षानुवर्षांपासून सवारी मिरवणूक व इराणीं धर्मीयांचा मातम हे लोकांचं आकर्षण ठरत आहे शहरातील हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांच्या दर्गेजवळ भावीक मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी व पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात यावेळी पोलिसांचे बंदोबस्त लावण्यात आले होते 

श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी सावरींची स्थापना केली जाते त्यामध्ये हुसेन नगर हेही प्रसिद्ध आहे तसेच डावखर रोड येथील तृतीयपंथी इमामे कासीम यांची सवारी ही आकर्षण ठरली जाते यामध्ये मिलत नगर,ईदगाह परिसर, सूतगिरणी फाटा, गोंदवणी रोड,बेलापूर रोड वार्ड क्रमांक ७, बेलापूर, अशोक नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सवारी चे स्थापना केली जाते हे सर्व सवारी मोहरम १०ला शहरातून मुख्य मार्गावरून  विसर्जन मिरवणूक होतात परंपरेप्रमाणे याही वर्षी सावरींची मिरवणूक शहरातून व परिसरातून करण्यात आली,


बेलापूर याठिकाणी मुख्य बाजार पेठेतून सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यामध्ये भक्ती भावाने सर्व धर्मीयांनी दर्शनासाठी गर्दी केली होती व काही ठिकाणी प्रसाद शरबत याचंही वाटप करण्यात आलं या सर्व सवाऱ्या हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी येऊन विसर्जन होतात तर काही आपापल्या ठिकाणी विसर्जन केले जाते गेल्या दोन वर्षानंतर आज श्रीरामपूरकरांना याचा लाभ मिळाला यावेळी हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणची सवारी शहरवासीयांना आकर्षण ठरले हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था श्रीरामपूर यांच्यावतीने दिनांक ११ ऑगस्ट रोजी खिचडा महाप्रसादाचा आयोजनही करण्यात आलेला आहे याकरता सर्व शहरवासीयांना  हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आमंत्रण देण्यात आलेले आहे. या सर्व मोहरम मिरवणुका शहर भर आंनदात आणि जल्लोषात पार पाडण्यासाठी शान-ए-करबला कमेटीचे पदाधिकारी असलम बिनसाद,तमन्ना सुरय्या नायक,कलीम बिनसाद,ऍडव्हकेट अजित डोखे,अजीज अहेमद शेख(बेलापूर )तसेच पोलीस प्रशासन यांनी अधिक परिश्रम घेतले सर्व कार्यक्रम शहर वासियांच्या सहकार्याने वेवस्थित पार पडल्याणे सर्वांना यश मिळाले. 

नाशिक प्रतिनिधी-महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वरिष्ठ गटाच्या 49 व्या महाराष्ट्र राज्य ज्यूदो अजिंक्यपद स्पर्धेला  मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.या स्पर्धेचे उद्घाटन यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यांतून 252 खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदकप्राप्त खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई करणारे खेळाडू अजिंक्य वैद्य, श्रद्धा चोपडे, अपूर्वा पाटील, समीक्षा शेलार, आदित्य धोपवकर, प्रदीप गायकवाड, शुभांगी राऊत यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर विविध वजनी गटाच्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धांना सुरुवात झाली.यामध्ये महिलांच्या 63 किलो वजनी गटात पुण्याच्या गौतमी कांचनने अंतिम लढतीत कोल्हापूरच्या रुध्वी श्रुंगारपुरेचा पराभव करून विजेतेपद मिळवले, तर भूमी कोरडे (मुंबई) आणि तन्वी पवार (सिंधुदुर्ग) यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला. पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात नागपूरच्या साईप्रसाद काळेने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात यवतमाळच्या अभिषेक दुधेचा पराभव करून या गटाचे विजेतेपद आपल्या नावे केले. तर मुंबईच्या राहुल बोभडी आणि ठाण्याच्या आदर्श शेट्टीला संयुक्त तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड केली जाणार असून 16 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान लखनौ येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धेचे संचालक म्हणून ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पंच शैलेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जिल्ह्यांतील 20 पंच कार्यरत आहेत. तर आंतरराष्ट्रीय पंच स्मिता शेट्टी, शिल्पा शेरिगर या मॅटप्रमुख म्हणून काम बघत आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा आयोजन समितीचे योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, स्वाती कणसे, सुहास मैंद, माधव भट आदी प्रयत्नशील आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget