Latest Post

बेलापूर (प्रतिनिधी  )-बेलापुर झेंडा चौकात नेहमीच  येथील  नेहमीच गजबजलेल्या झेंडा चौक परिसरात होणारी वाहतूक कोंडी हा नित्याचाच भाग झाला आहे. वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी ग्रामस्थांकडून नेहमीच केली जाते अधिकारी ही मागणी मान्य करतात परंतु त्याची अंमलबजावणी आजपावेतो झालेली नाही. याचाच फटका पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना नुकताच बसला. त्याचे असे झाले की दोन-तीन दिवसांपूर्वी सकाळी साधारण अकरा वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची गाडी बेलापूर हुन पढेगाव कडे जात होती. परंतु झेंडा चौक परिसरात अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती नेमकी या वाहतूक कोंडीत  मिटके यांची गाडी अडकली . ड्रायव्हरने प्रथम हॉर्न वाजवून  अस्ताव्यस्त गाड्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु निर्ढावलेल्या वाहनधारकांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. काही वेळ वाट पाहूनही वाहने बाजूला जात नसल्याचे पाहून शेवटी ड्रायव्हरने सायरन वाजविला. सदर गाडी पोलिसांची आहे हे समजताच आधी बेपरवा असलेल्या वाहनधारकांनी तातडीने आपापली वाहने बाजूला घेतली आणि हे अधिकारी मार्गस्थ झाले.बेलापूर येथील बस स्टँड पासून ते जे टी एस हायस्कूल पर्यंत दुतर्फा वाहने लावलेली असतात. या बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. प्रसंगी लहान-मोठे अपघात होऊन बऱ्याचदा वाहनधारकांमधे  बाचाबाची होते. परंतु याकडे ना पोलीस लक्ष देतात ना ग्रामपंचायत प्रशासन.मध्यंतरी अशा अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांची हवा सोडणे, वॉल किल्ल्या काढून घेणे त्यांच्यवर कायदेशीर कारवाई करणे अशी मोहीम बेलापूर पोलिसांनी सुरू केली होती तिचा अपेक्षित परिणामही दिसू लागला होता परंतु अल्पावधीतच ती मोहीमही थंडावली. ग्रामपंचायत प्रशासनाला तर या गोष्टीशी काही देणे-घेणे नाही असे वाटते.भविष्यात काही गंभीर घटना घडण्यापूर्वीच ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून नागरिकांना नेहमी होणाऱ्या वाहतुकीच्या त्रासातून मुक्तता करावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-पत्र्याच्या शेजारी असलेल्या शेडजवळ गवत का पेटविले याचा जाब विचारल्याने बडधे कुटुंबात तुफान हाणामारी झाली असुन बेलापुर पोलीसांनी सहा जणाविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे . बेलापुर खूर्द येथील बडधे कुटुंबात गेल्या अनेक वर्षापासून वाद होते त्या वादाचे पर्यावसण आज तुफान हाणामारीत झाले या वेळी लाकडी दांडके गज कुऱ्हाड आदिंचा वापर करण्यात आला .बेलापुर खूर्द येथील बडधे वस्ती येथे राहणारे सुभाष मुरलीधर बडधे यांच्या शेजारी राहणारे अजित मच्छिंद्र बडधे व इतरांनी त्यांच्या पत्र्याच्या शेडलगत गवत व पाचट आणून टाकले व ते पेटविले त्यामुळे सुभाष बडधे यांच्या पत्र्याला आगीच्या झळा पोहोचल्या त्याचा जाब विचारण्यासाठी सुभाष मुरलीधर बडधे ,सुनिल सुभाष बडधे ,पांडूरंग सुभाष बडधे ज्योती सुनिल बडधे हे गेले असता आगोदरच तयारीत असणाऱ्या अजित मच्छिंद्र बडधे शरद मच्छिंद्र बडधे ओमकार मच्छिंद्र बडधे ,भाऊसाहेब कारभारी बडधे सोनाली आजित बडधे तुळसाबाई मच्छिंद्र बडधे

यांनी लाठ्या काठ्या गज व कुऱ्हाडीचा वापर करुन चौघांना गंभीर जखमी केले या चौघावर श्रीरामपुरातील शिरसाठ यांच्या दवाखान्यात उपचार सुरु असुन एकाची प्रकृती गंभीर आहे .बेलापुर पोलीसांनी ज्योती सुनिल बडधे यांच्या फिर्यादीवरुन अजित बडधे ,शरद बडधे ,ओमकार बडधे ,भाऊसाहेब बडधे सोनाली बडधे तुळसाबाई बडधे यांचे विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२२ नुसार  भादवि कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,३०७,५०४,५०६  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट  हे पुढील तपास करत आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-सरकारच्या निर्देशानुसार कोविडचे नियम पाळत श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेसाठी दोनशेच्या टप्प्याने भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय यात्रा नियोजन बैठकीत करण्यात आला. तसेच पारंपरिक व आवश्यक सर्व विधी साजरे करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.मढी देवस्थान समितीच्या महाप्रसाद गृहासमोर यात्रा नियोजन समितीची बैठक प्रभारी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार श्याम वाडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, गटविकास अधिकारी शितल खिंडे, यासह परिवहन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, वनविभाग, वीज वितरण, नगरपालिका अशा प्रमुख यंत्रणाचे प्रतिनिधी, देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, सचिव विमल मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, विश्वस्त शामराव मरकड, शिवजीत डोके, भऊसाहेब मरकड, डॉ.विलास मढीकर, माजी सरपंच देवीदास मरकड, बाबासाहेब मरकड, ग्रामस्थ नवनाथ मरकड, डॉ. रमाकांत मडकर, लक्ष्मण मरकड आदी उपस्थित होते.मढी येथील चैतन्य कानिफनाथांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत तीन टप्प्यांमध्ये होते. होळी, रंगपंचमी व अमावस्येला भरणारी फुलोर बाग यात्रा असे टप्पे असून रंगपंचमी टप्पा सर्वाधिक मोठा असतो. राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. यावर्षी भाविकांना दर्शन घेऊन लगेच माघारी फिरावे लागेल. रंगपंचमीच्या दिवशी मानाच्या काठ्या मंदिराच्या कळसाला लावून त्यानंतर त्यांची विधिवत पूजा केली जाते. समाधी मंदिरासमोरील गर्दी टाळण्यासाठी अशा भाविकांना मंदिर परिसरात थांबण्यास बंदी असून यात्रेसाठी खास तयार करण्यात आलेल्या पटांगणात जाऊन पारंपरिक विधी करून माघारी फिरावे लागेल.अमावस्येच्या दिवशीची कावड यात्रा व निशान भेट मर्यादीत भाविकांच्या उपस्थितीत होईल. गेल्या दोन वर्षापासून यात्रा बंद राहून यंदाही कोविडचे निर्बंध पाळून भावीकांना यात्रेस परवानगी मिळाल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. यावेळी माहिती देताना आगार प्रमुख महेश कासर म्हणाले, एस टीचा संप मिटला नसला तरी जिल्ह्यातून एसटी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण क्षमतेच्या सुमारे 25 टक्के बसेस आगारातून सुरू झाल्या आहेत. मढी येथून पैठणसाठी जादा गाड्या सुटतील. यात्रेदरम्यान चालणारे अवैध धंदे, दारू विक्री पूर्णपणे बंद करावेत, अशी मागणी अंबादास आरोळे यांनी केली.यावेळी अध्यक्ष मरकड म्हणाले, यात्रेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाचे पूर्णपणे पालन करण्यात येईल. भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या सर्व बाजूंनी सुमारे अडीचशे एकर परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी हायमॅक्स, पथदिवे, अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडी होणार नाही. मायंबावरून येणारे भाविकांना थेटपणे पाथर्डी-तिसगाव येथे सहजपणे जाता येईल. देवस्थान समीतीच्यावतीने पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा देण्यात आली आहे. भाविकांनी गर्दी न करता सामाजिक अंतर व भाविकांच्या संख्येसाठी निश्चित केलेली अट काढून दर्शन सोहळा संपेल.


बेलापूरः (प्रतिनिधी  )-जागतीक महीला दिनानिमित्त केला जाणारा महीलाचा सन्मान हा त्यांचा उत्साह वाढविणारा असुन केवळ महीला दिनीच नाही तर वर्षभर महीलांचा आदर ,सन्मान केला पाहीजे असे मत सरपंच महेंद्र साळवी यांनी व्यक्त केले महीला दिनाचे औचित्य साधुन महीला ग्रामपंचायत सदस्या तसेच महीला ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते                                      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या सौ.शिला राम पोळ ह्या होत्या.या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे  जेष्ठ पत्रकार देविदास देसाई सौ .प्रियंका कुऱ्हे  आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी ग्रामपंचायत महिला सदस्या तबस्सुम बागवान,स्वाती अमोलिक,प्रियंका कु-हे ,सुनीता बर्डे,यांचेसह ग्रामपंचायत  कर्मचारी उज्वला मिटकर,निर्मला गाढे,सुशिला खरात,कलाबाई शेलार,निर्मला तेलोरे,निर्मला भिंगारदिवे,कविता भिंगारदिवे,सगुणा तांबे,सरस्वती बागडे,लता गांगुर्डे आदिंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .                                 याप्रसंगी ,सदस्य चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,रमेश अमोलिक,पञकार दिलीप दायमा, किशोर कदम दादासाहेब कुताळ ,अजीज शेख,सुधीर तेलोरे,राज गुडे आदी उपस्थित होते.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- करोडो रुपयांच्या मालमत्ता घोटाळा प्रकरणी दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यात बेलापूरातील एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असल्याची माहीती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा लुटे यांनी दिली असुन बेलापूरात हा चर्चेचा विषय बनला आहे .या बाबत पुण्यातील आर्थिक गुन्हा शाखेत मालमत्ता खरेदी विक्री प्रकरणात सन २०१६ मध्ये फसवणूक झालेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता करोडो रुपयांच्या मालमत्तेचा हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते पोलीसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेवुन तपास केला असता बेलापुरातील राजेंद्र ठोंबरे यांनी आपल्या खात्यावर ९० लाख रुपयाचा धनादेश घेतला होता त्यानंतर ते पैसे आरोपीस परत दिले होते . ब्लँक मनी व्हाँईट करण्याचा हा प्रकार होता त्यामुळे पोलीसांनी सन २०१६ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरुन बेलापूरातील राजेंद्र ठोंबरे यास ताब्यात घेतले आहे . फसवणूकीच्या गुन्ह्यात मदत केल्याचा गुन्हा रंजिस्टर नंबर ७१/ २०१६ दाखल करण्यात आला होता.
या आरोपीस अटक करण्यासाठी  आर्थिक गुन्हा शाखेचे पथक अनेक वेळा बेलापुर येथे आले होते परंतु आरोपी सापडत नसल्यामुळे पोलीसांना रिकाम्या हाताने परत जावे लागत होते अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा टुले यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पथकाने ठोंबरे यास ताब्यात घेवुन स्थानिक पोलीस डायरीला तशी नोंद करुन पुण्याला नेलेले आहे यातील मुख्य आरोपीस अटक होवुन त्याची जामीनवर मूक्तता देखील झालेली आहे परंतु या गुन्ह्यातील काही आरोपी अजुनही फरार असल्यामुळे या गुन्ह्याबाबतची अधिक माहीती देण्याचे तपासी अधिकारी मनिषा टूले यांनी टाळले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-लहान मुलांच्या भांडणाच्या कारणातुन दोन कुटुंबात जबर हाणामारी झाली होती त्यात दोन जण गंभीर जखमी झाले होते  पोलीसांनी तीन जणाविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल केला आहे .तपासाअंती जातीवाचक शिवीगाळ व अँट्राँसीटी गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले असुन तपासात आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली आहे                                     

बेलापुरातील बोरुडगल्लीत राहणारे आतार व सोनवणे या दोन कुटुंबात काही दिवसापूर्वी लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाले होते  ते वाद  मिटविल्यानंतरही दुसऱ्या दिवशी दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली होती       हाणामारीत  कचरु धोडीराम सोनवणे विकास सोनवणे आकाश सोनवणे या तिघांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती यात कचरु सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना रक्तभंबाळ अवस्थेत आगोदर पोलीस स्टेशन नंतर साखर कामगार दवाखान्यात पाठविण्यात आले होते  त्यांचेवर तसेच विकास सोनवणे व आकाश सोनवणे यां तिघावर  साखर कामगार रुग्णालयात उपचार करण्यात आले होते कचरु सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी तीन आरोपीविरुध्द खूनाच्या गुन्ह्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता तसेच तीन आरोपींना अटकही करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासाअंती जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आरोपी विरुध्द अँट्राँसीटी अँक्ट नुसार वाढीव कलम लावण्यात आले आहे .तसेच याच गुन्ह्यात आणखी दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली असुन आरोपी आयुब अनिस आतार व सुफीयान अकील आतार यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात एकुण पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत. कचरु धोंडीराम सोनवणे यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी अनिस दादासाहेब आतार अकील दादासाहेब आतार बबडी दादासाहेब आतार यांचेविरुध्द भादवि कलम ३०७ ,३२४ ,३२३ ,५०४ ,५०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता आता आयुब अनिस आतार व सुफीयान अकील आतार यांचेविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके हे करत आहेत.

अहमदनगर प्रतिनिधी -वर्षांनुवर्ष फरार, पाहिजे, शिक्षा झालेल्या व स्टॅण्डींग वॉरंटमधील 1163 आरोपींवर जिल्हा पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याची स्थिती पाहून काहींना अटक करण्यात आली तर काही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्र परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.उच्च न्यायालयात शिक्षा झालेले, फरार, पाहिजे व स्टॅण्डींग वॉरंट असलेले चार हजार 682 आरोपी वर्षांनुवर्ष पोलिसांना चकवा देत फरार झाले होते. अशा आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक पाटील यांनी 1 जानेवारी, 2022 ते 6 मार्च, 2022 या दरम्यान विशेष मोहिम राबविली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह तालुकास्तरावरील सर्व पोलिसांंना तशा सुचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक कटके या मोहिमेवर लक्ष ठेऊन होते. फरार असलेल्या 45 आरोपींपैकी 16 आरोपींना, पाहिजे असलेल्या चार हजार 444 आरोपींपैकी एक हजार 86 आरोपींना, स्टॅडिंग वॉरंंटमधील 180 पैकी 59 आरोपींना आणि उच्च न्यायालयात शिक्षा झालेल्या 13 आरोपींपैकी दोन अशा 1163 आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 798 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 35 आरोपी यापूर्वीच अटक केले असल्याचे पोलिसांनी काढलेल्या माहितीतून समोर आले. तर 39 आरोपी मयत झाले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयामध्ये यापूर्वीच निकाली काढलेल्या खटल्यातील आरोपींची संख्या 291 ऐवढी असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.सदरची मोहिम अधीक्षक पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कटके, सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचार्‍यांनी केली.गंभीर गुन्ह्यातील 790 गंभीर गुन्हे केल्यानंतर वर्षांनुवर्ष फरार झालेल्या आरोपींच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मोक्का, खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी व घरफोडी अशा गुन्ह्यात आरोपी असलेल्या 790 आरोपींना जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मोक्का 4, खुन 24, खुनाचा प्रयत्न 58, दरोडा 55, जबरी चोरी 106, घरफोडी 130 आरोपींचा समावेश आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget