Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, बीफ मार्केट परिसरात विनापरवाना शस्त्रे घेवून फिरत असलेल्या एक़ास गुन्हे अन्वेषण नगरच्या पोलीस पथकाने सापळा रचून पकडले. पोलिसांनी त्याचेकडून एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असे एकूण 30,500/ रू.कि.चा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे जप्त केले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, बीफ मार्केट परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, रविंद्र घुंगासे. रोहित येमुल, मेघराज कोल्हे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे या अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने बीफ मार्केट, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर येथे जावून सापळा लावला.त्यानंतर काही वेळातच एक संशयीत इसम बीफ मार्केट परिसरात फिरतांना दिसला. त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असे एकूण 30,500/ रू.कि.चा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आली असून ते जप्त करण्यात आले आहे. त्याचे नाव अंजर इलीयाज शहा वय 22, रा. बीफ मार्केट जवळ, वॉर्ड नं. 2, ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र तुकाराम धुगांसे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 268/2022, नुसार अंजर इलीयाज शहा याचेविरुध्द भादंवि कलम आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

कर्जत प्रतिनिधी -स्वस्तात सोने देतो म्हणून एका दरोडेखोराने सात पुरुष व दोन महिलांच्या मदतीने खेडनजीकच्या आखोणी परिसरात बोलावून जेजुरीच्या तिघांना जबर मारहाण करत केली. सोन्याची चैन, एक मोबाईल व एक लाखाची रक्कम असा एकूण १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल बळजबरीने लुटल्याचा प्रकार नुकताच घडला होता. कर्जत पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींची नावे निष्पन्न करत तिघांना जेरबंद केले आहे.शेखर वसंत माने (रा. जेजुरी, रेल्वे स्टेशन ता.पुरंदर जि. पुणे) असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे तीन वर्षांपुर्वी खुनाच्या गुन्ह्यात येरवडा तुरुंगात असताना तिथे भाऊ बेल्या काळे याच्याशी ओळख झाली होती. तुरुंगात दोघेही वर्षभर एकत्र राहिले होते. त्यानंतर फिर्यादी हे तुरुंगातुन सुटून घरी आले होते. तीन आठवड्यापुर्वी भाऊ काळे याने फिर्यादीला फोन करून तुरुंगातील ओळख सांगून 'माझ्याकडे सोने आहे, तुला स्वस्तात सोने देतो' असे सांगितले.त्यावर वेळ भेटल्यावर येतो असे फिर्यादीने सांगुनही तो पैशांची गरज असल्याचे सांगून फिर्यादीस वारंवार फोन करत होता. त्यावर ५ पाच ते सहा दिवसांपुर्वी फिर्यादी (टाकळी ता. करमाळा) येथे आले असता भाऊ बेल्या काळे व त्यासोबत अन्य दोन महिलांनी दोन चैनमधील गंठन दाखवले. ते सोने असल्याची फिर्यादीने खात्री केली. त्यावर 'दोन लाख घेऊन या, तुम्हाला सोने देतो' असे संभाषण झाल्यावर फिर्यादी तेथून गावी निघून आले. दि.२५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता भाऊ बेल्या काळे याने फोन करून 'तुम्ही येणार आहे का? असे विचारले. त्यावर फिर्यादीने सांगतो असे म्हणत एक लाख रुपयांची जमवाजमव केली.त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीचे मित्र ओंकार जाधव, रामभाऊ झगडे असे तिघे फिर्यादीच्या मारुती अल्टो गाडीतून (एमएच ०५ एएस ७७३४) सकाळी ११ वाजता निघाले. त्यावेळी फिर्यादीने आपल्या मित्रांना स्वस्तातील सोने घेण्यासाठी चाललो असल्याची माहिती दिली होती. दरम्यान भाऊ काळे याने कोठे आले?आणखी किती वेळ लागेल?अशी वेळोवेळी विचारणा केली. त्यानंतर फिर्यादी बारामती- भिगवण- खेड नजीकचा भीमा नदी पुल ओलांडून खेड व आखोणी शिवारात खराब डांबरी रस्त्याच्या ठिकाणी दुपारी २ च्या सुमारास आले. त्या ठिकाणी भाऊ बेल्या काळे उभा होता व त्याच्याबरोबर पायजमा-शर्ट घातलेला आणखी एकजण होता.त्यानंतर त्यांनी गाडीपासून बाजूला येण्यास सांगितले असता सर्वजण बाजुला गेले त्यावेळी भाऊ बेल्या काळे याचे सहा जोडीदार व दोन महिला तीन मोटारसायकलवरून आले. त्यांनी फिर्यादी व मित्रांवर दगड मारायला सुरुवात करून लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. त्यातील एकाने बळजबरीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन काढली. फिर्यादीचा मित्र रामभाऊ झगडे याच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढला. काहींनी गाडीची उचकापाचक केली व त्यातील एक लाखाची रक्कम काढून घेऊन मोटारसायकलवर निघून गेले.याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जत पोलिसांनी आरोपी अभिमान दागिन्या काळे, रा. इंदिरानगर, राशीन, ता. कर्जत, अविनाश उर्फ लल्या बेळया काळे, रा. जवळा, ता. जामखेड आणि आणखी एक असे तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींची ही नावे निष्पन्न केली आहेत. या गुन्ह्यातील आरोपींवर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि पुणे जिल्ह्यातील लोणीकाळभोर, लोणीकंद, रांजणगाव या पोलीस ठाण्यात चोरी, दरोडा, घरफोडी, दरोड्याची तयारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, अनंत सालगुडे, पोलीस जवान भाऊसाहेब काळे, अंकुश ढवळे, शाम जाधव, अर्जुन पोकळे, संपत शिंदे, गोवर्धन कदम, सुनील खैरे, मारुती काळे आदींनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने बेलापुर बु।। ग्रामपंचायतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातील सुमारे १५००० पुस्तकांचे प्रदर्शन अनोखी पर्वणी ठरल्याने या पुस्तक प्रदर्शनाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन ग्रंथालयाचे नियमित वाचक रंगनाथ देवकर, मच्छिंद्र पुंड तसेच सेवानिवृत्त ग्रंथपाल रमेश खरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की,महामानव  डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीनिमित्त पुस्तक प्रदर्शन आयोजित केले असून डॉ.आंबेडकरांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा,संघर्ष करा या मंत्रा प्रमाणे नवीन पिढी घडावी हा या पुस्तक प्रदर्शना मागील हेतु आहे.उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की,

ग्रामपंचायतीच्या वाचनालयात २०००० पुस्तके असून यात बाल साहित्य,नाटक,कविता संग्रह,प्रवास वर्णने,धार्मिक, स्पर्धा परीक्षा अश्या एकूण १० विभागांची पुस्तके उपलब्ध आहेत. यातील १५००० पुस्तकांचे आज प्रदर्शन आयोजित केले आहे यातून वाचन संस्कृतीचे जतन होऊन नवीन वाचक वर्ग निर्माण होण्यास मदत होईल. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,पत्रकार देविदास देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.पत्रकार विष्णुपंत डावरे यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिली.यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे,मारुती राशिनकर,प्रकाश नवले,किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण,तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,किशोर खरोटे,नानासाहेब जोंधळे,जनार्धन ओहोळ,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख, रमेश अमोलिक,पत्रकार देविदास देसाई,विष्णुपंत डावरे,दिलीप दायमा,ज्ञानेश गवले,किशोर कदम,कासम शेख,रुपेश सिकची,प्रकाश कु-हे,रफिक शेख,अकबर सय्यद, रत्नेश गुलदगड,नितीन नवले,सुधीर तेलोरे,तान्हाजी शेलार,जिना शेख,सुधिर तेलोरे,विशाल आंबेकर, गोपी दाणी,अजीज शेख,रोनाल्ड अमोलिक,सुभाष कु-हे,रमेश शेलार,जलील जनाब,जलील शेख,सचिन कडेकर,बाळासाहेब शेलार,महेश ओहोळ आदी उपस्थित होते.प्रदर्शन यशस्वीतेसाठी ग्रंथपाल उज्वला मिटकर-साळुंके,सोपान हिरवे,सुभाष राशिनकर,मधुकर गायकवाड, बाबासाहेब प्रधान,शिला पुंड,निर्मला गाढे,सचिन नगरकर,सचिन साळुंके,रविंद्र मेहेत्रे,विजय खरोटे,अमोल साळवे,अविनाश शेलार,गौरव वाडिया,राजेश गोहेल आदींनी परिश्रम घेतले.पुस्तक प्रदर्शनास विद्यार्थी, महिला,जेष्ठ नागरिक,तरुण आदींसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्रीरामपूर मनसेच्या वतीने श्री साई विठ्ठल  अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्य व अन्नधान्य वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

दोन वर्षानंतर प्रथमच डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सहात साजरी करण्याचा योग आला मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  या वर्षी आगळ्या वेगळ्या पध्दतीने जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला महामानवाची जयंतीही त्याच पध्दतीने गोरगरीब अनाथ मुलात जावुन साजरी करण्याचा निर्णय घेतला मनसेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवुन त्यांनी सुभाषवाडी येथील कृष्णानंद महाराज चालवत असलेला श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम गाठला तेथील मुलांना अन्नधान्य व शालेय साहीत्य वाटप करण्यात आले  त्याप्रसंगी बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की अठरा ते वीस वर्षापासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीचे शिका संघटित व्हा मग आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करा हा कानमंत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रत्येक जयंतीला विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे काम आम्ही करत असतो परंतु यावर्षी बेलापुर  येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम येथे कृष्णानंद महाराजांनी अनाथ आश्रम चालू करून 25 ते 30 विद्यार्थ्यांचे पालन पोषण करत असल्याचे समजल्याने  अशा मुलांना शिक्षण घेण्यासाठी व खाण्यापिण्याची साठी  अन्नधान्याची गरज असल्याने आम्ही यावर्षी या आश्रमातील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके कंपास व इतर  शालेय साहित्य व तसेच दात स्वच्छ घासण्यासाठी टूप पेस्ट ब्रश व गहू तांदूळ ज्वारी  इत्यादी अन्नधान्य खाद्य पदार्थ देण्यात आले यापुढे या आश्रमासाठी वेळोवेळी मदत करत राहू जेणेकरून अनाथाश्रमातील मुले शिकून पुढे काहीतरी मोठे अधिकारी व्हावेत जेणेकरून इतर अनाथ मुलांना यांची प्रेरणा मिळेल की रस्त्यावर भीक न मागता कुठल्यातरी अनाथ आश्रम मध्ये शिकून भविष्यात कुठल्यातरी शासकीय अधिकारी किंवा मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करावे किंवा स्वतःचे व्यवसाय चालू करावे येणारी तरुण पिढी वाया जाऊ नये यासाठी आश्रमासाठी यापुढे जी काही मदत लागेल ती सर्व मदत करत राहू 

असे आश्वासन याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे दिले याप्रसंगी संतोष डाहाळे  उपाध्यक्ष, बाबा रोकडे तालुकाध्यक्ष, निलेश लांबोळे, शहराध्यक्ष, आश्रमाचे अध्यक्ष कृष्णा महाराज, उपाध्यक्ष प्रकाश  मेहेत्रे,विशाल शिरसाट विद्यार्थी सेना जिल्हा सचिव, विकी राऊत विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष, संतोष भालेराव प्रवीण कारले, दीपक सोनवणे, दीपक लांडे, समर्थ सोनार, अतुल खरात, विकी शिंदे, विशाल लोंढे, विशाल त्रिभुवन,राजू शिंदे, अमोल साबणे, संदीप विशंभर, किशोर वाडीले, रोहित जवंजाळ, महेश कोलते, चेतन दिवटे, मंगेश जाधव, किशोर बनसोडे सुमित गोसावी विकी परदेशी,लखन शिंदे ज्ञानेश्वर काळे सोमनाथ गुंजाळ  ऋषिकेश सानप किशोर अमोलिक भास्कर मंदार भाऊसाहेब फटांगरे रतन वर्मा अभिमन्यू धर्म जिज्ञासू किरण राऊत सुधाकर पाटील आकाश आदिक दीपक जगताप

आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

रामगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू व  मराठी शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी, चित्रकला ,नींबू चमचा,धावणे स्पर्धात विजेते,त्यानिमित्ताने त्यांना प्रमाणपत्र,मेडल,वितरण करण्यात आले,या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद नवले  ,बेलापूर ग्रामपंचायत सरपंच ,महेंद्र साळवी ,बेलापूर पोलीस स्टेशनचे ,पोलीस नाईक, ढोकणे दादा, महावितरणचे, जाधव साहेब ,केंद्रप्रमुख, राजाबाई कांबळे मॅडम, मुख्याध्यापक अनिल ओहोळ सर ,गोखलेवाडी, ग्रामपंचायत सदस्य,  मुस्ताक शेख ,भैया भाई ,तसेच शाळा व्यवस्थापन समिती ,हरिहर नगर मराठी व उर्दू शाळा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव साहेब होते , या कार्यक्रमात स्पर्धेत प्रथम क्रमांक येणारे  मराठी शाळेचे विद्यार्थी, धावणे स्पर्धेसाठी, फिरोज शेख अतिश बबन लगे ,चमचा लिंबू स्पर्धा, धावणे प्रथम ,तयबा गुलाब शेख ,सार्थक मिथुन दोडके, असद जावेद शेख ,तेजल संतोष जाधव ,चित्रकला स्पर्धा ,आयशा वाहिद शेख, तेजल संतोष जाधव ,मुन्नी मकसूद शेख ,संगीत खुर्ची, इरम नवाज शेख, सारा मोसिम शेख ,हुमेरा मुस्ताक बागवान, अलीम निसार बागवान, स्मार्ट स्टुडन्ट विजेते ,हुजेब फिरोज शेख ,तोसीन नवाज शेख, श्रद्धा शाम जाधव, साद  नदीम शेख, तसेच उर्दू शाळेचे विद्यार्थी ,धावणे स्पर्धा, तालीबअसलम शेख, जैद अजीम बागवान,  चमचा लिंबू स्पर्धा, जैदआरिफ बागवान, शोयबअजिम शेख,  चित्रकला स्पर्धा ,आरिफ बागवान  आयशा नजीर शेख, रेश्मा आरिफ शेख, शिक्षक स्टॉप ,मराठी शाळा, कारले सर ,जरे मॅडम तसेच उर्दू शाळेचे शिक्षक , शाळेचे मुख्याध्यापक इमाम सर, आकील सर, हूर बानो मॅडम, समिना मॅडम,   आमिनामॅडम,  बक्षिसे विशेष सहकार्य ,बक्षिसे (प्रमाणपत्र,मेडल,)वाटणे कामी  शा,व्यवस्थापण समीती,चे  श्री समद शेख ,विद्यार्थ्यांना खाऊ केळी वाटपासाठी योगदान ,श्री गणेश शिंदे, विद्यार्थांना पाणी जार, सद्दाम जाकीर शेख, सर्व सदस्य व्यवस्थापन समिती हरिहर नगर  मराठी व उर्दू शाळा, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली तसेच या कार्यक्रमासाठी पत्रकार शफिक शेख, पत्रकार कासम शेख ,व रामगड ग्रामस्थ आदी उपस्थित होते,

बेलापुर  (प्रतिनिधी  )-त्याग संयम प्रेम करुणा शील सदाचार सत्य व अहींसा याचा संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसावे तिर्थकर भगवान वर्धमान महावीर यांची जयंती बेलापूरात मोठ्या उत्सहात संपन्न झाली सकाळीच जैन स्थानकापासुन मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला पुरुषांनी एक सारखा गणवेश  व महीलांनी एका रंगाच्या साड्या परिधान केल्येल्या साड्या यामुळे कोरोनानंतर दोन वर्षांनी निघालेली ही मिरवणूक अतिशय लक्षवेधी ठरली झेंडा चौकात भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर गावातून ही मिरवणूक पुन्हा जैन स्थानकात आली तेथे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक बाजारा समीतीचे संचालक सुधीर नवले जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड विलास मेहेत्रे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी संतोष डाकले व

अजय डाकले परिवाराच्या वतीने पक्षाकरीता  पाणी व दाणे ठेवण्याकरीता पात्र भेट देण्यात आले .महावीर जयंती निमित्त आर्य अनिल डाकले व जान्हवी अतिश देसर्डा यांनी नृत्य व गीत सादर केले तर पुर्वा मुथा दिव्या लुक्कड काव्या लुक्कड विधी लुंक्कड गौरव ललवाणी तिर्थ कोठारी आरण लुक्कड आदित्य लुक्कड यांनी भगवान महावीर जयंती निमित्त मनोगत व्यक्त केले या वेळी सुवालाल लुक्कड किराणा मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष शातीलाल हिरण विजय कटारीया अजय डाकले सुभाष मुथा सचिन कोठारी बाळू संचेती प्रकाश देसर्डा प्रविण लुंक्कड संतोष ताथेड प्रमोद बोरा अमित लुक्कड शितल गंगवाल डाँक्टर गंगवाल हेमंत मुथा गणेश संचेती आदिसह आनेक बांधव उपस्थित होते

श्रीरामपूर प्रतिनिधी-तालुक्यातील उक्कलगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी मध्यरात्री येथील प्रगतशिल शेतकरी आबासाहेब सोन्याबापू थोरात यांच्या पटेलवाडी जवळील वस्तीवर बिबट्याने हल्ला चढवून त्यांच्या दोन शेळ्या व एका गिर जातीच्या कालवडीला ठार केले.दरम्यान ही घटना ताजी असतानाच परवा पुन्हा बिबट्याने सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान याच वस्तीवर हल्ला चढवून आबासाहेब सोन्याबापू थोरात यांचा नातू शुभम संदीप थोरात यास चावा घेऊन जखमी केले. मात्र शेतातील महिलांचा आरडाओरडा व प्रसंगावधान राखत शुभमने सावध पवित्रा घेतल्याने तो बालंबाल बचावला.त्याच्यावर शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी वनक्षेत्रपाल यांनी दोन दिवसांपूर्वी भेट देऊन मृत शेळ्या व वासरांचा पंचनामा केला असला तरी मुलावर हल्ला झाल्यानंतर मात्र वनखात्याचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही.जखमी शुभमला ताबडतोब लस देणे आवश्यक असताना स्थानिक पातळीवर कुठेही लस उपलब्ध झाली नसल्याचे समजते. या भागात द्राक्ष बागा आणि उसाचे मोठे आगार असून बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा आहे. त्यातच ऊसतोड होत असल्याने बिबटे मानवी वस्तीकडे कूच करत आहेत. हे बिबटे संख्येने तीन पेक्षा अधिक असून त्यांचा सातत्याने याच भागात वावर असल्याने या भागात त्वरित पिंजरा लावून हे बिबटे जेरबंद करावेत, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget