Latest Post

बेलापूरः (प्रतिनिधी  )-जागतीक महीला दिनानिमित्त केला जाणारा महीलाचा सन्मान हा त्यांचा उत्साह वाढविणारा असुन केवळ महीला दिनीच नाही तर वर्षभर महीलांचा आदर ,सन्मान केला पाहीजे असे मत सरपंच महेंद्र साळवी यांनी व्यक्त केले महीला दिनाचे औचित्य साधुन महीला ग्रामपंचायत सदस्या तसेच महीला ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते                                      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या सौ.शिला राम पोळ ह्या होत्या.या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे  जेष्ठ पत्रकार देविदास देसाई सौ .प्रियंका कुऱ्हे  आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी ग्रामपंचायत महिला सदस्या तबस्सुम बागवान,स्वाती अमोलिक,प्रियंका कु-हे ,सुनीता बर्डे,यांचेसह ग्रामपंचायत  कर्मचारी उज्वला मिटकर,निर्मला गाढे,सुशिला खरात,कलाबाई शेलार,निर्मला तेलोरे,निर्मला भिंगारदिवे,कविता भिंगारदिवे,सगुणा तांबे,सरस्वती बागडे,लता गांगुर्डे आदिंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .                                 याप्रसंगी ,सदस्य चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,रमेश अमोलिक,पञकार दिलीप दायमा, किशोर कदम दादासाहेब कुताळ ,अजीज शेख,सुधीर तेलोरे,राज गुडे आदी उपस्थित होते.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- करोडो रुपयांच्या मालमत्ता घोटाळा प्रकरणी दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यात बेलापूरातील एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असल्याची माहीती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा लुटे यांनी दिली असुन बेलापूरात हा चर्चेचा विषय बनला आहे .या बाबत पुण्यातील आर्थिक गुन्हा शाखेत मालमत्ता खरेदी विक्री प्रकरणात सन २०१६ मध्ये फसवणूक झालेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता करोडो रुपयांच्या मालमत्तेचा हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते पोलीसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेवुन तपास केला असता बेलापुरातील राजेंद्र ठोंबरे यांनी आपल्या खात्यावर ९० लाख रुपयाचा धनादेश घेतला होता त्यानंतर ते पैसे आरोपीस परत दिले होते . ब्लँक मनी व्हाँईट करण्याचा हा प्रकार होता त्यामुळे पोलीसांनी सन २०१६ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरुन बेलापूरातील राजेंद्र ठोंबरे यास ताब्यात घेतले आहे . फसवणूकीच्या गुन्ह्यात मदत केल्याचा गुन्हा रंजिस्टर नंबर ७१/ २०१६ दाखल करण्यात आला होता.
या आरोपीस अटक करण्यासाठी  आर्थिक गुन्हा शाखेचे पथक अनेक वेळा बेलापुर येथे आले होते परंतु आरोपी सापडत नसल्यामुळे पोलीसांना रिकाम्या हाताने परत जावे लागत होते अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा टुले यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पथकाने ठोंबरे यास ताब्यात घेवुन स्थानिक पोलीस डायरीला तशी नोंद करुन पुण्याला नेलेले आहे यातील मुख्य आरोपीस अटक होवुन त्याची जामीनवर मूक्तता देखील झालेली आहे परंतु या गुन्ह्यातील काही आरोपी अजुनही फरार असल्यामुळे या गुन्ह्याबाबतची अधिक माहीती देण्याचे तपासी अधिकारी मनिषा टूले यांनी टाळले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-लहान मुलांच्या भांडणाच्या कारणातुन दोन कुटुंबात जबर हाणामारी झाली होती त्यात दोन जण गंभीर जखमी झाले होते  पोलीसांनी तीन जणाविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल केला आहे .तपासाअंती जातीवाचक शिवीगाळ व अँट्राँसीटी गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले असुन तपासात आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली आहे                                     

बेलापुरातील बोरुडगल्लीत राहणारे आतार व सोनवणे या दोन कुटुंबात काही दिवसापूर्वी लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाले होते  ते वाद  मिटविल्यानंतरही दुसऱ्या दिवशी दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली होती       हाणामारीत  कचरु धोडीराम सोनवणे विकास सोनवणे आकाश सोनवणे या तिघांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती यात कचरु सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना रक्तभंबाळ अवस्थेत आगोदर पोलीस स्टेशन नंतर साखर कामगार दवाखान्यात पाठविण्यात आले होते  त्यांचेवर तसेच विकास सोनवणे व आकाश सोनवणे यां तिघावर  साखर कामगार रुग्णालयात उपचार करण्यात आले होते कचरु सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी तीन आरोपीविरुध्द खूनाच्या गुन्ह्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता तसेच तीन आरोपींना अटकही करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासाअंती जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आरोपी विरुध्द अँट्राँसीटी अँक्ट नुसार वाढीव कलम लावण्यात आले आहे .तसेच याच गुन्ह्यात आणखी दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली असुन आरोपी आयुब अनिस आतार व सुफीयान अकील आतार यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात एकुण पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत. कचरु धोंडीराम सोनवणे यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी अनिस दादासाहेब आतार अकील दादासाहेब आतार बबडी दादासाहेब आतार यांचेविरुध्द भादवि कलम ३०७ ,३२४ ,३२३ ,५०४ ,५०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता आता आयुब अनिस आतार व सुफीयान अकील आतार यांचेविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके हे करत आहेत.

अहमदनगर प्रतिनिधी -वर्षांनुवर्ष फरार, पाहिजे, शिक्षा झालेल्या व स्टॅण्डींग वॉरंटमधील 1163 आरोपींवर जिल्हा पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याची स्थिती पाहून काहींना अटक करण्यात आली तर काही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्र परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.उच्च न्यायालयात शिक्षा झालेले, फरार, पाहिजे व स्टॅण्डींग वॉरंट असलेले चार हजार 682 आरोपी वर्षांनुवर्ष पोलिसांना चकवा देत फरार झाले होते. अशा आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक पाटील यांनी 1 जानेवारी, 2022 ते 6 मार्च, 2022 या दरम्यान विशेष मोहिम राबविली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह तालुकास्तरावरील सर्व पोलिसांंना तशा सुचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक कटके या मोहिमेवर लक्ष ठेऊन होते. फरार असलेल्या 45 आरोपींपैकी 16 आरोपींना, पाहिजे असलेल्या चार हजार 444 आरोपींपैकी एक हजार 86 आरोपींना, स्टॅडिंग वॉरंंटमधील 180 पैकी 59 आरोपींना आणि उच्च न्यायालयात शिक्षा झालेल्या 13 आरोपींपैकी दोन अशा 1163 आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 798 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 35 आरोपी यापूर्वीच अटक केले असल्याचे पोलिसांनी काढलेल्या माहितीतून समोर आले. तर 39 आरोपी मयत झाले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयामध्ये यापूर्वीच निकाली काढलेल्या खटल्यातील आरोपींची संख्या 291 ऐवढी असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.सदरची मोहिम अधीक्षक पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कटके, सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचार्‍यांनी केली.गंभीर गुन्ह्यातील 790 गंभीर गुन्हे केल्यानंतर वर्षांनुवर्ष फरार झालेल्या आरोपींच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मोक्का, खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी व घरफोडी अशा गुन्ह्यात आरोपी असलेल्या 790 आरोपींना जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मोक्का 4, खुन 24, खुनाचा प्रयत्न 58, दरोडा 55, जबरी चोरी 106, घरफोडी 130 आरोपींचा समावेश आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- तालुक्यात सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या  बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेत सुधीर नवले अरुण पा नाईक रविंद्र खटोड यांच्या  शेतकरी जनता विकास अघाडीने बारा जागेवर विजय संपादन केला असुन शरद नवले व अभिषेक खंडागळे यांच्या गांवकरी मंडळाला केवळ एकाच जागेवर विजय मिळवीता आला तिसऱ्या शेतकरी परिवर्तन पँनलला तीन अंकी संख्याही पार करता आली नाही                         बेलापुर सेवा सोसायटीची १३ जागेकरीता निवडणूक घेण्यात आली होती तेरा जागेकरीता एकुण ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक व जनता अघाडीचे रविद्र खटोड यांचा शेतकरी जनता विकास अघाडी तर प्रकाश मेहेत्रे यांचा परिवर्त पँनल

निवडणूक लढवत होता सर्वसाधारण जागेकरीता शेतकरी जनता विकास अघाडीचे आठही उमेदवार निवडून आले निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते  १)कुऱ्हे  अशोक रामभाऊ (३५४ ) २)नवले किशोर शंकर ( ३७२ ) ३)नवले सुधीर वेणूनाथ (३६८ ) ४) नाईक अरुण गुलाबराव (३७९ ) ५)पवार शेषराव भानुदास (३४५ ) ६)बोबले पंडीत(३३०) ७) मेहेत्रे विलास गंगाधर (३०३) ८)सातभाई राजेंद्र कचरु (३३५ ) अनुसुचित जाती जमाती राखीव ९)अमोलीक अंतोन विठ्ठल महीला राखीव १०)मेहेत्रे सविता तुकाराम (२९८ ) ११)ईतर मागास प्र वर्ग शिवाजी रामनाथ वाबळे (३७३ )१२) भटक्या विमूक्त जाती जमाती गवते विश्वनाथ पाराजी तर गांवकरी मंडळाच्या एकमेव  सौ भाग्यश्री भास्करराव खंडागळे  या विजयी झाल्या आहेत .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संदीप रुद्राक्षे यांनी काम पाहीले या वेळी पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धायवट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस नाईक भारत पंडीत पोलीस नाईक किरण गीरमे निखील तमनर होमगार्ड मधुकर काळे सोमनाथ भगत किरण गिरमे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला .विजयानंतर शेतकरी जनता विकास अघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली .

बेलापुर  (प्रतिनिधी  )-एकीकडे विज्ञानाने मानवाची प्रगती होत आसतानाच बेलापूरात निवडणूक निमित्ताने गंडेदोरे केल्याचा प्रकार समोर आला असुन ग्रामपंचायत निवडणूकी नंतर सोसायटी निवडणूकीतही असाच प्रकार झाल्याचे उघड झाले आहे.  वर्षभरापूर्वी बेलापुर ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती त्या निवडणूकीत वाग्यांची पुजा करुन त्यास टाचण्या टोचून ते ठराविक ठिकाणीच टाकण्यात आले होते त्याचा परिणाम बेलापुर ग्रामपंचायत निवडणूकीत किती झाला? हे ते तंत्र मंत्र करणारांनाच ठाऊक! परंतु आता बेलापुर सोसायटी निवडणूकीतही अशाच प्रकारे तंत्र मंत्र टोटके करण्याचा प्रकार उघड झाला आहे असे टोटके करुन काहीच होत नसते है माहीत असुनही आठ दिवसापूर्वी आमावस्येच्या दिवशी नारळाची पुजा करुन ते ठराविक ठिकाणी ठेवण्यात आले होते आज बेलापुर सेवा संस्थेचे मतदान होत आहे त्या मतदान केंद्रासमोरच असे टोटके केल्याचे आढळून आले असून हा केवळ अंधश्रध्देचा प्रकार आहे विकृत मनोवृत्तीचा प्रकार असावा अशा मनोविकृताचा शोध घेण्याची नागरीकांची मागणी आहे . बेलापुर वा परिसरात

दिवसेंदिवस बुवाबाजी छाछूगीरी करणारांची संख्या वाढत आहे लोकांना खोटेनाटे अश्वासने देवुन आर्थिक लुबाडणूक करणाराचे मोठमोठे अड्डे तयार झालेले आहेत बेलापुर परिसरात चालणारी बुवाबाजी बंद करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समीतीने या परिसरात व्यापक जनजागृती मोहीम राबवुन लोकांच्या श्रध्देचा फायदा घेवुन फसवणूक करणाराविरुध्द कारवाई करावी अशी मागणी सूज्ञ नागरीकाकडून केली जात आहे .

बेलापूरः(प्रतिनिधी  )-बेलापूर सोसायटीचे विद्यमान सत्ताधारी खोटं बोलं पण रेटून बोल ह्या गोबेल्स नितीत पारंगत आहेत.संस्थेच्या विकासाच्या गोंडस नावाखाली स्वंः हित साधण्याचे काम केले असुन त्यांचे पितळ उघडे पडले आहे.त्यामुळेच या निवडणुकीत सत्तापरिवर्तन आणि गावकरी मंडळाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केला आहे.                                              जि प सदस्य शरद.नवले पुढे म्हणाले की,सत्ताधा-यांचे कारनामे सभासदांच्या लक्षात आले आहे.त्याच त्याच नेत्यांना आणि त्याच त्या चेहऱ्यांचा सभासदांना वीट आला आहे.जेथे तेथे ठराविक नेत्यांचीच टोळीच दिसत आहे . पदे फक्त यांनाच हवी असतात.सामान्य कार्यकर्त्यांना फक्त स्वार्थापुरते वापरायचे आणि स्वार्थ साधून झाला की वा-यावर सोडायचे हि यांची रित आहे.आता माञ सभासदांना बदल हवा आहे आणि तो होणारच यात शंका नसल्याचे .नवले म्हणाले.                             यांच्या ताब्यात पंधरा वर्षे ग्रामपंचायत होती.तेथे यांनी काय प्रताप केले हे जनतेला ठाऊक आहे.एका माजी सरपंचावर अपाञ होण्याची नामुष्की आली.अनेक प्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागले.जे ग्रामपंचायतचे सदस्य नव्हते ते कारभार हाकीत होते.कोणाची बिले काढायची,कोणत्या  चेकवर सह्या करायच्या याबाबत सूचना देत होते.ग्रामपंचायत ही रिमोट नेत्याच्या मर्जीने चालत असल्यामुळे अनेक गैरप्राकार झाले ..तोच प्रकार सोसायटीतही चालत होता.चेअरमन नामाधारी सयाजीराव तर रिमोट नेता बाजीराव अशी अवस्था होती.पेट्रोल पंपावरुन कोणाला पेट्रोल व डीझेल उधारीवर दिले गेले आणि कोणाकोणाकडून वसूली केली गेली हे सभासदांना माहित आहे.जुना पेट्रोल पंप व आता नुतनीकरण केलेल्या पेट्रोल पंपाचे फोटो टाकून टिमकी वाजविली जात आहे पण यात सत्ताधा-यांची कर्तबगारी काय?हि नुतनीकरण कामे विक्रीच्या प्रमाणात आॕईल कंपनी करते.पेट्रोल आणि डीझेलची घट हि प्रमाणीत घटीपेक्षा अधिक आहे.तसेच टेस्टिंगच्या नावाखाली आठवेळा ७६८ लिटर पेट्रोल काढले गेले.याची परस्पर विक्री झाली की कसे. तसे शेरेही कंपनी सेल्स  अधिका-यांनी वार्षिक समरी अहवाल व मासिक विक्री  पुस्तकात मारले आहेत.यावरुन यातही काळेबेरे असल्याचेच स्पष्ट होत आहे.तसेच पेट्रोलची अपेक्षित  विक्री एक लाख लिटरने तर डीझेलची अपेक्षित  विक्री दोन लाख लिटरने कमी झाली आहे  हे चांगल्या कारभाराचे लक्षण आहे का? पेट्रोल पंपात नफा झाल्याच बडेजाव केला जातो. पण पूर्वी पेट्रोलला प्रतिलिटर ७५पैसे कमिशन होते.ते आता  प्रतिलिटर ३रुपये २५पैसे तर डिझेलला पूर्वी प्रतीलिटर ४०पैसे कमिशन होते.तर आता प्रतिलिटर २रुपये २५पैसे मिळत आहे.कंपनीने कमिशनमध्ये घसघशीत वाढ केल्याने नफा दिसतोय.यात संचालक मंडळाची कर्तबगारी काय?तेव्हा खोटीनाटी माहिती देवून दिशाभूल करु नये असे श्री.नवले म्हणाले.             सोसायटी हि सभासदांच्या अर्थकारणाशी निगडीत आहे याचे भान सत्ताधा-यांना नाही.त्यांनी स्वतःचेच हित साधले आहे.संस्थेत गफले करुन सत्ताधारी मालामाल झाले आहे.हाच माल आता निवडणुकीत बाहेर पडणार आहे.सत्ताधा-यांना सत्तेची व पैशाची धुंदी आहे.पण सभासद उद्याच्या निडणुकीत  हि धुंदी उतरविल्याशिवाय राहाणार नाहित.गावकरी मंडळाने गेल्या वर्षभरात ग्रामपंचायतीत पारदर्शक कारभार केला आहे.विकासाची अनेक कामे अल्पावधीत केली आहे.लोकाभिमुख कारभार करुन जनतेचा विश्वास सार्थ ठरविला आहे.तसाच सभासदाभिमुख कारभार सोसायटीतही केला जाईल.यासाठी गावकरी मंडळाला विजयी करावे  असे आवाहनही नवले यांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget