श्रीरामपूर प्रतिनिधी-शहरातील सरस्वती कॉलनी परिसरात एका मालवाहू टेम्पोत 42 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सचिन विश्वास सराफ (वय 42) असे या तरुणाचे नाव आहे. शहरातील वार्ड नं. 7 मधील दळवीवस्ती परिसरात मालवाहू टेम्पोच्या केबीनमध्ये सचिन मृतावस्थेत आढळून आला.नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी साखर कामगार रूग्णालयात नेले असता उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक़ संजय सानप, पोलीस नाईक अडांगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन सराफ यानचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोलीस नाईक अडांगळे अधिक तपास करीत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली असा परिवार आहे.
Post a Comment