प्रवरामाईला आलेल्या पहील्या पाण्याचे गांवकरी मंडळाच्या हस्ते जलपुजन.
बेलापूरः(प्रतिनिधी )-अमृतवाहिनी प्रवरा नदीस यंदाच्या पावसाळ्यात पहिलेच पाणी आले. बेलापूरच्या गावकरी मंडळ व ग्रामस्थांनी प्रवरामाईचे जलपूजन करुन आपला आनंद व्यक्त केला.प्रवरा नदिच्या पाण्यावर बेलापूर पंचक्रोशीतील शेती व बाजारपेठ अवलंबून आहे.भंडारदरा व निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदिला पाणी येते.यंदा सप्टेंबर महिना सुरु होवूनही नदी वाहती न झाल्याने चिंतेचे वातावरण होते.माञ वरुणराजाच्या कृपेने धरणांच्या पाणलोटात मुसळधार पाऊस होवून धरणे भरली आणि प्रवरा नदिला यंदा पहिल्यांदाच पूर आला. प्रवरेला पाणी आल्याचे समजताच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.गावकरी मंडळ व ग्रामस्थांनी प्रवरेला आलेल्या पाण्याचे पूजन केले.बेलापूरचे माजी उपसरपंच प्रकाश नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड,पत्रकार देविदास देसाई अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कु-हे,तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे आदिंची भाषणे झाली.
याप्रसंगी शरद नवले,रणजित श्रीगोड,जालिंदर कु-हे,महेंद्र साळवी,अभिषेक खंडागळे, शरद देशपांडे, साहेबराव वाबळे,इस्माईल शेख,भाऊसाहेब कुताळ, भास्कर बंगाळ, प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,देविदास देसाई,नवनाथ कुताळ,दिलीप दायमा,सुहास शेलार,किशोर कदम,पुरुषोत्तम भराटे,चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,शफिक बागवान,बाळासाहेब दाणी,शांतीलाल हिरण,भरतलाल सोमाणी,रावसाहेब अमोलिक, विशाल आंबेकर,महेश कु-हे,सचिन वाघ,राजेंद्र वारे,जमशेद पटेल, अन्वर सय्यद,सतिश व्यास,तस्वर बागवान,श्रीहरी बारहाते,संजय रासकर,अजीज शेख,बाळासाहेब शेलार,अल्ताफ शेख,शफीक आतार,रफिक शेख,रोहित शिंदे,युनूस आतार,मारुती गायकवाड,अन्सार पटेल,विनायक जगताप,मोकाशी दादा,अशोक शेलार,बाबा शेख,विजय हुडे,लहानू नागले,जिना शेख,दादासाहेब कुताळ, जाकीर हसन शेख, बाबूलाल पठाण,जब्बार आतार,दिलीप अमोलिक, कुंदन कुताळ,सुरेश अमोलिक,सिकंदर पठाण,मोहन सोमाणी,सागर ढवळे,निसार बागवान,संजय गोरे,निसार नालबंद,मच्छिंद्र खोसे,सुभाष शेलार,प्रशांत मुंडलिक,मास्टर हुडे,सद्दाम आतार,साईनाथ शिरसाठ,गणेश बंगाळ, अकबर सय्यद, किरण गागरे,अकिल पटेल,सौरभ कापसे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.