Latest Post

कोपरगाव, राहाता व लोणी परिसरामधून महिलांचे गळ्यातील दागिणे चोरणारी टोळी२,०५,०००/- रु. किमतीचे मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई प्रस्तूत बातमीची हकिगत अशी कि,दि.२२/०९/२०२१ रोजी सकाळचे वेळी फिर्यादी श्रीमती संगीता गणेश देशमूख,वय-५४ वर्ष, धंदा- नोकरी, रा. साईनगर, कोपरगाव ह्या त्यांचे स्कुटी गाडीवरुन मेहता कन्या विद्यालय,कोपरगाव येथे गेल्यानंतर पाकीगमध्ये स्कुटी गाडी पार्क करीत असताना पाठीमागून मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे गळ्यातील ६०,०००/-रु. किं. चे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने तोडून चोरुन नेले होते.सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी कोपरगांव शहर पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. 1 २९/२०२१, भादविकलम ३१२, १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच जिल्ह्यामध्ये वारंवार चैन स्नॅचिंगच्या घटना घडत असल्यामूळे मा.पोलीस अधिक्षक साो, अहमदनगर तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर व श्रीरामपूर यांचे आदेशाने श्री.अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासबाबत सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे अधिकारी व अंमलदार गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पो.नि. श्री. अनिल कटके यांना गोपनिय बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा नागेश काळे रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई श्री. सोपान गोरे,पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, पोहेकों/संदीप पवार, पोन शंकर चौधरी, पोन विशाल दळवी, पोना रविकिरण सोनटक्के,पोनादिपक शिंदे, पोकों/योगेश सातपूते, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून वडाळा महादेव येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे (२) नागेश राजेन्द्र काले, वय-२० वर्षे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.परंतु नमुद गुन्हा हा त्याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळालेली असल्याने दोन पंचासमक्ष त्याचे वडाळा महादेव येथील घराची झडती घेतली असता घरगडतीमध्ये दोन सोन्याचे मिनी गंठण व दोन सोन्याचे मंगळसुत्र असे ६० ग्रॅम वजनाचे दागिने मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले.जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांबाबत आरोपी नागेश काळे यास विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदरचे दागिने हे त्याने व त्याचे साथीदार नामे सोंड्या उर्फ अदीत्य गणेश पिंपळे, रा. अशोकनगर कारखाना, संदीप दादाहरी काळे, रा. वडाळा महादेव व आणखी एक साथीदार अशांनी मिळून मागील २ महीन्याचे कालावधीमध्ये कोपरगाव शहर, राहाता शहर, लोणी-बाभळेश्वर रोड या ठिकाणाहुन रस्त्याने जाणाऱ्या महिलांचे गळ्यातील दागिणे तोडून चोरुन आणले असल्याचे सांगितले. सदर माहितीच्या आधारे साथीदार आरोपीतांचा शोध घेऊन आरोपी नामे २) सॉन्या उर्फ अदीत्य गणेश पिंपळे, बब-१९ वर्षे, रा. अशोकनगर कारखाना, ) संदीप दावाहरी काळे, वय-३२ वर्षे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर यांना वेगवेगळया ठिकाणाहुन ताब्यात घेतले. चौथ्या साथीदाराचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून दोन सोन्याचे मिनीगंठण, दोन सोन्याचे मंगळसुत्र असे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दोन मोबाईल असा एकुण २,०५,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सदर चोरी बाबत संबधीत पो.स्टे. चे अभिलेख तपासून दाखल असलेले गुन्हे तसेच सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिणे व आरोपीकडून ताब्यात घेतलेले दागिणे याची पडताळणी करुन खात्री केली असता खालील प्रमाणे चैन स्नॅचिंगचे ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.१) कोपरगाव शहर पो.स्टे. गुरनं.२९३/२०२१, भादवि कलम ३९२, ३४ २) कोपरगाव शहर पो.स्टे. गुरनं.३००/२०२१, भादवि कलम ३९२, ३४ ३) राहाता पो.स्टे. गुरनं. २३९/२०२१, भादवि कलम ३९२, ३४, ४) लोणी पो.स्टे. गुरनं.३७६/२०२१, भादवि कलम ३९२, ३४ सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



अहमदनगर - महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेल्या सुगंधी तंबाखू साठ्यावर कोतवालीपोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कोतवाली पोलिसांनी संतोष प्रकाश सोनवणे,सफल संतोप जैन आणि गोरक्षनाथ मच्छीद्र धाडगे या आरोपीना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत कोतवाली पोलीस स्टेशन हददीत गोंधळे गल्ला माळीवाडा ,बुरुडगाव रोड भोसले मंगल कार्यालय जवळ व जीपीओ चौक ते धरती चौक परिसरात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखु मावा बनविण्यासाठी साठवून ठेवणे व वाहतुक करणे सुरू असल्याचीखात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी लागलीच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोसई मनोज महाजन व पोसई जी टी इंगळे यांना सदरची माहीती देवून त्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत करून पोसई/महाजन व पोसई/जी.टी. इंगळे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना समक्ष बोलावून घेवून पोनि सो यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांना सविस्तर माहिती देवून पोसई/मनोज महाजन यांनी पंच बोलावून घेवून पंचा समक्ष वेगवेगळे पथके तयार करून सदर पंचाना छापेबाबत सविस्तर माहीती देवून त्याप्रमाणे बातमीतील ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे.आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्ग्रत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच तपासकामी आरोपीना २८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर ,अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल सो. मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. संपतराव शिंदे, पोसई/जी.टी.इंगळे, पोसई/मनोज महाजन पोना/शाहीद शेख,पोना/विष्णु भागवत, पोना/अभय कदम, पोना/ शरद गायकवाड, पोफो/सुमित गवळी, पोको/सुशिल वाघेला, पोफो/प्रमोद लहारे, पोको काजळे, पोको/खताडे यांनी केली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास अघाडीने पुकारलेल्या बंदला बेलापुर गावात चांगला प्रतिसाद मिळाला. महाविकास अघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदला बेलापूरातील व्यापारी बाधवांनी चांगला प्रतिसाद दिला भाजपाने या बंदमध्ये सहभागी न होण्याचे अवाहन व्यापार्यांना केले होते परंतु व्यापाऱ्यांनी ते धुडकावत बंदमध्ये सहभागी होवुन आपला निषेध नोंदविला काल दिवसभर बेलापूरच्या वेगवेगळ्या व्हाटस्अप गृपवर बंद विषयी अवाहन प्रतिअवाहन चालू होते भाजपाने  बंदमध्ये सहभागी न होण्याचे अवाहन व्यापाऱ्यांना केले होते तर महाविकास अघाडी तसेच शेतकरी संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे अवाहन व्यापाऱ्यांना केले होते त्यामुळे बेलापुरची बाजारपेठ काही दुकाने वगळता पुर्णपणे बंद होती भाजीपाला तसेच फळ विक्रेत्यांची दुकाने मात्र सुरु होती या वेळी शेतकरी संघटनेचे नेते सुधाकर खंडागळे पचायत समीती सदस्य अरुण पा नाईक बाजार समितीचे संचालक सुधीर नवले शिवसेनेचे आशोक पवार यांनी व्यापाऱ्यांनी स्वयःस्फूर्तीने दुकाने बंद ठेवल्याबद्दल व्यापाऱ्यांच आभार मानले.



बेलापुर (प्रतिनिधी  )-श्री शिवप्रतिष्ठाण बेलापुर यांच्या  वतीने घटस्थापने पासुन विजयादशमी पर्यत गावातुन पहाटे दुर्गा दौड फेरी काढुन जनजागृती करण्यात येत असुन या दुर्गा दौड  फेरीतील ध्वजाचे घरोघर पुजन करुन स्वागत केले जात आहे .             गेल्या काही वर्षापासुन प .पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतुन श्री  शिवप्रतिष्ठाण बेलापुर  यांच्या वतीने घटस्थापनेपासुन ते विजया दशमी पर्यत दररोज पहाटे ५.३० वाजता प्रभात फेरी काढण्यात येते. मागील वर्षी कोरोनामुळे अशी दुर्गा दौड फेरी काढू शकलो नसल्याचे शल्य शिवप्रतिष्ठाणच्या अनेक मावळ्यांना आहे .या वेळी शासनाने नियमात  शिथीलता दिल्यामुळे शिवप्रतिष्ठाणच्या मावळ्यांनी या वेळी जोरदार तयारी केली. सकाळीच साडे पाच वाजता सर्व मावळे बेलापूरातील झेंडा चौकात

असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती जवळ जमा होतात.सर्वांच्या डोक्यात पांढरी टोपी असते .संपूर्ण गावभर हे मावळे अनवाणी फेरी मारतात. छत्रपती शिवाजी महारांजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन दुर्गा दौड फेरीस सुरुवात होते. फेरीच्या अग्रभागी हिंदुराष्ट्र भगवा ध्वज असतो. त्यांनतर श्री शिवप्रतिष्ठाणचा फलक त्या पाठोपाठ दोन रांगेत सर्व मावळे शिस्तीचे काटेकोरपणे पालन करत मार्गक्रमण करतात. दुर्गा दौड फेरी दरम्यान जागो हिंदु जागो अशी वेगवेगळी पद्य एक मावळा पुढे म्हणतो त्या पाठोपाठ सर्व मावळे गातात .ग्रामस्थ विशेषकरुन महीला वर्ग मोठ्या आनंदाने या फेरीच्या स्वागतासाठी सज्ज असतात घरासमोर सडा रांगोळी काढली जात आहे. फेरी घरासमोर आल्यावर महीला भक्तीभावाने भगव्या ध्वजाची पुजा करतात .या फेरीत दिडशे ते दोनशे मावळे सहभागी होतात   नऊ दिवस दररोज गावातील एका मंदीरात या दुर्गा दौड फेरीचा समारोप होतो. तेथे आरती होते त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप होतो व पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या फेरीचे नियोजन केले जाते .या फेरीत चार- पाच वर्षापासुन ते तीस -पस्तीस वयोगटातील मुलांचा सहभाग असतो. विजया दशमीच्या दिवशी या फेरीत महीला व तरुणींचाही सहभाग होतो सर्वांच्या डोक्यावर भगवा फेटा परिधान असतो. त्यामुळे या फेरीचे आकर्षण आणखीनच वाढते.  या फेरीमुळे गावातील वातावरण भक्तीमय झालेले आहे .




दि.07/10/2021 रोजी डिग्रस येथे Dy.s.p. संदीप मिटके यांनी चित्रपटातील प्रसंगलाही लाजवेल अशा घडलेल्या घटनेत स्वतच्या जीवाची पर्वा न करता ओलीस ठेवलेल्या कुटुंबाची  अतिशय प्रसंगावधान राखून सुटका केली या धाडसी कारवाईचे कौतुक आज रोजी नाशिक परिक्षेत्राचे IG श्री. B.G.शेखर यांनी केले.

     दि.7/10/2021 रोजी सकाळी डीग्रस येथे पीडित महिला,त्यांचे पती मुलगा व मुलगी हे त्यांचे राहते घरी असताना त्यांचा मुलगा सकाळी कचरा टाकण्यासाठी मागील दरवाजाने बाहेर गेला असता तेथे दबा धरून बसलेल्या आरोपी नामे सुनील लोखंडे यांने मागील दरवाजाने घरात प्रवेश केला व पीडित महिला  यांच्या मुलाच्या कमरेला गंन लावून मागोमाग घरात आला व त्याने  आई  कोठे आहे? तिला बाहेर बोलाव असे म्हणून आरडाओरड करू लागला सदर ओरडण्याचा आवाज आल्याने पीडित महिला यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता आरोपी सुनील लोखंडे याने त्यांचे मुलास रिव्हॉल्वर लावून  त्यास घरातील बेडरूमकडे घेऊन येत असताना  दिसल्याने त्यांनी बेडरुमचा दरवाजा आतून लॉक केला आरोपीने पीडित महिलेचे यांना बाहेर येण्यासाठी सांगून.त्यांच्या मुलीच्या दिशेने एक गोळी फायर केली सदर गोळी तिचा भाऊ  याचे काना जवळून गेली गण मधून गोळी फायर झाल्यानंतरही पीडित महिला यांनी दरवाजा उघडला नाही हे बघून आरोपीने मी आता गॅस सिलेंडरच्या टाकीला गोळी मारून  स्फोट घडवून आणतो,तू बाहेर ये मी तुला गोळी घालतो तू जर बाहेर आली नाही तर मी तुझ्या मुलांना व पतीला गोळ्या घालीन असे आरोपी म्हणाला   सदर वेळी पीडित महिला यांनी Dy.s.p. संदीप मिटके यांना सदर घटनेबाबत माहिती दिली व तात्काळ पोलीस मदत मिळण्यासाठी विनंती केली

घटनास्थळावर तात्काळ पोहोचत Dy.s.p. संदीप मिटके साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदरची परिस्थिती अतिशय समयसूचकता दर्शवित अत्यंत कौशल्याने हाताळीत आरोपीला शरण येण्यासाठी सांगून आरोपीशी संयमाने चर्चा चालू ठेवली परंतु आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संदीप मिटके यांनी त्याला बोलण्यात गुंतवून त्याचे मतपरिवर्तन केले  *"ओलीस ठेवलेल्या मुलीस सोड वाटल्यास पिस्तुल माझे डोक्यावर ठेव"* असे सांगून मुलीची सुटका केली.मुलगी दाराजवळ जाताच आरोपीचे लक्ष विचलित केले व धाडसाने आरोपीच्या अंगावर झडप घेऊन पिस्तुलाचा बॅरल पकडला व आरोपीस खाली दाबले.त्यावेळी आरोपीने एक गोळी फायर केली परंतु मिटके यांनी पिस्तुलाच्या बॅरल गच्च पकडून जमिनीचे दिशेने ठेवल्याने गोळी संदीप मिटके यांचे डाव्या पायाच्या पॅन्टला घासून गेली तेवढ्यात तेथे उपस्थित असलेल्या पथकाने संदीप मिटके यांचे मदतीस येऊन आरोपी जेरबंद करून त्यास ताब्यात घेतले सदरची कारवाई अतिशय संयमाने  ओलीस ठेवलेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी व स्वतःच्या जीवाची पर्वा न  करता पोलीस खात्याची मान आदराने उंचावेल अशी कामगिरी केल्याने I.G.P.  B.G.शेखर पाटील यांनी Dy.S.P.संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक केले.


राहुरी ( अहमदनगर ) : डिग्रस (ता. राहुरी) येथे आज (गुरुवारी) सकाळी एका निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षकाने एका विवाहित महिलेच्या मुलांना त्यांच्या राहत्या घरात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके मुलांची सुटका करण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने उपअधीक्षक मिटके बचावले. 

सुनिल लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक आहे. तो पहाटे पासून घरात प्रवेश करण्यासाठी दबा धरून बसला होता. त्याने आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान एका विवाहित महिलेच्या घरात प्रवेश केला.

आरोपीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहित महिलेच्या लहान मुलांना डांबून ठेवले. त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर रोखून धरत त्या महिलेला बाहेर येण्यास सांगितले. मात्र महिलेनी प्रसंगावधान राखत मोबाईल वरून परिचितांना या घटनेची माहिती दिली.

त्यामुळे थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस उपअधीक्षक मिटके घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरू होते. अखेर मिटके यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली. ती मिटके यांचा डोक्याजवळून गेली. मिटके थोडक्यात बचावले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण डिग्रस गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

दरम्यान, आरोपीने मागील आठवड्यात 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजता त्या विवाहित महिलेला राहुरी शहराजवळ अडवून, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते. त्यांना शरीर संबंधाची मागणी करून, 8 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी घटनेच्या रात्री महिले आरोपीविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अपहरण, आर्म ॲक्ट, खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तोच गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने आजचे कृत्य केल्याचे समजते.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी आज (गुरुवारी) दुपारी दोन वाजता डिग्रस येथे घटनास्थळाची पाहणी केली.





बेलापुर  (प्रतिनिधी  )- गुन्ह्याचा तपास लवकर लागावा ही नागरीकांची अपेक्षा रास्त आहे परंतु आम्ही काही जादुगार नाही आपण दिलेल्या माहीती व मदतीमुळेच आम्ही सर्व गुन्ह्यांची उकल करु शकलो बेलापूरकरांनी केलेल्या कौतुकामुळे आम्हालाही काम करण्यास निश्चितच ऊर्जा मिळेल असे मत अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी व्यक्त केले      बेलापुर परिसरात काही दिवसापासुन दरोड्याचे सत्र सुरु झाले होते चोरट्यांनी आगोदर प्रा सदाफुले यांच्या घरावर दरोडा टाकला त्यानंतर उदय खंडागळे व भगीरथ चिंतामणी यांच्या घरावर दरोडा टाकला या घटनेमुळे वाड्या वस्त्यावरील नागरीकात भितीचे वातावरण तयार झाले परंतु पोलीसांनी सर्व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्याबद्दल बेलापुर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अनिल कटके श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट उपस्थित होते. या वेळी बोलताना अप्पर पोलीस दिपाली काळे पुढे म्हणाल्या की बेलापुर गावाचा ईतिहास फार मोठा आहे पोलीसांच्या पाठीवर शाबासकीची थाप ही बेलापूरकरच देवु शकतात असेही त्या म्हणाल्या  या वेळी सत्काराला उत्तर देताना उपविभागीय अधिकारी संदीपमिटके म्हणाले की मी यापूर्वीही तालुक्यात काम केलेले होते परंतु त्या वेळी मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असे म्हणालो नसलो तरी या तालुक्यात पुन्हा आलो आहे . आपल्या सर्वांच्या मदतीने पोलीसांनी दरोड्यातील आरोपींना जेरबंद केले दरोड्याच्या तपासाकरीता आंदोलन रस्ता रोको गाव बंद आंदोलने झाली असती तर व्यवस्थित तपास करता आला नसता .ग्रामस्थांनी वेळोवेळी गाव बंद ठेवण्याचा प्रयत्न करु नये व्यापाऱ्यांनी विनाकारण बंद करणारा विषयी तक्रार केल्यास निश्चितच कठोर कारवाई करु कुठल्याही घटनेला बंद रस्ता रोको हा पर्याय असु शकत नाही असेही ते म्हणाले एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके म्हणाले की आम्ही आमचे कर्तव्य केले त्या बद्दल आपण केलेल्या सत्कारामुळे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल या वेळी जि प सदस्य  शरद नवले रणजीत श्रीगोड माजी सरपंच भरत साळूंके ईस्माईल शेख सरपंच महेंद्र साळवी आदींनी मनोगत व्यक्त केले या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके राजेंद्र आरोळे सुरेश औटी शंकर चौधरी रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ नितीन भालेराव नितीन चव्हाण नितीन शिरसाठ सुनिल दिघे किशोर जाधव पंकज गोसावी राहुल नरवडे आदि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा ग्रंथ व शाल देवुन सन्मान करण्यात आला सुवर्णकार समाजाच्या वतीने अनिल मुंडलीक यांनी पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला या वेळी बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सुवालाल लुक्कड कैलास चायल प्रकाश नवले,भास्कर बंगाळ,प्रभाकर कु-हे,शांतीलाल हिरण प्रशांत लढ्ढा बाबुलाल पठाण रावसाहेब अमोलीक गोरख कुताळ प्रशांत मुंडलीक बाळासाहेब दाणी महेश कुऱ्हे  प्रकाश कुऱ्हे,दादासाहेब कुताळ,विशाल वर्मा गणेश बंगाळ ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, रमेश अमोलीक मोहसीन सय्यद,नितीन नवले,शफीक आतार, रामेश्वर सोमाणी श्रीहरी बारहाते,महेश कु-हे,जाकीर हसन शेख,जिना शेख,संजय रासकर अजीज शेख,मोहन सोमाणी,विशाल आंबेकर,शोएब शेख,गणेश बंगाळ, गोरख कुताळ, अकिल जहागिरदार,नंदु खंडागळे तस्वर बागवान,दिपक निंबाळकर प्रभात कुऱ्हे,कुंदन कुताळ,अजीज शेख,बाळासाहेब शेलार,समीर जहागिरदार,नितीन नवलेअन्वर बागवान,पत्रकार असलम बिनसाद सुहास शेलार किशोर कदम दिलीप दायमा अशोक शेलार कासम शेख मुसा सय्यद सचिन वाघ दिपक क्षत्रीय शफीक बागवान आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी आभार मानले.




MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget