Latest Post

शेवगाव प्रतिनिधी-जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने कोयत्याने वार करत दुसर्‍या गटातील चौघांना गंभीर जखमी केले. तर या घटनेतील आरोपीला पोलीस पकडून घेऊन जात असताना पहिल्या गटातील एकाने हल्ला करत कोयत्याचा वार केल्याने पोलीस कर्मचार्‍याचे बोट तुटल्याची घटना कोळगाव (ता. शेवगाव) येथे घडली. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे गावामध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे.हा प्रकार रविवार (दि.3) रात्री उशीरा घडली. याप्रकरणी अण्णा तुकाराम खंडागळे (वय 55, रा. कोळगाव) याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसाचे बोट छाटून जखमी केल्याप्रकरणी अर्जुन विठ्ठल खंडागळे (वय 48) व ज्ञानेश्वर रामा खंडागळे (वय 20) दोघेही रा. कोळगाव यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जबर जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी हवालदार संदीप उबाळे यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला तर इतरांना नगर येथे हलविण्यात आले आहे.याबाबत लक्ष्मी थोरात यांच्या फिर्यादीत म्हटले आहे, जुन्या भांडणाच्या कारणावरून अण्णा खंडागळे याने वडील भगवान खंडागळे, आई पार्वती खंडागळे यांना तसेच नातेवाईक सुनील हिवाळे, मारिया हिवाळे व फिर्यादीस शिवीगाळ करून हातात कोयता घेऊन येऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून चौघांना गंभीर जखमी केले. या अगोदरही अण्णा खंडागळे याने अनेकवेळा आई वडिलांना मारहाण करून दहशत असल्याचे म्हटले आहे. थोरात यांच्या फिर्यादीवरून अण्णा खंडागळे याच्या विरुध्द खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत. जखमींना उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर हवालदार परशुराम नाकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कोळगाव येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली. त्यांनी त्वरीत सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. मी व सहकारी संदिप उबाळे दोघे जण आरोपी अण्णा खंडागळे यास पकडून गाडीकडे घेवून जात होतो. त्याच वेळेस अर्जुन विठ्ठल खंडागळे याने त्याला सोडा मी त्याला जीवे ठार मारणार आहे, असे म्हणत कोयत्याने केलेला. हा वार हवालदार उबाळे यांच्या हाताच्या बोटावर झाला. यामध्ये त्यांचे एक बोट तुटले असून ते गंभीर जखमी झाले.पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आरोपी अर्जुन खंडागळे, ज्ञानेश्वर खंडागळे (वय-20) व अण्णा खंडागळे यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. नाकाडे यांच्या फिर्यादीवरुन अर्जुन खंडागळे व ज्ञानेश्वर खंडागळे यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जबर जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके हे करीत आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी-गाडीचा कट मारल्याच्या कारणावरून चौघा तरूणांवर धारदार चॉपरने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. शहरातील म्हाडा कॉलनी येथे रात्री 9.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेत जखमी झालेल्या अली जाकीर पठाण (वय 17, धंदा कार डेंटींग-पेन्टींग, रा. संजयनगर, वार्ड. नं. 2, श्रीरामपूर) या तरुणाने शहर पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, मी व मित्र अदनान शेख व जावेद शाह असे एका गाडीवरून कामावरून घराकडे जात असताना म्हाडा कॉलनी येथे सुरज यादव याने गाडीला कट मारला तेव्हा मी म्हणालो की, गाडी दिसत नाही का? याचा राग आल्याने त्याने मला व मित्रांना शिवीगाळ करत आरोपींनी धारदार चॉपरने वार केले.डोक्यावरचा वार हुकवला तेव्हा डाव्या खांद्याला वार लागला. जावेद शाह, अदनान शेख यांनाही चॉपरने वार करून जखमी केले. यावेळी इतरांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी रॉड, बेल्टने मारहाण केली. यावेळी लोक जमले असता आरोपींनी चॉपरने पाठीवर वार करत तन्वीर शेख यालाही मारहाण केली व दुचाकी गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले.या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत सुरज यादव, गणेश गिते, सुजीत काळे, सनी काळे, शुभम यादव व इतर 8 जणांविरूद्ध भादंवि कलम 307, 143, 147, 148, 149, 324, 504, 506, 427, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम 7 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक़ विठ्ठल पाटील हे इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस उपअधीक्षक़ संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली.

नगर प्रतिनिधी-अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दि.०४/०७/२०२२ रोजी यशस्वी झाला आहे.भूसंपादन कार्यालयातील मंगेश ढुमणे (लोकसेवक) या कर्मचाऱ्याला चार हजारांची  लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.तक्रारदाराने आईच्या नावे घेतलेल्या जमिनीच्या अकृषिक परवानगी करता ना हरकत प्रमाणपत्रासाठी भुसंपादन विभागात प्रकरण दाखल केले होते.सदरचे ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर आरोपी लोकसेवक मंगेश ढुमणे याने तीन हजारांची मागणी केली होती याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.दि.१/०७/२०२२ रोजी केलेल्या लाच मागणीच्या पडताळणी दरम्यान आरोपी  ढुमणे याने पंचासमक्ष दोन्ही कामांचे एकत्रित चार हजार मागितले होते.सोमवार दि.०४/०७/२०२२ रोजी चार हजार रुपये घेताना आरोपी ढुमणेला रंगेहात पकडण्यात आले.सदरची कारवाई लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर,पोलिस निरीक्षक श्री.शरद गोर्डे,गहिनीनाथ गमे,पोना/रमेश चौधरी,विजय गंगुल,पोलिस अंमलदार/ रविंद्र निमसे,मपोना/राधा खेमनर,संध्या म्हस्के,चालक पोलिस हवालदार/हरून शेख,राहुल डोळसे यांनी केली

श्रीरामपूर प्रतिनिधी-शहरातील सरस्वती कॉलनी परिसरात एका मालवाहू टेम्पोत 42 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सचिन विश्वास सराफ (वय 42) असे या तरुणाचे नाव आहे. शहरातील वार्ड नं. 7 मधील दळवीवस्ती परिसरात मालवाहू टेम्पोच्या केबीनमध्ये सचिन मृतावस्थेत आढळून आला.नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी साखर कामगार रूग्णालयात नेले असता उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक़ संजय सानप, पोलीस नाईक अडांगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन सराफ यानचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोलीस नाईक अडांगळे अधिक तपास करीत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली असा परिवार आहे.

अहमदनगर प्रतिनिधी - प्रस्तुत बातमीची हकीकत अशि की दि.०१/०७/२०२२ रोजी स्थानीक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे चैन स्नैकिंग गुन्हयातील आरोपीकडे तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे दोन इसम हस्तीदंत विक्री करणेसाठी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांनी सदर माहिती श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक आमदनगर यांना कळवली.मा.श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक श्री. अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले. नमूद आदेशान्वये पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश इंगळे,पोसई/सोपान गोरे,सफौ/राजेंद्र वाघ,पोहेकाॅ/बापूसाहेब फोलाणे,देवेंद्र शेलार,पोना/ भीमराज खर्से,सुरेश माळी,पोना/शंकर चौधरी,रवि सोनटक्के,पोकॉ/सागर ससाणे व मच्छिंद्र बर्डे लागलीच असे पथक तयार करून कारवाई करणे बाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले.सदर सूचनाप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे खाजगी वाहनाने नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे वेशांतर करून सापळा लावून थांबले असताना थोड्याच वेळात दोन इसम टोल नाका परिसरात संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यापैकी एकाच्या पाठीवर मिल्ट्री रंगाची सॅक होती.सॅक मधून काहीतरी भाग वर आलेला व त्यास रुमाल बांधलेला होता थोडा वेळ थांबल्यानंतर संशयित इसमा जवळ एक ग्रे रंगाची आय-२० कार येऊन थांबली व कार मधून चार इसम खाली उतरले संशयित दोन्ही इसम कार मधून आलेल्या इसमांना सॅक मधून एक मोठा हस्तिदंत सारखी वस्तू दाखवून बोलत असताना हस्तिदंत विक्री करण्यासाठी आलेले इसम हेच आहेत अशी पोलीस पथकाची खात्री झाल्याने त्यांनी संशयित इसमांवर झडप घालून शिताफीने ताब्यात घेतले.त्यांची अंग झडती घेतली असता त्यांचे ताब्यात हस्थिदंत सारखी वस्तू मिळून आली.संशयित इसमांना त्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी हस्तिदंत खरे असून ते विक्री करण्यासाठी आलो अशी कबुली दिल्याने त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) व्यंकटेश दुराईस्वामी वय ४० वर्ष रा.हल्ली, वाकडी फाटा दरेवाडी तालुका जिल्हा अहमदनगर २) महेश बाळासाहेब काटे वय ३० रा. आखेगाव तालुका शेवगाव असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे हस्तिदंत बाबत विचारपूस करता त्यांनी शेवगाव येथील महेश मरकड व त्याचे इतर साथीदारांना काळया बाजारात हस्थिदंत विक्री करण्यासाठी आलो असे सांगितले.हस्थिदंत कुठून आणले आहेत याबाबत तपास चालू आहे.सदर आय-२० कार मधून आलेल्या व ताब्यात घेतलेले इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) महेश भगवान मरकड वय २६ वर्ष रा. गहिलेवस्ती शेवगाव २) सचिन रमेश पन्हाळे वय ३३ वर्ष राहणार आखेगाव तालुका शेवगाव ३) निशांत उमेश पन्हाळे वय २५ वर्ष रा. भगतसिंग चौक शेवगाव ४) संकेत परशुराम नजन वय २३ वर्ष रा.पवार वस्ती शेवगाव असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी व्यंकटेश दुराईस्वामी व महेश काटे यांच्याकडून हस्तिदंत खरेदी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले, उपवन संरक्षण अधिकारी अहमदनगर यांनी हस्तीदंत हे प्राथमिक तपासणीमध्ये अस्सल खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे.बहुमूल्य शोभेच्या वस्तू व औषधी आदि करिता हस्तिदंतांचा वापर होत असल्याने हत्तीचे दातांना आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे मात्र दातांची किंमत जाहीर केल्यास हस्तीचे दातांच्या तस्करीसाठी हत्तीची हत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे वनविभागाने या दातांची किंमत जाहीर करण्यात बंदी घातलेली आहे.सदरील घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सदर इसमाविरुद्ध भादविक ४२९ सह वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २(१६),९,३९,४४,(ब),५० व ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर

श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक,श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

कोपरगाव प्रतिनिधी-दारू विक्री चालू ठेवण्यासाठी 55 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोड अंती 35 हजारांची लाच स्विकारताना, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक नंदू चिंधू परते व सहा दुय्यम निरिक्षक राजेंद्र भास्कर कदम या दोन अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडले आहे.मंगळवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईने लाचखोर अधिकार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.तक्रारदार यांचा दारू विक्री व्यवसाय असून दारू वाहतूक व विक्री चालू ठेवण्यासाठी दिनाक 27 जून रोजी आरोपी राजेंद्र भास्कर कदम यानी मागील 11 महिन्यांचे बाकी हप्त्याचे 55 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले तसेच आरोपी नंदू चिंधु परते यांनी त्यांच्यासाठी दरमहा 5 हजार रुपये लाचेची मागणी करून दिनांक 29 जुन रोजी आरोपी राजेंद्र भास्कर कदम याने 35 हजार रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्यासमक्ष स्विकारतांना पकडण्यात आले.ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरिक्षक संदीप साळुंखे, पो.ना. डोंगरे, पो.ना. इंगळे, पो. ना नितीन कराड, चालक विनोद पवार यांच्या पथकाने केली.

श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील आरटीओ कार्यालयात काल सायंकाळच्या दरम्यान एका एजंटने काही लोकांना जमवून अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत त्यांच्या बरोबर झटापट केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.येथील आरटीओ कार्यालयात काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक एजंट व कर्मचारी त्यांच्यामध्ये काही कागदपत्र घेण्यावरून बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली. त्या एजंटने बाहेरून काही लोकांना जमवून आणले. त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद होत असल्याचे पाहून काही अधिकारी, कर्मचारी व एजंटसह गर्दी जमली. त्या एजंट्स व त्याने जमवलेल्या लोकांनी कर्मचारी अधिकार्‍यांना शिवीगाळ करत त्यांच्या बरोबर झटापट केली. हा प्रकार पाहण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.या घटनेची माहिती कळताच पोलीस त्या ठिकाणी आले. या प्रकरणाची पोलिसांनी सर्व माहिती घेतली. त्या एजंटला शोधण्यासाठी पोलिसांनी त्याचे घर गाठले मात्र तो मिळून आला नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget