बेलापुर (प्रतिनिधी )-रासायनिक वापरापासून तयार केलेले अन्न मानवासाठी धोकादायक आहे हे लक्षात घेवुन साँईल चार्जर टेक्नाँलाँजीच्या माध्यमातून शेतीकरीता सेंद्रिय खत तयार केले असुन या खतामुळे नागरीकांना विषमूक्त अन्न मिळणार असल्याचा दावा साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे राम मुखेकर यांनी केला आहे.साँईल चार्जर टेक्नाँलाँजी तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खत व सेंद्रिय औषधे तयार केली असुन अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी ग्राहक वितरक मेळाव्यात बोलताना राम मुखेकर म्हणाले की कमजोरीमुळे पिकावर रोग येतो त्यामुळे पिकाची कमजोरी दुर करण्यासाठी खर्च करण्याऐवजी आपण रोगावर ८०% खर्च करतो पिकाच्या वाढीसाठी मातीची भूमीका ८० ते ९० % असते व वातावरणाचा परीणाम १० ते २० %असते हे सत्य असताना आपण सर्वात मोठा हिस्सा वातावरणावर खर्च करतो पिकाच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्बाचे महत्त्व ९४% व एनपीके सोबत १३ मिनरल्सचा हिस्सा फक्त ६ % असुन देखील आपण ८५ % खर्च हा रासायनिकच्या १३ घटकावर करतो मुळांच्या मदतीने झाडे पानामध्ये प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्न (फळ )तयार करतात हे सत्य असताना शेतकरी फळांचा विकास करण्यासाठी जवळचा मार्ग निवडतात हे चुकीचे आहे मातीचा पर्यायाने तिच्या बाळाचा म्हाणजेच पिकांचा अंत पाहू नका सुदृढ पिकाला ऊन वारा पाऊस पोषण देतो व कमजोर पिकाला नष्ट करतो पिकाला नैसर्गिक पोषण द्या एससीटी वैदीकच्या नैसर्गिक पोषणामध्ये ९४ % ह्युमस व ६ % मिनरल्स आहेत एससीटी वैदीकचा मूलमंत्र आहे माती बलवान तर पिक पहीलवान अन पिक पहीलवान तर शेतकरी धनवान त्यामुळे एससीटीच्या वैदीक तंत्रज्ञानाचा वापर करुन विषमूक्त अन्न पिकवा असे आवाहनही राम मुखेकर यांनी केले आहे या वेळी प्रसाद मुखेकर ऋषीकेश हडोळे शेखर वाकचौरे विशाल कोकणे आण्णासाहेब जाधव कौस्तुभ पावसे भाऊसाहेब खेमनर महेश शिंदे पत्रकार देविदास देसाई आदिसह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment