Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या तालुक्यातील मक्तापूर येथील एका सराईत गुन्हेगारास नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याच्या पोलीस पथकाने कट्ट्यासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत नगरच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, एक इसम गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सोनई येथे येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिंळाल्याने त्यांनी आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, हवालदार मनोहर गोसावी, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, कॉन्स्टेबल सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने, रोहित येमूल व चालक हवालदार बबन बेरड अशांनी मिळून कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथे सापळा लावला.तिघे सचिन वसंतराव कोळेकर रा. मक्तापूर ता. नेवासा याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा 26 हजार रुपये किमतीच्या वस्तू मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले.सचिन वसंतराव कोळेकर याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. सेकंड 35/2022 आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

कोपरगाव प्रतिनिधी-कोपरगाव तालुक्यातील जवळके नावाचे छोटेसे गाव आणि या गावातली तीन युवक फिरोज  मनियार, अक्षय थोरात अन् सागर दरेकर संगीताच्या क्षेत्रामध्ये स्वतःच नशीब आजमावत आहेत. त्यांच तिसर गाण गर्लफ्रेंड   होशीलका ? हे गाणे नुकतेच  FSA PRODUCTION ह्या युट्युब चॅनेल वर प्रदर्शित झाले आहे. आशिष श्रावणी दिग्दर्शित या गाण्यात शाळा वेबसिरीज फेम अनुश्री माने तसेच सेजल अमनेकर, अक्षय थोरात , सागर

दरेकर यांनी  अभिनय केला असून प्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक फिरोज मणियार तसेच महाराष्ट्राच्या नामवंत गायिका सोनाली सोनवणे यांनी या गण्यास आवाज दिला आहे.अधिक माहिती अशी की, यातील फिरोज  हा स्थापत्य अभियांत्रिकी आहे. त्याच्या या स्वप्नाला त्याचे मित्र अक्षय थोरात (एम कॉम) आणि सागर दरेकर  (विद्युत अभियांत्रिकी ) यांची खंबीर साथ मिळत आहे.घरची बेताची परिस्थिती आणि त्यातून घेतलेले शिक्षण यात नोकरीच्या मागे न लागता तिन्ही युवक एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. आणी त्यांची स्तुती ही  एवढ्यासाठीच त्यांनी कुणाचाही आधार न घेता आपले तिसरे गाणे प्रदर्शित केले. ह्या क्षेत्रामध्ये आजकाल खूप तरुणी- तरुणांचा सहभाग वाढत चाललेला दिसतोय पण तुमच्यात जिद्द आणि त्यासाठी धडपड असणं आवश्यक आहे. हीच जिद्द धडपड घेऊन फिरोज मणियार व त्याच्या सह टीम ने चांगली भरारी घेतली आहे.यापूर्वी त्यांची दोन गाणी सादर झालेले असून त्यातील एक गाणे झी म्युझिक सारख्या मोठ्या वाहिनीने घेतलेले आहे तर त्यांच्या 'FSA PRODUCTION' या निर्मिती अंतर्गत चालणाऱ्या यूट्यूब चैनल वर ही त्यांचे अनेक चाहते आहेत.आज सर्व सुविधा सोयी उपलब्ध असतांना युवक नवीन काही  करण्यास हिम्मत करत नाहीत परंतु आपल्या परिस्थितीला शिक्षणाला कुठेही आडवे येऊ न देता आर्थिक परिस्थितीशी झगडत या युवकांनी जे क्षेत्र निवडले आहे त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्याची धडपड करत आहेत ती निश्चितच अभिनंदनीय आहे.फिरोज या क्षेत्रात कसा आला हे विचारला असता साईंच्या दरबारी भजन गात गात निर्माण झालेली आवड पुढे स्वप्न झाली आणि त्यातच करिअर करायचं ठरलं. गीतकार ,संगीतकार आणि गायक ह्या तिन्ही आघाड्यांवर आव्हान पेलताना दोन्ही जिवलग मित्र मोलाची साथ देत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द,नवीन शिकण्याची तयारी आणि मेहनती स्वभाव यामुळे हे तारे संगीत क्षेत्राच्या आकाशात नक्कीच चमकतील ही खात्री आहे.या युवकांच्या प्रयत्नास साईबाबा संस्थांनचे अध्यक्ष नामदार आशुतोष दादा काळे तसेच युवा नेते सुमित दादा कोल्हे,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनिष जाधव आदी मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


श्रीरामपुर  /( खास प्रतिनिधी )-अवैध धंदेवाल्याकडून हप्तेवसुली संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना तातडीने पोलीस नियंत्रण  कक्षअहमदनगर येथे नेमणूक करण्यात आली असुन दोघा पोलिसांना निलांबीत करण्यात आले आहे.                                          अवैध धंद्यावाल्याकडून वसुली बाबत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व पोलीस वैरागर तसेच राऊत यांच्या संभाषणाची आँडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती त्याची दखल घेवुन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी हे आदेश काढले आहेत.त्या संभाषणात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे हे राऊत यास वसुलीचे काम वैरागर याच्याकडे देण्यात आले असुन तु वसुली करु नको कुणाकडे जावु नको असे सांगत आहेत या सर्व गंभीर प्रकरणाची पोलीसा अधिक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दखल घेत ताताडीने पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नगर मुख्यालयात नियत्रंण कक्षात बदली केली आहे  तर पोलीस शिपाई लक्ष्मण दशरथ वैरागर, कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत यांना निलंबीत केले आहे  हे दोघेही श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

व्हायरल झालेल्या क्लिप मध्ये अधिकारी वसुली संदर्भात सल्ला देत असल्याचे ऐकु येते. वसुलीचे काम दुसऱ्याचे असल्याचे या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला म्हटल्याचे क्लिप मध्ये स्पष्ट होते. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची धमकी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत एस पी मनोज पाटील यांनी पोलीस निरीक्षक साळवे यांची बदली तर दोघांच्या निलंबनाचे आदेश काढत चौकशी सुरू केली आहे.तर श्रीरामपूर पोलिसांतून आणखी दोन संशयाच्या भवर्यात. 


श्रीरामपूर प्रतिनिधी - 
भीम आर्मी भारत एकता मिशन चे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे साहेब, महाराष्ट्र प्रभारी दत्तू मेढे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे साहेब, महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दिपकजी भालेराव साहेब यांच्या आदेशानुसार भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक मा. पँथर ऋषी पोळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत.भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष साजिद भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचा विषय असा होता कि, _रोहन माळवदकर_ या मनुवादी लेखकाने "वास्तव" या पुस्तकात _भिमाकोरेगाव चा खोटा इतिहास लिहिला आहे. तसेच ब्राम्हण महासंघाने हि पुस्तके फुकट वाटू अशी बुरसटलेल्या विचारसरणीची मानसिकता दाखवली._  त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाचे असल्यामुळे सदरच्या घटनेचा निषेध म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून काळी फीत लावून दिनांक 30/01/2022 रोजी सकाळी 11 वाजता  निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार तसेच श्रीरामपूर पोलीस प्रशासनाच्या अटीनुसार मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरचे आंदोलन करण्यात आले.यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दीपकजी भालेराव साहेब, स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पँथर ऋषी पोळ साहेब, महाराष्ट्र सदस्य गौरव भालेराव, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष साजिद भाई शेख, राहाता तालुकाध्यक्ष सुनील भाऊ मोकळ, राहाता तालुका संघटक शब्बीर भाई कुरेशी, स्टुडंट्स फेडरेशन राहाता तालुका संघटक साहिल गायकवाड,विश्वदीप सोनवणे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.




इच्छा होती मात्र वेळ नव्हता, ध्वजारोहन करणे हे कर्तव्य.
श्रीरामपूर प्रतिनिधी - पालिकेच्या ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचा अट्टहास का?राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्य भरातील नगरपालिकासह याही नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. ज्या ज्या ठिकाणच्या  नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. अशा नगरपालिकांची सूत्रे प्रशासकांनी हाती घेतले आहेत. २६ जानेवारी २०२२ रोजी आपल्या हस्ते शहर आणि तालुक्यात ठीकठिकाणी ध्वजारोहणासह इतरही अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित अशी होती. पालिकेतील ध्वजारोहणाचे आपणास कोणत्याही प्रकारचे मुख्य अधिकाऱ्यांकडून उपस्थित राहण्या संदर्भातले निमंत्रण नव्हते. असे असले तरी नगरपालिका ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला . मात्र शहरातील संत लूक हॉस्पिटल मधील ध्वजारोहन हे आपल्या हस्ते पूर्वनियोजित असे होते. ते टाळणे अपरिहार्य असे होते. आणि पालिकेच्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहिले पाहिजे असा काही नियम नाही,त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा अट्टहास का?असा सवाल करून नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या,

खरेतर प्रजासत्ताक दिन हा सर्व स्तरातील सर्वांचाच असतो आणि एकाच वेळी सर्व त्याठिकाणी ध्वजारोहणास जाता येणे शक्य नाही. जो तो आपापल्या मर्जीनुसार आणि निमंत्रनानुसार प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो. त्याचा सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे.  शासकीय ध्वजारोहनासह काँग्रेस भवन आणि संत लूक हॉस्पिटल या ठिकाणचे ध्वजारोहण करण्यास संदर्भातले निमंत्रण मला असल्या कारणाने अगोदर या ठिकाणी मी ध्वजारोहण केले आहे. इच्छा असूनही आपण मात्र  नगरपालिकेच्या ध्वजारोहणास उपस्थित राहू शकलो नाही. वेळेचे बंधन असल्याकारणाने  सर्व ठिकाणचे ध्वजारोहण करण्यासाठी एकाच वेळी उपस्थित राहता येत नाही. असे श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष महाराष्ट्र कृषक समाजाच्या अध्यक्षा आणि साईबाबा संस्थांनच्या विद्यमान विश्वस्त अनुराधा ताई आदिक यांनी म्हटले आहे. 



श्रीरामपूर : २६ जानेवारीला डॉ बाबसाहेबांनी लिहलेल्या संविधानाच्या माध्यमातून, सर्व देशवासियांना विचार स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्य मिळाले. मात्र ज्या संविधनामुळे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली,अशा श्रीरामपूर पालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक यांना, पालिकेत प्रशासक येताच, शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पाठ फिरवल्याचे लक्षात आलेने, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा यांना पालिकेच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचा विसर पडल्या संदर्भात बातमी लावल्याचा राग अनावर झाल्याने, एका वृत्तपत्राचे संपादक असलेल्या स्वर्गीय खासदार गोविंदरावजी आदिक यांच्या कन्येने, तुम्ही पत्रकार आमच्या विरोधात पैसे घेऊन खोट्या बातम्या लावतात ? आम्हाला इतर कामे नाहीत का ,पालिकेच्या ध्वजारोहणास जायला आम्ही रिकामी टेकडे आहे का ? अशा शब्दांचा वापर करून, जवळपास १५० ते  २०० लोकांच्या जमवा समोर आरेरावीची भाषेत एस न्यूज मराठी ,चौफेर कानोसा या प्रसार माध्यमांमध्ये, व्यवस्थापकीय संपादक पदावर काम करत असलेल्या पत्रकारा समोर, सर्व पत्रकारांचा अपमान केल्याची निंदनीय घटना घडली. या घटनेच्या निषेध नोंदवित ग्रामीण पत्रकार महासंघाच्या वतीने, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व उपविभागीय प्रांताधिकारी अनिल पवार ,तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपूर यांना निवेदन देऊन,भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा अपमान करत, पत्रकारांशी अरेरावी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यायावी अशी मागणी केली असून. जर तत्कालीन राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास संघटनेच्या वतीने विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा,ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी दिला असून, त्यामुळे निर्माण होणारी संभाव्य परिणाम व परिस्थितीस , राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक या वैयक्तिक व संयुक्तिक रित्या जबाबदार राहातील असेही जाहीर केलं आहे. या आंदोलना वेळी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख किरण शिंदे, साईकिरण टाइम्सचे राजेश बोरुडे, तिरंगा न्यूजचे अस्लम बिनसाद, एस ९ न्यूजचे युनूस इनामदार, स्वप्नील सोनार, लोकमतचे भरत थोरात, व्हिजन प्लसच्या सायरा सय्यद, एस न्यूज च्या मनीषा थोरात, अविनाश लिहणार, पत्रकार विठ्ठल गोरणे, आदी उपस्थित होते.

अहमदनगर प्रतिनिधी-जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस कर्मचारी हरिभाऊ मांडगे (वय 40, रा. पिंपरी गवळी, ता. पारनेर) यांनी शनिवारी (दि. 29) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.हरिभाऊ मांडगे यांच्यावर कौटुंबिक वादातून 2018 आणि 2022 मध्ये दोन गुन्हे सुपा (ता. पारनेर) पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget