साईनाथ रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञाचा प्रताप साईदर्शनने केला उघड, स्टिंग ऑपरेशन मध्ये या डॉक्टरचा पर्दाफाश!!
शिर्डी ( प्रतिनिधी) येथील श्री साईनाथ रुग्णालय येथे सेवेत असताना आपल्या आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्या खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या येथील डॉक्टर अमित नाईकवाडी यांचा भांडाफोड दैनिक साई दर्शन च्या टीमने स्टिंग ऑपरेशन करून केला आहे, श्री साईबाबा संस्थान व खुद्द साईबाबानाही आर्थिक फायद्यासाठी फसवणाऱ्या या डॉक्टरांवर श्री साई संस्थान प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे , अशा मागणीचे सर्व पुराव्यानिशी निवेदन दैनिक साई दर्शन च्या वतीने श्री साईबाबा संस्थान चे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश व श्री साईबाबा संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे,
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,शिर्डीत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे दोन अद्ययावत रुग्णालये, नागरिक आणि साई भक्तांच्या सेवेसाठी सुसज्ज आहेत. परंतु या रुग्णालयातील काही डॉक्टर मंडळींकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रुग्णांच्या जीवाशी अत्यंत बेजबाबदारपणे खेळ चालविला असून त्याबाबत असंख्य तक्रारी दैनिक साईदर्शन कडे प्राप्त होत असतानाही श्री साईबाबा संस्थानची बदनामी होईल अथवा चुकीचा संदेश बाहेर भक्तांना अथवा नागरिकांना जाईल या एकाच कारणामुळे आजवर त्या तक्रारींकडे दैनिक साई दर्शन कडून कानाडोळा करण्यात आला. मात्र हा प्रकार दिवसेंदिवस वाढू लागला आहे, एका डॉक्टरांनी तर मोठा कळसच केला आहे,
अश्या या डॉक्टरच्या एकाच दिवसात दोन तक्रारी साई दर्शन कडे येऊन संबंधित रुग्णाची नातेवाईक असलेली व्यक्ती न्यायाची अपेक्षा दैनिक साई दर्शन कडे करत होती, त्या अनुषंगाने सदर प्रकरणी खरे काय ते शोधण्याचा प्रयत्न दैनिक साईदर्शनने केला असता धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्याने या संपूर्ण प्रकरणी दैनिक साईदर्शनच्या टीम सह स्टिंग ऑपरेशन करत सदर प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.
संबंधित डॉक्टर अमित नाईकवाडी हे येथील साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ म्हणून म्हणून सेवा बजावतात, त्याबद्दल मानधनही घेतात,आणि या रुग्णालयात कोणतेही वैद्यकीय उपकरणे व साधनांची कमी नसतांनाही या रुग्णालयात ऑपरेशन साठी आलेल्या रुग्णांना मात्र कोपरगाव हद्दीत नवीन झालेल्या हॉस्पिटलला ऑपरेशन करा , मी स्वतः ऑपरेशन तेथे करतो,असे हे डॉक्टर सांगत असल्याचे निदर्शनास आले, म्हणजे हे महाशय डॉक्टर साईबाबा संस्थान मध्ये मानधन घेऊन अस्थिरोग तज्ञ म्हणून काम करतात, मात्र येथे काही रुग्णांची शस्त्रक्रिया संस्थांनच्या रुग्णालयात करण्याऐवजी कोपरगाव येथील एका नवीन हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करून देतो, असे सुचवतात, हे साईबाबांना किंवा साई संस्थानला फसवण्याचा प्रकार नाही का? असा सवाल करण्यात येत आहे, यासंदर्भात साईनाथ रुग्णालयात चौकशी केली असता येथील वैद्यकीय अधीक्षकाकडून काल दिनांक१३ सप्टेंबर 20 21 सोमवार रोजी डॉक्टर नाईकवाडी हे वैद्यकीय कारणाने एक दिवसीय रजेवर असल्याचे कळाले , त्यांनी तसा मोबाईलवर सकाळी मेसेज केल्याचेही सांगण्यात आले,त्यानंतर आम्ही डॉक्टर नाईकवाडे यांना कॉल केला असता त्यांनी मात्र मी 8 दिवस रजेवर असून संस्थान रुग्णालयात कोणतेही ऑपरेशन करू शकत नाही, असे स्पष्ट सांगितले. मग आम्ही स्वतः आम्हाला माहिती मिळाल्या नुसार हे खरच आजारी आहेत की दुसऱ्या दवाखान्यात रुग्णांची शस्त्रक्रिया करत ,काम करत आहेत हे तपासण्या साठी कोपरगाव येथील त्या हॉस्पिटल मध्ये खात्री करण्यास गेलो असता हे डॉक्टर नाईक वाडी त्या हॉस्पिटल मधेच एका रुग्णाचे ऑपरेशन करत असल्याचे आम्हाला दिसून आले, येथे केसपेपर वर औषधे सुद्धा त्यांनी स्वहस्ताक्षरात ऑपरेशन थेटर मधून बाहेर येऊनत्यांच्या सही निशी लिहून दिली आणि आम्ही त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केली आहे, त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितले की, मला सर्दी असल्याने साईनाथ रुग्णालयात ऑपरेशन करू दिले जात नाही म्हणून मी इथे शस्त्रक्रियेसाठीआलो आहे, याचा अर्थ साई संस्थानच्या रुग्णालय प्रशासनालाही फसवुन हे डॉक्टर महाशय येथे शस्त्रक्रिया करत होते, हे उघड झाले आहे,अश्या पद्धतीने रुग्णांच्या ऑपरेशनची तारीख साईनाथ रुग्णालयात असताना हे महाशय दुसऱ्या खाजगी रुग्णालयात त्या रुग्णाला बोलावत असतील, आपल्या आर्थिक फायद्यासाठी जर संस्थान रुग्णालय सोडून इतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असतील, तेथे शस्त्रक्रिया करीत असतील तर या डॉक्टरांच्या वतीने श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात सेवेवर येतांना जे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे ,त्याचे उल्लंघन होत नाही का? कारण संस्थान रुग्णालय प्रशासनाच्या नियमाप्रमाणे जर डॉक्टर साई संस्थान रुग्णालयात काम करत असेल तर इतर दवाखान्यात त्यांना काम करण्यास मनाई आहे असे असताना या डॉक्टर महाशयांनी मात्र ते तर केलेच आहे ,पण संस्थान रुग्णालयातील रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयात बोलावुन तेथे शस्त्रक्रिया करतो असे सांगणे म्हणजे साई संस्थान प्रशासनाला फसवण्याचा प्रकार हा नाही का? या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अश्या डॉक्टर पेशाला काळीमा फासणाऱ्या पांढऱ्या कपड्यातील काळा हेतू ठेऊन काम करणाऱ्या लोकांना योग्य आणि कठोर शासन झाले पाहिजे अशी दैनिक साईदर्शन प्रमाणेच असंख्य साईभक्त, ग्रामस्थ, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांची मागणी असून सदर प्रकरणी संस्थान प्रशासनाने लक्ष घालून डॉक्टर अमित नाईकवाडे यांना कठोर शासन करून सेवेतून बडतर्फ करावे, जेणेकरून अश्या प्रकारे श्री साईबाबा संस्थान प्रशासनाची आणि पर्यायाने साईबाबांची पैशांच्या लालसेपोटी फसवणूक करणाऱ्या लोकांना चाप बसविणे अत्यंत गरजेचे झाले आहे, ह्या डॉक्टरांना तातडीने कठोरात कठोर शासन करून सेवेतून बडतर्फ करावे, साईंच्या रुग्णालयात होणाऱ्या ह्या अशा डॉक्टरांच्या अनागोंदीला आळा बसवावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे दैनिक साई दर्शन च्या वतीने श्री साईबाबा संस्थान चे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश व श्री साईबाबा संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत यांना ही प्रत्यक्ष भेटून केली आहे, त्यांनीही या निवेदनानंतर यासंदर्भात लवकरच लवकर चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन यावेळी दिले आहे, दरम्यान या प्रकरणामुळे या डॉक्टर महाशया बद्दल शिर्डी व परिसरातील ग्रामस्थ व संपूर्ण साई भक्तांमध्ये मोठी चर्चा होत आहे व या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी ही साई भक्त व ग्रामस्थांनी केली आहे,