Latest Post

राहुरी ( अहमदनगर ) : डिग्रस (ता. राहुरी) येथे आज (गुरुवारी) सकाळी एका निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षकाने एका विवाहित महिलेच्या मुलांना त्यांच्या राहत्या घरात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके मुलांची सुटका करण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने उपअधीक्षक मिटके बचावले. 

सुनिल लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक आहे. तो पहाटे पासून घरात प्रवेश करण्यासाठी दबा धरून बसला होता. त्याने आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान एका विवाहित महिलेच्या घरात प्रवेश केला.

आरोपीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहित महिलेच्या लहान मुलांना डांबून ठेवले. त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर रोखून धरत त्या महिलेला बाहेर येण्यास सांगितले. मात्र महिलेनी प्रसंगावधान राखत मोबाईल वरून परिचितांना या घटनेची माहिती दिली.

त्यामुळे थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस उपअधीक्षक मिटके घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरू होते. अखेर मिटके यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली. ती मिटके यांचा डोक्याजवळून गेली. मिटके थोडक्यात बचावले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण डिग्रस गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

दरम्यान, आरोपीने मागील आठवड्यात 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजता त्या विवाहित महिलेला राहुरी शहराजवळ अडवून, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते. त्यांना शरीर संबंधाची मागणी करून, 8 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी घटनेच्या रात्री महिले आरोपीविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अपहरण, आर्म ॲक्ट, खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तोच गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने आजचे कृत्य केल्याचे समजते.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी आज (गुरुवारी) दुपारी दोन वाजता डिग्रस येथे घटनास्थळाची पाहणी केली.





बेलापुर  (प्रतिनिधी  )- गुन्ह्याचा तपास लवकर लागावा ही नागरीकांची अपेक्षा रास्त आहे परंतु आम्ही काही जादुगार नाही आपण दिलेल्या माहीती व मदतीमुळेच आम्ही सर्व गुन्ह्यांची उकल करु शकलो बेलापूरकरांनी केलेल्या कौतुकामुळे आम्हालाही काम करण्यास निश्चितच ऊर्जा मिळेल असे मत अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी व्यक्त केले      बेलापुर परिसरात काही दिवसापासुन दरोड्याचे सत्र सुरु झाले होते चोरट्यांनी आगोदर प्रा सदाफुले यांच्या घरावर दरोडा टाकला त्यानंतर उदय खंडागळे व भगीरथ चिंतामणी यांच्या घरावर दरोडा टाकला या घटनेमुळे वाड्या वस्त्यावरील नागरीकात भितीचे वातावरण तयार झाले परंतु पोलीसांनी सर्व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्याबद्दल बेलापुर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अनिल कटके श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट उपस्थित होते. या वेळी बोलताना अप्पर पोलीस दिपाली काळे पुढे म्हणाल्या की बेलापुर गावाचा ईतिहास फार मोठा आहे पोलीसांच्या पाठीवर शाबासकीची थाप ही बेलापूरकरच देवु शकतात असेही त्या म्हणाल्या  या वेळी सत्काराला उत्तर देताना उपविभागीय अधिकारी संदीपमिटके म्हणाले की मी यापूर्वीही तालुक्यात काम केलेले होते परंतु त्या वेळी मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असे म्हणालो नसलो तरी या तालुक्यात पुन्हा आलो आहे . आपल्या सर्वांच्या मदतीने पोलीसांनी दरोड्यातील आरोपींना जेरबंद केले दरोड्याच्या तपासाकरीता आंदोलन रस्ता रोको गाव बंद आंदोलने झाली असती तर व्यवस्थित तपास करता आला नसता .ग्रामस्थांनी वेळोवेळी गाव बंद ठेवण्याचा प्रयत्न करु नये व्यापाऱ्यांनी विनाकारण बंद करणारा विषयी तक्रार केल्यास निश्चितच कठोर कारवाई करु कुठल्याही घटनेला बंद रस्ता रोको हा पर्याय असु शकत नाही असेही ते म्हणाले एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके म्हणाले की आम्ही आमचे कर्तव्य केले त्या बद्दल आपण केलेल्या सत्कारामुळे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल या वेळी जि प सदस्य  शरद नवले रणजीत श्रीगोड माजी सरपंच भरत साळूंके ईस्माईल शेख सरपंच महेंद्र साळवी आदींनी मनोगत व्यक्त केले या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके राजेंद्र आरोळे सुरेश औटी शंकर चौधरी रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ नितीन भालेराव नितीन चव्हाण नितीन शिरसाठ सुनिल दिघे किशोर जाधव पंकज गोसावी राहुल नरवडे आदि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा ग्रंथ व शाल देवुन सन्मान करण्यात आला सुवर्णकार समाजाच्या वतीने अनिल मुंडलीक यांनी पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला या वेळी बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सुवालाल लुक्कड कैलास चायल प्रकाश नवले,भास्कर बंगाळ,प्रभाकर कु-हे,शांतीलाल हिरण प्रशांत लढ्ढा बाबुलाल पठाण रावसाहेब अमोलीक गोरख कुताळ प्रशांत मुंडलीक बाळासाहेब दाणी महेश कुऱ्हे  प्रकाश कुऱ्हे,दादासाहेब कुताळ,विशाल वर्मा गणेश बंगाळ ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, रमेश अमोलीक मोहसीन सय्यद,नितीन नवले,शफीक आतार, रामेश्वर सोमाणी श्रीहरी बारहाते,महेश कु-हे,जाकीर हसन शेख,जिना शेख,संजय रासकर अजीज शेख,मोहन सोमाणी,विशाल आंबेकर,शोएब शेख,गणेश बंगाळ, गोरख कुताळ, अकिल जहागिरदार,नंदु खंडागळे तस्वर बागवान,दिपक निंबाळकर प्रभात कुऱ्हे,कुंदन कुताळ,अजीज शेख,बाळासाहेब शेलार,समीर जहागिरदार,नितीन नवलेअन्वर बागवान,पत्रकार असलम बिनसाद सुहास शेलार किशोर कदम दिलीप दायमा अशोक शेलार कासम शेख मुसा सय्यद सचिन वाघ दिपक क्षत्रीय शफीक बागवान आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी आभार मानले.




बेलापूर( प्रतिनिधी )-शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात लखिंपुर खेरी येथे निदर्शने करणाऱ्या शेतकर्‍यांच्या अंगावर मोटर गाड्या घालून चार शेतकरी व एक पत्रकार चिरडल्याच्या घटनेचा बेलापूर येथील शेतकरी संघटनेच्या  वतीने जाहीर निषेध व तिव्र संताप व्यक्त करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री यांच्या ताफ्यातील दोन मोटारीने शेतकऱ्यांना चिरडण्याच्या संतापजनक घटने बद्दल देशभरात निषेध व्यक्त होत आहे. बेलापूर येथील सेवा सोसायटीच्या प्रांगणात पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक यांच्या उपस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी अरुण पाटील नाईक म्हणाले की देशाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर कायम अन्याय होत आहे. शेतमाल निघत असताना भाव पाडायचे, हंगाम संपला की पुन्हा भाव वाढवायचे. दहा हजारांवर गेलेले सोयाबीन आज पाच हजारांपर्यंत खाली आलेले आहे. ही शेतकऱ्यांची पिळवणूक आहे. गेली दहा महिन्यापासून दिल्ली सिमेवर आपल्या प्रश्ना संदर्भात आंदोलन करीत असणाऱ्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला केंद्रातील मोदी सरकारला वेळ नाही. दुसरीकडे आपल्या न्याय हक्कासाठी निदर्शने करणाऱ्या शेतकर्‍यांच्या अंगावर गाड्या घालून जगाच्या पोशिंद्यालाच चिरण्याचे काम केले जात आहे. ही घटना निंदनीय असून मी या घटनेचा जाहीर निषेध करीत आहे, अशा तीव्र शब्दात श्री पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या घटनेसंदर्भात ज्या कोणाचे नाव आले आहे, त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी बेलापूर सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे यांनी केली.

यावेळी प्रकाश नाईक, भास्कर बंगाळ प्रकाश कुऱ्हे, भाऊसाहेब वाबळे, चंद्रकांत नाईक, अक्षय नाईक, शिवाजी वाबळे, जावेद शेख,पत्रकार देविदास देसाई  सुहास शेलार, दिलीप दायमा,किशोर कदम निलेश सोनवणे, अशोक कुऱ्हे, संदीप कुऱ्हे, हरी बडाक, श्री सोमानी, सुनील नाईक, बापू पुजारी, मच्छिंद्र खोसे, नंदू भागवत, जगन्नाथ अमोलिक आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर खूर्द गावात सध्या फक्त एकच कोरोनाचा रुग्ण असुन तो ही रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहे गावात लसीकरण ८०% पुर्ण झाले असुन सणा सुदीचे दिवस लक्षात घेता नागरीकांना बंद मध्ये शिथीलता द्यावी अशी मागणी बेलापुर खूर्दच्या ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी केली आहे. मा जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी पुढे म्हटले आहे की गावात सध्या कोरोनाचा एकच रुग्ण आहे सर्व नागरीकांचे आर टी पी सी आर टेस्ट व रँपीड टेस्ट करुन घेण्यात आलेल्या आहेत गावात लसीकरणाचे कामही चांगल्या प्रकारे झालेले आहे तपासणी केलेले सर्व अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहे गावातील कोरोना समीती अतिशय जागृकपणे काम करत असुन कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेत आहे          गावात कोरोनाचे रुग्ण वाढु लागताच बेलापुर खूर्द ग्रामपंचायतीने आपणहून लाँकडाऊन सुरु केला होता सर्व परिसर बंद केला होता तेव्हापासून गावातील व्यापार बंद आहे सध्या कोरोना आटोक्यात आलेला असुन तसा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल देखील आहे नवरात्रौ उत्सव दसरा सण तोंडावर आला असल्या कारणाने व्यापाऱ्यांनी कर्ज काढून उसनवार करुन दुकानात माल भरुन ठेवलेला आहे त्यामुळे दुकाने जास्त दिवसा बंद राहील्यास माल खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे बंदच्या नियमात शिथीलता द्यावी अशी मागणी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे  या निवेदनावर सर्वश्री अँड दिपक बारहाते ,महेश बडधे , चंद्रकांत मते ,भाऊसाहेब पुजारी,राहुल गायकवाड  ,किशोर बोरुडे , हुसेन पठाण ,योगेश वाघमोडे ,रविंद्र पुजारी ,नंदकिशोर कुऱ्हे ,शरद म्हैस ,सोमनाथ भागवत ,रविंद्र महाडीक ,प्रज्ञा रोकडे , रफीक सय्यद ,मिलींद बडधे ,दिपक महाडीक ,रोहीणी राऊत ,समीर सय्यद , प्रकाश रणदिवे ,लखन भगत विलास भालेराव किरण पुजारी मच्छिंद्र थोरात सुनिल बडधे आदींच्या सह्या आहेत.


श्रीरामपूर (प्रतिनिधी)- माननीय नगराध्यक्ष अनुराधाताई यादी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राजेंद्र पवार यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादीचे युवा शहर उपाध्यक्ष फजल शेख यांनी संजय नगर परिसरातील मुळे प्राथमिक शाळा श्रीरामपूर ईदगाह रोड या ठिकाणी व्हॅक्सिनेशन शिबिर घेतले. या ठिकाणी नगरसेवक राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या सहकारी टीमच्या सहाय्याने संजय नगर इदगाह परिसर या भागातील नागरिकांना लसीकरणासाठी घरोघरी जाऊन विनंती व जनजागृती करून त्यांची नोंदणी करून त्यांना कोरोना चे सर्व नियमांसह लाइन लावून व्हॅक्सिनेशन

करून घेताना नगरसेवक राजेंद्र पवार सह परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी सहा वाजेपर्यंत  700 च्या पुढे नागरिकांना व्हॅक्सिनेशन करून घेतले या कामाबद्दल त्यांचे परिसरातील नागरिकांनी कौतुकच केले यावेळी सुरज सोनवणे,जावेद ईनामदार,अबूबकर बिनसाद ,शशिकांत खरात, सलीम पठाण ,अक्षय साळवे ,शुभम पवार, समी ईनामदार,सचिन गवळी व नगरपालिका चे आरोग्य विभाग कर्मचारी यांनी नागरिकांना उपस्थित राहून चांगली सुविधा दिली.



मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक,अहमदनगर व मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब,अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. अनिल कटके व त्यांचेपथकातील पोहेकॉ. भाऊसाहेब काळे, पोहेकॉ. दत्तात्रय हिंगडे, पोना संदीप दरंदले, पोकॉ. राहुल सोळंके, पोकां.रोहिदास नवगिरे, पोकॉ. शिवाजी ढाकणे, पोकॉ. आकाश काळे असे अवैध धंदयावर कारवाई करणेकामी स्वतंत्रपPथक तयार करुन कारवाईचा आदेश दिल्याने पारनेर पो स्टे हददीत विशेष मोहीम राबवून सोमवार दि.०५/१०/२०२१ रोजी ०५ ठिकाणी छापे टाकून एकूण २३,०००/-रु. किं. चा मुद्देमाल त्यामध्ये गावठीहातभटटीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे ५ आरोपी विरुध्द पारनेर पोलीस टाण्यात खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

१) पारनेर पो.स्टे. गुरनं. १७०८/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ३,०००/-रु. किं, ची गावटी हातभटटीची तयार दारु,आरोपीचे नांव- बजाबा अमृता दिघे रा. वडझिरे, ता.पारनेर

२) पारनेर पो.स्टे. गुरनं. । ७०९/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ३५००/-/-रु. किं. ची गावटी हातभटटीची तयार दारु,आरोपीचे नांव. संतोष शंकर मोरे रा. वडझिरे, ता.पारनेर

३) पारनेर पो.स्टे. गुरनं. १७१०/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ३०००/-रु. किं. ची गावटी हातभटटीची तयार दारु आरोपीचे नांव. १. जनाबाई शंकर लंके रा. वडझिरे, ता.पारनेर

४) पारनेर पो.स्टे. गुरनं. ७११ /२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- २५००/-रु. किं. ची गावटी हातभटटीची तयार दारु आरोपीचे नांव- १. शाम दामू मलके रा. वडझिरे, ता.पारनेर (फरार)

५) पारनेर पो.स्टे. गुरनं. १७१२ /२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ११०००/-रु. किं. ची गावटी हातभटटीची तयार दारु आरोपीचे नांव- १. जयवंत आणा गायकवाड रा. देविभोयरे, ता.पारनेर

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेव, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री.सौरभकमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, व श्री. अजित पाटील साहेब,उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.








बेलापुर  (प्रतिनिधी  )-माणसातील माणूसकी संपत असली तरी एखाद्या मुक्या प्राण्याला जिव लावला तर तो ही प्राणी आपल्यावर तितकेच प्रेम करतो अशीच एक घटना संक्रापुर तालुका राहुरी येथे घडली असुन मालक मयत झाल्यानंतर त्यांची पाळीव कुत्री दररोज त्यांच्या फोटोजवळ जावुन बसत आहे.तीन वर्षापूर्वी कुणीतरी शिर्डी येथुन कुत्रे पकडून ते संक्रापुर येथे आणून सोडले त्यात हे कुत्रीचे पिलू होते. ते संक्रापुर येथील धर्माजी धोंडीबा चव्हाण यांच्या घराजवळ राहु लागले. काही दिवसातच धर्माजी चव्हाण यांना त्या कुत्रीचा लळा लागला .ती घरात, परिसरात घाण करु लागल्यामुळे धर्माजी चव्हाण यांची मुले नानासाहेब व दादासाहेब हे त्या कुत्रीचा रागराग करु लागले .परंतु धर्माजी चव्हाण यांनी मुलांची सुनांची समजुत काढली अन त्या कुत्रीचे पालन

पोषण केले तीचे नाव सोनी ठेवले आज ती सोनी तीन वर्षाची झाली आहे तिचे पालन पोषण करणारे तिचे मालक धर्माजी चव्हाण यांचे अचानक निधन झाले त्यांच्या निधनाच्या तीन दिवस सोनीने काहीच खाल्ले नाही परंतु ही बाब घरच्यांच्या लक्षात आली नाही. वडील आजारी पडल्यामुळे नानासाहेब व दादासाहेब तसेच घरातील सर्व मंडळी त्याच्या देखभाली करीता तैनात असल्यामुळे सोनीकडे कुणी पाहीलेच नाही. परंतु ती मुकाट्याने अश्रू ढाळत होती अखेर धर्माजी चव्हाण यांचे निधन झाले त्यांचा अंत्यविधीही उरकण्यात आला त्या नंतर  धर्माजीचा फोटो घरात ठेवण्यात आला त्यापुढे दिवा लावण्यात आला अन ती सोनी सरळ त्या फोटोपुढे नतमस्तक होवुन अश्रू ढाळत बसली. सुरुवातीला घरातील कुणालाही काही वाटले नाही परंतु ती सोनी सारखी धर्माजी चव्हाण यांच्या फोटो समोर येवुन बसु लागली अन मग घरातील लोकांना या मुक्या प्राण्याच्या भावनेचा, दुःखाचा अंदाज आला .आपल्या भावना आपण व्यक्त करु शकतो परंतु मुक्या प्राण्याला देखील  आपल्या सारख्याच भावना असतात .


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget