खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनापोटी अकरा लाख रुपये देण्याचे अश्वासन देवून दिला नकार,गुन्हा दाखल.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनापोटी अकरा लाख रुपये देण्याचे अश्वासन देवून नकार दिला तसेच मानसिक व शारिरीक छळ केल्याचा आरोप गुप्त धन खोदकाम करणारा मयत सुनिल गायकवाड याच्या पत्नीने केल असुन त्याच्या तक्रारीवरुन पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बेलपूरातील दोन खटोड बंधुवर गुन्हा दाखल केला आहे. या बाबत गुप्तधनाचे खोदकाम करणारा मजुर मयत सुनिल गायकवाड याची पत्नी वंदना सुनिल गायकवाड हीने श्रीरामपुर शहर पोलीसात दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की वट पौर्णिमेच्या दिवशी माझे पती सुनिल गायकवाड हे दोन मजुरांना सोबत घेवुन राजेश व हनुमंत खटोड यांचे घराचे मागील बाजुस मोकळ्या जागेत झाडे लावण्यासाठी मजुरीने खड्डे खोदण्याच्या कामासाठी गेले होते ते काम संपवून घरी आल्यानंतर मला सांगितले की हनुमंत खटोड यांचे घराचे मागील बाजुस झाडे लावण्यासाठी खड्डा खोदत असताना एक तांब्याचा हंडा सापडला त्यात वर चांदी व खाली सोने होते हंडा पुर्णपणे भरलेला होत खड्डा खोदताना हंड्याला धक्का लागला त्यामुळे त्यातील नाणी खाली पडली त्या नाण्यांना हात न लावता ती फावड्याच्या सहाय्याने पुन्हा हंड्यात टाकली त्या नंतर राजेश व हनुमंत खटोड यांना सांगितले की खोदकाम करताना हंडा सापडला आहे ते दोघेही तेथे आहे त्यातील सोने व चांदीची नाणी पाहून राजेश व हनुमंत खटोड यांनी सांगितले की तुला सदरील हंडा सापडल्याचे कुणालाही सांगु नको तुला अकरा लाख रुपये दैतो पैकी एक लाख २८ हजार रुपये रोख दिले या घटने नंतर माझे पती सुनील गायकवाड हे त्यांनी दिलेल्या अश्वासनामुळे राहीलेले दहा लाख रुपये मागण्यासाठी वेळोवेळी राजेश व हनुमंत खटोड यांचेकडे गेले त्या त्या वेळेस राजेश व हनुमंत खटोड यांनी माझे पतीला पैसे न देता शिवीगाळ करुन मारहाण केली हा प्रकार पतीने घरी आल्यानंतर मला सांगीतला त्या नंतरही त्या दोघांना वेळोवेळी पैसे मागीतले असता त्यांनी माझे पतीला धमकी दिली की आमचेकडे भरपुर पैसे आहेततुला कोठेही कामधंदा करु देणार नाही तुला काम मिळू देणार नाही तुझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणून भिक मागायला लावू असे म्हणून पतीला धमकी दिली त्या नंतर पतीने घरी आल्यानंतर सर्व काही सांगितले तेव्हापासून माझे पती घरी कुणा सोबतही बोलत नसत सदरील लोकांना घाबरुन घरातच बसुन रहात असे सदरील गुप्त धनाचा गावभर बोभाटा झाल्याने तहसीलदार यांनी त्या गुप्तधनाचा पंचनामा करुन ते जप्त केले त्या नंतर जेव्हा जेव्हा राजेश खटोड व माझे पतीची भेट झाली त्या त्या वेळेस राजेश खटोड माझे पतीला म्हणायचा तुझ्यामुळे आम्हाला आमचे वडीलोपार्जित धन शासनाला जमा करावे लागले तुच ही बातमी सर्वांना सांगीतली तुला आता तुझी अवकात दाखवीतो असे म्हणून पतीला शिवीगाळ करुन मानसिक त्रास दिला होता सदरील बाब ही माझे पती घरी आल्यानंतर मला सांगीतली तेव्हापासून माझे पती खूप मानसिक तणावाखाली जिवन जगत होते त्यांना खटोड यांची खुप भिती वाटत होती त्याच भितीपोटी व त्यांचे मानसिक शारिरीक छळाला कंटाळून माझे पती सुनिल गायकवाड यांनी आत्महत्या केली असुन माझ्या पतीच्या मृत्यूस खटोड हेच जबाबदार असल्याचे वंदना गायकवाड हीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे तिच्या तक्रारीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला राजेश व हनुमंत खटोड यां दोघावर भादवि कलम ३०६ ,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यत आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हे करतआहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget