बेलापुर (प्रतिनिधी )- लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास अघाडीने पुकारलेल्या बंदला बेलापुर गावात चांगला प्रतिसाद मिळाला. महाविकास अघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदला बेलापूरातील व्यापारी बाधवांनी चांगला प्रतिसाद दिला भाजपाने या बंदमध्ये सहभागी न होण्याचे अवाहन व्यापार्यांना केले होते परंतु व्यापाऱ्यांनी ते धुडकावत बंदमध्ये सहभागी होवुन आपला निषेध नोंदविला काल दिवसभर बेलापूरच्या वेगवेगळ्या व्हाटस्अप गृपवर बंद विषयी अवाहन प्रतिअवाहन चालू होते भाजपाने बंदमध्ये सहभागी न होण्याचे अवाहन व्यापाऱ्यांना केले होते तर महाविकास अघाडी तसेच शेतकरी संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे अवाहन व्यापाऱ्यांना केले होते त्यामुळे बेलापुरची बाजारपेठ काही दुकाने वगळता पुर्णपणे बंद होती भाजीपाला तसेच फळ विक्रेत्यांची दुकाने मात्र सुरु होती या वेळी शेतकरी संघटनेचे नेते सुधाकर खंडागळे पचायत समीती सदस्य अरुण पा नाईक बाजार समितीचे संचालक सुधीर नवले शिवसेनेचे आशोक पवार यांनी व्यापाऱ्यांनी स्वयःस्फूर्तीने दुकाने बंद ठेवल्याबद्दल व्यापाऱ्यांच आभार मानले.
Post a Comment