Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी:-दि१४/०२/२०२२ रोजी श्रीरामपूर शहर पोलिस निरीक्षक संजय सानप यांना माहिती मिळाली की शिरसगाव शिवारातील ओव्हर ब्रिज जवळ इंदिरानगर जाणारे रोडवर काही संशयित इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी सपोनि जीवन बोरसे,पोलीस नाईक सचिन बैसाणे,पोलीस नाईक पंकज गोसावी,पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे,पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल रोंगटे यांना बातमीतील माहिती सांगून कारवाई करणे बाबत सूचना केल्या तपास पथकातील कर्मचारी व अधिकारी शिरसगाव शिवारात ओवर ब्रिज जवळ इंदिरानगर येथे गेले असता नमूद बातमीतील वर्णनाप्रमाणे पाच इसम ब्रिज जवळ इंदिरानगर जाणारे रोडवर फिरत असलेले दिसून आले.त्यावेळी तपासी अमलदार त्यांच्या दिशेने जात असताना सदर संशयित इसमांना तपास पथकाचा सुगावा लागल्याने ते पळून जाऊ लागले तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी तीन जणांना पकडले. व त्यातील दोन इसम मोटरसायकलवरून भरधाव वेगात पळून गेले त्यांचे पाठलाग करण्यात आला परंतु ते मिळून आले नाही सदर पकडलेल्या इसमांना  त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव १) निसार रज्जाक शेख वय 38 वर्षे राहणार हुसेन नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर२) राजू शामराव दामोदर वय 42 वर्षे राहणार हूसेन नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर ३) तौपिक आयुब पठाण वय 27 वर्षे राहणार हुसेन नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर असे सांगितले सदर माणसांची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता निसार शेख याच्या अंगझडतीत एक चाकू नायलॉन दोरी मिळून आली, राजू शामराव दामोदर याच्या अंगझडतीत पॅन्टच्या खिशात मिरचीपूड मिळून आली, तोपिक आयुब पठाण यांचे अंगझडतीत  लोखंडी कटावणी मिळून आली. वरील प्रमाणे हत्यारे व मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल गौरव राजेंद्र दुर्गुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर८८/२०२२ भादविक ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई  श्री .मनोज पाटील पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री.संजय सानप, सपोनि.जिवन बोरसे, पोलीस नाईक.पंकज गोसावी, पोलीस नाईक. बिरप्पा करमल, पोलीस नाईक.सचिन बैसाने, पोलीस नाईक.रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिज आत्तार ,पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे ,पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार, यांनी केली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- सातवी राज्यस्तरीय वर्ड फुनाकोशी शाँतोकोन कराटे चॅम्पियन शिप ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये श्रीरामपूर मार्शल आर्टचे प्रशिक्षक कलीम बिनसाद यांच्या मार्गदर्शनाखाली 25 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते या राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये जिल्हाभरातून 600 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी श्रीरामपूर मार्शल आर्ट च्या पंचवीस विद्यार्थ्यांनी 50 मेडल मिळून श्रीरामपूर मार्शल आर्ट ची शान वाढविली  श्रीरामपूर मार्शल आर्ट च्या पंचवीस विद्यार्थ्यांनी 18 गोल्ड मेडल 25 सिल्वर

मेडल तर 7 ब्राउन मेडल असे पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये पन्नास मेडल मिळवले तर पहिले पारितोषिक हे श्रीरामपूरच्या मार्शल आर्ट ने पटकावले. यामध्ये विजय झालेल्या मुलांची नावे याप्रमाणे मुबारक बिनसाद, इब्राहिम बिनसाद,अबरार पटेल, बुशरा पटेल,जोया पटेल,अंकिता गौड, समृद्धी वाव्हळ,किर्तिका जगदाळे,सोहम जगदाळे,विर वाव्हळ,ऋषिकेश बैरागी,सायली सोर्णे,श्रद्धा सोर्णे,सोहम थोरात,समर्थ थोरात,प्रथमेश वालतुरे , रेहान आतार,सक्षम मानधने,कार्तिक शेलार,चिदंबर ठोंबरे,सार्थक वाव्हळ,वेदीका वाव्हळ,धनेश ताथेड ,हुसैन शेख,सोहम गतीर,व्यंकटेश शिंपी,

या मुलांना श्रीरामपूर येथील मिनी स्टेडियम या ठिकाणी मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. संदीप मिटके

साहेब, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. संजय सानप साहेब, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे साहेब, पी.एस.आय. बोरसे साहेब, शहराच्या प्रथम नागरिक अनुराधाताई आदिक,नगरसेवक राजेंद्र पवार, महाराष्ट्र लघु व्रत्त पत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली, डॉक्टर मयूर कापसे समाजसेविका आपसरा भाबी शेख या प्रमुखांनी या मुलांचा गुणगौरव करून त्यांना सन्मानित केले यावेळी श्रीरामपूर मार्शल आर्ट चे संस्थापक प्रशिक्षक श्री कलीम बिनसाद सर यांनी मुलांनी केलेली पराक्रमी कामगिरी बद्द्ल पाहुण्यांना माहिती दिली यानंतर पाहुण्यांनी या चिमुकल्यांचे खूप कौतुक केले. पाहुण्यांसमोर मुलांनी प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी अनुराधाताई अधिक यांनी या सात ते पंधरा वयोगटातील मुलांनी व मुलींनी खूप मोठे काम केले आपल्या श्रीरामपूर शहराचे नाव पुढे नेले आणि अशीच कामगिरी या मार्शल आर्ट च्या वतीने घडेल अशी मला खात्री आहे असे ते बोलले व यासाठी वाटेल ती मदत मी करेल व मुलांसाठी रबर मॅट ची व्यवस्था आपण लवकरात लवकर करून देऊ असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमामध्ये आपल्या परिसरातील अकॅडमीचे प्रशिक्षण वैभव शिरसागर, सोपान लाटे, प्रभाकर शेळके, अशोक शिंदे, एस न्युज चे जयेश सावंत  हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकील बागवान सर यांनी केले तर आलेल्या पाहुण्यांचे तसेच पालकांचे आभार एडवोकेट अजित डोके यांनी मानले.

श्रीरामपूर प्रतिनिधी - आज दि. 13/02/2022 रोजी Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी टाकळीभान परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला. आरोपी. क्र.)1)   बाळू शहादु मोरे रा टाकळीभान तालुका श्रीरामपूर 42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.) 2000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)आरोपी. क्र.) 2.  संगीता मच्छिंद्र डुकरे रा. माळेवाडी टाकळीभान तालुका श्रीरामपूर 38,500/-  रु. कि.चे 550 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)1500/- रू  किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)एकूण 84,000/-/-  रुपये वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.अचानक झालेल्या या कारवाईमुळे   टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे टाकळीभान येथील महिलांनी  Dysp संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp  संदीप मिटके, ASI राजेंद्र आरोळे,HC सुरेश  औटी,PC नितीन शिरसाठ आदींनी केली.

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) -येथील हरेगांव फाटा पोलिस चौकीतील कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी नाईक,किरण पवार, राजेंद्र देसाई,गणेश गायकवाड इ.कर्तव्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष पोलिसांच्या उत्कृष्ट कामगीरीने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे,जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके,शहर पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन अंतर्गत हरेगांव फाटा पोलिस चौकीतील कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांनी २,३ अपहरण प्रकरण तसेच मोबाईल गहाळ प्रकरणी मोठी कसरत आणि मेहनत करत सदरील प्रकरणी गुन्ह्याचा २४ तासाच्या आत छडा लाऊन उत्कृष्ट कामगीरी बजावली असल्याबद्दल येथील आझाद फाऊंडेशनच्यावतीने शहर पोलिस निरीक्षक संजय सानप आणि हरेगांव फाटा पोलिस चौकीच्या कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार करुन सन्मान करण्यात आला.यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप, पोउनि.समाधान सुरवाडे,गोपनीय शाखेचे पोकॉ.गुंजाळ,संतोष परदेशी,संतोष दरेकर, तुषार गायकवाड,महेश पवार,हरेगांव फाटा पोलिस चौकीचे पोलिस नाईक किरण पवार, राजेंद्र देसाई,गणेश गायकवाड समवेत आझाद फाऊंडेशनचेअध्यक्ष साजिद शेख,राज खान ,फारुक शेख,परवेज शेख,असलम शेख,समता फाऊंडेशनचे अॅड. मोहसीन शेख, जिशान सय्यद, सचिन धनवटे,नजीम शेख,राहुलभोसले,मतीन शेख,नदीम सय्यद, तबरेज कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

नाशिक  प्रतिनिधी - गोदावरी नदीवरील ऐतिहासिक रामसेतू पंचवटी व नाशिक शहराला जोडणारा मोठा दुआ आहे. हा रामसेतू तोडण्याच्या हालचाली स्मार्ट सिटीचे अधिकारी करत आहेत, असे सांगत त्याला आमचा विरोध असल्याचे रामसेतू बचाव अभियानच्या कल्पना पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.रामसेतूमुळे नाशिक शहरातून पंचवटीला येण्यासाठी सोयीचे ठरते. या पुलावर गेल्या अनेक वर्षापासून शेकडो छोटे व्यावसायिक आपला रोजगार करून पोट भरत आहेत. हा रामसेतू कायमचा नष्ट करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.स्मार्टसिटी योजनेंतर्गत नारोशंकर मंदिराजवळील दोन सांडवे तोडण्यात आल्याने नागरिकांना ये - जा करण्यासाठी रामसेतूची मदत घ्यावी लागत आहे. रामसेतू तोडला तर नाशिक व पंचवटीतील रहिवाशांना जाण्यायेण्यासाठी प्रचंड अडचणीचे ठरणार आहे.तरी रामसेतू तोडण्यास आमचा कायमच विरोध राहील, विशेष म्हणजे रामसेतूची उभारणी इंग्रजकालीन आहे. तरीही रामसेतू अजून ताठ मानेने उभा आहे, अशी माहिती कल्पना पांडे यांनी दिली.रामसेतूवरून शेकडो वेळा गोदावरीच्या पुराचे पाणी गेले असतानाही रामसेतू तसाच आहे. शासनाचा विकास करण्याचा उद्देश असला तरी ऐतिहासिक स्थळे कशी शाबूत राहतील हा उद्देशही नजरेसमोर ठेवावा. ज्या स्मार्टसिटी योजनेअंतर्गत रामसेतू तोडण्याचा प्रयत्न होत आहे, त्या स्मार्टसिटीच्या कामांचा दर्जा कसा आहे हे सांगणे नको. दोन-तीन महिन्यातच पुराच्या पाण्याने फरशा कशा वाहून गेल्या होत्या हे समोर आलेले आहे. त्यामुळे स्मार्टसिटीच्या विकासाबाबत सुसूत्रता अजिबात नाही,असा आरोप त्यांनी केला.कारण नसताना रस्ते खोदायचे व दोन-तीन महिने तशाच अवस्थेत ठेवायचे, त्या खड्ड्याला बुजवण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा पदरात पाडून घ्यायचा हाच यामागील उद्देश आहे,असेही पांडे यांनी सांगितले.रामसेतू बचाव अभियान यशस्वी होण्यासाठी नाशिक शहरातील नागरिकांची सह्यांची मोहीम सुरु करण्यात येणार आहे . यावेळी पांडे यांच्यासह सुनंदा जगत, सुनंदा जगताप, स्वप्नील आहेर, सचिन खिंडारे, संदीप बोरकर, सुभाष पोतदार, संजय वाली उपस्थित होते.


पुणे प्रतिनिधी - गावाचा विकास होतांना भौतिक सामाजिक व अशा मूलभूत अशा सुविधा झाल्या पाहिजेत यासाठी शासनाच्या ग्राम विकासाच्या विविध योजना राबवतांना प्रत्यक्ष अमंलबजावणी   होतांना लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटोदा आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील उपस्थित होते.ग्रामगौरव आणि शब्दसारथी संस्थेतर्फे कृषि व ग्राम विकासाचे धोरण काल,आज व उद्या या परिसंवादाचे आयोजन लॉ कॉलेज रस्त्यावरील प्रसाद अपार्टमेंटच्या आवारात करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे गोल्डमॅन प्रशांत सपकाळ,ग्रामगौरवचे विवेक ठाकरे,कु.धनश्री ठाकरे, अमोल मचाले,पराग पोतदार, विशाल घोडेस्वार,सुनिल शेटे, प्रिया

गायकवाड,आर्यन आखाडे, वाय.डी. पाटील,शरद चौधरी आदी उपस्थित होते. परिसंवादाच्या सुरुवातीला ग्रामगौरवच्या राज्यस्तरीय कॉर्पोरेट कार्यालायाचे उदघाटन वृषभ व बैलगाडीचे पूजन करून उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. आदर्श गावाचा आदर्श घेण्याची गरज राज्यात लौकिकपात्र काम केलेल्या ग्रामपंचायतींना शासन आदर्श गाव म्हणून पुरस्कृत करते या आदर्श गावांचे अनुकरण व आदर्श घेण्याची गरज आहे.आपल्या गाव स्वउत्पन्नातून आत्मनिर्भर कसे होईल, यासाठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे,असे परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक भास्कर पेरे-पाटील यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले.सुनील सुतार,गौरव ठाकरे,राजू भडके,शरद चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

अहमदनगर- पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल  असणारे,  ११ वर्षापूर्वीचा खूनाचा गुन्हा उघड झाला आहे. वाहनचालकाचा खून करुन प्रेत सिंधखेड राजा, (जि. बुलढाणा) येथे जाळून पुरावा नष्ट करुन नावात बदल व ओळख लपवून राहणारे आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. भरत मारुती सानप असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.११) पञकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके व स्थानिक गुन्हे शाखेतील तपासी अधिकारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी जिल्हयातील गंभीर स्वरुपाचे ना उघड खून, दरोडा, जबरी चोरी उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्याकडून  अहमदनगर यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणणे बाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शेवगाव    उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे व पोनि श्री कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि गणेश इंगळे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाने, पोना भिमराज खसे, सुरेश माळी, रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार व चापोहेकॉ बबन बेरड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्ह्यांचा आढावा घेत असतांना पोनि श्री.कटके यांना गुप्तबातमीदार मार्फत माहिती मिळाली की, पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०७/२०११ भा.द.वि.कलम ३६४, ३९४, ३४ प्रमाणे घातपाताचे दृष्टीने अपहरण व जबरी चोरी करण्याचे उद्देशाने गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी भरत मारुती सानप हा अद्यापपर्यंत फरार असून, त्याची कोणतीही माहिती नाही. या दाखल गुन्ह्याची  माहिती अशी की, दि. २३ मार्च ११ रोजी   नितीन सखाराम सोनवणे (वय २४, धंदा ड्रायव्हर, रा. यमुनानगर, सर्व्हे नं. १९९, विमाननगर, पुणे नगर रोड, पुणे-१४) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, दि.११ मार्च १९ रोजी भाऊ  अनिल सखाराम सोनवणे (वय २९) हा व त्याचा वाहनचालक  भरत मारुती सानप (रा. खडकवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे त्याचे जवळील माल ट्रक (नं. एमएच-१२-एव्ही-६४४९) अशी घेऊन रायपुर येथे बायडींग वायर भरण्यासाठी गेले होते. दि. १६ मार्च ११ रोजी रायपुर येथून ५ लाख ४८ हजार  ९४० रु.ची बायडींग वायर भरुन पुणे येथे येण्याकरीता निघाले होते. दि.१८ मार्च २०११ रोजी सकाळी ते जालना येथे आल्याबाबत  भाऊ अनिल सोनवणे याने फोन करुन सांगितले होते. त्यानंतर त्याचा फोन लागला नाही. दि. २१ मार्च ११ रोजी  मालट्रक बेवारस अवस्थेमध्ये भगवानगड (ता. पाथर्डी) येथे मिळून आली होती. ट्रकमधील बायडींग वायर नव्हती तसेच ट्रकचे कॅबीनमध्ये रक्ताचे डाग दिसले होते. तसेच भाऊ अनिल सोनवणे याच्या सोबतचा  चालक भरत सानप याचा फोन बंद होता. यावरुन भरत सानप याने भाऊ अनिल सोनवणे यास जबर मारहाण व घातपात करण्यासाठी अपहरण करुन ट्रक मधील ५ लाख ४८ हजार ९४० रु.कि.ची. बायडींग वायर बळजबरीने चोरुन नेली आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत  खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील स्वंतत्र पथक स्थापन करुन मिळालेल्या माहितीचे आधारे सूचना करून  गुन्ह्यातील फरार आरोपीबाबत माहिती घेऊन अटक करण्याबाबत आदेश दिले. पथकाने गुन्हा व गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती घेतली असता आरोपी भरत मारुती सानप (रा. खडकवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) हा सध्या कन्हेरवाडी (ता. परळी, जि. बीड) येथे स्वतःचे नावात बदल करुन व ओळख लपवून राहत आहे. अशी माहिती तपास पथकास मिळाल्याने त्यांनी आरोपीचा याचा शोध घेऊन त्यास कन्हेरवाडी (ता. परळी, जि. बीड) येथून ताब्यात घेतले. यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिमान मारुती सानप (वय ३७, रा. खडकवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे चुकीचे नाव सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. मी अभिमान मारुती सानप असून तसे आधारकार्ड पथका समक्ष सादर केले. परंतु तपास पथकाची पूर्णखात्री होती की,  हाच भरत मारुती सानप आहे. त्यामुळे पथकाने त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे कसून चौकशी करता त्यांचेकडे असलेल्या ओळखी बाबतच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी केली. त्यामध्ये त्याचेकडे सन २००६ मधील मतदान ओळखपत्र सापडले. त्यावर त्याचे नाव भरत मारुती सानप असे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याने मीच भरत मारुती सानप असे असल्याचे सांगून पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. १०७/२०११ भा.द.वि.कलम ३६४, ३९४, ३४  गुन्हा केल्याने मला पोलीसांनी पकडू नये म्हणून मी माझी ओळख लपवून नावात बदल करुन अभिमान या नावाने राहत होतो. अशी कबुली देऊन अनिल सोनवणे हा नेहमी मला माझ्या पत्नी विषयी वाईट बोलायचा त्याचा मला राग होता म्हणून देवरीगाव (जि गोंदिया) येथे ट्रकचे टायरमधील हवा चेक करण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यावेळी आमच्यामध्ये वाद झाले. मला त्याचा राग आल्याने मी त्याचे डोक्यात टायरमधील हवा चेक करण्यासाठी टायर वाजवण्यासाठी माझ्या हातात असलेला व्हील पान्हा त्याच्या डोक्यात मारला होता. त्यावेळी तो जागेवर बेशुध्द झाल्याने मी त्यास तसाच उचलून गाडीचे केबिनमध्ये टाकला होता. मी ट्रक चालवित सिंधखेडराजा (जि. बुलढाणा) येथे आल्यावर अनिल सोनवणे याची हालचाल बंद झाल्याने तो मयत झाला आहे, असे समजून मी त्यास सिंधखेडराजा ते जालना जाणारे रोडवरील खदानजवळ नाल्यावरील पुला जवळ ट्रक थांबवून ट्रकमधील अंथरुन व पांघरुन घेण्याचे कपडे व नाल्याजवळील सुकलेले गवत त्याचे अंगावर टाकून त्यास पेटवून देवून तेथून निघून आलो. त्यांनतर माझ्या ओळखीचे सुनिल आश्रुबा सानप, परमेश्वर उत्तम दराडे यांचे मदतीने ताब्यातील ५ लाख ४८ हजार ९४० रु.कि.ची बायडींग वायरची विल्हेवाट लावली होती.अशी माहिती आरोपी अभिमान ऊर्फ भरत मारुती सानप सांगितल्याने ही बाबतची खात्री करण्यासाठी पोलीस पथक सिंदखेडराजा पोलीस ठाणे (जि. बुलढाणा) येथे जाऊन पोलीस ठाण्यातील अभिलेखाची खात्री केली असता दि. १९ मार्च २०११ रोजी सिंधखेडराजा पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२/११ भादविक ३०२, २०१ प्रमाणे खून करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले आहे. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मिळून न आल्याने गुन्ह्याची अ-वर्ग समरी करुन गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आलेला होता.गुन्ह्यांची खात्री होऊन आरोपी निष्पन्न झाल्याने तपास पथकाने आरोपीस  अभिमान ऊर्फ भरत मारुती सानप यास ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात  हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.अशा प्रकारे पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाचे गुन्ह्यात आरोपीस अटक करुन ११ वर्षापूर्वी घडलेल्या व सध्या गुन्ह्याची वर्षापुर्वी घडलेल्या व सध्या गुन्ह्याची अ-वर्ग समरी करुन गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आलेल्या खुनाचा गुन्हा उघडकिस आणून आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget