या घटनेमुळे बेलापूर गाव व श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.सुनील गायकवाड यांनी असा आरोप केला होताा की या गुप्तधनाची विल्हेवाट स्वत:च्या फायद्यासाठी बेलापूरातील काही मुजोर प्रवृत्तीच्या लोकांनी लावली होती .तसेच या मुजोर प्रवृत्तीच्या लोकांना आपण या प्रकरणाचा निपटारा केला असे देखील वाटत होते.या आरोपानंतर सुनील गायकवाड यांनी आत्महत्या केली आहे.
त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची आवश्यकता असून यामध्ये अनेक “व्हाईट कॅालर गुन्हेगारांचे” हात गुंतलेले असल्याची दबक्या आवाजात बेलापूर गावात चर्चा पूर्वी चालु होती आणि आता सुनील गायकवाड यांच्या मृत्यूनंतर ही चर्चा पुन्हा जोर पकडत आहे.
तरी पोलिस प्रशासनाने या प्रकरणाच्या मूळाशी जावुन तपास करून सुनील गायकवाड यांना न्याय द्यावा.त्यांच्यामागे चार मुली,आई ,पत्नी हे पोरके झाले आहेत.काही व्हाईट कॅालर गुन्हेगार प्रवृत्तीच्या अति स्वार्थी व अति लालची लोकांमुळे गोरगरीब मजूर सुनील गायकवाड यांचा जीव गेला बेलापूरात गुप्तधन सापडल्याची आगोदर दबक्या आवाजात चर्चा होती खटोड यांच्या बंगल्याच्या परिसरात खोदकाम करताना गुप्त धनाचा हंडा सापडला तो हंडा सर्व प्रथम सुनिल गायकवाड याच्या नजरेस पडला होता त्या नंतर त्यांच्या जोडीदारांच्या मदतीने तो बाहेर काढला त्या वेळी तिन जणांना तो उचलत नव्हता असे सुनिलचे म्हणणे होते संबधीतांनी त्यांना गप्प बसविण्यासाठी लालच दाखविले त्यामुळे ते मजुरही गप्प बसले त्या नतर दिलेल्या अश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे सुनिल व त्याच्या सोबत खोदकाम करणारांनी वाद घालण्यास सुरुवात केली अन त्या गुप्त धनाचा गावभर बोभाटा झाल्यानंतर संबधीतांनी बऱ्याच दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयास गुप्तधन असले बाबत कळविले त्या नंतर शासकीय नियमाप्रमाणे कार्यवाही झाली मात्र त्या डेगीत केवळ चांदीच ठेवण्यात आल्याचे सुनिलचे म्हणणे होते या खोदकाम करणार्या मजुरांना दबावतंत्राचा वापर करुन दहशतीखाली ठेवले सुनिल याने अनेक वृत्तवाहीनींना मुलाखती दिलेल्या होत्या त्यामुळे सुनिलवर फार मोठा दबाव होता त्याला रात्र रात्र झोप येत नसे तो अचानक झोपेतुन खडबडूळ जागे व्हायचा आसे काही नातेवाईकांचे म्हणणे आहे त्यामुळे पैसे कमी मिळाल्यामुळे आलेले नैराश्य तसेच वाढता दबाव यामुळै सुनिलने आत्महत्या केली असल्याचे गावात बोलले जात आहे पोलीसांच्याही एकंदर सर्व प्रकार आता लक्षात येत आहे मात्र तक्रार न आल्यामुळे पोलीसही शांत आहेत मयत सुनिलला मेल्यानंतर तरी न्याय मिळेल का? गुप्तधनाची सखोल चौकशी होवून सोने गिळणारे वाटून घेणारे उक्ते घेणारे यांना शासन होईल का?हा खरा सवाल आहे
Post a Comment