Latest Post

श्रीरामपूर : शहरातील वार्ड नंबर २ परिसरात राहत असलेल्या. एका अल्पवयीन दलित मुलीचे ३ वर्षांपूर्वी शाळेत जातांना अपहरण करून. तिला धर्मांतरासाठी अल्पवयीन मुलीच्या इच्छे विरोधात शारिरीक मानसिक छळ करून, बळजबरीने तिच्याशी निकाह केला. यासंदर्भात १९ जुलै रोजी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या, इरफान कुरेशी उर्फ मुल्ला याच्या विरुद्ध. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरातील अहिल्यादेवी नगर परिसरात मुल्ला व त्याच्या गुन्हेगारी टोळीची प्रचंड दहशत असून. सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर, पीडित अल्पवयीन मुलगी त्याच परिसरात राहत असल्याने. दाखल गुन्ह्यातील तडजोडसाठी, पीडित कुटुंबावर दाबाव आणण्याचा प्रयत्न मुल्ला टोळीकडून केला जात असल्याने. त्या मुलीला त्वरीत,अहिल्यादेवीनगर परिसरातून काढून बालसुधार गृहात पाठविण्यात यावे,पीडीत मुलीचे बळजबरीने धर्मांतरण करून. तिचे मुल्लापाजीशी लग्न लावणा-या मोलानाला दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे. पीडीत अल्पवयीन  मुलगी गरोदर असून, तीची डिलेव्हरी पुर्व डि.एन.ए. चाचणी करण्यात यावी. या गुन्ह्यात मुल्लाला मदत करणा-या त्याच्या टोळीतील गुन्हेगार सदस्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे. या गुन्हेगारांचा कायम स्वरूपी बंदोबस्त होण्यासाठी, मुल्ला व त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. या करिता हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने, शहर पोलीस ठाण्यात शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून निवेदन दिले. सदरचे आंदोलन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते,मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,,विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर दिलीप शिरसाठ, शशिकांत कडूसकर, शिवप्रतिष्ठानचे किसन ताकटे,श्रीराम सेवा संघाचे कुणाल करंडे ,अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीचे प्रवीण फरगडे,देविदास चव्हाण,संजय यादव सोमनाथ कदम , विजय लांडे, सिद्धार्थ साळवे,महेश विश्वकर्मा आदींसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

बेलापुर  (प्रतिनिधी) - लाभार्थी रेशनकार्ड धारकांना लाभाबरोबरच कामाची गुणवत्ता देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली आयएसओ मानांकनासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यातून आपल्या कामाच्या गुणवत्तेत सुधार होवून लाभार्थींना ही याचा लाभ होणार आहे. शासनाच्या प्राधान्य सुची कार्यक्रमवरील हा एक प्रमुख कार्यक्रम असल्याने लवकरच सर्व स्वस्त धान्य दुकानरांकडून होत असलेल्या सहकार्यातून जिल्ह्याची सार्वजनीक वितरण व्यावस्था आयएसओ मानांकनास पात्र ठरणार असल्याचा विश्वास जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी व्यक्त केला.

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृह येथे जिल्ह्यातील नायब तहसीलदार पुरवठा निरीक्षक गोदामपाल धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी तालुकाध्यक्ष यांची आयएसओ मानांकन बाबतच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजीत वांढेकर, राजेंद्र राऊत, दत्तात्रय भावले, दिपाली तांबे  व कार्यालयीन सहकारी मनिषा सचदेव आदि व्यासपिठावर उपस्थीत होते. 

सार्वजनिक वितरण प्रणालीस आयएसओ मानांकनाचे काम तीन स्तरावर होत आहे, तालुकास्तरीय पुरवठा विभाग, तालुकास्तरीय गोदाम व स्वस्त धान्य दुकान अशा तीन स्तरावर काम सुरू आहे. दुकानाची इमारत पक्के बांधकाम असणे आवश्यक आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सारखेपणा व आकर्षकपणा यावा या करीता जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना एकच रंग असणार आहे, सर्वत्र एक सारख्या रंगाचे व आकाराचे फलक,तसेच  सर्व धान्य दुकानदारांना ड्रेस कोड, तसेच ओळखपत्र असणार आहे, अद्यावत नोंद वह्या व विविध प्रकारचे रजीष्टर, पारदर्शक नमुना बरणी, परीसर व दुुकानातील स्वच्छता, वृक्षलागवड किंवा कुंड्यातील झाडे लावून परीसर सुशोभिकरण, लाभार्थींसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, उंदीर व घुशींसाठी पिंजरा किंवा इतर साधन व पेस्ट कंट्रोल करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आग प्रतिबंधक यंत्र, स्मोक प्रतिबंधक यंत्र आदि सुविधा उपलब्ध करायच्या आहेत.

या आयएसओ मानांकरनाकरीता तालुकास्तरावर महसुल नायब तहसिलदार यांचे मार्गदर्शनाखाली अव्वल कारकुन काम करणार आहे त्यासाठी तालुकास्तरावर धान्य दुकानदारांतून मंडल निहाय समन्वयक नेमुन कामाच्या प्रगतीचा अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करण्याबरोबरच कामाची पुर्तता करून घ्यायची आहेे. यासाठी दुकानदारांनी अज आपल्या दुकानच्या अवस्थेचा फोटो काढून ठेवायचा आहे व सुचनेनुसार केलेल्या बदलाचा फोटो काढायचा आहे.  

या बरोबरच लाभार्थींना डीजीटल सेवा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यासाठी रोखीच्या व्यावहाराऐवजी स्कॅनर व स्वायप मशीनची सुविधा उपलब्ध करायची आहे. विविध प्रकारचे फलक लावताना त्यावर शिल्लकसाठी, प्रमाण, दर, पात्रलाभार्थींची संख्या, दक्षता कमीटीसदस्यांच्या नावाचा फलक, लाचलुुचपत कार्यालयाचा संपर्क क्रमांक, तपासणी अधिकारी यांचे नाव संपर्क क्रमांक, आरोग्य तपासणी प्रमाणपत्र, अन्न व औषध परवाना वजनमापांचे प्रमाणपत्र, शॉपअ‍ॅक्ट प्रमाणपत्र आदिं अद्यावत करावयाचे आहेत.शेवटच्या टप्प्यात सि सि टी व्ही स्मोक डिटेक्टर अग्निशामक यंत्रणा ही कामे करावयाची आहेत

जिल्ह्यातील 1884 दुकानात एक सारखे पण येण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकांनाना एकच रंग असावा, एक सारखे फलक, एकाच साईजचे व एकाच रंगाचे फलक व एक सारखा ड्रेसकोड यात एक सारखेपणा असल्यास राज्यात आपल्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होईल अशी सुचना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली. त्यास जिल्ह्यातील सर्व दुकानदार प्रतिनिधींनी दुजोरा दिला. 

या बैठकीस स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा उपाध्यक्ष बजरंग दरंदले, चंद्रकांत झुरंगे, सुरेश उभेदळ, शिवाजीराव मोहीते, कैलास बोरावके, बाबा कराड, सुखदेव खताळ, प्रकाश भोसले, बाळासाहेब दिघे, विश्वासराव जाधव, सतिष हिरडे, गोवर्धन वाघस्कर, आत्माराम कुंडकर, श्रीकांत म्हस्के, गुलाबराव पवार, राजेंद्र शेळके, श्री.आरगडे आदिंसह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थीत होते. 

या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील बहुतांशी दुकानांना जुन महिण्यात उशीरानेे मोफतचे धान्य उपलब्ध झाले परंतू दि.2जुलैपासून ते धान्य पॉझ मशीनवर दिसत नसल्याने सर्वच दुकानात धान्यसाठा दुकानात पडून आहे, कार्डधारक दुकानात चकरा मारत आहेत, जिल्ह्यातील वितरण बंद आहे. काही दुकानात काही टक्केवारीत वितरण झाले परंतू उर्वरीत वितरण थांबल्याने त्यास मुदतवाढ मिळण्याची आवश्यकता असल्याची मागणी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी केली.

आपली मागणी रास्त आहे परंतू पहील्या व दुसर्‍या टप्प्यातील धान्य वाहतुकीत विस्कळीतपणा आल्यामुळे या अडचणी येत आहेत. आम्ही मुदत वाढीची मागणी केली आहे परंतू या वितरणास मुदतवाढ येण्याची शक्यता कमी असल्याने दुकानदारांनी आपल्या दुकानात जो धान्यसाठा शिल्लक आहे त्यातून  वितरण सुरु करावे, मागील वितरणास मुदत वाढ आल्यानंतर ते ही वितरण करता येईल परंतू सध्या आहे ते वितरण सुरू करा, दुकाने बंद ठेवू नका अशी सुचना यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- मा .जि प सदस्य शरद नवले यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद निधीतुन  खडीकरण केलेल्या दिघी रोड रस्त्याचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .                                   बेलापुर बुा येथील दिघी रस्स्त्याच्या कामाबाबत परिसरातील नागरीकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीची दखल घेवुन मा.जि प सदस्य शरद नवले यांनी या रस्त्याच्या खडीकरणासाठी तीन लाख रुपयांचा निधी मंजुर करुन त्या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पुर्ण केले आज त्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्या वेळी माजी जि प सदस्य माजी  जिल्हा नियोजन समीती सदस्य  शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक पा. खंडागळे, अशोक कारखान्याचे माजी व्हा चेअरमन जालींदर कुऱ्हे,  ग्रा.प सदस्य मुश्ताक शेख,रमेश आमोलिक,वैभव कुर्‍हे,एम पी सोसा संचालक प्रभाकर कुर्‍हे,प्रकाश मेहेत्रे ,दत्तात्रय सोनवणे ,वृध्देश्वर कुर्‍हे ,अर्जुन कुर्‍हे,   मच्छिंद्र कुर्‍हे,शांतवन आमोलिक ,नामदेव मेहेत्रे ,सोहम लगे ,बाळासाहेब कुर्‍हे ,  विशाल पवार, अन्तोन आमोलिक, शाम सोनवणे ,अनिल कुर्‍हे ,

आहेर पाव्हणे ,मनोज मेहेत्रे  ,मल्हारी कुर्‍हे,  गणेश कुर्‍हे ,शुभम कुर्‍हे ,साहिल कुर्‍हे ,आदिसह  परिसरातील नागरीक उपस्थित होते.

श्रीरामपूर प्रतिनिधी-आज दि. १५/७/२०२२ रोजी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहिती नुसार विभागाने गणेशनगर व नांदूर शिवार ता. राहाता जि.अहमदनगर येथे संयुक्त मोहीम राबवून हातभट्टी गावठी दारू बनवण्याची चार अड्डे उद्धवस्त कारवाईत एकूण ०४ गुन्हे नोंदविण्यात आले असून हातभट्टी तयार करण्याचे ६२५५ लिटर कच्चे रसायन नाश केले तयार हातभट्टी गावठी दारू ९० लिटर व इतर भट्टीचे साहित्त्य असा एकूण १,६५,५००/- किंमतीचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे. सदर कारवाई मध्ये अज्ञात इसमां विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात आली आहे.

सदरील कारवाई श्री गणेश पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर,यांचे मार्गदर्शनाखाली श्री गोपाल चांदेकर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र २ श्रीरामपूर,व श्री. संजय कोल्हे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कोपरगाव विभाग यांनी केली. सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक श्री. व्ही. एम. आभाळे, श्री. धवल गोलेकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री.के.के.शेख, श्री. दिगंबर ठुबे महिला जवान श्रीमती. स्वाती फटांगरे, श्रीमती. वर्षा जाधव वाहन चालक श्री.एन.एम. शेख दफेदार श्री. विजु पाटोळे इत्यादी सहभागी झाले होते .

बेलापूर प्रतिनिधी- आपले कोण परके कोण यात तफावत न करता प्रामाणिक पणे न्यायाची बाजू मांडणाऱ्या महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघ गेल्या तीस वर्षापासून कार्य करीत असून पत्रकार संघाचे अध्यक्ष बरकत अली यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रभर पत्रकार संघाचा विस्तार झाला असून जनतेत पत्रकार संघाची चांगली छबी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन बेलापूर येथील जि. प. सदस्य शरद राव नवले पाटील यांनी केले

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या बेलापूर शाखेचे वर्धापन दिन व कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दिनांक 14/7/2022 रोजी दुपारी तीन वाजता बेलापूर येथील नगर रोड लगत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य शरद राव नवले पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली पत्रकार संघाचे प्रदेश सचिव अभयजी बाफना, बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहसिन सय्यद, पत्रकार दायमा, पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, युवा प्रदेश कार्याध्यक्ष संदीप पवार, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख, उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष कासम भाई शेख, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष राव गायकवाड, चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, सिन्नर तालुका अध्यक्ष मधुकर मुठाळ, राहता तालुका अध्यक्ष विजय खरात, राहता तालुका सचिव राहुल कोळगे, पाटोदा कार्याध्यक्ष दादा भाऊ मोरे, पाटोदा उपाध्यक्ष मुजम्मिल शेख, पुणतांबा शहराध्यक्ष मयूर मलठणकर, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार कासम शेख यांनी केले यावेळी बेलापूर शाखा कार्यालयाची फित कापून शरद नवले पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा पुष्पहार देऊन बेलापूर शाखा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला 


आपल्या अध्यक्षीय भाषणात शरद  नवले पाटील पुढे म्हणाले की एक वर्षापूर्वी बेलापूर गावात पत्रकार संघाची स्थापना करण्यात आलि असून येथील नवोदित पत्रकारांच्या खांद्यावर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यानुसार या शाखेच्या पत्रकारांनी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करून पत्रकार संघाचे नावलौकिक वाढविले आहे त्यांनी गावातील बातम्यांचा पाठपुरावा करूनच बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत याच बरोबर कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्या गावातील नेते, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे, पोलिस प्रशासनाच्या उत्कृष्ट कार्यप्रणाली बद्दल येथील अधिकारी व पोलिसांचा सत्कार केला, दिवाळीच्या काळात जाती एकता दृढ होण्याच्या उद्देशाने राम गड येथे फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अशा विविध क्षेत्रामध्ये पत्रकारांनी उत्कृष्ट असे काम केले आहे त्यांच्या कामाचे व विशेष म्हणजे पत्रकार संघाचे आपण जि. प. सदस्य या नात्याने कौतुक करीत आहोत असे ते म्हणाले


आपल्या प्रमुख भाषणात पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली म्हणाले की आपण गेल्या तीस वर्षापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून नवोदित पत्रकार घडविण्याचे व त्यांना पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्याचे कार्य केले असून याच उद्देशाने बेलापूर येथील पत्रकारांना पत्रकार संघ बरोबर काम करण्याची संधी प्राप्त करून दिली ती उपयोगी ठरली असून आज या ठिकाणी बेलापूर शाखेचे वर्धापन दिन व शाखा कार्यालयाचे उद्घाटन करताना आपल्याला स्वाभिमान वाटत आहे पत्रकारांनी कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्याअगोदर बातमीची सत्यता पडताळून पहावी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकारावर येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम पत्रकार संघाने आजवर केले आहे यापुढेही करणार आहे त्यामुळे पत्रकारांनी निर्भीडपणे व प्रामाणिकपणे काम करीत राहावे असे शेख यांनी सांगितले पत्रकार संघाचा तीस वर्षाचा प्रवास पूर्ण झाला असल्याने येत्या ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आपण पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले


यावेळी अभयजी बाफना, सुखदेव केदारे, मधुकर मुठाळ, गुलाब भाई शेख, एजाज सय्यद, मुसा भाई सय्यद, सुभाष राव गायकवाड आदींनी शुभेच्छा पर भाषणे केली कार्यक्रमास  राहुरी येथील पत्रकार गणेश पवार, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, सार्थक साळुंके, इमरान शेख, अकबर भाई शेख यांच्यासमवेत इतर पत्रकार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार एजाज सय्यद यांनी मानले

बेलापुर (प्रतिनिधी ) - वडीलांचे अंत्यसंस्कार मुलानेच करण्याची परंपरा समाजात प्रचलीत आहे मुलगा नसेल तर पुतण्या सर्व विधी करतो परंतु श्रीरामपुरात एका मुलीने सर्व रुढी परंपराचे जोखड बाजुला सारुन आपल्या वडीलाच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडले                  याबाबतचे वृत्त असे की, श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावालगत असलेल्या नेहरूवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुभाष साळूंके हे गेल्या काही वर्षापासून श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.7 मधील रामचंद्रनगर येथे राहतात. त्यांना एक मुलगी आहे. , तीने उच्च शिक्षण घेतले तसे उच्च विचारही अंगीकारले तिचे वडील सुभाष साळूंके यांचे अचानक निधन झाले त्यांना एकच अपत्य ते ही मुलगी असल्यामुळे सर्व विधी कोण करणार? हा प्रश्न उभा राहीला अन वडीलांच्या अचानक जाण्याचे अपरिमीत दुःख असतानाही तिने सर्व विधी करण्याचा धाडसी निर्णय घेतला  माझ्या पित्याचे अग्निदहन , शिकाळी मीच धरणार, पाणी मीच पाजणार सर्व विधी मलाच करु द्या मीच त्यांची मुलगी अन मीच त्यांचा मुलगा असे सर्वांना सांगितले अन सर्व विधी स्वतःच केले आजही समाजात  मुलगा व मुलगी असा भेदभाव केला जातो अशा लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न रुपाली हीने केला

शिर्डी ( प्रतिनिधी)सर्वच न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे न्यायदानास विलंब होत आहे.अशा परिस्थितीत, लोक न्यायालयामध्ये वादपूर्व , प्रलंबित खटले निकाली काढणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळेनागरिकांचा वेळ, पैसा, श्रम या तिन्ही बाबींची बचत होत असते. न्यायालयीन खटला लढवण्यासाठी लागणारा पैसाव श्रम या दोघांचाही वापर विधायक कार्यासाठी करण्याची संधी पक्षकारांना मिळते. म्हणूनचजिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हा न्यायालयातील दोन्हीवकील संघाच्या सहकार्याने आणि अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मागील तीन लोक अदालतमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.त्यामुळे, अहमदनगर या ठिकाणी झालेल्या लोक अदालतीपैकी मागीलतीन लोक अदालत ह्या संस्मरणीयठरलेल्या आहेत. या यशाचे शिल्पकारहे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर व्ही.यार्लगड्डाहे असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, विधीज्ञ ,पक्षकार व कर्मचाऱ्यांचे ह्या यशामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा न्यायालय अहमदनगर व सर्व तालुका न्यायालयामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोक अदालतीमध्ये तडजोड योग्य प्रकरणे, अर्थात चोरीची प्रकरणे, किरकोळ मारहाणीची प्रकरणे, बँकेची व वित्तीयसंस्थेशी संलग्न प्रकरणे, धनादेशाचीम्हणजे चेकची प्रकरणे, यांचा समावेशहोतो. महानगरपालिका, नगरपंचायत ग्रामपंचायत यांच्याकडील मालमत्ता कर,पाणीपट्टी, घरपट्टी आणि महावितरण यांचे कडील प्रलंबित विज देयके, अशा स्वरूपाची प्रकरणे, लोक अदालतमध्ये तडजोडीने निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे.. बँकेकडील व पतसंस्थेकडील प्रकरणांमध्ये व्याजदरात सूट अथवा व्याजदरात माफी मिळून काही प्रमाणात फायदा होतो. पर्यायाने प्रलंबित व वाद पूर्व खटल्यांची संख्याकमी होऊन न्यायव्यवस्थेवरील ताण कमी होतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून दिनांक १३ ऑगस्ट २२रोजी होणाऱ्या लोक अदालत मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून फायदा

घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या नवनियुक्त सचिव

भाग्यश्री पाटील यांनी केलेले आहे.चौकशीसाठी जिल्हा विधी सेवाप्राधिकरण या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget