Latest Post

गळनिंब(प्रधिनिधी)पुरूषांनी स्वत: कमावलेल्या प्राॅपर्टीमध्येच स्वत:चा अधिकार परंतु वडिलांच्या प्राॅपर्टीमध्ये मुलाप्रमाणे मुलीचाही समान हक्क असून वंश परंपरेने चालत आलेल्या पुरूषप्रधान संस्कृतीने महीलांच्या अधिकारावर खर्‍या अर्थाने गदा आल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश मा.एन.के.खराडे साहेब यांनी गळनिंब,कुरणपूर,फत्याबाद येथे  विधी सेवा समिती व वकील संघ श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरा प्रसंगी केले.

    यावेळी व्यासपीठावर श्रीरामपूर वकील संघाचे अँड.आर.डी.भोसले,अँड.आहेर अँड.पंकज म्हस्के,गळनिंबचे सरपंच शिवाजी चिंधे,कुरणपूरच्या सरपंच सौ.मनिषा पारखे,प्रवरा बॅंकेचे मा.संचालक हनुमान चिंधे आदी होते.     

अँड.पंकज म्हस्के यांनी मार्गदर्शन करताना समाजातील वृध्द,निराधार व अपंग व्यक्तींना सरकारच्या वतीने देण्यात येणार्‍या विविध योजनांचा लेखाजोखा मांडला.अँड.आर.डी.भोसले यांनी विधी सेवा समितीच्या वतीने समाजातील घटकांना मोफत न्याय कसा देता येईल याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष कैलास चिंधे यांनी  मार्गदर्शन केले.   प्रास्तविक व सुत्रसंचालन अँड.रविंद्र हाळनोर यांनी केले.    यावेळी आण्णासाहेब शिंदे,साहेबराव भोसले,ज्ञानदेव जाटे,बापूसाहेब वडितके,बाळासाहेब वडितके,शांताराम चिंधे,बापूसाहेब तुपे,का.पोलिस पाटील चंद्रकांत ओहोळ,सोपान जाटे,विधी सेवा समितीचे संदिप शेरमाळे,शहाजी वडितके,अजित देठे,कैलास ऐनोर,डाॅ.सुनिल चिंधे,मनोहर चिंधे,संजय कुदनर,सुधाकर पिलगर,विधी सेवा समितीचे करंदिकर साहेब,ग्रामसेवक राजू ओहोळ,बाळासाहेब भोसले,राहूल चिंधे आदी उपस्थित होते.आभार सिध्देश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी मांडले.



श्रीरामपूर (वार्ताहर)जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांचा सत्कार शिर्डी व कोपरगाव येथील पत्रकारांनी श्रीरामपूर येथील पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात जाऊन केला, बुधवार दिनांक 20 10 2021 रोजी पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शेख बरकत आली यांचा  सत्कारार्थी बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेख बरकत अली हे होते अध्यक्ष स्थानाची सूचना

कासम शेख यांनी मांडली त्यास अनुमोदन नरेंद्र पाटील यांनी दिले या सत्काराच्या कार्यक्रमास पत्रकार विजय खरात ,रवींद्र जगताप, संदीप गोरे, अनिल गांगुर्डे ,राहुल कोकणे, एजाज भाई शेख, मोहम्मद अली सय्यद, राज मोहम्मद शेख, अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया चे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद ,पेपर मास्टर अकबर शेख, रियाज खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकार खरात, रवींद्र जगताप, नरेंद्र पाटील ,आदींनी शाल श्रीफळ बुके व हार देऊन बरकत अली यांचा सत्कार केला उपस्थितांसमोर शेख बरकत अली, रवींद्र जगताप, नरेंद्र पाटील, कासम भाई शेख, असलम बिन साद ,एजाज सय्यद आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी अध्यक्षीय भाषणात शेख बरकत आली यांनी सांगितले की राहता व शिर्डी येथील पत्रकारांनी मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राज्य सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार केला असून विशेषता त्यांनी त्यांच्या परिसरातील गोरगरीब अन्याय पीडित व तळागाळातील लोकांच्या कामाची जबाबदारी आपल्यावर टाकली असून ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडून त्यांची विश्वास पुरती करू ज्या प्रमाणे आपण गेल्या 29 वर्षापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून अन्याय पीडित जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करीत असून विशेषता पत्रकारांवर बातमी  छापल्या च्या रोष आत्मक भूमिकेतून ज्या ज्या ठिकाणी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत अगर त्यांच्यावर दावे दाखल झाले आहेत व पत्रकारांना मारहाण झाली आहे अशा ठिकाणी पत्रकार संघाचा ग्रुप त्यांच्या पाठीशी उभा राहून अशा संकटातून त्यांची सुटका करतो व त्यांना न्याय मिळवून देतो अशा पद्धतीने आपण मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून जनतेची कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पत्रकार रवींद्र जगताप यांनी आपल्या भाषणात सध्या ओबीसी, एसटी, एन टी व अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांची दुर्दशा झालेली असल्याचे सांगून या समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असल्याने अशा समाजातील पीडित जनतेकडे मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करून शेख यांनी न्याय निवाडा केल्यास त्यांच्यावरील अन्याय नक्कीच थांबतील असे ते म्हणाले या बैठकीस बेलापूर व श्रीरामपूर भागातील पत्रकार उपस्थित होते उपस्थितांचे आभार रामगड येथील पत्रकार राज मोहम्मद शेख यांनी मानले.
kopar


अहमदनगर  जिल्ह्यात मालमत्ता विषयक   गुन्ह्याकरिता कुप्रसिद्ध असलेल्या सुरेश निकम टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.  एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी  ऋतिक प्रेमचंद  छजलानी यांनी Cr. No. 254/ 2021 IPC 395,120( ब )नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध सुरेश निकम टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर.सुरेश निकम  सह टोळीतील अन्य 6 सदस्यांना अटक करण्यात आली होती. सुरेश निकम  टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मा. श्री मनोज पाटील( पोलीस अधिक्षक), मा. श्री. सौरभ अग्रवाल मा. श्री. अजित पाटील यांनी  सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dysp संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. सदर टोळीवर या पूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1)  सुरेश रणजीत निकम ( टोळी प्रमुख) 1) एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे  2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 3) एमआयडीसी पो. स्टे.l 868/20 IPC 399, 402,आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 4) एमआयडीसी पो. स्टे.l 210/15 IPC 394, 397,341प्रमाणे 5) एमआयडीसी पो. स्टे.l 112/15 IPC 394,395,427,34प्रमाणे  2) विकास बाळू हनवत ( टोळी सदस्य)1)  एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे 2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 

3) एमआयडीसी पो. स्टे.l 868/20 IPC 399, 402,आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 4)एमआयडीसी पो. स्टे.l 397/19 IPC 392, 341, 411 प्रमाणे 5)  सोनई पो.स्टे.l 131/21 IPC 394,34  प्रमाणे 6)सोनई पो.स्टे.l 311/20 IPC 392,341,411  प्रमाणे 3) करण शेलार ( टोळी सदस्य) 1))  एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे 2) एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे  3)सोनई पो.स्टे.l 131/21 IPC 394,34  प्रमाणे 4)एमआयडीसी पो. स्टे.l 868/20 IPC 399, 402,आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 4) रोहित शिंदे. ( टोळी सदस्य) 1)एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे 2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 5) सागर जाधव ( टोळी सदस्य) 1) एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे 2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 3)एमआयडीसी पो. स्टे.l 210/15 IPC 394, 397,341प्रमाणे 4)एमआयडीसी पो. स्टे.l 112/15 IPC 394,395,427,34प्रमाणे 6)  सतीश अरुण बर्डे ( टोळी सदस्य) 1) एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे 2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 3)एमआयडीसी पो. स्टे.l 210/15 IPC 394, 397,341प्रमाणे 4)एमआयडीसी पो. स्टे.l 112/15 IPC 394,395,427,34 प्रमाणे 7) विधी संघर्ष बालक (टोळी सदस्य)

सदर गुन्ह्यात  एक विधी संघर्ष बालकाचा समावेश असून त्याचेवर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.पुढील तपास मा. मनोज पाटील पोलिस अधीक्षक, अ.नगर, डॉ.सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक अ.नगर,मा. डॉ. दिपाली काळे  अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शन खाली  Dysp संदीप मिटके हे करीत आहेत.



बेलापुर (प्रतिनिधी  )-रासायनिक वापरापासून तयार केलेले अन्न मानवासाठी धोकादायक आहे हे लक्षात घेवुन साँईल चार्जर टेक्नाँलाँजीच्या माध्यमातून शेतीकरीता सेंद्रिय खत तयार केले असुन या खतामुळे नागरीकांना विषमूक्त अन्न मिळणार असल्याचा दावा साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे राम मुखेकर यांनी केला आहे.साँईल चार्जर टेक्नाँलाँजी तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खत व सेंद्रिय औषधे तयार केली असुन अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी ग्राहक वितरक मेळाव्यात बोलताना राम मुखेकर  म्हणाले की  कमजोरीमुळे पिकावर रोग येतो त्यामुळे पिकाची कमजोरी दुर करण्यासाठी खर्च करण्याऐवजी आपण रोगावर ८०% खर्च करतो पिकाच्या वाढीसाठी मातीची भूमीका ८० ते ९० % असते व वातावरणाचा परीणाम १० ते २० %असते हे सत्य असताना आपण सर्वात मोठा हिस्सा वातावरणावर खर्च करतो पिकाच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्बाचे महत्त्व ९४% व एनपीके सोबत १३ मिनरल्सचा हिस्सा फक्त ६ % असुन देखील  आपण ८५ % खर्च हा रासायनिकच्या १३ घटकावर करतो मुळांच्या मदतीने झाडे पानामध्ये प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्न (फळ )तयार करतात  हे सत्य असताना शेतकरी फळांचा विकास करण्यासाठी जवळचा मार्ग निवडतात हे चुकीचे आहे मातीचा पर्यायाने तिच्या बाळाचा म्हाणजेच पिकांचा अंत पाहू नका सुदृढ पिकाला ऊन वारा पाऊस पोषण देतो व कमजोर पिकाला नष्ट करतो  पिकाला नैसर्गिक पोषण द्या एससीटी वैदीकच्या नैसर्गिक पोषणामध्ये ९४ % ह्युमस व ६  % मिनरल्स आहेत एससीटी वैदीकचा मूलमंत्र आहे माती बलवान तर पिक पहीलवान अन पिक पहीलवान तर शेतकरी धनवान त्यामुळे एससीटीच्या वैदीक तंत्रज्ञानाचा वापर करुन विषमूक्त अन्न पिकवा असे आवाहनही राम मुखेकर यांनी केले आहे या वेळी प्रसाद मुखेकर ऋषीकेश हडोळे शेखर वाकचौरे विशाल कोकणे आण्णासाहेब जाधव कौस्तुभ पावसे भाऊसाहेब खेमनर महेश शिंदे पत्रकार देविदास देसाई आदिसह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.


 

!!!    "  समता -विश्व बंधुत्व - महीलांचे हक्क प्रदान करणारे   क्रांतीदुत "" ;-----  प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व. ""!!!

 

    ( १)    " तेरावे सद्दीची पैगंबरी खुप ! दावीतो प्रमाण कुराणातं !!

               जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !

   आनंद वतनी ज्योती म्हणे !! ".  समतेचा पुरस्कार करणारे   "राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले ...

        (२)"  एक ही सफमें खडे हो गयै , मेहमूद और अयाज ...!!

ना कोई बंदा रहा ,ना बंदा नवाज. ..!!! "

जगप्रसिद्ध साहित्यिक व ऊर्दू कवी डॉ.मुहम्मद इक्बाल सहाब..

      इतिहासाच्या कित्येक महान व्यक्तींनी ज्या महामानवाच्या कार्याविषयी , जीवनाविषयी , त्यांच्या  सामाजिक एकता विषयावर , क्रांतिकारक निर्णय विषयी कित्येकदा स्तुती केली ,ज्ञात -अज्ञात पणे आदर्श घेतला व आपल्या कार्यात त्यांच्या विचारांचा अंगिकार केला , 

 आशा महान महामानवाचा आज जन्मदिवस 

  मी लिहीताना  एक निरक्षर ,अनाथ , विश्व बंधुत्व ,संवेदनशील , समतेचा पुरोगामी प्रेषित मुहम्मद स्व . यांचा उल्लेख करतो.

.त्याचप्रमाणे पुरोगामी विचारांचे धगधगत्या मशाली चे महामानव च करतो .त्या पुरोगामी विचारांनी प्रभावित होऊन कित्येक संत ,पीर , बादशहा ,महान विचारवंत , विद्वान , समाजसुधारक या महात्म्यांनी आप- आपल्या देशात समाजात  ज्ञात , अज्ञात पणे क्रांती घडवून आणली .

              आगदी १५०० वर्षांपूर्वी पारंपरिक  वादातून धर्माची सुटका करून लोकांना एक ईश्वरवादाची,  अल्लाहा ची शिकवण देवून , फक्त  "  एकच  अल्लाहा  समस्त ब्रम्हांडाचा नायक  आहे "  .त्या एकाच अल्लाहा ची प्रार्थना करा . व  अल्लाहाची   प्रार्थना करताना अनुयायींना थेट संपर्क साधण्यासाठी कोणत्याही प्रकारे मधे दलाल मुक्त धर्माची संकल्पना मांडली.      सोबतच कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही .

           इस्लामी संस्कृती नुसार कोणत्याही  प्रकारची साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज ठेवली नाही .

कोणी ही व्यक्ती  ती मग शुद्र ही असेल ती सुध्दा  इस्लामी ज्ञान घेवू शकतो , अलिम मौलाना , मुफ्ती , हाफीज ,बनु शकतो ,शिक्षण घेवू शकतो .  ठराविक जातीत जन्माला आला तरच तुम्ही  शिकण घेवु शकतात आसा पारंपरिक वाद त्यांनी एकदम नाकारला.  

ज्ञानी माणसांला प्रेषित मुहम्मद स्व.यांनी मोठे स्थान दिले आहे,एक विद्वान एका शहीदांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे ,हा विचार त्यांनीच दिला आहे , ईस्लाम मधे एका शहीदांचे फार मोठं महत्त्व आहे , तरी सुद्धा त्यांनी विद्वानांना जास्त महत्त्व दिले ,मग ते कोणत्याही प्रकारचे  उदा. ज्ञान असणारा व्यक्ती म्हणजेच विद्वान फक्त धार्मिक ज्ञान असणं च हे ज्ञान ईस्लाम मानत नाही तर उदा. अर्थ शास्त्रात , रसायनशास्त्र , वैद्यकीय शास्त्रात, क्रीडा क्षेत्रात , लष्कर क्षेत्रात आशा विविध क्षेत्रातील ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व यांनी सर्व मानवजातीला कायमची अगदी खुली केली .

त्याकाळी चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खुप प्रगत देश होता तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " तुम्ही चीनला जावुन ज्ञान मिळवा  लागलं तरी तुम्ही ज्ञान घेण्यासाठी जा " असा संदेश  त्याकाळी दिला .या पुरोगामी दुर-दृष्टीकोनाबददल प्रेषित मुहम्मद स्व यांचा नेहमीच अभिमान बाळगावा तितके थोडेच.

           श्री.  गुरु नानक देवजी , आपल्या ( जन्म साखी विलायत वाला ,पेज नंबर १६८) ) मधे म्हणतात की,  " ले पैगंबरी आया , इस दुनिया माहे ! नाऊ .

                 मोहम्मद मुस्तफा ,हो आबे परवा हे !!!!)

( अर्थात , ज्यांचं नाव मुहम्मद आहे ,ते या जगात प्रेषित बनुन आलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकाच्या शैतानी शक्तींची भिती व भय नाही .ते बिलकुलच निर्भय  आहेत .)

         अल्लाह समोर सर्व मानव सम-समान, सारखेच आहेत हा पुरोगामी विचार मांडला .

              आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणी कितीही मोठा होवू , बनू शकतो , कोणीही राजा ,प्रधान बनू शकतो हा अत्यंत पुरोगामी विचार मांडला .राजा होण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावा लागतो हा विचारच नाहीसा करून टाकला व आपल्या कृतीतून दाखवून देत .

      याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर व औरंगाबाद शहरांची ज्याने निर्मिती  केली ,शहर बसवले, चेहरा- मोहरा बदलला असे पंतप्रधान ,वजिर जो एक निग्रो गुलाम म्हणून विकत आणला होता व आपल्या कर्तृत्वाने मोठ्या पदावर गेला.  ते म्हणजेच मलिक अंबर हे होत .(उदाहरण . त्यांच्या महानिर्वाण नंतर ७००-८०० वर्षानंतर चे आहेत ).

   समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक हे प्रेषित मुहम्मद स्व.हेच . आपल्या २३ वर्षांच्या कालावधीत समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून , अरब देशात काळा -गोरा  हा भेदभाव खुप मोठ्या प्रमाणात होता , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात  केली जात होती ,ती  गुलामगिरी नष्ट करून एका जैद नावाच्या काळया गुलामाचा आपल्या सख्ख्या आत्या बहीणाचा विवाह करून काळया -गोरयांचा भेदभावच  नष्ट केला .

तसेच ह.बिलाल नावाच्या तुच्छ समजले जाणारे गुलामगिरीतून मुक्त करून . नंतर मक्का विजयी दिवशी  पवित्र काबागृहावर चढून " अजान " देण्याचा आदेश दिला व समस्त जगाला दाखवून दिले की , कोणीही अपवित्र नसते.  समस्त मानव जात ही इस्लामच्या मुलभूत सिद्धांतानुसार एकच अल्लाहाची संतान आहेत. सर्व रंगाचे , वर्णाचे , वंशाचे ,एकच आहेत .हा भेदभाव ईस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय , हक्क , संधी आहेत .हा क्रांतिकारी विचार पहिल्यांदा प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व. यांनीच जगाला दिला.

           स्वामी विवेकानंद म्हणतात ,""' प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व.आपल्या आदर्शवत जीवनात असं काही धडा घालून गेले की ,त्यांच्या अनुयायांनी , मुस्लिमांमध्ये संपूर्ण समता , बंधुभाव निरंतर नांदावयांस हवे , त्यांच्या मधे जातीचा , लिंगाचा , वर्णभेदाचा भेदभाव कदापी ही शिरू नये..""

                   स्त्रियांना वारसाहक्कात , मालमत्तेत वाटा आहे . तो देणारे जगभरात पहिला विद्रोही क्रांतीकारक विचार  प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनीच दिला.

      विश्वातील पहिला घटस्फोटीत , विधवा महिलांसाठी पुनर्विवाह  ही संकल्पना मांडली व जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलाशी  स्वतः विवाह करून तुच्छ समजलं जाणार्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी पत्नी बनवून बहुमान दिला .

       स्री भ्रुण हात्या हे पाप आहे ही सांगणारं ही प्रेषित मुहम्मद पैगंबर च .

 अरब जगतात १४००-१५०० वर्षांपूर्वी समाजमनावर नसानसात भिनलेली होतं की , जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जातं असतं .  त्या जन्म झालेल्या मुलीला जिवंत पुरायच्या क्रुर प्रथा होती , तेथील स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं समजलं जातं असतं.ती प्रथाच आपल्या २३ वर्षाच्या कालखंडात हद्दपार करून टाकली.

   स्त्रियांना  शिक्षणाचा अधिकार आहेत व त्या शिकल्या पाहिजेत असे ठणकावून सांगत दाखवून दिले आहे.

आपल्या वडिलांच्या संपत्ती तुन , पतीच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतून मुलींचाही वाटा आहे हा क्रांतिकारी विचार अंमलात ही आणला.

जगप्रसिद्ध अंतिम प्रवचनातून (हॹतुल विदाह -खुतबा Farewell speech) मधे , त्यांनी महीलांच्या हक्काची काळजी घ्यावी असं तळमळीने सांगितले , " मित्रांनो ,पतीचे पत्नी वर हक्क आहे , तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला ,बायकांना प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा ,कठोर , निष्ठुर होवू नये ,दयाळु राहा , तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे ,तर काळजी घ्यावी . पत्नी चे जे काही आधिकर असतील  ते सर्व द्या . तुमच्या वर विश्वास टाकला आहे ,तर विश्वासघात करू नका , तुम्हाला महाप्रलयाच्या (कयामतच्या ) दिवशी अल्लाहा समोर हिशोब द्यावाच लागेल . या दिवसाची कायम आठवण ठेवा ."" 

  आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत महीलांची  तळमळ व्यक्त केली , काळजी घेतली .

      महात्मा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे लिहीतात ,की, 

 ""    तेरावे सद्दीची पैंगंबरी खुण ! दावितो प्रमाण कुरआणात !

            जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !

आनंद वतनी ज्योती म्हणे !! ""

             पुढे पुन्हा  महात्मा फुले  यांनी पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहिला व त्यात ते स्तुती करताना लिहीतात की , " 

     कोणी नाही श्रेष्ठ ! कोणी नाही दास !

जात प्रमादास खोडी बुडी ! मोडीला अधर्म आणि मतभेद !

सर्वात अभेद ठाम केला !!! " 

(   अर्थात ;- " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला , गुलामगिरी नाकारली , जातिभेद, जातीपाती बुडासकट नष्ट केले , अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला , सर्वात्र अभेद ,समता, बंधुभाव कायम केला !!')

      पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ इक्बाल लिहीतात  की ,.   

         " एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !!

         ना कोई बंदा रहा , ना बंदा नवाज ""!!!

( अर्थात :- मस्जिद मधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा , राष्ट्रपती ,च्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहिला ,कोणी गुलाम नाहीत कोणी मालक नाही ....)

पैगंबर स्व.यांनी अभुतपुर्व क्रांती घडवताना संपूर्ण अरब देशात व्यसनापासुन कित्येक संसार उध्वस्त झालेली पाहून नशा मुक्त, व्यसनमुक्त  चळवळी चालवुन संपूर्ण अरब प्रदेश व्यसन मुक्ती केला . ""  दारू बनवणारा ,त्याची विक्री करणारा ,  ने आन, व्यापार  करणारा , मदत करणारे सर्व गुन्हेगार ठरवले , ""  अरब प्रदेश व्यसन मुक्त केले .

     अर्थ व्यवस्थेत अभुतपूर्व क्रांती घडवून आणली बिना व्याजी अर्थव्यवस्था निर्माण केली , व्याज घेणं- देणं दोन्हीला हराम करून बंद केले , सावकारी पध्दतीचा नायनाट केला .

त्यासाठी श्रीमंत वर्गात जकात पध्दत चालु केली ती अनिवार्य करण्यात आली . यामुळे त्याचे चांगले परिणामही दिसू लागले , समाजातील बहुसंख्य कुटूंब जकात देण्या ईतपत सक्षम झाली व अशा कित्येक गरीबांना त्याचा लाभ झाला.

साक्षरतेची , शिक्षणाची अदुतिय क्रांती घडवून आणली . समाजातील स्री शिक्षण अनिवार्य केले , मुलं-मुली, वृध्द व्यक्तींवर शिक्षण अनिवार्य करण्यात येवून. एका शिक्षीतांने  दहा निरक्षरांना  ज्ञान देण्याचं काम करावे . जेलमधील शिक्षीत,साक्षर कैदींना निरक्षर कैद्यांना शिक्षण देणे अनिवार्य केले . शिक्षणाची अभुतपूर्व क्रांती घडवून आणली.

       आति- विशेष बाब  म्हणजे  जगातील इतिहासात तोडच नाही आशी विषेश बाब म्हणजे प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व . स्वतः एक निरक्षर , अशिक्षित असून , स्वतः ला लिहीता-वाचता येत नव्हते . तरी सुद्धा , सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व देवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला . याला एक अद्भुतीय  क्रांतीच घडवून आणली.

              या सर्व न भूतो न भविष्यते अशा घडवलेल्या क्रांती चे श्रेय स्वतः ला यतिकिंचतही न देता सर्व काही श्रेय जगत निर्मात्यां अल्लाहा रबबुल आलमीनला दिले !!! मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत .

ते स्वतः म्हणतं ,मी तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस , कार्यकर्ता आहे, हे सर्व यश अल्लाहा रबबुल आलमीन च्या कृपेने मिळालं आहे.आशी ठाम भूमिका घेउन स्वतः ची विनम्रता संपूर्ण जगासमोर मांडली ... केवढी मोठी विनम्रता ही जगाच्या इतिहासात तोडच नाही .

    प्रसिद्ध तत्वज्ञ ;- बर्नार्ड शॉ नोबेल पुरस्कार विजेते म्हणतात ,की ," मुहम्मद स्व .यांनी दिलेल्या शिकवणीबाबत माझ्या मनात आदर आहे .मी त्यांची प्रशंसा करतो कारण त्यांच्या मध्ये जबरदस्त तेज आहेत.प्रत्येक वयोगटास आवाहन करणारे आणि जीवनात होणारे परिवर्तन पोचविण्याचे सामर्थ्य असलेला हा एकमेव धर्म आहे असे मला वाटते .या व्यक्तींचा मी अभ्यास केला आहे, उद्याच्या युरोपला ईस्लामची तत्व प्रणाली मान्य होईल असे मी भाकीत केले आहे . कारण आजच्या युरोपने ते मान्य करण्यास सुरुवात केली आहे ( The Genuine Islam लेखक :- बर्नार्ड शॉ .) .

              या नबी सलाम ..!

      या नबी  लाखों ,करोडों सलाम !!!!!!!!!


लेखक डॉ सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर 

९२७१६४००१४ ..

कोपरगाव, राहाता व लोणी परिसरामधून महिलांचे गळ्यातील दागिणे चोरणारी टोळी२,०५,०००/- रु. किमतीचे मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई प्रस्तूत बातमीची हकिगत अशी कि,दि.२२/०९/२०२१ रोजी सकाळचे वेळी फिर्यादी श्रीमती संगीता गणेश देशमूख,वय-५४ वर्ष, धंदा- नोकरी, रा. साईनगर, कोपरगाव ह्या त्यांचे स्कुटी गाडीवरुन मेहता कन्या विद्यालय,कोपरगाव येथे गेल्यानंतर पाकीगमध्ये स्कुटी गाडी पार्क करीत असताना पाठीमागून मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे गळ्यातील ६०,०००/-रु. किं. चे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने तोडून चोरुन नेले होते.सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी कोपरगांव शहर पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. 1 २९/२०२१, भादविकलम ३१२, १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच जिल्ह्यामध्ये वारंवार चैन स्नॅचिंगच्या घटना घडत असल्यामूळे मा.पोलीस अधिक्षक साो, अहमदनगर तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर व श्रीरामपूर यांचे आदेशाने श्री.अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासबाबत सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे अधिकारी व अंमलदार गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पो.नि. श्री. अनिल कटके यांना गोपनिय बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा नागेश काळे रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई श्री. सोपान गोरे,पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, पोहेकों/संदीप पवार, पोन शंकर चौधरी, पोन विशाल दळवी, पोना रविकिरण सोनटक्के,पोनादिपक शिंदे, पोकों/योगेश सातपूते, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून वडाळा महादेव येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे (२) नागेश राजेन्द्र काले, वय-२० वर्षे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.परंतु नमुद गुन्हा हा त्याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळालेली असल्याने दोन पंचासमक्ष त्याचे वडाळा महादेव येथील घराची झडती घेतली असता घरगडतीमध्ये दोन सोन्याचे मिनी गंठण व दोन सोन्याचे मंगळसुत्र असे ६० ग्रॅम वजनाचे दागिने मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले.जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांबाबत आरोपी नागेश काळे यास विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदरचे दागिने हे त्याने व त्याचे साथीदार नामे सोंड्या उर्फ अदीत्य गणेश पिंपळे, रा. अशोकनगर कारखाना, संदीप दादाहरी काळे, रा. वडाळा महादेव व आणखी एक साथीदार अशांनी मिळून मागील २ महीन्याचे कालावधीमध्ये कोपरगाव शहर, राहाता शहर, लोणी-बाभळेश्वर रोड या ठिकाणाहुन रस्त्याने जाणाऱ्या महिलांचे गळ्यातील दागिणे तोडून चोरुन आणले असल्याचे सांगितले. सदर माहितीच्या आधारे साथीदार आरोपीतांचा शोध घेऊन आरोपी नामे २) सॉन्या उर्फ अदीत्य गणेश पिंपळे, बब-१९ वर्षे, रा. अशोकनगर कारखाना, ) संदीप दावाहरी काळे, वय-३२ वर्षे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर यांना वेगवेगळया ठिकाणाहुन ताब्यात घेतले. चौथ्या साथीदाराचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून दोन सोन्याचे मिनीगंठण, दोन सोन्याचे मंगळसुत्र असे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दोन मोबाईल असा एकुण २,०५,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सदर चोरी बाबत संबधीत पो.स्टे. चे अभिलेख तपासून दाखल असलेले गुन्हे तसेच सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिणे व आरोपीकडून ताब्यात घेतलेले दागिणे याची पडताळणी करुन खात्री केली असता खालील प्रमाणे चैन स्नॅचिंगचे ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.१) कोपरगाव शहर पो.स्टे. गुरनं.२९३/२०२१, भादवि कलम ३९२, ३४ २) कोपरगाव शहर पो.स्टे. गुरनं.३००/२०२१, भादवि कलम ३९२, ३४ ३) राहाता पो.स्टे. गुरनं. २३९/२०२१, भादवि कलम ३९२, ३४, ४) लोणी पो.स्टे. गुरनं.३७६/२०२१, भादवि कलम ३९२, ३४ सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



अहमदनगर - महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेल्या सुगंधी तंबाखू साठ्यावर कोतवालीपोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कोतवाली पोलिसांनी संतोष प्रकाश सोनवणे,सफल संतोप जैन आणि गोरक्षनाथ मच्छीद्र धाडगे या आरोपीना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत कोतवाली पोलीस स्टेशन हददीत गोंधळे गल्ला माळीवाडा ,बुरुडगाव रोड भोसले मंगल कार्यालय जवळ व जीपीओ चौक ते धरती चौक परिसरात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखु मावा बनविण्यासाठी साठवून ठेवणे व वाहतुक करणे सुरू असल्याचीखात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी लागलीच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोसई मनोज महाजन व पोसई जी टी इंगळे यांना सदरची माहीती देवून त्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत करून पोसई/महाजन व पोसई/जी.टी. इंगळे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना समक्ष बोलावून घेवून पोनि सो यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांना सविस्तर माहिती देवून पोसई/मनोज महाजन यांनी पंच बोलावून घेवून पंचा समक्ष वेगवेगळे पथके तयार करून सदर पंचाना छापेबाबत सविस्तर माहीती देवून त्याप्रमाणे बातमीतील ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे.आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्ग्रत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच तपासकामी आरोपीना २८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर ,अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल सो. मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. संपतराव शिंदे, पोसई/जी.टी.इंगळे, पोसई/मनोज महाजन पोना/शाहीद शेख,पोना/विष्णु भागवत, पोना/अभय कदम, पोना/ शरद गायकवाड, पोफो/सुमित गवळी, पोको/सुशिल वाघेला, पोफो/प्रमोद लहारे, पोको काजळे, पोको/खताडे यांनी केली आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget