Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी )-येथील सुनिल विनायक गायकवाड वय ४३ याने घरातच साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली. या बाबत मिळालेली माहीती अशी की सुनिल गायकवाड यांने काल सायंकाळी घरातील छताला असलेल्या पंख्याला साडी बांधुन गळफास घेतला सुनिलची पत्नी माहेरी गेलेली होती  घरात कुणीही नसल्यामुळे ही बाब उशीरा लक्षात आली तो पर्यत सुनिल मयत झालेला होता घटनेची माहीती मिळताच बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके आपल्या सहकाऱ्या समवेत घटनास्थळी पोहोचले सुनिल यास खाली उतरुन श्रीरामपुर येथील साखर कामगार हाँस्पीटलला दाखल केले असता डाँक्टरांनी त्यास मृत घोषित केले मृतदेहाचे शवविच्छेदन करुन ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले बेलापुर येथील स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे पोलीस पाटील अशोक प्रधान उपस्थित होते  काही दिवसापासून सुनिल हा प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याची गावात चर्चा सुरु असुन सुनिलच्या आत्महत्येचे खरे कारण काय ? या बाबत नागरीकात उलट सुलट चर्चा चालू आहे त्याच्या पश्चात आई पत्नी व चार लहान मुली भाऊ भावजयी असा परिवार आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) आज दि.  10/09/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत  श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव आऊटसाईड येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  हरेगाव आऊट साईड परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला 

आरोपी. क्र.)1) अशोक बाबुराव गायकवाड

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

3500/- रू किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2.  सुधीर काशिनाथ गायकवाड 

38,500/-  रु. कि.चे 550 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2000/- रू  किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र.) 3. अशोक रामभाऊ गायकवाड

35,000/-  रु. कि.चे 500 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3500/- रू  किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 4. संतोष चंद्रभान गायकवाड

14,000/-  रु. कि.चे 200 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1,500/- रू  किमतीची 15  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

---------------------------------------------

 एकूण 1,40,000/-/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे हरेगाव आऊटसाईड परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे हरेगाव येथील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.

*सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ,  लक्ष्मण  राऊत, अमोल गायकवाड, प्रवीण भोजे, आर सी पी पथक आदींनी केली.*

बेलापूर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायतीने १४ वा वित्त आयोग व दलीत वस्ती योजनेच्या निधीतून केलेल्या कामात ४० लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेबाबत जि प सदस्य शरद नवले यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्याने जिल्हा परिषदेचे विद्युत विभागाचे शाखा अभियंता बी. बी. चौधर यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी निलंबनाची कारवाई केलीआहे.बेलापूर बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने २०१५ ते २०२० या काळात १४ वा वित्त आयोग,दलित वस्ती सुधार योजना आदी योजनांच्या निधी मधून लाईटची कामे केली होती. याकामांवर अंदाजे ४० लाख रुपये एवढी मोठी रक्कम खर्च करण्यात आली होती. सदरील कामात भ्रष्टाचार झालेला असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार केली होती.तसेच जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडी सभेत हा विषय मांडून याबाबत चौकशी करण्याचा ठराव करण्यात आला होता.या अनुषंगाने शासकीय तंत्रनिकेतन,अहमदनगर यांच्या वतीने तांत्रिक तपासणी व चौकशी करण्यात आली.चौकशी अधिकाऱ्यांनी बेलापूर गावास भेट देऊन समक्ष पाहणी करत चौकशी केली.या चौकशीत झालेले काम व नमूद केलेले काम यांत मोठी तफावत आढळून आली.तसेच मोजमाप पुस्तकात नोंदणी केलेली बल्ब,वापरलेले पोल यात मोठी तफावत आढळली.या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.तसेच श्री.चौधर यांनी कामाचे अंदाजपत्रके,मोजमाप पुस्तिका व इतर कागदपत्रे तपासणी कामी हजर केली नाहीत.यावरून या कामात गैरव्यवहार झालेला दिसत असल्याने श्री.चौधर यांच्यावर  जिल्हा परिषद सेवा(शिस्त व अपील)च्या तरतुदीनुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात आलेली असून याबाबतचे आदेश जिल्हा परिषद संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत.यामुळे गावात खळबळ झाली असून सन २०१५ ते सन २०२१ याकाळात लाईटच्या कामात मोठा  गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याची चर्चा आहे.


श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांना बढती मिळाली असून त्यांची नियुक्ती नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस अधिक्षक पदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बीडमधील आंबेजोगाई अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.स्वाती भोर यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केलेले आहे.तसेच नगर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांची सोलापूर शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी तर नगर शहर उपविभागाचे विशाल ढुमे यांची औरंगाबाद शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती झाली आहे.तर पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक यांची नगर पोलीस मुख्यालयात उपअधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील 17 वर्षीय युवकाने शेवगाव पोलिसांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.अदित्य भोंगळे याला शेवगाव पोलीस ठाण्याच्या चार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या व गावठी कट्टा खरेदी विक्री प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. नंतर त्याला पोलिसांनी सोडून दिले. मंगळवारी रात्री त्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणला होता. दरम्यान, मयत अदित्यची आई संगीता भोंगळे यांनी सांगितले की, माझ्या मुलाला पैशासाठी पोलीस त्रास देत होते. त्यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली. मी बचत गटाचे पैसे काढून 47 हजार रुपये पोलिसांना दिले. राहिलेले तीन हजार रुपये पोलिसांनी दिलेल्या मोबाईल नंबर वर फोन पे व्दारे पाठविल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या घटनेनंतर शेवगाव शहरातील आंबेडकरी चळवळीचे नेते, कार्यकर्ते यांनी दुपारी चार वाजता अदित्य भोंगळे याचा मृतदेह शेवगाव पोलीस ठाण्यात आणला. दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल न झाल्यास त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे घटनास्थळी आले आणि मयत अदित्यच्या आईचा इन कॅमेरा जबाव घेऊन दोषी पोलीसांवर ठोस कार्यवाही करू, असे आश्वासन दिल्यावर मृतदेह अंत्यविधीसाठी पाठविण्यात आला.यावेळी पवन कुमार साळवे, शिवसेना तालुका अध्यक्ष तथा माजी सभापती अ‍ॅड. आविनाश मगरे, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, माजी सभापती प्रकाश भोसले, आरपीआयचे तालुका अध्यक्ष विजय बोरुडे, बाजार समितीचे माजी सभापती अनिल इंगळे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊराव भोंगळे, अनिल कांबळे, वंचितचे तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे, शेवगावचे माजी सरपंच राहुल मगरे, नगरसेवक प्रविण भारस्कर, अनिल बोरूडे, संतोष बानायत, भगवान मिसाळ, कडू मगर, राजू मगर, अरुण भोगळे, रोहीदास भोंगळे, संतोष पटवेकर आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी देवळाली प्रवरा येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला 

आरोपी. क्र.)1)मंगल गोरक्षनाथ गायकवाड रा. देवळाली प्रवरा

14,000/-  रु. कि.चे 200 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1400/- रू किमतीची 14 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2. कचरू राजेंद्र गायकवाड 

35,000/-  रु. कि.चे 500 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2500/- रू  किमतीची 25  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र.) 3. रमेश गायकवाड

14,000/-  रु. कि.चे 200 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

1700/- रू  किमतीची 17  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 4. रवि डुकरे 

24,500/-  रु. कि.चे 350 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2000/- रू  किमतीची 20  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र.) 5.  अजय जाधव

14,000/-  रु. कि.चे 200 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1500/- रू  किमतीची 15  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

---------------------------------------------

 एकूण 1,10,600/-/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे  देवळाली प्रवरा परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे देवळाली प्रवरा येथील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, P.N  पंकज गोसावी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, राहुल नरवडे, सुनील दिघे गौतम लगड, Lpc. पूजा पवार, अनिता गीते आदींनी केली.


श्रीरामपूर (प्रतिनिधी )-महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या नासिक जिल्हा कार्याध्यक्षपदी रंगरेज तर मालेगाव शहर उपाध्यक्ष पदी शाहिद शेख यांची निवड पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत नासिक जिल्हा कार्याध्यक्षपदी असलम रंगरेज यांची निवड करण्यात आली असून मालेगाव शहर उपाध्यक्ष पदी शाहिद शेख यांची निवड करण्यात आली या निवडीचे नियुक्तीपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली यांच्या हस्ते देण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत आली हे होते सूत्रसंचालन पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष कासम शेख यांनी केले या बैठकीस पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव शेख फकीर मोहम्मद ,नाशिक जिल्ह्याचे सचिव वाहाब खान पठाण, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष, सुभाष राव गायकवाड, श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष ,कासम शेख,बेलापूर शहर प्रमुख ,एजाज सय्यद ,सामाजिक कार्यकर्ते अमीर बेग मिर्झा आधी उपस्थित होते .यावेळी शेख बरकत आली ,कासम शेख ,सुभाष राव गायकवाड,वाहाब खान,एजाज सय्यद आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख यांनी सांगितले की पत्रकार संघाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील विस्तार वाढविणे करिता आपण या ठिकाणी नाशिक व मालेगाव येथील व्यक्तींची निवड करून त्यांच्यावर पत्रकार संघाची जबाबदारी व पुढील पत्रकार संघाचा विस्तार सोपविला आहे या बैठकीत काँग्रेस कमिटीच्या शहर उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रियाज खान पठाण यांचा तर पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सुभाष राव गायकवाड यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. बैठकीस इतर पत्रकार उपस्थित होते .आभार प्रदर्शन वाहब खान यांनी केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget