श्रीरामपूर प्रतिनिधी- सातवी राज्यस्तरीय वर्ड फुनाकोशी शाँतोकोन कराटे चॅम्पियन शिप ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये श्रीरामपूर मार्शल आर्टचे प्रशिक्षक कलीम बिनसाद यांच्या मार्गदर्शनाखाली 25 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते या राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये जिल्हाभरातून 600 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी श्रीरामपूर मार्शल आर्ट च्या पंचवीस विद्यार्थ्यांनी 50 मेडल मिळून श्रीरामपूर मार्शल आर्ट ची शान वाढविली श्रीरामपूर मार्शल आर्ट च्या पंचवीस विद्यार्थ्यांनी 18 गोल्ड मेडल 25 सिल्वर
मेडल तर 7 ब्राउन मेडल असे पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये पन्नास मेडल मिळवले तर पहिले पारितोषिक हे श्रीरामपूरच्या मार्शल आर्ट ने पटकावले. यामध्ये विजय झालेल्या मुलांची नावे याप्रमाणे मुबारक बिनसाद, इब्राहिम बिनसाद,अबरार पटेल, बुशरा पटेल,जोया पटेल,अंकिता गौड, समृद्धी वाव्हळ,किर्तिका जगदाळे,सोहम जगदाळे,विर वाव्हळ,ऋषिकेश बैरागी,सायली सोर्णे,श्रद्धा सोर्णे,सोहम थोरात,समर्थ थोरात,प्रथमेश वालतुरे , रेहान आतार,सक्षम मानधने,कार्तिक शेलार,चिदंबर ठोंबरे,सार्थक वाव्हळ,वेदीका वाव्हळ,धनेश ताथेड ,हुसैन शेख,सोहम गतीर,व्यंकटेश शिंपी,
या मुलांना श्रीरामपूर येथील मिनी स्टेडियम या ठिकाणी मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. संदीप मिटके
साहेब, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. संजय सानप साहेब, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे साहेब, पी.एस.आय. बोरसे साहेब, शहराच्या प्रथम नागरिक अनुराधाताई आदिक,नगरसेवक राजेंद्र पवार, महाराष्ट्र लघु व्रत्त पत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली, डॉक्टर मयूर कापसे समाजसेविका आपसरा भाबी शेख या प्रमुखांनी या मुलांचा गुणगौरव करून त्यांना सन्मानित केले यावेळी श्रीरामपूर मार्शल आर्ट चे संस्थापक प्रशिक्षक श्री कलीम बिनसाद सर यांनी मुलांनी केलेली पराक्रमी कामगिरी बद्द्ल पाहुण्यांना माहिती दिली यानंतर पाहुण्यांनी या चिमुकल्यांचे खूप कौतुक केले. पाहुण्यांसमोर मुलांनी प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी अनुराधाताई अधिक यांनी या सात ते पंधरा वयोगटातील मुलांनी व मुलींनी खूप मोठे काम केले आपल्या श्रीरामपूर शहराचे नाव पुढे नेले आणि अशीच कामगिरी या मार्शल आर्ट च्या वतीने घडेल अशी मला खात्री आहे असे ते बोलले व यासाठी वाटेल ती मदत मी करेल व मुलांसाठी रबर मॅट ची व्यवस्था आपण लवकरात लवकर करून देऊ असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमामध्ये आपल्या परिसरातील अकॅडमीचे प्रशिक्षण वैभव शिरसागर, सोपान लाटे, प्रभाकर शेळके, अशोक शिंदे, एस न्युज चे जयेश सावंत हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकील बागवान सर यांनी केले तर आलेल्या पाहुण्यांचे तसेच पालकांचे आभार एडवोकेट अजित डोके यांनी मानले.
Post a Comment