Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) येथील पत्रकार प्रकाश बापुराव कुलथे यांची शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर निवड व्हावी अशी विनंती स्वरूप मागणी श्रीरामपूर साहित्यिकांतर्फे करण्यात आली आहे. 

   आंतरराष्ट्रीय किर्ती असलेल्या शिर्डीचे साईबाबा संस्थान हे जगात श्रद्धाभावाचे तीर्थस्थान आहे.श्रद्धा आणि सबुरी ही  जीवनमूल्ये जपणारे, चरित्र आणि चारित्र्य,अभ्यास आणि भक्तीध्यास, संस्कृती आणि सदवृत्ती,शुद्धविचारांची पत्रकारिता, सामाजिक सेवाभाव,साहित्य आणि  परंपरा अशा गुणवत्तेने वाटचाल करणारे पत्रकार प्रकाश कुलथे जिल्ह्यातील साहित्यिकांचे आवडते व्यक्तिमत्व आहेत. श्रीरामपूर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष,महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष, राज्य  अधिस्वीकृती समितीचे सदस्य,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त उपाध्यक्ष, श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णंकार संस्था श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक  उपाध्यक्ष,वाचन संस्कृती प्रतिष्ठान, श्रीरामपूर संस्थेचे उपाध्यक्ष, साहित्य प्रबोधन मंच, श्रीरामपूरचे माजी अध्यक्ष, टाकळीभान येथील साहित्य परिवाराचे संस्थापक सदस्य, वर्ल्ड सामनाचे मुख्य संपादक, दिवाळी अंकाचे मुख्य संपादक अशा विविध संस्था आणि सेवाकार्यात सदैव सहभागी असलेले पत्रकार प्रकाश कुलथे हे श्रीसाईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा आदर्श जपत कार्य करतील असा आम्हा साहित्यिकांना विश्वास आहे, तरी त्यांची साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी निवड व्हावी अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष कामगार नेते अविनाश आपटे, माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्रा डॉ बाबुराव उपाध्ये, नामदेवराव देसाई, सुखदेव सुकळे, डॉ.  शिवाजी काळे,कवी  पोपटराव पटारे, डॉ रामकृष्ण जगताप,कवयित्री  संगीता फासाटे कटारे, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, पत्रकार शौकतभाई शेख,आदी साहित्यिक, पदाधिकारी यांनी केली आहे.

श्रीरामपूर (शौकतभाई शेख)-  येथील उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक सौ.अर्चना फटांगरे (घनवट) यांना मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल, शासनमान्य कॉमन सर्व्हिस सेंटर - समता (आरटीओ) अॉनलाईन सेवा केंद्राचे संचालक सरताज शेख यांच्या हस्ते, सर्व धर्मिय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाऊंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आरटीओ प्रतिनिधी फईम शेख,अफजल मेमन, प्रदिप नरवडे, इम्रान शेख, मतीन शेख, राजेंद्र ओमने,उमेश बागीले आदी उपस्थित होते.

आरटीओ अधिकारी अर्चना फटांगरे (घनवट) यांनी २०१५ ते १९ या आपल्या पहिल्या पोस्टींगमध्ये अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर सन २०१९ साली त्यांची बदली श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली,या ठिकाणी त्यांनी सलग दोन वर्ष आपली उत्कृष्ट कारकिर्द गाजवली, आरटीओ अधिकारी कसे असवेत हे त्यांनी आपल्या सेवा कारकिर्दीतून दाखवून दिले, हेडक्वाटर्स असो की फ्लाईंग, ज्या, ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्येक्षेत्रात सेवा बजावली त्या, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तबगारीची छाप सोडली,कोणी कितीही मोठा असो, पुढारी असो की अन्य कोणी असो, योग्य कागदपत्र असल्याखेरीज ते कामे करत नाही,शासनाने ठरवून दिलेली जबाबदारी तथा वरिष्ठांच्या आदेशाला आपली भक्ती समजून त्यांनी आजवर आपली सेवा बजावली, श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे कार्येक्षेत्र तसे खुप मोठे आहे, अकोले, संगमनेर, कोपरगांव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर,नेवासा असे तब्बत सात तालुक्याचा कारभार या कार्यालयांतर्गत येतो,सहजिकच सात तालुक्यातील नागरीक आपल्या कामानिमित्त या कार्यालयात येतात,या कार्यालयात आपल्या कामानिमित्त आलेल्या नागरीकांची नेहमीच मोठी वर्दळ असते,वाहन चालविण्याचे कच्चे, पक्के लायसन्स सोबत वाहन पासिंग आणि इतर आरटीओतील कामे हाताळताना त्यांनी मोठ्या संयमाने आपली सेवा बजावली, सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्येंत सातत्याने विना ब्रेक कामे करणारी महिला आरटीओ अधिकारी म्हणून सौ.फटांगरे मॅडम यांनी वेगळीच ख्याती प्राप्त केलेली आहे, शासनाने त्यांच्या या उत्कृष्ट कर्तबगारीची दखल घेऊन  मोटार वाहन निरीक्षकपदी त्यांना पदोन्नती दिल्याने तथा बुलढाणा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पोस्टिंग मिळाल्याने खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या उज्वल कार्याची पावतीच मिळाली आहे, अहमदनगर व श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाप्रमाणेच त्या बुलढाणा आरटीओत देखील आपल्या उत्कृष्ट कार्याची छाप सोडतील यात शंका नाही,

त्यांच्या पदोन्नती निमित्त येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे साहेब,समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख,समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटचे संचालक इंजि.मोहसिन शेख, समता आरटीओ अॉनलाईन सर्व्हिसेसचे संचालक सरताज शेख, मयुर मोटार ड्रायव्हिंगचे प्रतापराव शिंदे,मनोज बोहत, बाळासाहेब झेंडे यांच्यासमवेत श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील आरटीओ अधिकारी, कर्मचारी, आरटीओ प्रतिनिधी यांनी त्यांच्या पुढील भावी उज्वल कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुरी तालूक्यातील खडांबे येथील साळवे कुटूंबावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार करण्यात आला. त्या साळवे कुटूंबाला न्याय न मिळाल्यास तसेच आरोपीला पाठीशी घालणारे राहुरी येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे निलंबन झाले नाहीतर येत्या अधिवशनात काळे झेंडे दाखवण्यात येईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी आज दिनांक २५ जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी दिला. 

      राहुरी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. न्याय व्यवस्था दलित व अदिवासी समाजाला न्याय देण्यात कमी पडत आहे. तालूक्यातील खडांबे येथे अत्याचार करणाऱ्या आरोपींना पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पाठीशी घालण्याचे काम केले. येत्या आठ दिवसांत पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निलंबित केले नाहीतर अहमदनगर येथील पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा तालूकाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला. या प्रसंगी डाॅ. जालिंदर घिगे यांनी सांगितले कि, कायद्याचे पालन करणारेच कायदा मानत नसेल तर अंदोलन करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना पाठिशा घालणाऱ्या अधिकाऱ्यास तातडीने निलंबित करावे. तालुक्यातील खंडाबे व कुरणवाडी येथील दोन्ही घटना अत्यंत गंभिर आहेत. छत्रपतीच्या राज्यात शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही. ते अन्यायाच्या विरोधात लढत राहिले. आम्ही त्यांच्याच मार्गावर चालत आहोत. 

        यावेळी बोलताना ॲड. भाऊसाहेब पवार म्हणाले कि, राहुरी पंचायत समितिचा सदस्य बाळासाहेब लटके यासह त्याच्या कुटूंबियाने साळवे कुटूंबियांना मारहाण करुन जातिवाचक शिविगाळ केली होती. मात्र राहुरीचे पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी साळवे कुटूंबाची खरी तक्रार न घेता चुकीची फिर्याद घेतली. त्याचवेळी ॲट्रोसिटी का दाखल केली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन मोर्चा काढण्याचे निवेदन दिले. तेव्हा तब्बल पंधरा दिवसाने राहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल. निवेदन देताच का लगेच आरोपींना अटक केली? याचा अर्थ काय? की पोलिस या आरोपींना पाठिशी घालत होते?

        यावेळी बौध्द महासभेचे गौतम पगारे, बाबुराव मकासरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून राहुरी पोलिस ठाण्याच्या कारभारा बाबत नाराजगी व्यक्त केली. या अंदोलनात पिंटूनाना साळवे, सलिम शेख, बाळासाहेब बर्डे, ईश्वर खिलारी, सुनिल ब्राम्हणे, रविंद्र गायकवाड, गोरख थोरात, खडांबे येथिल पिडीत कुटूंबातील महिला, मुलगा व मुलगी यासह अनेक कार्यकर्ते अंदोलनात सामिल झाले होते.

         यावेळी निवेदन स्विकरतांना पोलिस उपधिक्षक राहुल मदने यांनी अंदोलनकांना सांगितले की, तुम्हाला पुन्हा अंदोलन करण्याची गरज पडणार नाही. यावेळी अंदोलकांनी प्रश्न केला की पोलिस निरिक्षक दुधाळ यांना निलंबित कधी करणार? तेव्हा संबधित घटने बाबत चौकशी करून जिल्हा पोलिस अधिक्षकाकडे सर्व अहवाल पाठवण्यात येईल व न्याय दिला जाईल. असे मदने यांनी सांगितले.

दिनांक २५ रोजी मौजे टाकळीमियाँ येथे कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आला. या प्रशिक्षण वर्गास मंडळ.कृषि अधिकारी राहुरी प्रशांत डहाळे, कृषि पर्यवेक्षक तुळशिराम पवार, कृषि सहायक शिवप्रसाद कोहकडे ,कृषि भिमराज गडधे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते .

या प्रशिक्षण वर्गात भिमराज गडधे यांनी कापुस लागवड व एकात्मिक खत व्यवस्थापन तसेच किड व रोग नियंत्रण या बाबत मार्गदर्शन केले .कृषि पर्यवेक्षक तुळशिराम पवार यांनी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क तयार करणे व त्याचा वापर कसा करावा या बाबत मार्गदर्शन केले. कृषि सहायक शिवप्रसाद कोहकडे यांनी सोयाबीन पिकावर येणारी किड व रोग यांची ओळख व नियंत्रण करण्यासाठी उपाय योजनांची माहीती दिली तसेच या वेळी निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्याक्षीक दाखविण्यात आले ,

या वेळी साहेबराव निमसे, संजय तोडमल, बाबासाहेब करपे, साहेबराव गायकवाड, दत्तात्रय नलावडे, बाबासाहेब ढोबळे, अजित करपे, दादासाहेब जाधव, गणेश तोडमल, गणेश निमसे, अक्षय करपे, अक्षय घोडके, सोमनाध सगळगिळे,  ऋषिकेश घोडके उपस्थित होते.



राहुरी-(प्रतिनिधी मिनाष पटेकर)-दिनांक २४ जून रोजी मौजे वळण येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत बोलताना तज्ञ कृषी पर्यवेक्षक श्री शिवाजी कोरडे म्हणाले की कापूस लागवड करताना एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी शेतकऱ्यांना शेतीशाळा, शेतीचे नियोजन व खर्चात बचत याबाबत खेळाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहाय्यक चंद्रकांत म्हसे यांनी खताची बचत, सोयाबीन पिक व्यवस्थापन व शासनाच्या विविध योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर, सहाय्यक कृषी अधिकारी भिमराज गडधे,मंगेश बनकर, आकाश गोरे, सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे,सदस्य अशोकराव खुळे,अशोकराव कुलट,माजी सरपंच बाबासाहेब खुळे,दत्तात्रय खुळे,ज्ञानेश्वर खुळे, युनुस शेख,सारंगधर खुळे,अर्जुन आढाव,बाळासाहेब खुळे, बाबासाहेब मकासरे, अशोक काळे, षकीरचंद फुणगे,गोविंद फुणगे उपस्थित होते. हरिभाऊ डमाळे यांनी आभार प्रदर्शन केले. किसान कृषी सेवा केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले.


राहुरी-(प्रतिनिधी मिनाष पटेकर)-दिनांक २३ जून रोजी मौजे मानोरी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे ,कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर ,तुळशीराम पवार ,कृषी सहाय्यक चंद्रकांत म्हसे,भिमराज गडदे ,श्रीमती दुर्गा सहाने उपस्थित होते .सदर कार्यक्रमात श्री तुळशीराम पवार कृषी पर्यवेक्षक यांनी एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भिमराज गडधे यांनी कापूस पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले .तसेच चंद्रकांत म्हसे कृषी विभागाच्या विविध योजना व मका पिकावर अमेरिकन लष्करी आळी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास बापूसाहेब चोथे, शिवाजी पोटे, गणेश चोथे ,दत्तात्रय आढाव ,सचिन साबळे, नानासाहेब आढाव ,बन्सी शेख, पंढरीनाथ चौथे ,अशोक वाघ, बापूसाहेब वाघ,अभिषेक आढाव, नितीन चोथे ,विकास वाघ, बाळासाहेब राठोड ,दत्तात्रय आढाव ,सचिन साबळे ,शिवाजी पोटे व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.


श्रीरामपूर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने डाॅ,  शामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करण्यात आले 

यावेळी बोलताना भाजपा शहरअध्यक्ष मारूतीभाऊ बिंगले म्हणाले एक देशमे   दो निशान दो प्रधान दो संविधान नही चलेगे.असा त्यांचा मुल मंत्र होता. 

तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश  राठी यांनी सांगितले की 1951 साली भारतीय जनसंघाची स्थापना केली आज काश्मिर जो आपल्या भारतात आहे याचे सर्व श्रेय डाॅ, शामा प्रसाद मुखर्जी यांना जाते, घटनेच्या 370 या कलमास त्यांचा सक्त विरोध होता आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांच्या कालखंडात कलम 370 रद्द करण्यात आला आहे..

यावेळी मिलींदकुमार साळवे यांनी डाॅ,  शामा प्रसाद मुखर्जी यांच्या विषयी माहिती विशद केली. 

यावेळी शहरअध्यक्ष श्रीरामपूर मारूती बिंगले जिल्हा उपाध्यक्ष गणेश  राठी, सतिश सौदागर, जिल्हा अध्यक्ष सांस्कृतिक सेल बंडुकूमार शिंदे, युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव उपाध्यक्ष रूपेश हरकल सचिव अक्षय नगारे, राहुल आठवल,अक्षय वर्पे, राजेंद्र कांबळे, अजित बाबेल, मिलींदकुमार साळवे, रवी पंडित, गणेश अभंग, डाॅ ललित सावज, बाळु आहिरे, विजय आखाडे, विशाल अंभोरे, संदिप रणनवरे,दत्तु देवकाते, पंकज करमासे, ललित गाडेकर, विशाल साबळे ,रोहित मिसाळ,गणेश कुर्हे, गजानन आढाव, व भारतीय जनता पार्टी च कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.


.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget