Latest Post

राहुरी,आज दि.  12/01/2022 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना राहुरीतील हॉटेल न्यू  भारत  तसेच राहुरी ते शिर्डी जाणारे रोडवर  हॉटेल न्यू प्रसाद चे शेजारी सेक्स रॅकेट वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे  राहुरी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन  तीन पिडीत  महिलांची सुटका करण्यात आली आहे. 

 LPN स्वाती कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 1)  सय्यद फरहाद इरशाद अहमद  वय 34 रा   बुवासिंद बाबा चा दर्गा समोर राहुरी, याच्याविरुद्ध  राहुरी पोलीस स्टेशन  येथे Cr no. 24/2022  स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. LPC मीना नाचन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 2)   राजू शिवाजी इंगळे रा इंदिरा नगर वार्ड नंबर 6 श्रीरामपूर  याच्या विरुद्ध   राहुरी पोलिस स्टेशन येथे cr. No.25 /2022 महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आलेला आहे या कारवाईमुळे राहुरी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, मा. डॉ.  दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली Dyspसंदीप मिटके , PI मधुकर साळवे, पो.कॉ. नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे,  सचिन ताजणे,  गणेश फाटक,  इफ्तेकार सय्यद, चा.पो.का  चांद सय्यद, LPN स्वाती कोळेकर ,LPC मीना नाचन यांच्या पथकाने केली.

राहुरी,आज दि.  12/01/2022 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना राहुरीतील हॉटेल न्यू  भारत  तसेच राहुरी ते शिर्डी जाणारे रोडवर  हॉटेल न्यू प्रसाद चे शेजारी सेक्स रॅकेट वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे  राहुरी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन  तीन पिडीत  महिलांची सुटका करण्यात आली आहे. 

 LPN स्वाती कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 1)  सय्यद फरहाद इरशाद अहमद  वय 34 रा   बुवासिंद बाबा चा दर्गा समोर राहुरी, याच्याविरुद्ध  राहुरी पोलीस स्टेशन  येथे Cr no. 24/2022  स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. LPC मीना नाचन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 2)   राजू शिवाजी इंगळे रा इंदिरा नगर वार्ड नंबर 6 श्रीरामपूर  याच्या विरुद्ध   राहुरी पोलिस स्टेशन येथे cr. No.25 /2022 महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आलेला आहे या कारवाईमुळे राहुरी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, मा. डॉ.  दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली Dyspसंदीप मिटके , PI मधुकर साळवे, पो.कॉ. नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे,  सचिन ताजणे,  गणेश फाटक,  इफ्तेकार सय्यद, चा.पो.का  चांद सय्यद, LPN स्वाती कोळेकर ,LPC मीना नाचन यांच्या पथकाने केली.

श्रीरामपूर शहराची रचना दोन विभागांमध्ये विभागलेली आहे रेल्वेच्या अलीकडे आणि रेल्वेच्या पलीकडे असे दोन भाग श्रीरामपूर शहराचे आहेत आणि दोन्ही बाजूने शहर झपाट्याने वाढत आहे. बेलापुर रेल्वे स्टेशन वर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व प्लॅटफॉर्म क्रमांक 2 असे दोन प्लॅटफॉर्म असून दररोज येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या 30 गाड्यांची आहे  रेल्वे स्टेशन वर  प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाण्यासाठी रेल्वेच्या पलीकडील बाजूस  रेल्वे स्टेशन व तिकीट घर अधिकृत एकच प्रवेशद्वार देण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरातील  प्रवाशांची कुचंबणा होत आहे. बऱ्याच वेळेस रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर  आल्यास दादर ने चढून प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर आपल्या जवळ असलेल्या सामानाने जावे लागते बऱ्याच वेळेस तर रेल्वे येण्याच्या ऐन वेळी रेल्वे कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे हे अलाउन्ससिंग करण्यात येते त्यामुळे प्रवाशांची  मोठी धावपळ उडते व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वाढत असलेल्या शहराची रचना पाहता पुढील भविष्यासाठी दोन्ही बाजूला  रेल्वे स्टेशन तसेच तिकीट घर असणे अत्यंत आवश्यक आहे तरच शहराचा विकास होणार आहे म्हणून रेल्वेच्या पलीकडील बाजूस प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर त्वरित रेल्वे स्टेशन व तिकीट घर उभारणी करण्यात यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी व नगरसेवक राजेश अलघ यांनी केंद्रीय

रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे सदर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या बाजूच्या रेल्वे पलिकडील रेल्वे स्टेशनची निर्मिती मागणी त्वरित मान्य होण्यासाठी शहरातील व्यापारी तसेच रेल्वे पलीकडे राहणारे गोंधवणी परिसर शिरजगाव परिसर खबड्डी तसेच संत लूक हॉस्पिटल परिसर कॉलेज पाठीमागील तसेच  वार्ड नंबर दोन संपूर्ण परिसर येथील सर्व  नागरिकांची एक मोठी मागणी असून या मागणीने जोर धरला असल्याचे रवींद्र गुलाटी यांनी सांगितले. याबाबत परिसरातील सर्व नागरिक तसेच राजकीय/ बिगर राजकीय वेगवेगळ्या संघटना तसेच व्यापारी यांचा एक शिष्टमंडळ  रेल्वे सल्लागार समितीचे श्री रणजीत श्रीगोड यांना सोबत घेऊन लवकरच  रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे खासदार सदाशिव  लोखंडे खासदार सुजय विखे स्थानिक आमदार लहू कानडे तसेच सेंट्रल रेल्वे जनरल मॅनेजर व सोलापूर डिव्हिजन रेल्वे मॅनेजर यांना  नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे नगरसेवक राजेश अलघ यांनी यावेळी सांगितले.


श्रीरामपूर शहराची रचना दोन विभागांमध्ये विभागलेली आहे रेल्वेच्या अलीकडे आणि रेल्वेच्या पलीकडे असे दोन भाग श्रीरामपूर शहराचे आहेत आणि दोन्ही बाजूने शहर झपाट्याने वाढत आहे. बेलापुर रेल्वे स्टेशन वर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व प्लॅटफॉर्म क्रमांक 2 असे दोन प्लॅटफॉर्म असून दररोज येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या 30 गाड्यांची आहे  रेल्वे स्टेशन वर  प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाण्यासाठी रेल्वेच्या पलीकडील बाजूस  रेल्वे स्टेशन व तिकीट घर अधिकृत एकच प्रवेशद्वार देण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरातील  प्रवाशांची कुचंबणा होत आहे. बऱ्याच वेळेस रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर  आल्यास दादर ने चढून प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर आपल्या जवळ असलेल्या सामानाने जावे लागते बऱ्याच वेळेस तर रेल्वे येण्याच्या ऐन वेळी रेल्वे कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे हे अलाउन्ससिंग करण्यात येते त्यामुळे प्रवाशांची  मोठी धावपळ उडते व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वाढत असलेल्या शहराची रचना पाहता पुढील भविष्यासाठी दोन्ही बाजूला  रेल्वे स्टेशन तसेच तिकीट घर असणे अत्यंत आवश्यक आहे तरच शहराचा विकास होणार आहे म्हणून रेल्वेच्या पलीकडील बाजूस प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर त्वरित रेल्वे स्टेशन व तिकीट घर उभारणी करण्यात यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी व नगरसेवक राजेश अलघ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे सदर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या बाजूच्या रेल्वे पलिकडील रेल्वे स्टेशनची निर्मिती मागणी त्वरित मान्य होण्यासाठी शहरातील व्यापारी तसेच रेल्वे पलीकडे राहणारे गोंधवणी परिसर शिरजगाव परिसर खबड्डी तसेच संत लूक हॉस्पिटल परिसर कॉलेज पाठीमागील तसेच  वार्ड नंबर दोन संपूर्ण परिसर येथील सर्व  नागरिकांची एक मोठी मागणी असून या मागणीने जोर धरला असल्याचे रवींद्र गुलाटी यांनी सांगितले. याबाबत परिसरातील सर्व नागरिक तसेच राजकीय/ बिगर राजकीय वेगवेगळ्या संघटना तसेच व्यापारी यांचा एक शिष्टमंडळ  रेल्वे सल्लागार समितीचे श्री रणजीत श्रीगोड यांना सोबत घेऊन लवकरच  रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे खासदार सदाशिव  लोखंडे खासदार सुजय विखे स्थानिक आमदार लहू कानडे तसेच सेंट्रल रेल्वे जनरल मॅनेजर व सोलापूर डिव्हिजन रेल्वे मॅनेजर यांना  नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे *नगरसेवक राजेश अलघ यांनी यावेळी सांगितले.


अहमदनगर-प्रतिनिधी - दरोडा गुन्ह्यामधील आरोपी २४ तासाच्या पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी कोतवाली पोलीसांनी केली आहे. आरोपी ऋषीकेश प्रदीप लड्डे (रा. सिव्हील हाडको सावेडी अहमदनगर), अक्षय ऊमाकांत थोरवे (रा. सागर हॉटेल शेजारी पाईपलाईन रोड अहमदनगर), यश किरण पवार (रा. सिव्हील हाडको सावेडी अहमदनगर ) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे असून या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्याना शुक्रवार(दि.१४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके, कोतवालीचे पोनि संपतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार पोसई सुखदेव दुर्गे, पोसई सोपान गोरे, चापोहेकाँ तागड, पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना योगेश कवाष्टे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोकाॅ अभय कदम, पोकाॅ दिपक रोहकले, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ सोमनाथ राउत, पोकाॅ अतुल काजळे, पोकाॅ प्रशांत बोरुडे व मोबाईल सेलचे पोकाँ नितीन शिंदे, पोकाँ राठोड व स्थागुशाचे सफौ राजु वाघ,संजय खंडागळे, पोहेकाँ बापू फालाणे, पोना भिमराज खरसे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि १० जानेवारी २०२२ रोजी मोपेड गाडीवरुन पहाटे जात असताना जुने कोर्टजवळ त्यांचे पाठीमागून तीन अनोळखी आरोपी हे एका विना नंबरच्या गडद लाल रंगाची मोपेड गाडीवरुन येऊश त्यांनी गाडीवरुन खालीपाडून धारधार हत्याराने दोन्ही हाताचे पंजावर मारुन गंभीर जखमी करुन त्यांचे गळ्यातील अंदाजे १० तोळे वजनाची सोन्याची चैनगोफ बळजबरीने तोडून चोरून नेली, या सतिष उर्फ बाळासाहेब नारायण तरीटे (रा चितळे रोड अहमदनगर) यांनी दवाखान्यातील दिलेल्या जबाबा वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं । २५ / २०२२ भादवि कलम ३९४,३९७,३४ प्रमाणे गुन्हा रजि, दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना पो नि संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. गुन्ह्यातील आरोपी हे आयुर्वेद चौक येथे गुन्हयात वापरलेले मोपेड़ गाडी सह येणार आहेत अशी बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने आयुर्वेद चौक येथे सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले.



श्रीरामपूर प्रतिनिधी:-श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पीडितेच्या फिर्यादीवरून  पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम वायकर यांचे विरुद्ध लग्नाचे आमिष   दाखवून, बलात्कार सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर  गुन्ह्याचा तपास श्रीरामपूरचे Dy.s.p.संदीप मिटके यांच्याकडे होता.  गुन्ह्यातील आरोपी हा पोलीस कर्मचारी असल्याने यात काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या प्रमाणे Dy.s.p.संदीप मिटके यांनी 

आपल्या नेहमीच्या शैलीत आरोपीला कुठल्याही प्रकारे सहानुभूती  न दाखवता आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  तीन दिवस पोलिस कोठडी दिली.Dy.s.p संदीप मिटके यांनी केलेल्या कारवाईमुळे कायदा हा सर्वांसाठी समान व तसेच योग्य कारवाई झाल्याचे समाधान श्रीरामपुर मधील जनतेकडून व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले.



श्रीरामपूर (प्रतिनिधी)- मा.नगराध्यक्ष अनुराधाताई आदीक  यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राजेंद्र पवार यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादीचे युवा शहर उपाध्यक्ष फजल शेख यांनी संजय नगर परिसरातील मुळे प्राथमिक शाळा श्रीरामपूर ईदगाह रोड या ठिकाणी व्हॅक्सिनेशन शिबिर घेतले. या ठिकाणी नगरसेवक राजेंद्र पवार यांच्याने नेतृत्वाखाली व त्यांच्या सहकारी टीमच्या सहाय्याने संजय नगर इदगाह परिसर या भागातील नागरिकांना

लसीकरणासाठी घरोघरी जाऊन विनंती व जनजागृती करून त्यांची नोंदणी करून त्यांना कोरोना चे सर्व नियमांसह लाइन लावून व्हॅक्सिनेशन करून घेताना नगरसेवक राजेंद्र पवार सह परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी 3 वाजेपर्यंत 350 च्या पुढे नागरिकांना व्हॅक्सिनेशन करून घेतले या कामाबद्दल त्यांचे परिसरातील नागरिकांनी कौतुकच केले यावेळी

नगरपालिका यांच्या वतीने रोहिणी उंडे आयेशा पठाण  आरोग्य विभाग सौरभ जाधव तर आशा सेवीका रोहिणी पारखे, रेखा त्रिभुवन, तरंनुम खान ,हिना पठाण, यांनी खुप चांगल्याप्रकारे सेवा दिली सुरज सोनवणे,जावेद ईनामदार,अबूबकर बिनसाद ,शशिकांत खरात, सलीम पठाण ,अक्षय साळवे ,शुभम पवार, समी ईनामदार,सचिन गवळी व नगरपालिका चे आरोग्य विभाग कर्मचारी यांनी नागरिकांना उपस्थित राहून चांगली सुविधा दिली.




MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget